तर मंडळी, ज्याला गिर्हाइक नाही ते ओटीटीवर ह्या नवीन न्यायाने सम्राट पृथ्विराज प्राइम वर येउन आदळला आहे. आज पाउस म्हणून कामाला दांडी मारुन घरीबसलेली पण लोणावळ्यास न गेलेली निरुद्योगी म्हातारी पिसे काढायला सज्ज आहे. ( अश्या परिस्थितीत सुद्धा न बघावा असा हा चित्रपट आहे पण आह विल टेक वन फॉ द टीम!! टीम माबो झिंदाबाद म्हणारे.)
तर अगदी पहिल्या पाटीपासुनच खिदळायला सुरुवात ते डिस्क्लेमर येते त्यात वी डोंट वाँट टु पोर्ट्रे एन्ही ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला इन बँड लाइट. सो फार सो गुड. पण तेच खाली हिंदीत आहे तिथे ही हम किसी भी ब्ला ब्ला को खराब रौशनी में चित्रीत करनेका इरादा नहीं रखते है!!!!
एका वाक्यात तीन उर्दू शब्द ते ही चुकीच्या भाषांतराने!! उदय चोप्राला तरी बसवायचे होते चुका सुधारायला. ( जो खुदही एक गलत्ती है वो औरों की गलतियां क्या सुधारेगा!!!) तर असो आता पुढे. दोन तास बारा मिनिटा चा हा पीळ!!
आता जोहारचे पण आम्ही समर्थन करत नाही म्हणे. नशीबच आमचे.
आता एकदम एक हिंदीत जोश पूर्ण गाणे शत्रुचा नि:पात करु रक्त वाहवू वगैरे. थेट गोकुल में मोहन कुरुक्षेत्र मे ं अर्जुन गायक प्रथिराज म्हणतो!! उदय किधर है तू!! मग लंका मे राव्ण असे नको म्हणून लंका मे रावण को राम सतावन. मार्शल म्हण तात तसे देशी संगीत. एक ग्लाडीएटर सारखे थिएटर येते व हे गझनी मधील आहे. सीजी चे पर्वत वगैरे. एक हिरव्या निळ्या रंगाचे कपडे मुकुट तलवार वाला मिया भाई मोठ्या खुर्चीत बसतो. व एक राज गायक टाइप माणूस( सोनू सूद - क्या क्या करना पडता पैसे के लिये... ) उच्च कोटीच्या हिंदीत प्रचे कौतूक चालू होते. हे बरं चालतं
तो प्र आंध ळा झालेला आहे. पण त्याला अजून एक संधी देत आहेत दयाळू सुलतान. मग तो एक मोठा सीजी हत्यार घेउन सज्ज होतो.
मध्येच एक लहान पणची आठवण. कुठे तरी पाउस पडलेला आहे त्या एक थेंबाचा आवाज ह्या बाल प्र ने ऐकला आहे म्हणे. ह्याने अगदी मस्त क्रीम कलरचा ड्रे स केला आहे. डिझाइनर.
आता बिचारा सीजी सिंह येतो व हा त्याला रक्तमय पद्धतीने मारतो. राजगायक डोळे विस्फारून बघत आहे. बाकी कैदी आत आहेत साखळ दंड घालून. प्रेक्षकातले मिया भाई कौतूक करतात. हे बराच वेळ चालते दोन तीन अजून सिंह आले आहेत. पण धरम पाजींची सर नाही( सं धरम वीर!!) हा त्यांना ही मारून मला फक्त आधी चुनोती देउन सांगा मी कोणाशी पण द्वंद्व करेन म्हणून बेशुद्ध होतो. व राजगायक त्याची मलम पट्टी करत आहे.
