आज गोकुळात रंग खेळतो हरी

Submitted by अश्विनीमामी on 31 July, 2022 - 11:22

श्रावण महिना सुरू झाला. व्रत वैकल्यांची, उपास- तापासाची, पत्री-फुले गोळा करण्याची लगबग चालू झाली. पुरणा - वरणाचे नैवेद्य बनवणे, संपूर्ण चातुर्मास पुस्तकातील कहाण्या व आरत्या ह्यांची उजळणी करणे सुरू झाले. आदित्य राणू बाई, पाट माधव राणी, चिमादेव राणी, अशी नावे ऐकुन खुदकन हसायला येते हे ही नेहमीचेच. एक महत्वाचा सण म्हणजे गोकुळ अष्टमी व त्यानंतरची दही हंडीची धमाल. दोन वर्षे लॉकडाउनमध्ये काढल्यानंतर ह्या वेळी गोपाळांचा व गोपिकांचा उत्साह ओसंडून वाहात आहे. तो शब्दबद्ध करायला ही श्रावणातली प्लेलिस्ट श्रीकृष्णार्पण.

केशवाचे गोकुळातले नंदाघरचे बाळ पण व किशोर पण म्हणजे एक मनोरम आनंद सोहळा आहे. एकदा ते सुटले की पुढे घनघोर जीवन लढाई व अवतारकार्य पूर्ण करणे हा अवघड कर्तव्यनिष्ठ भाग चालू होतो. पण हे सर्व नंतर. आत्ता तर जन्म घेउन हे अलौकिक बालक नंदा घरी सुरक्षित पोहोचले आहे. इतर गोप बालकांबरोबर वाढत आहे. लोणी मटकावत आहे.

१) आज गोकुळात रंग खेळतो हरी:

https://www.youtube.com/watch?v=aEM1xZZ_WB0

टिपर्‍यांचा खेळ रंगला आहे. रंग टाकायची गंमत चालू आहे. खोड्या करणे हा तर नैसर्गिक स्वभावच आहे ह्याचा. राधिके घरी जाताना जरा इकडे तिकडे बघ. सख्या सांगत आहेतः

आज गोकुळात रंग खेळ तो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवुनी रंगतो गुलाल फासतो सांगते तुला मी अजुनही परोपरी

सांग शाम सुंदरास काय जाहले रंग टाकल्याविना कुणा न सोडले.
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले एकटीच वाचशील काय तू तरी

त्यातिथे अनंग रंग रास रंगला गोप गोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा... तो पहा मृदंग मंजिर्‍यांत वाजला हाय वाजली फिरून तीच बासरी.

राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.

कविवर्य सुरेश भटांची रचना व पं. मंगेशकरांनी संगीत दिले आहे. शाळेत गॅदरिं ग मधे ह्या गाण्यावर एक नाच नक्की असायचा. जीवनाचा समरसुन उपभोग घ्यायचा तर ह्या खोड्यांना प्रतिसाद दिला पाहिजे . तालातली लय शोधली पाहिजे. टिपर्‍यांच्या नादात हरवले पाहिजे तो कान्हा तोल संभाळून घेइलच.

२) झुलतो बाई रास झुला:
https://www.youtube.com/watch?v=3Yh_IJX-C3c

राधिकेचे मनोगतः

झुलतो बाई रास झुला, नभ निळे रात निळी कान्हा ही निळा,..
वार्‍याची वेणू फांद्यांच्या टिपर्‍या गुंफ तात गोफ चांदण्यात छाया.
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा......

प्राणहीन भासे रासाचा रंग रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहिकडे मज दिसे हरी सावळा.....

गुंतलास कोठे नंद नंदना तू राधेच्या रमणा केव्हा येशील तू
घट धरे रात सरे ऋतु चालला....

सुधीर मोघे ह्यांचे काव्य आहे. किती सरळ रचना अगदी मनापासुनची.


३) नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम

https://www.youtube.com/watch?v=RiuJSTIcM3U

सुधीर फडके आशा भोसले ह्यांचे एक अजरामर गीत सोबत सुरेख पेटी वाजवली आहे. एक सच्ची भावना प्रतीत होते.

विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम
कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी
जन्म भरीच्या श्वासाइतुके मोजियले हरी नाम...

बाळ गुराखी यमुने वरचा गुलाम काळा संतां घरचा
हाच तुक्याचा विट्ठठल आणि दासाचा श्रीराम

जितु के मालक तितकी नावे ह्रुदये तितुकी ह्याची गावे
कुणीही ओळखे तरीही ह्याला दीन अनाथ अनाम..

गदिमांचे सिद्धहस्त कवित्व.

४) भरजरी ग पितांबर दिला फाडून

https://www.youtube.com/watch?v=DMB0rxXSQdA

श्यामची आई चित्रपटातील अगदी भावुक करुन सोडणारे गाणे. मी ह्या पुस्तकाची फॅन आहे. काय पॅकेज काढायचे ते काढा. पण आईबरोबरची लाडघरची सहल. बैलगाडीतून रात्री जाताना वर तारे बघत आईच्या मांडीवर झोपी गेलेला श्याम ही माझी अल्टिमेट पेरेंटिन्ग
फँटसी आहे. राधिके बरोबरचे एक नाते तर फार पुढे आलेले द्रौपदी बरोबरचे बहीण व मैत्रीण ह्याच्या अधले मधले इतरांना न समजणारे बंध . पण हे नाते नसते तर तो कान्हाही अपूराच वाटला असता. असे मैत्र सर्वांना लाभो.

भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. अगदी साधा ठेका आपण बाळाला झोपवताना अलगद थोपटतो तसा
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेले नारद म्हणून

बोट श्रीहरीचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर देइ.
सुभद्रा बोलली शालू नी पैठणी फाडूनी का देउ चिंधी तुम्हासि मी

पाठची बहीण झाली वैरीण......

द्रौपदी बोलली हरीची मी कोण , परी मला त्याने मानिली बहीण.
काळजाची चिंधी काढून देइन एव्ढे त्याचे माझ्यावरी ऋण

वसने देउन प्रभू राखी माझी लाज चिंधी साठी आला हरी माझ्या दारी आज
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ति तैसा नारायण.
रक्ताच्या नात्याने उपजे नाप्रेम पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोचि भाउ धन्य ती बहीण प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिन्धी पाहुन हरी झाले प्रसन्न.

ह्या भावनेला व्यक्त करायला जास्त शब्दांची गरज नाहीच.

५) राधाधर मधु मिलिंद जय जय

https://www.youtube.com/watch?v=bxYQleAtIN8

एक नाट्य संगीत न राहवुन देत आहे. संस्कृत काव्य आहे राहुल आपला जानी आव्डता व आनंद भाटे स्पॉटि फाय वर श्री रामदास कामत ह्यांनी गायलेली हीच रचना उपलब्ध आहे. ती जास्त छान आहे. राहुलने एकट्यानेही म्हणलेली आहे.

राधाधरमधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद कालिंदी-तट-पुलिंद-लांछित सुरतनुपादारविंद जय जय उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद जय जय गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद जय जय

६) कन्ना निदुरुंचरा

https://www.youtube.com/watch?v=Q-AV9KMLTFc

बाहुबली दोन मधले आहे मूळ तेलुगु गाणेच ऐका. हैद्राबादेतील ज्युबिलि हिल्स स्थित एखाद्या प्रचंड प्रासादात - एखादी रेड्डी कन्यका तिच्या मैत्रीणी व आई ह्या खेळून दमलेल्या बालकाला झोपवत आहेत. असे वाट्ते. अनुश्का रॉक्स. भक्ती व प्रीती दोन्ही रस इथे ऐकायला मिळतात. गोड रचना आहे. व कान्ह्याची नावे तरी किती ती वापरली आहेत अगदी चतुराईने. ह्याची हिंदी आवृत्ती पण उपलब्ध आहे. पण त्यात तो जी पुल्ला रेड्डीच्या दुकानातल्या शुद्ध तुपात बनवलेल्या प्रसादाचा गोडवा अंमळ कमी पडतो.

