अंध डेट आणि गंध भेट

Submitted by सामो on 2 August, 2022 - 19:39

चित्र जालावरुन साभार.

सफोरामध्ये आत शिरता शिरताच सायलीने मनगटावरील नाजूक घड्याळा कम ब्रेसलेटकडे नजर टाकली व ती शिरीन ला म्हणाली. "आटप गं. काय फाउंडेशन आणि लिपस्टिक घ्यायचं ते घे. आपल्याला उशीर व्हायला नको." आता या काळात मनगटी घड्याळ कोणी घालतं का? तुम्ही आम्ही नसू घालत पण सायली घालायची. अनेक परंपरा तिला आवडत म्हणुन ती पाळायची. वेळेची फार काटेकोर होती ती. शिवाय सबवे मध्ये, बसमध्ये उभ्याउभ्या मोबाईल कोण काढणार व वेळ पहाणार, त्यापेक्षा पटकन नजर टाकायला,घड्याळच आवडायचं तिला. इवलीशी गोल डायल असलेले, ठळक आकड्यांचे. वेळेची ती इतकी पक्की होती की डेटिंगकरताही वेळ नसे तिला. डेटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय मनणारी ती. सायली व शिरीन, दोघीजणी खरं तर आज, शिरीनच्या कामासाठी म्हणुन भेटल्या होत्या. शिरीनला आरुषला भेटायचे होते. पण तिला सायलीबरोबरच कॉफीशॉप मध्ये जायचे होते त्याला भेटायला. एकटे भेटायचे नव्हते. का तर म्हणे आकर्षक मैत्रिण बरोबर असताना, आरुष तिच्याबरोबर कसा वागतो ते तिला पडताळायचे होते.
अर्थात सायलीला पहील्यांदा, ते मान्य झालेच नव्हते. एक तर ती स्वतःला दिसावयास, अनाकर्षक समजे. आणि त्याची अजिबात तसूभरही खिन्नता तिला नव्हती. कारण तिच्या मते तिचे विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन, तिचे छंद व तिची मते, हे तिचे लुक्स मोअर दॅन ओवरकॉम्पेन्सेट करत असत. ती नार्सिसिस्ट नव्हती पण स्वतःच्या बुद्धीमत्तेचा तिला रास्त अभिमान जरुर होता. याउलट शिरीन - रुपाकडे लक्ष देणारी, स्वतःच्या आकर्षकतेबद्दल अति सजग होती. असे नव्हते की तिचे वाचन कमी होते किंवा तिला ठाम मते नव्हती पण त्या तिच्याकरता, दुय्यम बाबी होत्या. आपल्या बॉयफ्रेन्डने आपल्यावर लट्टु असलेच पाहीजे - अशी तिची वयानुरुप आणि त्या त्या वयातील स्वप्नाळू वृत्तीनुरुप, रास्त अपेक्षा होती. शेवटी, शिरीनच्या बर्‍याच मनधरणी नंतर असे ठरले की - सायलीने शिरीनबरोबर यायचे व प्रयत्नपूर्वक पण सटली शिरीनला सॅबोटाज करायचा प्रयत्न करायचे. अर्थात आरुषला आपणच लाटतो आहोत असे काहीसे भासवायचे. coquettish वागायचे. आणि आरुष जर गळास लागला, सायलीवरती भाळला, तर मग त्याचा पर्दा फाश झाल्यास, शिरीनने आरुषला डंप करायचे. असे काहीसे. सायलीच्या मते तिच्यावर आरुष काय कोणीच भाळणार नाही तर शिरीनचे मत आरुष सायलीवर भाळेल असे पडले व झाले!! दोघींची पैज लागली. जर आरुष सायलीवरती भाळला तर सायलीने , शिरीनला क्लिनिकचा 'अ‍ॅरोमॅटिक एलिक्झिर' पर्फ्युम भेट द्यायचा व नाही भाळला तर शिरीनने सायलीला,
ठरलेल्या प्लॅननुसार दोघी मॉलमध्ये येत्या झाल्या होत्या. पण कॉफीशॉपकडे जाताना, वाटेत लागले सफोरा, आणि अर्थात शिरीनची पावले थबकली होती. ट्रायल ट्रायल करत शिरीनने बरीचशी फुकटची रंगरंगोटी करुन घेतली होती. एक दोन कातिल सुगंधाचे फुकटचे पर्फ्युम सॅम्पल्स स्प्रे करुन, एकदाच्या दोघी बाहेर पडल्या व वेळेत कॉफी शॉपमध्ये पोचल्या. दोघींना एक बुथ मिळाला व एकेक मोका व फ्रॅपेची ऑर्डर देउन दोघी स्थानापन्न झाल्या. काही वेळातच आरुषही आला.
चष्मा,किंचित राखलेले केस, मध्यम उंची , सिल्वर फ्रेमचा चष्मा. दिसायला तो देखणा होता. बेतास बात रुप असलेल्या पुरुषांना दाढी मिशी शोभते कारण त्यांचे लुक्स लपलेले अधिक चांगले वाटतात. आरुष तर मग रुपाने चांगलाच उजवा होता. तरी त्याने मिशी व दाढीचे हिरवट खुंट ठेवलेले होते. आणि विटक्या लव्हेंडर टी शर्ट ब्लु जिन मध्ये डॅशिंग दिसत होता तो. हातात काही पुस्तके पाठीवरती बॅकपॅक, चालण्यात एक प्रकारचा सहज आलेला, आत्मविश्वास. सायलीची अपेक्षा नव्हती शिरीनचा चॉइस इतका देखणा असेल म्हणुन. धिस वॉज अ प्लेझंट सरप्राईझ. हां होती ती इन्टेलेक्च्युअल , बाह्यरुपास फारसे महत्व न देणारी पण तीही माणुस होती. ते ही तिशीतली, सिंगल