चित्र जालावरुन साभार.
सफोरामध्ये आत शिरता शिरताच सायलीने मनगटावरील नाजूक घड्याळा कम ब्रेसलेटकडे नजर टाकली व ती शिरीन ला म्हणाली. "आटप गं. काय फाउंडेशन आणि लिपस्टिक घ्यायचं ते घे. आपल्याला उशीर व्हायला नको." आता या काळात मनगटी घड्याळ कोणी घालतं का? तुम्ही आम्ही नसू घालत पण सायली घालायची. अनेक परंपरा तिला आवडत म्हणुन ती पाळायची. वेळेची फार काटेकोर होती ती. शिवाय सबवे मध्ये, बसमध्ये उभ्याउभ्या मोबाईल कोण काढणार व वेळ पहाणार, त्यापेक्षा पटकन नजर टाकायला,घड्याळच आवडायचं तिला. इवलीशी गोल डायल असलेले, ठळक आकड्यांचे. वेळेची ती इतकी पक्की होती की डेटिंगकरताही वेळ नसे तिला. डेटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय मनणारी ती. सायली व शिरीन, दोघीजणी खरं तर आज, शिरीनच्या कामासाठी म्हणुन भेटल्या होत्या. शिरीनला आरुषला भेटायचे होते. पण तिला सायलीबरोबरच कॉफीशॉप मध्ये जायचे होते त्याला भेटायला. एकटे भेटायचे नव्हते. का तर म्हणे आकर्षक मैत्रिण बरोबर असताना, आरुष तिच्याबरोबर कसा वागतो ते तिला पडताळायचे होते.
अर्थात सायलीला पहील्यांदा, ते मान्य झालेच नव्हते. एक तर ती स्वतःला दिसावयास, अनाकर्षक समजे. आणि त्याची अजिबात तसूभरही खिन्नता तिला नव्हती. कारण तिच्या मते तिचे विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन, तिचे छंद व तिची मते, हे तिचे लुक्स मोअर दॅन ओवरकॉम्पेन्सेट करत असत. ती नार्सिसिस्ट नव्हती पण स्वतःच्या बुद्धीमत्तेचा तिला रास्त अभिमान जरुर होता. याउलट शिरीन - रुपाकडे लक्ष देणारी, स्वतःच्या आकर्षकतेबद्दल अति सजग होती. असे नव्हते की तिचे वाचन कमी होते किंवा तिला ठाम मते नव्हती पण त्या तिच्याकरता, दुय्यम बाबी होत्या. आपल्या बॉयफ्रेन्डने आपल्यावर लट्टु असलेच पाहीजे - अशी तिची वयानुरुप आणि त्या त्या वयातील स्वप्नाळू वृत्तीनुरुप, रास्त अपेक्षा होती. शेवटी, शिरीनच्या बर्याच मनधरणी नंतर असे ठरले की - सायलीने शिरीनबरोबर यायचे व प्रयत्नपूर्वक पण सटली शिरीनला सॅबोटाज करायचा प्रयत्न करायचे. अर्थात आरुषला आपणच लाटतो आहोत असे काहीसे भासवायचे. coquettish वागायचे. आणि आरुष जर गळास लागला, सायलीवरती भाळला, तर मग त्याचा पर्दा फाश झाल्यास, शिरीनने आरुषला डंप करायचे. असे काहीसे. सायलीच्या मते तिच्यावर आरुष काय कोणीच भाळणार नाही तर शिरीनचे मत आरुष सायलीवर भाळेल असे पडले व झाले!! दोघींची पैज लागली. जर आरुष सायलीवरती भाळला तर सायलीने , शिरीनला क्लिनिकचा 'अॅरोमॅटिक एलिक्झिर' पर्फ्युम भेट द्यायचा व नाही भाळला तर शिरीनने सायलीला,
ठरलेल्या प्लॅननुसार दोघी मॉलमध्ये येत्या झाल्या होत्या. पण कॉफीशॉपकडे जाताना, वाटेत लागले सफोरा, आणि अर्थात शिरीनची पावले थबकली होती. ट्रायल ट्रायल करत शिरीनने बरीचशी फुकटची रंगरंगोटी करुन घेतली होती. एक दोन कातिल सुगंधाचे फुकटचे पर्फ्युम सॅम्पल्स स्प्रे करुन, एकदाच्या दोघी बाहेर पडल्या व वेळेत कॉफी शॉपमध्ये पोचल्या. दोघींना एक बुथ मिळाला व एकेक मोका व फ्रॅपेची ऑर्डर देउन दोघी स्थानापन्न झाल्या. काही वेळातच आरुषही आला.