आता दंगा खूप झाला आता झोप असे सांगत आहोत आपण ह्या विश्वबालकाला. ज्याचे नयन चोविस तास अठरा प्रहर उघडे राहून विश्वाचे रक्षण करत असतात. जीवित जनांचे प्राणी वनस्पतींचे पालन करतात तो हा हरी त्याला पण विश्रांती हवीच की.

मुकुंदा, माधवा, यादवा ओ वनमाळी अनिरुद्धा, आनंदा, मधुसूदना, राधारमणा.... हॅपी बर्थडे.

सर्व माबोकरांना जन्माष्ट्मीच्या शुभेच्छा. दहिपोहे काला, लोणी, प्रसाद येउ द्या. अजून गाणी श्लोक येउ द्या. दह्यांडीला सरकारने सार्वजनिक सुट्टी दिली आहे. ती बातमी वाचल्यावर सुचलेली ही गाणी आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>ह्याची हिंदी आवृत्ती पण उपलब्ध आहे. पण त्यात तो जी पुल्ला रेड्डीच्या दुकानातल्या शुद्ध तुपात बनवलेल्या प्रसादाचा गोडवा अंमळ कमी पडतो.
हाहाहा
सुंदर आहे हा धागा.
>>>>>>>>.मी ह्या पुस्तकाची फॅन आहे.
डिट्टो

https://www.youtube.com/watch?v=34KLNEE6sH8
कान्हो घेउन जाय रानी, धेनु घेउन जाय
संगे चाले श्रीदाम सुदाम ...
-----------------------
https://www.youtube.com/watch?v=_lpyqp5DU_U
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्र भाळी उगवला ...
फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग
फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग
आज अवघे अंतरंग ओसंडले हो

अमा, तुम्हालापण शुभेच्छा! ही घ्या एक दहीहंडी प्लेलिस्ट-
https://youtu.be/H9ySOP8PYEI सोनाक्षी !!!
https://youtu.be/Zgu6KY5WSmA?t=17 सोनाक्षी बाबा!!!!
https://youtu.be/1CHDrV_x0Qw मराठी गोविंदा...
https://youtu.be/4UobrULB91A बार्सिलोना... पण ब्याकग्राऊंडला मच गया शोर वाजवून द्या...

व्रजे प्रसिद्धम नवनीतचौरं गोपांगनानांच दुकुलचौरं
अनेक जन्मार्चित पापचौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि||१||
ब्रजभूमीमध्ये लीला दाखवुन, लोण्याचे गोळे चोरी करुन मटकावणारा, तसेच गोपिकांच्या वस्त्रांचे हरण करणारा, त्यांची वस्त्रे चोरणारा असा हा सर्व चोरांचा प्रमुख, कान्हा आमच्या जन्मोजन्मीच्या साठलेल्या पापांचीही चोरी करतो. अशा या चोरांच्या म्होरक्यास, प्रमुखास माझा नमस्कार असो.

श्री राधिकाया हृदयस्य चौरम, नवाम्बुदा श्यामलकांति चौरम
पदाश्रितानाम च समस्त चौरम, चौराग्रगण्यं पुरुषम नमामि ||
राधेच्या हृदयाची तर याने चोरी केलेली आहेच पण हा नवमेघासम कांति असलेला, निळा कान्हा त्याच्या आश्रयास आलेल्या भक्तांचे सर्वस्व हरण करतो. अशा या चोरांच्या प्रमुखास पुनःपुनः माझा नमस्कार असो.

अकिंचिनी कृत्य पदाश्रितम य:, करोति भिक्षुम पथि गेह हिनं
केनाप्यहो भीषण चौर इद्र्ग, दृष्ट: श्रुतो व न जगत त्रय Sपि
आपल्या चरणाश्रित लोकांचे सर्वस्व हरण करुन त्यांना बेघर आणि भिकारी बनवुन टाकणारा असा भीषण चोर ना दुसरा ऐकिवात आहे ना पहाण्यात.