इतका खून खराबा बास सुरुवातीला म्हणून जरा सॉफ्ट टच लगेच कनोज ला ट्रानसफर. हिरविणीचा राजवाडा. समोरच तळे आहे व त्यात हिरवी पाने व अनेक कमळे फुलली आहेत( सट्टल सट्टल) परत प्र चे कौतूक वाले गाणे. आजकाल हौशी तुनळी वाले कसे काही एक दोन नावांचीच तुतारी वाजवत राहतात मुद्दा सापडला नाही की तसे चालू आहे. हिरवीण गुलाबी ड्रेसात अवखळ पणा करत आहे. लहानच आहे ती मुलगी. ही काय मिस इंडिया एकदम आर्डिनरी गांव की छोरी दिसते. आता ह्यांचे दूरसे प्रियाराधन चालू आहे. नाव कोरलेले तीर पाठवणे, रंग
खुश्बू पाठवणे ही संस्कारी असल्याने हिने त्याच्या नावाचे कुंकू आधीच भाळी लावले आहे. लगेच होली कब है कब है होली!!
इधर तो बसंती की याद आना बनता है.
एक माणूस परत डोळ्याला पट्टी बांधून फागुन आयोरे. फेक राजस्थानी. हे एकीक डे. ह्याच्या कडे केशरी रंग. व एक सुमार गाणे. हिरव णी कडे त्या कमळ तळयात पडून अंग विक्षेप करणे मुली मुलींची संस्कारी होली. पियाला हे कर ते कर अशी प्रेमळ विनवणी. हे वाडे नक्की बाहुबलीत शोभतील असेच आहेत. लगेच हिरोला ती इथे असल्याचा भास होतो. हिने पण कंबरेला चेन बांधली आहे. पण शोभत नाही. आपली स्मिता बघा आज रपट जाये मधे. दोज लेडीज हँव सम इट . हद करदे पिया हद करदे हर सरहद को रद्द करदे म्हणे.
मिशीवाला म्हातारा पडोसन मधल्या ओम प्रकाश वाणी दिसत आहे.
आता मीर हुसेन गजनी महमुदाच्या भावाचे काही नाजूक प्रकरण आहे. त्याने एक बाई पळवून आणले आहे. व त्याला शरण हवे आहे.
आता प्र लगेच शरण मे आनेवालेका रक्षण करना हिंदू का धरम है मै धर्म का पालन करुंगा धर्म के लिये जियुन्गा मरुंगा. व
सोमनाथ मंदिरा संबंधी भावना प्रधान संवाद आहे. चित्रलेखाचा सन्मान आहे.
आता परत ते प्र कौतूक रक्त रंजीत गाणे आहे. व एक कौतूकाचा संवादही आहे. प्र चे व्हॅनिटी सीजी शॉट आहेत व प्र प्र असा कोरस.
बरोबर शंभर लोक्स घोडे स्वार.
सुलतान कुतुबुद्दीन ऐबकला अजमेर जिंकायला पाठवतो. हा लगेच प्र च्या दरबारात येतो. फाय्बर ग्लास च्या हत्तीचा दगड बनवला आहे
प्र लगेच मीर हुसेन चा मी प्रतिपाळ करेन ऐबक लगेच हाणा मारीची धमकी देतो. हाउ रूड. प्रेमाचा तिढा समजत नाही का ऐबक आता
लढावेच लागेल असा वाइट चेहरा करतो.
सर्व सैनीक डिझानर ड्रेसेस व केशरी फेटे लावून आहेत. ओव्हर किल रिअली.
लगेच प्रचंड युद्धाचा शॉट. मोठ मोठे सेनेचे शॉट्स आभाळातून बाणांचा वर्शाव शेवटी हत्तीवरचा सुलतान कोण आहे तो खाली पडतो
संजय दत्तची वीरश्री!! मग लढाई. प्र एकदम उडी मारून सुलतानाला पाडतो. मरायला टेकल्यावरही सुलतानाच्या चेहर्यावर भाव नाहीत.
सुलतान साखळदंड घालून दरबारात आला आहे. संजय दत्त रॉकी टाइप बंबईया हिंदीच बोलत आहे.
परत प्र चे कौतूक व त्यानंतर आगमन होते. जगात सर्वात वीर तो हाच. हा सुलतानाला तलवार घोडा वस्त्र देउन परत पाठवतो. हे सर्व राजगायकाला पंडिताला भट भटवे असे म्हणत आहेत व हसत आहेत.
