ईलेक्ट्रीक सायकल कोणती घ्यावी?

Submitted by अतरंगी on 29 July, 2022 - 04:29

गेल्याकाही वर्षात आरोग्य आणि पर्यावरण विषयी जागृती निर्माण सायकल, लोकांचा कल परत सायकल वापरण्याकडे होत आहे. शक्य तिथे दैनंदिन कामांमधे दुचाकीचा वापर टाळून सायकलचा वापर करायला हवा. अनेक जण अतिशय उत्साहाने आरोग्य, पर्यावरण वगैरे कारणांनी सायकल घेतात खरे पण नव्याचे नऊ दिवस सरल्यावर ती सायकल धूळ खात पडलेली दिसते. कारण रोजच्या कामाच्या रगाड्यात ती सायकल घेऊन अगदी अर्धा किमी जायला पण जिवावर येते. ऑफिस, कामाचे अंतर वगैरे अगदी ८-१० किमीच्या परिघामधे असले तरी १०-१२ तास काम करुन परत एवढे सायकलिंग करायचा कंटाळा येतो. अशा अनेक कारणांनी माझे स्वतःचेही सायकल घेणे लांबणीवर पडत गेले आहे.

पण सध्या दैनंदिन वापरात असलेल्या प्रत्येक वाहनाचे बॅटरीवर चालणारे मॉडेल उपलब्ध होत आहे, त्याला सायकल्सचाही अपवाद नाही. एकदा चार्ज केल्यावर २५-३० किमी किंवा त्या पेक्षा जास्त अंतर पार करता येतील अशा सायकल्स बाजारात आहेत. माझा कल साधी सायकल घेण्यापेक्षा ईलेक्ट्रीक सायकल घेण्याकडे वाढत आहे. ई-सायकल चे अनेक फायदे आहेत

१. तुम्ही ही सायकल नेहमीच्या सायकल प्रमाणे वापरू शकता, दम लागल्यास, कंटाळा आल्यास ती संपुर्णपणे बॅटरी वर चालवून जाऊ शकता. थ्रॉटल मोड मधे पार्शिअल बॅटरीचा वापर करुन ५०-७० किमीचे अंतर कापू शकता.

२. एकदा चार्ज केल्यास २५-३० किमीचे अंतर कापता येते. पुर्ण चार्ज करायला ३-५ तास लागतात. त्याला साधारण ५-१० रुपये खर्च येतो. १० रुपयात तुम्ही २५-३० किमी अंतर पार करु शकता, म्हणजेच ३० पैसे प्रति किमी.

३. स्पीड २५-३० kmph

४. काही मॉडेल्स मधील बॅटरी डिटॅचेबल आहे, जी काढून तुम्ही घरात नेऊन चार्ज करु शकता.

तोटे:-

१. रेग्युलर मेंटेनन्स हा साधरण सायकल पेक्षा जास्त आहे. मला डिलरने दर ६ महिन्याला अंदाजे ६०० रुपये ( स्पेअर पार्टची किंमत सोडून) सांगितले.

२. काही सायकल्स मधे बॅटरी डिटॅचेबल नसल्याने तुम्हाला पार्किंग मधे चार्जिंग पॉईंट असणे/ सायकल ऊचलून चार्जिंग साठी घरात नेणे/ एक्सटेंशन बोर्ड वापरणे, यातला एक पर्याय निवडावा लागेल.

३. आंतरजालावर अनेक रिव्ह्युज मधे स्पेअर पार्ट खराब झाल्यास न मिळणे/ लवकर न मिळणे याविषयी तक्रारी आहेत.

४. मोजके प्रसिद्ध ब्रांड्स आणी मॉडेल्स.

५. बॅटरी मुळे सायकल चे वजन ५-८ किलो ने वाढते.

६. किंमत नॉर्मल सायकल पेक्षा कैक पटीने जास्त आहे.

७. रिसेल किंमत फारच कमी आहे.

ईथे देशात- परदेशात कोणी ई-सायकल वापरत आहे का? ई-सायकल कोणती घ्यावी ? घ्यावी का? त्याचे वापरातील फायदे/ तोटे काय याची चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक जनरल फीड बॅक, तुमच्या केस मध्ये कदाचित ॲपलिकेबल नसेल,

मित्राने hero chi सायकल घेतली होती, बाकी वापरण्याच्या दृष्टीने काही प्रोब्लेम नव्हता, भोसले नगर ते law कॉलेज रोड टप्यासाठी त्याला भयंकर आवडली होती.
मात्र जास्त वजनामुळे दुसऱ्या मजल्यावर वरच्या घरी घेऊन जायला जीव मेटाकुटीला यायचा.
स्विमिंग ल घेऊन यायचा तिकडे रोटेतिंग गेट पार करायला ती उचलून घ्यावी लागायची, ते सुध्धा जीवावर यायचे.