चष्मा,किंचित राखलेले केस, मध्यम उंची , सिल्वर फ्रेमचा चष्मा. दिसायला तो देखणा होता. बेतास बात रुप असलेल्या पुरुषांना दाढी मिशी शोभते कारण त्यांचे लुक्स लपलेले अधिक चांगले वाटतात. आरुष तर मग रुपाने चांगलाच उजवा होता. तरी त्याने मिशी व दाढीचे हिरवट खुंट ठेवलेले होते. आणि विटक्या लव्हेंडर टी शर्ट ब्लु जिन मध्ये डॅशिंग दिसत होता तो. हातात काही पुस्तके पाठीवरती बॅकपॅक, चालण्यात एक प्रकारचा सहज आलेला, आत्मविश्वास. सायलीची अपेक्षा नव्हती शिरीनचा चॉइस इतका देखणा असेल म्हणुन. धिस वॉज अ प्लेझंट सरप्राईझ. हां होती ती इन्टेलेक्च्युअल , बाह्यरुपास फारसे महत्व न देणारी पण तीही माणुस होती. ते ही तिशीतली, सिंगल आकर्षक तरुणीच होती की. अर्थात मैत्रिणीचा बी एफ, आऊट ऑफ क्वेश्चन होता. अरे काही तत्व म्हणुन असतात की नाही. शिरीनचा खास मित्र होता तो. पण आपण स्वतःला हे वारंवार का बजावतोय नक्की हे तिलाच कळत नव्हते. दोघींच्या, प्लॅनबरहुकूम सायलीने प्रयत्न चालू ठेवले होते. तिच्या परीने ती स्वतःला बेस्ट प्रेझेन्ट करत होती म्हणजे विनोद करणे, आपली मते मांडणे, आरुषची मते जमेल तिथे खोडून काढणे. पण क्वचित त्याच्या नजरेला नजर मिळाली की तिला शब्द सुचत नसत किंवा मनात आलेला नवा मुद्दा विरुनच जात असे. अनेकदा तर आरुषच मिष्किलपणे तिचा मुद्दा तिच्या ध्यानात आणुन देई - असे म्हणायचे आहे का तुम्हाला? आणि लाजेने किंचित लाल होत तिला रुकार द्यावा लागत होता. आश्चर्य म्हणजे तो शिरीनपेक्षा, सायलीकडे जास्त लक्ष पुरवत होता. धिस वॉज अ रेड रेड फ्लॅग - ती मनात म्हणत होती. आणि तरी तिला ते फ्लॅटरिंगही वाटत होते. असे वाटणे चूकीचेच होते खरं तर.