कट टू कनोज ते अगम्य श्लोकांच्या पार्श्वसंगीतावर कोणतरी गुरू हिरवेणी कडे येतात. हे साउथ पिक्चर मधल्या सारखे ड्रेस केलेले आहेत.
प्र ला दिल्लीत बोलावुन राज्याभि शेक करायचे चालले आहे असे कळते.
प्रच सिंहासना साठी ग्रेट आहे असे नाना सांगतात. इथे ही एक दावेदार आहे सिंहासना साठी. बारके युद्ध होणारच. आता घाटाचा सीन. हिरवीन या नं मला लग्न करुन न्यानं असा खलिता पाठव ते व दिल्ली मुबारक म्हणते. आता प्रचा दिल्ली राज्या भिषेक दाखिवला आहे.
ह्याला पब्लिक अन्नदाता म्हणत आहे. प्रचे मसनदीवर मोठ्या लोडाला टेकून बसलेले खूपच शॉट्स आहेत.
कन्नोज वाला माणूस अर्धी दिल्ली मागायला आला आहे. व दिली नाही तर लगेच युद्ध. जयचंद बरोबर. प्र आता कनोज पती बरोबर युद्ध करेल. कनोज पती फुल दिल्ली घ्यायलाच बसला आहे आता तर व फुल्टू युद्ध मोड मध्ये आहे. मग संयोगि ता चे स्वयंवराचे ठरत आहे.
पण ऑफ ऑल थिंग्ज प्रची मूर्ती बनवून त्याच्याशी युद्ध करणार म्हणे!!! संयोगिता प्र च्या बाजूने भांडते. व आपले पवित्र प्रेम व्यक्त करते. साक्षी तन्वर पण राजस्थानी ड्रेस घालून उभी आहे व संयोगिता ला गप्प करत आहे. सं प्र शी लग्न केले नाही तर जीवन भर कुंवारी राहील म्हणे.
अगेन व्हाइट ऑरेंज मीटिन्ग - हे फार रिपिटॅटिव्ह होत चालले आहे. सैन्याला युद्धच करायचे आहे.
हुस्श अजून दीड तास आहे. थोडा ब्रेक घेते.
गायत्रीदेवी बाद्शाहो इल्लेना
गायत्रीदेवी
बाद्शाहो
इल्लेना
चाणक्य द्विवेदी तर गायबच झाला
चाणक्य द्विवेदी तर गायबच झाला
20 वर्षे अभ्यास करत होता म्हणे
सनी देओलला घेणार होता म्हणे
मृणाल देव तरूण असताना धडाधड
चुकीच्या बाफवर पोस्ट होती म्हणून काढली. दुसरीकडे टाकतो.
तर पुढे: जयचंदाने सौदागरला
तर पुढे: जयचंदाने सौदागरला गझनीच्या सुलतानाकडे पाठिवले. सुलतानाला सौदागर म्हणतो प्र वर अॅटेक करा आम्ही तुमचे दोस्त आहोत. व वळून माघारी जाते ते धूड. सुलतान पण विचारात पडला आहे. व आपल्या कारभार्यास " क्या चार हिंदुस्थानी कुच्च देर साथ नहींचल सकते असा मोठा प्रश्न विचारतो. सध्याच्या वातावर णात ह्या जेन्युइन प्रश्नाची बिजे व उत्तरेही मिळू शकतील पण पिक्चर फ्लॉप गेल्याने हे पण वाया गेले आहे. कारभारी बिरबल अपडेटेड व्हर्जन असल्याने लगेच हां सरकार पर जब उनके कंधेपे किसी की अर्थी हो तब असे भयसूचक उत्तर देतो.
