आज गोकुळात रंग खेळतो हरी

Submitted by अश्विनीमामी on 31 July, 2022 - 11:22

श्रावण महिना सुरू झाला. व्रत वैकल्यांची, उपास- तापासाची, पत्री-फुले गोळा करण्याची लगबग चालू झाली. पुरणा - वरणाचे नैवेद्य बनवणे, संपूर्ण चातुर्मास पुस्तकातील कहाण्या व आरत्या ह्यांची उजळणी करणे सुरू झाले. आदित्य राणू बाई, पाट माधव राणी, चिमादेव राणी, अशी नावे ऐकुन खुदकन हसायला येते हे ही नेहमीचेच. एक महत्वाचा सण म्हणजे गोकुळ अष्टमी व त्यानंतरची दही हंडीची धमाल. दोन वर्षे लॉकडाउनमध्ये काढल्यानंतर ह्या वेळी गोपाळांचा व गोपिकांचा उत्साह ओसंडून वाहात आहे. तो शब्दबद्ध करायला ही श्रावणातली प्लेलिस्ट श्रीकृष्णार्पण.

केशवाचे गोकुळातले नंदाघरचे बाळ पण व किशोर पण म्हणजे एक मनोरम आनंद सोहळा आहे. एकदा ते सुटले की पुढे घनघोर जीवन लढाई व अवतारकार्य पूर्ण करणे हा अवघड कर्तव्यनिष्ठ भाग चालू होतो. पण हे सर्व नंतर. आत्ता तर जन्म घेउन हे अलौकिक बालक नंदा घरी सुरक्षित पोहोचले आहे. इतर गोप बालकांबरोबर वाढत आहे. लोणी मटकावत आहे.

१) आज गोकुळात रंग खेळतो हरी:

https://www.youtube.com/watch?v=aEM1xZZ_WB0

टिपर्‍यांचा खेळ रंगला आहे. रंग टाकायची गंमत चालू आहे. खोड्या करणे हा तर नैसर्गिक स्वभावच आहे ह्याचा. राधिके घरी जाताना जरा इकडे तिकडे बघ. सख्या सांगत आहेतः

आज गोकुळात रंग खेळ तो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवुनी रंगतो गुलाल फासतो सांगते तुला मी अजुनही परोपरी

सांग शाम सुंदरास काय जाहले रंग टाकल्याविना कुणा न सोडले.
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले एकटीच वाचशील काय तू तरी

त्यातिथे अनंग रंग रास रंगला गोप गोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा... तो पहा मृदंग मंजिर्‍यांत वाजला हाय वाजली फिरून तीच बासरी.

राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.

कविवर्य सुरेश भटांची रचना व पं. मंगेशकरांनी संगीत दिले आहे. शाळेत गॅदरिं ग मधे ह्या गाण्यावर एक नाच नक्की असायचा. जीवनाचा समरसुन उपभोग घ्यायचा तर ह्या खोड्यांना प्रतिसाद दिला पाहिजे . तालातली लय शोधली पाहिजे. टिपर्‍यांच्या नादात हरवले पाहिजे तो कान्हा तोल संभाळून घेइलच.

२) झुलतो बाई रास झुला:
https://www.youtube.com/watch?v=3Yh_IJX-C3c

राधिकेचे मनोगतः

झुलतो बाई रास झुला, नभ निळे रात निळी कान्हा ही निळा,..
वार्‍याची वेणू फांद्यांच्या टिपर्‍या गुंफ तात गोफ चांदण्यात छाया.
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा......

प्राणहीन भासे रासाचा रंग रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहिकडे मज दिसे हरी सावळा.....

गुंतलास कोठे नंद नंदना तू राधेच्या रमणा केव्हा येशील तू
घट धरे रात सरे ऋतु चालला....

सुधीर मोघे ह्यांचे काव्य आहे. किती सरळ रचना अगदी मनापासुनची.


३) नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम

https://www.youtube.com/watch?v=RiuJSTIcM3U

सुधीर फडके आशा भोसले ह्यांचे एक अजरामर गीत सोबत सुरेख पेटी वाजवली आहे. एक सच्ची भावना प्रतीत होते.

विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम
कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी
जन्म भरीच्या श्वासाइतुके मोजियले हरी नाम...