So उचलून घेणे हा फॅक्टर कुठे येत असेल तर एकदा विचार करा.

मला पण चार्जिंग साठी तिसर्‍या मजल्यावर न्यायला लागणार आहे. त्यामुळेच डिटॅचेबल बॅटरी असलेली सायकल पहात आहे.
हिरो सायकल्स ने लाँच केलेल्या नविन मॉडेलची बॅटरी डिटॅचेबल आहे.

50/60k ??? Is it worth it?
त्या पेक्षा चांगल्या ब्रँड ची सायकल घेतली तर फायदेशीर पडेल,

डेली 10-15 km one way अंतर असले तरी साधी सायकल वापरण्याजोगी आहेच.
दिवसाच्या शेवटी कंटाळा येतो हे जरी खरे असले तरी दहा पंधरा दिवसांच्या सवयी नंतर त्याचे फारसे काही वाटणार नाही.
हवे तर मित्राकडून सायकल घेऊन ट्रायल करून पहा महिना भर.

Sorry अतरंगी, धाग्याच्या मूळ उद्देशालाच सुरुंग लावतो आहे Sad

50/60k ??? Is it worth it?>>>>

हा प्रश्न मलाही आहेच. मला पण ते जास्त वाटत आहेत. म्हणूनच धाग्यात शेवटी ई-सायकल कोणती घ्यावी ? घ्यावी का? असा प्रश्न आहे. तुम्ही मांडलेला मुद्दा विषयांतर नाही.

मी २० ते २५ पर्यंत सायकल बघत होतो. ई-सायकल्स पण डिटॅचेबल बॅटरी नसलेल्या ३० ते ४० पर्यंत आहेत. माझ्या मते त्याची उपयुक्तता जास्त आहे, कारण ती पडून न राहता त्याचा वापर होण्याची शक्यता जास्त आहे. घरातील आबालवृद्ध अगदी आरामात वापरु शकतील. त्यामुळे मी ती घ्यायचा विचार करत आहे. दहा पंधरा हजार जास्त खर्च करुन धाग्यात जे फायदे लिहिले आहेत ते मला मिळणार असतील तर चालेल.

जर डिटॅचेबल बॅटरी हवी असेल तर बजेट जास्त जात आहे. हिरोची डिटॅचेबल बॅटरी असलेली सायकल ५५,०००/- ला आहे. यात डिलर कडे थोड्या कमी भावात मिळेल.

या सायकल ईतक्या का महाग आहेत हे पण कळत नाही. कदाचित थोडे थांबल्यास अजून चांगली मॉडेल्स स्वस्तात मिळून जातील.

या सायकल ईतक्या का महाग आहेत हे पण कळत नाही. कदाचित थोडे थांबल्यास अजून चांगली मॉडेल्स स्वस्तात मिळून जातील.

नवीन Submitted by अतरंगी on 2 August, 2022 - 06:00

थोडे थांबून करता करता महागाई आणि दहा बारा टॅक्सेस लावून किमती वाढून एवढ्या झाल्यात. हा हा हा हा

तुम्ही राहत तो भाग फारच चढ उतार वाला असेल आणि तेवढा फिटनेस नसेल पण सायकल चालवावी वाटत असेल तरच घ्या

किंमत, मेंटेनन्स, चार्जिंग हा व्याप बघता साधी सायकल सुटसुटीत होते
सिम्बा यांनी म्हणल्याप्रमाणे काही दिवसात सवय होईल
व्यायाम होईल, फिटनेस वाढेल

मुलांना तर अजिबात देऊ नये असे माझं वैयक्तिक मत

या सायकल ईतक्या का महाग आहेत हे पण कळत नाही. कदाचित थोडे थांबल्यास अजून चांगली मॉडेल्स स्वस्तात मिळून जातील. >> कमी व्हायची शकयताच नाहिये, किमती वाढतच जाणार आहेत. बरीच कारणे आहेत पण विषयांतर होइल

>>>>> राहत तो भाग फारच चढ उतार वाला असेल आणि तेवढा फिटनेस नसेल पण सायकल चालवावी वाटत असेल तरच घ्या>>>

पण यातला कॅच असा, की e cycle che वजन बऱ्यापैकी जास्त असते, त्यामुळे फिटनेस नसताना फार चढ उतार नसताना सुध्धा पायडल मारून चालवायला ही सायकल जड जाते.
मग ती असिस्ट मोड मध्येच वापरली जाते.