आता सुलतान अय्बक ला दिल्लीस पाठवतो. व दिल्लीचे तख्त द्या नाहीत र आम्ही अॅटेक करू अशी ही धमकीच आहे. प्र केशरी फेटा व क्रीम ड्रेस घालुन लोडाला टेकून बसला आहे म्हणजे राज्य सरकारच करणार पण सुलतानाचे गुलाम म्हणून. ( पपेट गवर्न मेंट असे) ये किदर तो बी सुना है. मग प्र मक्ख चेहर्याने अपनी जिंद गी के बदले मैं सुलतान को अपने वतन की मुठ्ठी भर मिट्टी भी ना दुं असे लंबे वाक्य सुनवतो. फक्त कपाळाला लावण्याइतकीच मिट्टी मी देइन. मै उनके नापाक इरादे बराब्बर समजता हुं ( तूम दूध में पाणी क्युं डालता है!)
परत तेच अगम्य श्लोक ऑरें ज ड्रेसातली राणी राज्याला ओवाळते व विजयी भव म्हणून पाठवते. गरी ब सैनीक काठीला पाते बांधून व ऑरेंज शायनी फडके बांधून मरायला तयार पुढे निघत आहेत. पुढे युद्ध होते व ते लांब चालते. सुलतानाची परिस्थिती गंभीर आहे. काहीच दिवसात रसद व सैनीक संपतील. अशी परिस्थिती आहे. ह्या सुलतानाचे संवाद खरेतर मस्त आहेत. त्याने व विश्ले षण चांगले केले आहे परिस्थितीचे.
म्हणून हे गनिमी काव्याने रात्री हल्ला करतात. हा सर्व सेट किती महाग असेल. सीजी घोडे पळून जात आहेत असा सीन आहेत. त्या घोड्यांच्या पाठीला पेट्रोल भरलेल्या पिशव्या लाव ल्या आहेत व ते सर्वत्र पसरते. दोन्ही बाजूचे लोक मरतात. व प्र आणि ते राज गायक भट हत्यार खाली टाकून देतात.
ते बंदी झालेआहेत. हिरवीण शिव अभिषेक करत आहेत. ती रडते आहे. जौहरची तयारी चालू झाली आहे. ही लग्नाचा ड्रेस घालायच्या ऐवजी आत्माकी आहुती देणार आहे. सर्व ऑरेंज क्रीम ड्रेस करतात. व मोठा यज्ञ पेटवला आहे. देअर इज नथिंग फनी अबाउट धिस. फारच वाइट सीन आहे. हे तिकीट देउन सुद्धा बघवणार नाही. देअर इज नो जस्टिफिकेशान फॉर धिस. मी फॉरवर्ड केला. पण कुठे ही त्यातले भयानक पण दु:ख जीवनाची आहुती देणे ह्यातले बलिदान फीलिन्ग दिसत नाही. ह्या वेळेस गाणे घालायचे औचित्य समजत नाही. ह्या प्रथेचा निषेध.
साक्षी तन्वर लगे च नवर्याची कान उघाडणी करते. तुमच्या मुळे मुलीने जीव दिला.
कट टु प्र ला आता त्या स्टेडिअम मध्ये आले आहे. सुलतान के सामने झुकनेचा आदेश दिला आहे. ह्या सीन मध्ये वेगळीच मिशी चिकटवली आहे. तो सुलतान वाला प्राणी पण एकदम मक्ख चेहर्याचा आहे. कोणाकडेच युद्ध आवेश शौर्य दिसत नाही. त्याम्चा रागही येत नाही विचित्र म्हणजे
प्र ला क्रॉस सारख्या खांबावर लटकावले आहे. व सर्व लोक त्याला बूट चप्पल फेकून मारतात. काही ही दाखवले आहे. कवी एकदम प्र च्या
स्तुती पर संवाद म्हणू लागतो. शेड्स ऑफ ब्रॉमान्स. तुम्ही काजव्यांनी सुर्याला पकडले आहे. आता पुढे प्र कसा आवाजा वरून वार करतो बरोब्बर त्याचे प्रात्यक्क्षिक आहे. आता ती सुरुवाती ची सिंह फाइट परत दाखवली आहे.
त्यांचा राजवैद्य येउन प्र ला चेक करतो. कश्याचा कश्याला संबंध नाही.