आकर्षक तरुणीच होती की. अर्थात मैत्रिणीचा बी एफ, आऊट ऑफ क्वेश्चन होता. अरे काही तत्व म्हणुन असतात की नाही. शिरीनचा खास मित्र होता तो. पण आपण स्वतःला हे वारंवार का बजावतोय नक्की हे तिलाच कळत नव्हते. दोघींच्या, प्लॅनबरहुकूम सायलीने प्रयत्न चालू ठेवले होते. तिच्या परीने ती स्वतःला बेस्ट प्रेझेन्ट करत होती म्हणजे विनोद करणे, आपली मते मांडणे, आरुषची मते जमेल तिथे खोडून काढणे. पण क्वचित त्याच्या नजरेला नजर मिळाली की तिला शब्द सुचत नसत किंवा मनात आलेला नवा मुद्दा विरुनच जात असे. अनेकदा तर आरुषच मिष्किलपणे तिचा मुद्दा तिच्या ध्यानात आणुन देई - असे म्हणायचे आहे का तुम्हाला? आणि लाजेने किंचित लाल होत तिला रुकार द्यावा लागत होता. आश्चर्य म्हणजे तो शिरीनपेक्षा, सायलीकडे जास्त लक्ष पुरवत होता. धिस वॉज अ रेड रेड फ्लॅग - ती मनात म्हणत होती. आणि तरी तिला ते फ्लॅटरिंगही वाटत होते. असे वाटणे चूकीचेच होते खरं तर.
त्यात मध्येच काय की शिरीन उठली " एक्स्क्युज मी गाइज, कॅरी ऑन, मी एक फोनकॉल करुन पटकन येते." अरे देवा म्हणजे आता आपल्यालाच याला टॅकल करावे लागणार! या विचाराने सायली कावरीबावरी झाली. अरे काय हे!!! संप्रेरकांचे चढउतार अनुभवणार्‍या १६ वर्षाच्या आहोत काय आपण? त्यात काय घाबरायचं. तो काही खाणार नव्हता तिला. सो गप्पा रंगत राहील्या. एकमेकांना दोघेही जोखत होते. नॅचरल आहे ना - २ अनोळखी व्यक्ती कळत नकळत परस्परांना, जोखतच असतात. खरं तर जितक्या त्याच्या आवडीनिवडी तिला कळत जात होत्या तितका तिला तो स्वतःकरता एक खास मित्र म्हणुन, मिस्टर राईट आहे अशी खात्री पटत होती. मनाशीच ती विचार करत होती "अप्राप्यातील आकर्षण" असेल का हे? म्हणजे मैत्रिणीचा बी एफ आऊट ऑफ लिमिटस आहे असे वाटून तिला तो इतका आवडत होता का? ते काही का असेना, सायलीला आरुषची कंपनी खूप आवडत होती. बोलता बोलता, एका पॉइन्टला त्यानेच तिला तिचा फोन नंबर विचारला आणि परत कधी आपण भेटू शकतो का अशीही पृच्छा केली . धिस वॉज द लास्ट स्ट्रॉ ऑन कॅमल्स बॅक. सायलीने, थंड उपरोधिकपणे व संतापाने आरुषला विचारले "आय सी!! परत भेटायचे आहे का तुम्हाला? शिरीन आली की आपण शिरीनलाच काय ते विचारु यात का?" यावर आरुष मिष्किल हसत म्हणाला "पण शिरीनला कशाला यात ओढा? दोघेच भेटू यात की. वी हॅव अ लॉट इन कॉमन. " खरं तर त्याच्या या धिटाईने सायलीचे गाल आरक्त झाले होते, पायातले बळच गेले होते. " हाऊ इनकॉरिजिबल! याला काही वाटत नाही का मैत्रिणीच्या बेस्ट फ्रेन्डबरोबर फ्लर्ट करताना?" मुख्य म्हणजे व्यक्ती इतकी गोड व मिष्किल हसूच कशी शकते? शिरीनच्या भावनांशी खेळतोय हा माणुस. गोंडस फसाड च्या आडचा कावेबाज व तत्वे नसलेला माणुस आहे हा. बरं झालं हे सर्व नाटक केले नाहीतर शिरीन फशी पडली असती. काही शार्प कमेंट ती करणार त्या आधीच तिला शिरीन परत येताना दिसली.
शिरीन आली व सायलीला असे अनसेटल्ड पाहून तिने 'त' वरुन ताकभात ओळखला. हसत हसत डोळा मारत,ती आरुषला म्हणाली - "ऋष्या मिळाली का रे पुढची डेट? इतकं चिडायला लावलस माझ्या मैत्रिणीला?" आता आश्चर्याने आ वासण्याची पाळी होती सायलीची "म्हणजे? तुम्ही आधीपासून, ओळखता एकमेकांना?" यावर शिरीन हसत हसत, म्हणाली "अगदी लहानपणापासून गं. लाडका मामेभाऊ आहे माझा. तुला आधीच सांगीतलं असतं तर आली असतीस का तू भेटायला? मौल्यवान पैज जिंकायची म्हणुन करावे लागले हे सारे Happy ऋष्या बघ घालून दिली तुझी तुझी गाठ भेट, आता तरी मला वचन दिल्याप्रमाणे बरबेरी पर्फ्युम द्यायचास. आताच जाउन सफोरात स्टॉक चेक करुन आले आहे बघ. " आणि मॅडम तुम्हीही मला देणार आहात 'अ‍ॅरोमॅटिक एलिक्झिर' पर्फ्युम. कारण तुम्ही पैज हरला आहात याची मला खात्री आहे. लटक्या रागाने सायली म्हणाली "ए हे चिटिंग आहे हां" पण एकंदर शिरीनला डबल डबोले मिळाले. व तीघे हसत हसत कॉफीशॉपबाहेर पडले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रेश कथा.