यदीयनामापी हरत्यशेषं, गिरि प्रसराण Sपि पाप राशीन
आश्चर्य रूपों ननु चौर इद्र्ग, दृष्ट: श्रुतो व न मया कदापि
ज्या चोराच्या फक्त नामस्मरणाने पर्वतासारख्या भव्य, बलाढ्य, अविचल अशा पाप राशींचे संपूर्ण हरण होते, त्या नष्ट होतात असा अश्चर्यकारक चोर ना आमच्या पहाण्यात ना ऐकण्यात आला.

धनं च मानं च तथेन्द्रियाणि, प्राणमश्च हृत्वा मम सर्वमेव|
पलायसे कुत्र ध्रतSद्या चौर, त्वं भक्तिदाम्नाशी मया निबद्ध: ||
हे चोरा, माझे धन, सन्मान, इंद्रिये, प्राण सारे सारे हरण करुन कुठे पळून चालला आहेस? तुला भक्तीरुपी साखळदंडाने मी बांधून टाकतो आहे. आता पाहू कसा आणि कुठे पळतोस ते.

छिनत्सि घोरं यम पाश बन्धं, भिनस्ती भीमं भव पाश बन्धं ||
छिनत्सि सर्वस्य समस्त बन्धं, नैवात्मनो भक्त कृतं तू बन्धं ||
तू तर यमाचे घोर पाश छिन्न-विच्छिन्न करु शकतोस, तू मायेचे सासांरीक पाश तोडू शकतोस मग भक्तांनी जखडलेल्या तुझे हे बंध तू कसे काय बरं तोडू शकत नाहीस?

यन्मानसे तामस-राशी घोरे, कारागृहे दुःख मये निबद्ध: |
लभस्व हे चौर! हरे ! चिराय, स्व चौर्यदोषोचित मे व दण्डं ||
आणि तू असे भक्तीचे बंध तोडू शकत नाहीस, म्हणुनच अरे चोरा, हे नारायणा, अंधःकारमय व दु:खमय अशा माझ्या हृदयात तुला कायमस्वरुपी बांधून ठेवण्याची शिक्षा मी तुला ठोठावतो आहे.

कारागृहे वस् सदा हृदये मदीये, मद भक्तिपाश दृढ बंधन निश्चल:सन
त्वां कृष्ण हे प्रलय कोटिशतान्त रे Sपि, सर्वस्य चौर! हृदय न ही मोचयामी ||
तू माझ्या हृदयरुपी तुरुंगात , भक्तीपाशामध्ये निबद्ध असा सदैव वास करावास. कोटी प्रलय होवोत पण आता तुझी सुटका नाही. मी तुला अजिबात मुक्त करणार नाही.

धन्यवाद हीरा. चौराष्ट्क. ऐसीवरती कोल्हटकरांनी या स्तोत्राचा उल्लेख केलेला होता. त्या क्षणीच मला कविकल्पना, इतकी भावली होती. तेव्हा गुगल करुन हे अष्ट्क सापडत नव्हते. आता मात्र बर्‍याच ब्लॉग्ज्वरती, फेसबुक वर पोस्टस आहेत.

अमा, मि तुमचि पन्खि आहे. तुमाचे सगलेच लेखन छान, वाचनीय असते. वरच्या लिस्त मधे - मधुबान मे जो कन्हैय्या किसी गोपी से मिले गान् मिस झाल आहे का?
https://www.youtube.com/watch?v=qNnvL0ztJhA

मस्त! एकदम वातावरणनिर्मिती!

प्राणहीन भासे रासाचा रंग रंगहीन सारे नसता श्रीरंग >>> ही एकदम चपखल जमलेली ओळ आहे!