त्यात मध्येच काय की शिरीन उठली " एक्स्क्युज मी गाइज, कॅरी ऑन, मी एक फोनकॉल करुन पटकन येते." अरे देवा म्हणजे आता आपल्यालाच याला टॅकल करावे लागणार! या विचाराने सायली कावरीबावरी झाली. अरे काय हे!!! संप्रेरकांचे चढउतार अनुभवणार्या १६ वर्षाच्या आहोत काय आपण? त्यात काय घाबरायचं. तो काही खाणार नव्हता तिला. सो गप्पा रंगत राहील्या. एकमेकांना दोघेही जोखत होते. नॅचरल आहे ना - २ अनोळखी व्यक्ती कळत नकळत परस्परांना, जोखतच असतात. खरं तर जितक्या त्याच्या आवडीनिवडी तिला कळत जात होत्या तितका तिला तो स्वतःकरता एक खास मित्र म्हणुन, मिस्टर राईट आहे अशी खात्री पटत होती. मनाशीच ती विचार करत होती "अप्राप्यातील आकर्षण" असेल का हे? म्हणजे मैत्रिणीचा बी एफ आऊट ऑफ लिमिटस आहे असे वाटून तिला तो इतका आवडत होता का? ते काही का असेना, सायलीला आरुषची कंपनी खूप आवडत होती. बोलता बोलता, एका पॉइन्टला त्यानेच तिला तिचा फोन नंबर विचारला आणि परत कधी आपण भेटू शकतो का अशीही पृच्छा केली . धिस वॉज द लास्ट स्ट्रॉ ऑन कॅमल्स बॅक. सायलीने, थंड उपरोधिकपणे व संतापाने आरुषला विचारले "आय सी!! परत भेटायचे आहे का तुम्हाला? शिरीन आली की आपण शिरीनलाच काय ते विचारु यात का?" यावर आरुष मिष्किल हसत म्हणाला "पण शिरीनला कशाला यात ओढा? दोघेच भेटू यात की. वी हॅव अ लॉट इन कॉमन. " खरं तर त्याच्या या धिटाईने सायलीचे गाल आरक्त झाले होते, पायातले बळच गेले होते. " हाऊ इनकॉरिजिबल! याला काही वाटत नाही का मैत्रिणीच्या बेस्ट फ्रेन्डबरोबर फ्लर्ट करताना?" मुख्य म्हणजे व्यक्ती इतकी गोड व मिष्किल हसूच कशी शकते? शिरीनच्या भावनांशी खेळतोय हा माणुस. गोंडस फसाड च्या आडचा कावेबाज व तत्वे नसलेला माणुस आहे हा. बरं झालं हे सर्व नाटक केले नाहीतर शिरीन फशी पडली असती. काही शार्प कमेंट ती करणार त्या आधीच तिला शिरीन परत येताना दिसली.
शिरीन आली व सायलीला असे अनसेटल्ड पाहून तिने 'त' वरुन ताकभात ओळखला. हसत हसत डोळा मारत,ती आरुषला म्हणाली - "ऋष्या मिळाली का रे पुढची डेट? इतकं चिडायला लावलस माझ्या मैत्रिणीला?" आता आश्चर्याने आ वासण्याची पाळी होती सायलीची "म्हणजे? तुम्ही आधीपासून, ओळखता एकमेकांना?" यावर शिरीन हसत हसत, म्हणाली "अगदी लहानपणापासून गं. लाडका मामेभाऊ आहे माझा. तुला आधीच सांगीतलं असतं तर आली असतीस का तू भेटायला? मौल्यवान पैज जिंकायची म्हणुन करावे लागले हे सारे
ऋष्या बघ घालून दिली तुझी तुझी गाठ भेट, आता तरी मला वचन दिल्याप्रमाणे बरबेरी पर्फ्युम द्यायचास. आताच जाउन सफोरात स्टॉक चेक करुन आले आहे बघ. " आणि मॅडम तुम्हीही मला देणार आहात 'अॅरोमॅटिक एलिक्झिर' पर्फ्युम. कारण तुम्ही पैज हरला आहात याची मला खात्री आहे. लटक्या रागाने सायली म्हणाली "ए हे चिटिंग आहे हां" पण एकंदर शिरीनला डबल डबोले मिळाले. व तीघे हसत हसत कॉफीशॉपबाहेर पडले.
>>>>>माझं फारच दळण काम आहे अ
>>>>>माझं फारच दळण काम आहे अॅक्चुअली. वर्श वर्श वास घ्यायला होत नाही.

क्यूट!
क्यूट!
मस्तच लिहिलंय! कथा वाचतानाच
मस्तच लिहिलंय! कथा वाचतानाच एक टवटवीतपण जाणवतो.
शॉर्ट फिल्म खरंच होउ शकेल....+१.
शॉर्ट फिल्म खरंच होउ शकेल....
शॉर्ट फिल्म खरंच होउ शकेल....+१
खूपच गोड कथा आहे..आवडतात अशा स्वप्निल कथा वाचायला!