शीर्षकं बघ, गमतीतच लिहिलंय. Happy
फुकटचा पर्फ्यूम
मॅचमेकिंग आणि सफोरा
डेटची 'भेट' (भेटवर श्लेष आहे.)
चक्रव्यूह बरबेरीचे
अंध डेट आणि गंध भेट
(Blind dateचे अंध डेट केलेय लोकसत्ता स्टाईल)
एकीला मिळाला गंध, दुसरीला नाजुक बंध

एके ठिकाणी सायलीचे लीना झालेय.

खी: खी: तू सुचवलेलं, 'अंध डेट आणि गंध भेट' शीर्षक देते Happy
>>>>>>>>एके ठिकाणी सायलीचे लीना झालेय.
दुरुस्त केलेले आहे.

>>>>>एकीला मिळाला गंध, दुसरीला नाजुक बंध
वॉव!! कसली मस्त शीर्षकं सुचतात ग तुला.

संप्रेरक म्हणजे काय?
एक छानशी शॉर्ट फिल्म होऊ शकेल इतकी मस्त स्क्रिप्ट आहे...

शॉर्ट फिल्म खरंच होउ शकेल. नक्की विचार करा. शैली जमली आहे.
ह्या अशा क्षणांसाठी तर आम्ही जीव तोडुन बॅक एंडला कामे करीत असतो. कोणती पण इत्र कंपनी स्पॉन्सर करेल. आमच्या कंपनीत फारच पूर्वी तीन बारक्या बाटल्यांचे एक त्रि त गिफ्ट पॅक यायचे. रोमान्स , सोनिया व अजून एक असे होते अजून लोक त्याच्या आठ वणी काढतात.

. खरच काय मस्त काम आहे तुमच.>> माझं फारच दळण काम आहे अ‍ॅक्चुअली. वर्श वर्श वास घ्यायला होत नाही. पण त्याचा बाह्य परिणाम तुम्ही रंगवला आहे तसा होतो हे ब्येस्ट.

आमच्या गिफ्ट पॅकेटचे मध्ये तीन होते ते रोमान्स सोनिया व माय चॉइस. अजुनही क्रॉफर्ड मार्केट मध्ये कुठे तरी दिसेल.

अरे वाह मस्त कथा आहे.. आणि किती सुंदर लिहिलीय.. एखाद्या वीस बावीस वर्षाच्या लेखिकेने लिहावी अशी.. फ्रेश शैली +७८६

बेतास बात रुप असलेल्या पुरुषांना दाढी मिशी शोभते कारण त्यांचे लुक्स लपलेले अधिक चांगले वाटतात. >>> नोटेड Happy

छान

अरे मस्त.. visualize झाली अगदी. शॉर्ट फिल्म किंवा परफ्यूम कंपनीच्या जाहिरातीसाठी खरंच खूप मस्त स्क्रिप्ट आहे.

सर्वांचे आभार Happy

काल कथा लिहायला सुरुवात केली. काहीही प्लॉट मनात नव्हता पण तिशीतल्या. अमेरिकेतल्या २ स्त्रियांची हलकी फुलकी कथा लिहायचे असे ठरविले होते. ग्लॅमरस करायची होती खरं तर. कारण मला स्वतःला तशा म्हणजे ग्लॅमरस कथा प्रचंड आवडतात. पण प्लॉट बनत गेला.

कथा आवडली हे कळवल्याबद्दल सर्व प्रतिसाददात्यांचे तसेच सर्व वाचकांचे आभार.

Pages