पावसाळ्यातील गमती जमती

Submitted by Pallavi2579 on 14 July, 2022 - 05:53

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?

लहान मुलांचे पावसाळ्यातील सर्वात आवडते गीत म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?खरंतर लहान मुलांना पावसाळा ऋतू खूप आवडत असतो त्याला कारणेही भरपूर आहेत. उन्हाळा संपून शाळा सुरू झाल्या की पावसाळा ऋतू येतो आणि आम्हा विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो.पावसाळा ऋतू आल्यावर शाळांना सुट्ट्या मिळतात.पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे खूप-खूप आवडते.

नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच.

मोराचा नाच आपल्याला पावसाळा ऋतूत पाहायला मिळतो. ज्यावेळेस पाऊस पडायला सुरुवात होते त्यावेळेस मोर आनंदाने बेभान होऊन नाचत असतो. हे दृश्य पाहायला खूप खूप आवडते.
असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा पावसाळा ऋतू मला खूप-खूप आवडतो.

. काही ठिकाणी पावसाची पूजा केली जाते, ती याच कारणामुळे पाऊस सर्व प्राणीमात्रांना सूख देत असतो. पावसाला देवच मानले जाते.पावसाला मेघराज म्हटले जाते.मेघराज म्हणजे देवाचा अवतार होय.असा हा पावसाळा सर्वसृष्टीचे भले करण्यासाठीच येत असतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users