बाळ गुराखी यमुने वरचा गुलाम काळा संतां घरचा
हाच तुक्याचा विट्ठठल आणि दासाचा श्रीराम

जितु के मालक तितकी नावे ह्रुदये तितुकी ह्याची गावे
कुणीही ओळखे तरीही ह्याला दीन अनाथ अनाम..

गदिमांचे सिद्धहस्त कवित्व.

४) भरजरी ग पितांबर दिला फाडून

https://www.youtube.com/watch?v=DMB0rxXSQdA

श्यामची आई चित्रपटातील अगदी भावुक करुन सोडणारे गाणे. मी ह्या पुस्तकाची फॅन आहे. काय पॅकेज काढायचे ते काढा. पण आईबरोबरची लाडघरची सहल. बैलगाडीतून रात्री जाताना वर तारे बघत आईच्या मांडीवर झोपी गेलेला श्याम ही माझी अल्टिमेट पेरेंटिन्ग
फँटसी आहे. राधिके बरोबरचे एक नाते तर फार पुढे आलेले द्रौपदी बरोबरचे बहीण व मैत्रीण ह्याच्या अधले मधले इतरांना न समजणारे बंध . पण हे नाते नसते तर तो कान्हाही अपूराच वाटला असता. असे मैत्र सर्वांना लाभो.

भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. अगदी साधा ठेका आपण बाळाला झोपवताना अलगद थोपटतो तसा
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेले नारद म्हणून

बोट श्रीहरीचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर देइ.
सुभद्रा बोलली शालू नी पैठणी फाडूनी का देउ चिंधी तुम्हासि मी

पाठची बहीण झाली वैरीण......

द्रौपदी बोलली हरीची मी कोण , परी मला त्याने मानिली बहीण.
काळजाची चिंधी काढून देइन एव्ढे त्याचे माझ्यावरी ऋण

वसने देउन प्रभू राखी माझी लाज चिंधी साठी आला हरी माझ्या दारी आज
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ति तैसा नारायण.
रक्ताच्या नात्याने उपजे नाप्रेम पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोचि भाउ धन्य ती बहीण प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिन्धी पाहुन हरी झाले प्रसन्न.

ह्या भावनेला व्यक्त करायला जास्त शब्दांची गरज नाहीच.

५) राधाधर मधु मिलिंद जय जय

https://www.youtube.com/watch?v=bxYQleAtIN8

एक नाट्य संगीत न राहवुन देत आहे. संस्कृत काव्य आहे राहुल आपला जानी आव्डता व आनंद भाटे स्पॉटि फाय वर श्री रामदास कामत ह्यांनी गायलेली हीच रचना उपलब्ध आहे. ती जास्त छान आहे. राहुलने एकट्यानेही म्हणलेली आहे.

राधाधरमधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद कालिंदी-तट-पुलिंद-लांछित सुरतनुपादारविंद जय जय उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद जय जय गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद जय जय

६) कन्ना निदुरुंचरा

https://www.youtube.com/watch?v=Q-AV9KMLTFc

बाहुबली दोन मधले आहे मूळ तेलुगु गाणेच ऐका. हैद्राबादेतील ज्युबिलि हिल्स स्थित एखाद्या प्रचंड प्रासादात - एखादी रेड्डी कन्यका तिच्या मैत्रीणी व आई ह्या खेळून दमलेल्या बालकाला झोपवत आहेत. असे वाट्ते. अनुश्का रॉक्स. भक्ती व प्रीती दोन्ही रस इथे ऐकायला मिळतात. गोड रचना आहे. व कान्ह्याची नावे तरी किती ती वापरली आहेत अगदी चतुराईने. ह्याची हिंदी आवृत्ती पण उपलब्ध आहे. पण त्यात तो जी पुल्ला रेड्डीच्या दुकानातल्या शुद्ध तुपात बनवलेल्या प्रसादाचा गोडवा अंमळ कमी पडतो.

आता दंगा खूप झाला आता झोप असे सांगत आहोत आपण ह्या विश्वबालकाला. ज्याचे नयन चोविस तास अठरा प्रहर उघडे राहून विश्वाचे रक्षण करत असतात. जीवित जनांचे प्राणी वनस्पतींचे पालन करतात तो हा हरी त्याला पण विश्रांती हवीच की.

मुकुंदा, माधवा, यादवा ओ वनमाळी अनिरुद्धा, आनंदा, मधुसूदना, राधारमणा.... हॅपी बर्थडे.