मंगला नाथ यांनी गायलेले यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले ‘त्याची धून झंकारली रोमारोमात’ हे अतिशय आवडते गाणे आहे.
https://youtu.be/1vK_maYnyYg

माझा पती करोडपतीमधले ‘नंदकिशोरा, चित्तचकोरा’ हे गाणं चित्रीकरण मुद्दाम विनोदी केले असले तरी सुंदर आहे.
https://youtu.be/BCwNp_b13tI

‘सांचा नाम तेरा’ हे ज्युलीमधलं भजनही मला आवडते.
https://youtu.be/9sAfXMXyGjM

‘बडा नटखट है रे’ गाणंही मला आवडतं.
https://youtu.be/8uhPePg1oNQ

‘कान्हा सो जा जरा’ हे गाणं आवडतंच. आता तेलगु वर्जनही पाहिन.

ही एकदम चपखल जमलेली ओळ आहे!>> हो तेच मला लिहावयाचे होते कि हे दैवत महालात वर कुठेतरी अप्राप्य असे वसत नाही तर तुमच्या बरोबर हसत खेळत तुमचे अश्रु पुसत जगते. आपल्या मराठी कवींनी ज्या भावना अगदी साध्या शब्दात पकड्ल्या आहेत त्याचे कौतूक आहे. भक्तीला भाषेचे बंधन नसावे. तिथे तर तम भाव नसावा.

सुंदर लेख आणि प्रतिसादपण ! गोकुळाष्टमी आहे असंच वाटलं काही क्षण!
भरजरी ग पितांबर दिला फाडून >> हे गाण आले की मला लगेच चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला हे पण आठवते
https://www.aathavanitli-gani.com/Song/Chindhi_Bandhite_Draupadi

पुण्यामध्ये एक नर्तकी आहेत बहुतेक भिडे - त्यांचा एक नाचाचा कार्य क्रम बघितला होता. त्यांनी अभंगांवर आधारीत काही नृत्ये बसवली आहेत. भरत नाट्यम / कथक शैलीत. तर त्यात एक वस्त्रहरणा च्या प्रसंगावर पण आहे. ती किती प्रार्थना करते. पण देव उशीर करतो. ती नंतर विचारते की उशीर का केलास तर देव म्हणतो की तुझ्या मनात एक कण पण शंका असल्यास मी येत नाही ज्या क्षणी तू पूर्ण भार माझ्यावर टाकलास तेव्हा मी लगेचच आलो व तुझे संरक्षण केले. तुझ्या श्रद्धेत एक कणाची पण कमी नसली पाहिजे म्हणजे मी तिथे आहेच.

हे सर्व एका सुरेख अभंगात आहे व त्यांनी व त्यांच्या ट्रूपने नाच पण सुरेख केला होता. ह्या कार्यक्रमाची व त्यात वापरलेल्या अभंगांची सीडी पण उपलब्ध होती तिथे.

श्यामची आई, लाडघर, द्रौपदी, राधा या सगळ्यासाठी +१.

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी

किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला (चित्रपटात हे गाणं भोंदू बाबावर आहे)

हे श्यामसुंदर राजसा मनमोहना

वर आलेली आज अंतर्यामी भेटे आणि त्याची धून ही दोन्हीही आवडती आहेत.

कान्हा कान्हा आन पडी मैं तेरी द्वार

मीरा -लता - सांवरा रे म्हारी प्रीत निभाजो जी

>>>>>>>>वर आलेली आज अंतर्यामी भेटे आणि त्याची धून ही दोन्हीही आवडती आहेत.
डिट्टो. दोन्ही सुपर्ब आहेत.

‘सांचा नाम तेरा’ हे ज्युलीमधलं भजनही मला आवडते.
‘बडा नटखट है रे’ गाणंही मला आवडतं. >>> दोन्ही ऑटाफे आहेत गाणी माझी. साचा नाम तेरा ला एकच कडवे का आहे असा नेहमी प्रश्न पडतो. अवीट गोडीची गाणी आहेत दोन्ही. बडा नटखट है ची चाल ते रवींद्र संगीत वगैरे वरची आहे का इतके माहीत नाही पण त्यावरची बंगाली छाप स्पष्ट जाणवते. त्याचे तिसरे कडवे पिक्चर मधे नंतर आहे. विनोद मेहरा मोठा होउन परत येतो तेव्हा शर्मिलाने त्याच्याबरोबर लहानपणी लावलेल्या झाडाला भरपूर फुले आलेली असतात. पूर्वी पिक्चर पाहताना तो सीन, मागचा लताचा आवाज या मिश्रणातून गळ्यात आवंढा वगैरे आल्याचे आठवते. अजूनही येइल कदाचित.