ह्या दरम्यान कधीतरी प्र चे डोळे काढले आहेत.
परत चुनौती टाइम्स. पब्लिक त्यालाच सलाम करू लागते. सुलतान संतापला आहे व त्याचा टार्टार नावाचा अधिकारी हात वर करतो व ते अरेबिक टाइप फेटे ड्रेस घातलेले एक्स्ट्रा खाली बसतात. सुलतानाचे डोके फिरल्यास सर्वाम्ना कापून टाकेल.
प्र सात घोडेस्वारातला एक मेला तरी तुला सोडू असे सोपे चॅलेंज अवघड करतो व सुलतानालाच बोलवतो. हा पूर्ण लढाईच्या ड्रेसात व घोड्यावर आला आहे. तर प्र बिचारा एकच बाण आंधळा व जमिनि वर उभा अर्धी वरची बॉडी उघडी( जीझस स्टाइल. असा उभा आहे.
सुलतानाचा वध करताना तो भ ट प्राची न काला पासुनचे दाखले देत आहे अरे त्याला धड ऐकू तर दे. तर प्र एकदम अर्धी उडी हवेत घेउन आवाजाचा वेध घेउन बाण मारतो. तो बरोब्बर लागतो व सुलतान कोसळतो.
आता भट वरुन गॅलरीतुन उडी मारतो व आयर्न मँन सारखा लँड करतो. व प्र ला मिठी मारतो. पण गद्दार सैनीक पाठमोर्यांवर बाण सोडतात. प्र भिस्ष्म पिता मह पद्धतीने बाणां च्या शय्येवर पडतो. सुलतानचे लोक बाकीच्या लोकंना सोडून देतात. ते पण मैदानात येतात व पर आणि भट जो वारला आहे त्यांना नेतात. प्र ला जायच्या आधी संजय दत्त व हिरवीण स्वर्गातून दिसतात व बोलवतात.
ह्यानंतर पिक्चर संपतो. पुढे ७५५ वर्शे परकीय सत्ता होती व मग फिरसे दिल्ली भारतमाता की हुई असे वाक्य आहे.
इतका खर्च करून पिक्चरचा प्रभाव का पडला नाही हे एक कोडेच आहे. निष्प्रभ वाट्ते सर्व.
भारी झाले परीक्षण. तीन
भारी झाले परीक्षण. तीन वेगळे धागे काढले तरी चालेल की. प्रतिसादात पुढचा भाग नको वाटतो.
पृथ्वीराज चौहानच्या निधनानंतर २० वर्षे सुलतान जिवंत होता. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून तो नायकाच्या हातून मेला हे चालवून घ्यावे. याच चित्रपटात लॉर्ड माउम्टबॅटनचा वध सुद्धा हातासरशी दाखवला असता आणि एकीकडे नायक डोळे मिटत असताना युनियन जॅक खाली जाऊन तिरंगा वर चढताना नायकाच्या चेहर्यावर स्मित आणि त्याला सॅल्युटसाठी (झोपलेल्या अवस्थेत) कपाळाकडे जाणारा हात , कपाळाला बोटं टेकताच डोळे सताड उघडे , नजर तिरंग्यावर आणि प्राणपाखरू उडालेले असा शेवट किती अंगावर रोमांच आणणारा झाला असता. दोन तीन चार पाच सहा सातशे वर्ष इकडं तिकडं चालली असती.
(No subject)
शांमा प्रयत्न करते. पोस्ट
शांमा प्रयत्न करते. पोस्ट लैभारी.
अक्षय कुमार , सोनू सूद हे
अक्षय कुमार , सोनू सूद हे सर्व विकायला बाजारात उभे आहेत,कंगना पण विकवू आहे.त्या बाजारू लोकांना काय किंमत देण्याची गरज नाही
Bjp चे भड #### ve आहेत ते
आणि तो एक रॉकेटमन राहिला की
लोक म्हणतात शेवट खोटा आहे
Hrmant33 please edit post
Hrmant33 please edit post and remove bad words. And ## . This is not the place for it.
Pages