सर्व माबोकरांना जन्माष्ट्मीच्या शुभेच्छा. दहिपोहे काला, लोणी, प्रसाद येउ द्या. अजून गाणी श्लोक येउ द्या. दह्यांडीला सरकारने सार्वजनिक सुट्टी दिली आहे. ती बातमी वाचल्यावर सुचलेली ही गाणी आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लेख.

मला आठवलेली काही गाणी

कान्हा ना छेडो ना छेडो बासुरी - आशा भोसले - दो फूल. संगीत वसंत देसाई यांचे आहे. अतिशय मधुर गीत आहे.
सावरे सुनाओ बासुरी - लता मंगेशकर - बसेरा. आर. डी. चं संगीत, एक विलक्षण haunting effect आहे.
जो तुम तोडो पिया - लता मंगेशकर - झनक झनक पायल बाजे. संगीत वसंत देसाई. लताबाईंचा सूर शेवटी उत्कृष्ट टिपेला लागला आहे.
जैसे राधा ने माला जपी शामकी - लता मंगेशकर - तेरे मेरे सपने. संगीत सचिनदेव बर्मन. अतिगोड.

कान्हा छेडो बांसुरी
कन्हैया छेडो बांसुरी
नाचे राधा बावरी
झूमझूम के

बनवारी रे
जीने का सहारा तेरा नाम रे
मुझे दुनियावालों से क्या काम रे

मनमोहन देसाई- शम्मी कपूर -- कल्याणजी आनंदजी - राजेंद्र क्रिशन यांचं गोविंदा आला रे आला

मच गया शोर सारी नगरी रे - मराठी परवीन बाबी

छन्नुलाल मिश्रा... गाणी विलक्षण सुंदर आहेत.....

छुन्नुलालजींच्या गायनाचे वैशिष्टय म्हणजे ते गाता-गाता मधूनच गायनाचे विभिन्न पैलू उलगडून दाखवतात, आमच्यासारख्या फक्त 'कानसेन' असलेल्या लोकांची सोय Happy त्यांचे चैती, होरी, कजरी, ठुमरी, टप्पा असे उपशास्त्रीय तर फारच अवीट गोडीचे आणि अनवट. तुलसी रामायण, शिव विवाह, दुर्गा आणि शिवस्तुती ... फार सुंदर !

धन्यवाद अनिंद्य. ऐकते आता. ग्रेट सिंगर आहेत ते. 'खेले मसाने मे होरी दिगंबर खेले मसाने मे होरी' हे शिवशंकरांच्या होळीचे वर्णन व भजन तर आऊट ऑफ धिस वर्ल्ड आहे.
https://www.youtube.com/watch?v=nV88MAM-3YE

खेले मसाने मे होरी दिगंबर खेले मसाने मे होरी' हे शिवशंकरांच्या होळीचे वर्णन व भजन तर आऊट ऑफ धिस वर्ल्ड आहे.>> हे फारच वीअर्ड आहे. स्मशानात होळी. तीही दिगंबर अवस्थेत. धारपांच्या कथेत मस्त जाईल.

कुठे नेउन ठेवला बाफ माझा...... दिवे घ्या.

स्मशानात म्हनजे काय अमा , अगदी मसणवट्यात Wink
पण काय वर्णन काय वर्णन!!! Happy
-------------
पण म्हणतात ना शंकर स्मशानात वास्तव्य करतात. स्मशान दुसरे तीसरे काहीही नसून हे जगच आहे. जगालाच मृत्युभूमी म्हणतात .

आख्खा सीनच ते प्रतीक दाखवायला केलेला असतो
@फारएण्ड >>> अगदी अगदी. मराठीवालेच असे नाही पण जनरली सटल भावना, प्रतिके दाखवणे फारसे जमत नाही. प्रेक्षकांचा बुद्ध्यांक उगीच गृहित धरुन गोष्टी गिरवून गिरवून ठळक केलेल्या असतात.

अलिकडे पाहिलेला सैराटमधला असाच एक प्रतिकात्मक सीन आठवला. मोह आवरत नाही म्हणून लिहितेय. आर्ची शेजारणीशी बोलत रांगोळी घालत असते आणि त्या रांगोळीवर काळी सावली पडते. अंगावर शहारा आला होता तिथेच.