हो असिस्ट मोडमध्येच
नुसती सायकल खरेच जड आहे

आमच्या इथे एकाने घेतलीय
असिस्ट असेल तरच

पण मला त्यात सायकली चे थ्रिल च गेल्यासारखं वाटलं

किंमत हां मुद्दा १५ पासून पुढे ५५ वाली का नको असा प्रवास करत मग शेवटी बॅटरी वाली जड़ असल्याने पॅडलिंग सहज शक्य नाही ह्या सत्या पर्यन्त आल्यावर जर नुसतेच बसून प्रवास करायचे तर ई स्कूटर हीच बरी ना ?
सायकल हां चॉईस बेसिकली व्यायाम घडावा म्हणून सुचवला / निवडला जातो, पण जर पूर्णपणे मूळ उद्देशच विफल होत असेल तर ई सायकल पेक्षा ई स्कूटर अधिक बरी !!
सायकल साधी असो की बॅटरीवाली, ती सुरक्षित आणि सुलभ रित्या चालवता येण्याजोग्य रस्ते आहेत का हां सुद्धा महत्वाचा मुद्दा भारतात लागू होऊ शकतो.
व्यायाम = साधी सायकल
आरामशीर प्रवास + व्यायाम = गिअर वाली सायकल
विना कष्टाचा किफायतशीर प्रवास = ई सायकल

मी ई-सायकल ही नॉर्मल सायकल म्हणूनच वापरणार आहे. पर्यावरणाला हातभार आणि सोबत जळल्या थोड्याफार कॅलरीज तर बरे.

बॅटरी हे एक अ‍ॅडिशनल फिचर आहे, जे मी खरोखर दमलेला / कंटाळलेला असताना, मी आणि घरातील ईतर सदस्यांनी जवळची कामे त्यावर करावी, जिथे कंटाळा येईल तिथे बॅटरी वर चालवावी या साठी आहे.

वैयक्तिकरित्या मला सायकल वर (बॅटरीचे) ५-७ किलो वाढल्याने मला ती असिस्ट मोड वर चालवावी लागेल असे वाटत नाही. कारण माझ्या रोजच्या प्रवासात एक बालभारतीच्या ईथला ईवलासा चढ सोडला तर एकही चढ नाही. मला स्वतःला अजून मी रोज ३६५ दिवस सायकल वर ये- जा करु शकेन याची खात्री नाही. ऊगाच वारेमाप ऊत्साहाने १५-२० हजाराची सायकल घ्यायची आणि मग नंतर ती धूळ खात पडून राहणार किंवा मग निम्म्या किंमतीत विकायची ह्या दोन्ही गोष्टी नको आहेत. त्यामुळेच ई-सायकल घ्यावी का असा विचार चालू आहे.

ई-सायकल साठी ५०-५५ हजार मला पण जास्त वाटत आहेत. त्यात डिटॅचेबल बॅटरी सोडून असा एकही फायदा नाही कि ज्यासाठी १५ हजार जास्त मोजावे. चांगली ई-सायकल ३७-४० च्या रेंज मधे मिळत आहे.

स्वस्तातली बैटरी वरची सायकल आली (१५-२० हजार) तर उपयोग आहे>>>

हो मलाही तसेच वाटते. जी नॉर्मल सायकल आपल्याला घ्यायची आहे त्यापेक्षा ५-७ हजार जास्त देऊन सेम स्पेसिफिकेशन ची ई-सायकल घेता यायला हवी. तसे झाल्यास कदाचित याचा वापर वाढू शकेल.

ई-सायकल ला सबसिडी असते का? असायला हवी.....

ई-सायकल ला सबसिडी असते का? असायला हवी..... >>> दिल्लि मध्ये दिली आहे ५५००. बाकिच्या राज्यात नाहिये बहुतेक.

- नॉर्मल सायकल मध्ये configuration chi वर्सातालिटी जास्त मिळेल.
- नॉर्मल हायब्रीड सायकल घेऊन पुढेमागे छोट्या ट्रीप/ लाँग rides करू शकता
- asist मोड न वापरायचा निश्चय कितीही स्तुत्य असला तरी... सोय उपलब्ध असताना वापरायचा मानवी स्वभाव वाईट असतो Happy
मात्र..
- " वय वाढल्यामुळे यांनी स्वयंचलित दुचाकी चालवू नये " असे ज्ये ना घरात असतील तर त्यांना हा पर्याय चांगला आहे,

माझे मत -
स्वतः वापरण्यासाठी नॉर्मल सायकलला पसंती.
ज्यें ना आणि तुम्ही अशी सोय पहात असाल तर e cycle चालेल.

आता थांबतो.
काय निर्णय घेतलात आणि e सायकल चे अनुभव इकडे नक्की अपडेट करा Happy