मनमोहन, देवकी व अथेना - आपले
मनमोहन, देवकी व अथेना - आपले आभार.
छान झाली आहे कथा! क्यूट एकदम!
छान झाली आहे कथा! क्यूट एकदम!
आवडली.
आवडली.
भास्कराचार्य & सायो धन्यवाद.
भास्कराचार्य & सायो धन्यवाद.
गोड गोष्ट! अस्मिताने नावही
छान झाली आहे कथा. आवडली.
छान झाली आहे कथा. आवडली.
सी व सामी आभारी आहे
सी व सामी आभारी आहे
मस्तच...
मस्तच...
मस्त हलकी फुलकी कथा आहे
मस्त हलकी फुलकी कथा आहे
आपापले आवडते पर्फ्युम्स प्लीज
आपापले आवडते पर्फ्युम्स प्लीज कमेंटमध्ये लिहा.
मी आज एस्टी लॉडरचा 'मॉडर्न म्युस' फारा दिवसांनी लावला आहे. काय मादक दरवळ आहे. विस्कॉन्स मध्ये असताना, पानगळीच्या थंडीत , ऑफिसला जाताना लावत असे हा. थंड वार्यात खूप खुलायचा असा अनुभव आहे.
पर्फ्युम्स स्मॄतींचा कप्पा उघडत असतो. आज विस्कॉन्सिनमध्ये गेल्यासारखे वाटते आहे. function at() { [native code] }इशय नॉस्टॅल्जिक झालेले आहे.
वन अँड ओन्ली- एलिझाबेथ आर्डेन
वन अँड ओन्ली- एलिझाबेथ आर्डेन ...
ओह. ट्राय केला पाहीजे.
ओह. ट्राय केला पाहीजे.
व्हायलेट आईज बाय इलिझाबेथ
व्हायलेट आईज बाय इलिझाबेथ टेलर एकदाच वापरला, टेक्सासच्या वास्तव्यात. नंतर मिळालाच नाही.
मेसीज मध्ये मिळेल सामो ..
मेसीज मध्ये मिळेल सामो ..
धन्यवाद.
धन्यवाद.
खूप छान आवडली कथा
खूप छान
आवडली कथा
https://youtu.be/EPDQUE6aSOk
https://youtu.be/EPDQUE6aSOk
आरती माझी कथा इतकी मस्त वाचल्याबद्दल खूप खूप आभार. हावभाव, भावनांचे चढ-उतार परफेक्ट!!! फार मजा आली.
मस्त आहे कथा, हलकी फुलकी.
मस्त आहे कथा, हलकी फुलकी. माझं सध्याचं आवडतं पर्फ्युम आहे , molecule one . A shape shifting perfume, as described by the makers
तुमचा मॉलेक्युल वन पर्फ्युम
तुमचा मॉलेक्युल वन पर्फ्युम आयकॉनिक दिसतोय. मी कधीतरी आधी सँपल ट्राय करुन आवडला तर घेइन. त्याचा रिव्ह्यु वाचला -
Why is it a cult product?
First of all, the scent is based on one main ingredient and is designed to work with pheromones in your skin. It sinks in and then resurfaces after about 15 min as your own personal scent. The key is to leave it for a couple of minutes to ‘kick in’.
वर्णन छान आहे.
आवडली मस्त कथा आहे.
आवडली मस्त कथा आहे.
गोड गोष्ट !! खूप आवडली...
गोड गोष्ट !! खूप आवडली...
धन्यवास संजना
धन्यवास संजना
पल्लवि, विको, सायो आभार
पल्लवि, विको, आभार
सामो, कथा खूप आवडली. अगदी
सामो, कथा खूप आवडली. अगदी छानच! रिफ्रेशिंग एकदम.
मामी म्हणतात तसं शॉर्ट फिल्म खरंच होउ शकेल.
धन्यवाद.
धन्यवाद.
या कथेचे बीज थोड्याफार फरकाने
या कथेचे बीज थोड्याफार फरकाने, आ बैल मुझे मार - https://www.maayboli.com/node/84465 वरुन घेतलेले आहे.
Pages