@लंपन >>> लम्हेमधिल 'मोहे छेडो ना नंद के लाला'. शिव-हरींची लाडिक चाल, श्रीदेवीचे ग्रेसफुल नृत्य व अप्रतिम मुद्राभिनय, खूपच सुंदर गाणे आहे.

@चीकू >>> जैसे राधा ने माला जपी शामकी. डायरेक्ट कृष्णाला उद्देशून नाहीये. पण गाणे गोड आहे. एकदा ऐकून समाधान होत नाही.

@सामो >>> आज अंतर्यामी भेटे पहिल्यांदाच ऐकले. अप्रतिम गाणे आहे.

सुरसंगममधले 'जाऊ तोरे चरणकमल पर वारी' हे ही आवडते.

वा. सुंदर पद. यावरून मला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ह्या गाण्याची आठवण झाली. शिवाय राधाधर मधुमिलिंद, जय जय रमा रमण हरी गोविंद.
आणि स्वयंवर मधली काही पदे.

सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ह्या गाण्याची आठवण झाली. शिवाय राधाधर मधुमिलिंद, जय जय रमा रमण हरी गोविंद.>> हो राधाधर घेतले आहे वर. त्याचे मराठीत रु पांतर लिहाना हिरा.

सांगा मुकुंद मला पण लिस्टित घ्यायचे होते. बघुन टिपण तयार केले आहे. लिहिते. घन श्याम सुंदरा पण चांगले आहे ते तर मी गात असे एके काळी.
भरत तुम्हाला ब्रीफ बरोब्बर समज्ले आहे. घरगुती चवीची मराठी बाजाची गाणी आठवूया जास्त करून. हिंदीशी काही भांडण नाही.

एक क्षण आठव ण लिहि ते: मी २०१२ मध्ये आंध्रातून मुंबईत आले तेव्हा यस आय अ‍ॅम बॅक होम फील्स फार होते. सोसायटीत गरबा नाइट होती. ही नेहमी प्रमाणे उच्च श्रीमंत गुजराती पंजाबी सिंधी लोकांनी फ्लॅट घेतलेली सोसायटी. गलका चालू होता. माझ्या ओळखीचे कोणीच नाही त्यामुळे मी इकडे तिकडे बघत चालत होते एक चक्कर टाकून जायचे वर अश्याने. तर अचानक शेजारच्या छोट्या सोसायटी/ बस्तीतून आज गोकुळात रंग खेळतो हरी.. ऐकू आले व एकदम काहीतरी सापडल्या सारखे वाटले. इतका झगम गाट प्रत्येकाला हवाच असतो असे नाही. साधा टिपरीचा नाच गोफ विणणे पण आनंद देते.

किती सांगो मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला गाण्यावर शाळेच्या गॅदरिन्ग मध्ये गोफ विणीचा नाच बघितला आहे. भले मोठी मंदिरे होतील व असतील पण मला जवळीक माह्या देवघरातल्या लग्नात मिळालेल्या बाळकृ श्णाचीच वाटते.

या स्वरबद्ध झालेल्या कविता आहेत.
कुसुमाग्रजांची गवळण वीज म्हणाली धरतीला या नाटकात आली.
स्मरशील यमुना स्मरशील राधा
स्मरशील गोकुळ सारे

दुसरी इंदिरा संतांची कुब्जा

अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ

शेवटच्या ओळीतली 'हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव' मधली उत्कटता गाण्यात पुरेपूर येत नाही.

दोन्ही कविता ऐकताना समोर चित्र उभे राहते.

>>>>दुसरी इंदिरा संतांची कुब्जा
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ
शेवटच्या ओळीतली 'हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव' मधली उत्कटता गाण्यात पुरेपूर येत नाही.
वाह!! क्या बात है!

मस्त धागा.
हा धागा रोज दिसतो आणि 'झुलतो बाई रासझुला' रोज ऐकलं जातं.
'नको वाजवू श्रीहरी मुरली ' ही एक सोपी भैरवी (हो ना?) आहे. अनेकदा आमच्या क्लासच्या शनिवारच्या कार्यक्रमात ही गायली/ वाजवली जायची असं आठवतं.
आणि एक गवळण... तुझे श्रीमुख सुंदर... मुरली नको वाजवू, नको वाजवू मनमोहना. हे रेडिओवर चिक्कार वेळा लागायचं. युट्युबवर जे माझ्या डोक्यात आहे त्या आवाजात सापडेना. Sad माणिक वर्मांचं होतं का?

Pages