हे मी इथेच कोठेतरी वाचले होते व त्यामुळे मुद्दाम पुन्हा पाहिले - नंतर शेवटी तो शर्मिलाला घरी घेउन जातो तेव्हा लोक दुर्गापूजेकरता देवीच्या मुर्ती घरी घेउन जाताना दाखवले आहेत. शोले मधल्या उंबर्‍यावर थबकणार्‍या जया भादुरीचा सीन किंवा हा यातला सीन - प्रतीके असावीत तर अशी. मूळ सीन इंटरेस्टिंग असतोच पण नीट पाहिले तर कळते यात अजून काहीतरी आहे. नाहीतर आपले मराठी पिक्चरवाले पब्लिक. आख्खा सीनच ते प्रतीक दाखवायला केलेला असतो Happy

ढुंढे जशोदा चहू ओर छुप गये नंदकिशोर (किसिसे ना कहे ना) , हे अतिशय गोड.
https://youtu.be/nq6XbnCD8mY

जो तुम तोडो पिया ( सिलसिला), हे अप्रतिम!
https://youtu.be/mvlQX3pqoGo

मोहे पनघट पे नंदलाल (मुगलेआजम)

मनमोहना (जोधा अकबर)

मैया यशोदा (हम साथ साथ है)

वो किस्ना है (किस्ना)

मै सांवरे के रंग नाची (मीरा)

सांवरे सांवरे काहे मोसे करत जोराजोरी - अनुराधा
पनघट पे कन्हैया आता है और आ कर धूम मचाता है ( के सी डे ऊर्फ कृष्ण चंद्र डे)
राधिके तूने बंसरी चुराई ( जरी राधिकेला उद्देशून असले तरी पडद्यावर कृष्ण गातोय)
मैं नहीं माखन खायो
मराठी. - जीवाच्या जिवलगा नंद लाला रे
जळते मी हा जळे दिवा ( माणिक वर्मा ह्यांचं एक अप्रतिम गाणं)
घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा.
त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग
श्याम मी भ्याले घन बघुनी
नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे ( लता मंगेशकर)

दे रे कान्हा ..पिंजरा. ह्यात हे एकच आहे बाईंचं पण मस्त आहे.
मोहे छेडो ना नन्द के लाला.. लम्हे. हे नन्तर पिक्चर मधून काढून टाकले बहुदा.
अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग..
सौदागर मध्ये नटखट बन्सीवाले गोकुल के राजा असं काहीतरी आहे ना, ते छान आहे.
घननीळा मध्ये बरेचदा 'ळ' येतो.

छन्नुलाल मिश्रा यांची होळीची गाणी विलक्षण सुंदर आहेत.
https://www.youtube.com/watch?v=xBt4V4usnCQ

राधीकेची होळी
रंग डारुंगी डारुंगी रंग डारुंगी
के नंद के लालन बैरन
सांवर रंग , लाल कर दुंगी
मली गुलाल दौ गालन पे
रंग डारुंगी डारुंगी रंग डारुंंगी ||धॄ||
नारी बनाय के
नाच नचाऊंगी
डफ , मृदंग के तालन पे
रंग डारुंगी डारुंगी रंग डारुंगी||धॄ||
-------------------------------------------------
https://www.youtube.com/watch?v=pl1ZAiRIcKg

कॄष्णाची होळी
होरी खेलत नंदकुमार
हरी ब्रज मे धूम मची होरी खेलत नंदकुमार
अबीर गुलाल केसर रंग घोलत
और मलत मुख रोरी
ब्रज मे धूम मची होरी खेलत नंदकुमार
दौडी दौडी पिचकारी चलावत
सब मिली गावत होरी

Pages