नवीन महाराष्ट्र ,नवीन सारीपाट ,अविश्वास ठरावात काय होईल ?

Submitted by हस्तर on 29 June, 2022 - 15:04

कृपया जुन्या धाग्याला ५०० वर प्रतिसाद झाले आहेत तेव्हा इथे नवीन चर्चा करू

१) अविश्वास ठराव आधी राजीनामा देणे गरजेचं आहे का ?
२) फक्त नामकरण करून मतदार लोक खुश होतील कि विकास कामे पण गरजेची
३) हॉटेलचे बुकिंग ३० तारखा पर्यन्त होते , म्हणजे अविश्वास ठराव पण पूर्व नियोजित होता का ?
४) लोकांची sympathy शिव सेनेला मिळेल का

जे ४० फुटीर लोक आहेत त्यांची नावे ,त्यांच्या मतदारसंघाची नावे व तेथील भाजप प्रतिस्पर्धी उमेदवार ह्यांची नावे कोणी देऊ शकेल का ?

तसेच अविश्वास ठरावा बाबत आपले आडाखे काय
१) सेना आमदार फक्त फुटायचे नाटक करत असून सरकार पडणार नाही
२) भाजप जिंकणार
३) किंवा परत निवडणुका

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ठाकरे यांनी राजिनामा दिला आहे. त्यामुळे सर्व शक्यता अशक्यते वर पडदा पडला आहे. असो.

भाजपाला सत्ता हवी होती, यथावकाशाने मिळेल. पेढे भरवून एकमेकांचे अभिनंदन झाले असेल तर आता तरी जनतेसाठी कामे करतील अशी अपेक्षा.

मामी लंडनला गेलेल्या आहेत त्या धावपळीत परत येतील. ओपनिन्ग ला डिझाइनर साडी चूज करायची असेल.

तो परत येतोय तर !
मामी लंडनला गेलेल्या आहेत त्या धावपळीत परत येतील. ओपनिन्ग ला डिझाइनर साडी चूज करायची असेल. >>> ३५-४० पुरणपोळ्याही ऑर्डर कराव्या लागतील ना ?

<<< Bjp नी दुसरा नेता निवडावा आणि फडणवीस ह्यांची पण मस्ती उतरवी >>
हे नाही होणार. अंगात मस्ती असणे हा तर राजकारणात अतिशय आवश्यक गूण आहे.

म्हणजे नवीन नवीन हिंदी पॉप अल्बम लवकरच येणार... नको...>>>>>>
त्यांच्या आणि दिगपाल लांजेकर विरोधात कोणीतरी कोर्टात याचिका टाका ना !
मामी ने पुन्हा गाणी गायची नाही , आणि दीगपाल ने ऐतिहासिक सिनेमे बनवायचे नाहीत .
खूप मानसिक छळ होतो हो

मोदी चे सरकार पाडेल देवेंद्र .त्याला अगोदर संघात काही तरी पद देवून राजकारण मधून बाहेर काढा.
नाही तर नरेंद्र ची खुर्ची धोक्यात येईल.

भूतान चे चलन पण भारता पेक्षा चांगल्या स्थिती मध्ये.भारतीय रुपया रसा तळाला.

हिंदुत्व आता भारतीय लोकांचे भरेल.जेवायची ह्यांना गरज नाही .

शांत , संयमी , मिळमिळीत नेता नको , राकट , खुनशी, बडबड्या नेता हवा >> उठांबद्दल बहुतेकांना काही राग नाही. भाजपचे कट्टर लोक सोडले तर. इव्हन बंडखोर अजूनही चांगलेच बोलत आहेत. त्यांनी एकदम आलोकनाथ मोड मधे जायच्या ऐवजी पक्षावर पकड ठेवून राउतांची बडबड आणि सैनिकांची तोडफोड कंट्रोल केली असती तर बंडखोरांचे परतीचे दोर तुटले नसते. २०-२५ तरी तळ्यात मळ्यात असतील गेला आठवडाभर. पण त्यांचेही परतीचे मार्ग बंद झाले.

दिपक केसरकर सारखा सयमित प्रवक्ता असताना राउत सारखा प्रवक्ता का निवडला असेल सेनेने?परवा एबिपी माझावर त्या अ‍ॅन्करने ५-६ उचलवल तरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर नियत्रण ठेवुन बोलत होते. प्रवक्त्यामुळे सरकार पडल ही दुर्मिळ घटना म्हणून इतिहासात नोन्द होइल.

आजकाल चिकवा धाग्यावर लिहितात तसं उद्धव ठाकरेंकडून फार अपेक्षा नसल्याने किंवा विशेषतः अमराठी लोकांच्या वेगळ्या अपेक्षा असल्याने त्यांचा कार्यकाळ लोकांना चांगला वाटला. ट्विटरवर पक्षीय राजकारणात नसलेले लोकही त्यांच्याबद्दल चांगलं बोलताना दिसत आहेत. कोव्हिड संबंधी त्यांची हाताळणी लोकांना दिलासादायक वाटली. भाजप समर्थक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त केसेस आणि मृत्यू यांचा राग आळवतात. पण अगदी दुसरी लाट भरात असतानाही टेस्टिंग करता येत होतं, बेड आणि ऑक्सिजन मिळत होते.
इतर अनेक राज्यांना मृत्यूचे आकडे प्रचंड प्रमाणात लपवले. तसं महाराष्ट्रात झालं नाही.
संघ सरकार, राज्यपाल , राज्य भाजप यांनी पावलोपावली केलेली अडवणूक, असहकार्य यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूतीही दिसते आहे.
त्यांची प्रशासनावर पकड कमी पडली. प्रशासन पोलिस यंत्रणेत बसलेल्या भाजपच्या माणसांना वेसण घालता आली नाही.

फोन टॅप आणि भीमा कोरेगाव प्रकरणी ज्यांचं नाव घेतलं जातंय त्या रश्मी शुक्लांची चौकशी बारगळणार.

ईडीची भीती आणि खोक्यांना हिंदुत्वनिष्ठा हे नवे नाव मिळाले. यातल्या किती लोकांविरुद्धच्या ईडी कारवाया अचानक बंद पडतात ते दिसेलच. कर्नाटकमध्ये फुटलेल्या आमदारांच्या प्पोटनिवडणुकांवेळच्या अ‍ॅफिडेव्हिटमध्ये संपत्तीत घसघशीत वाढ झालेली दिसली. तसं यांतल्या कितींच्या बाबत होतं तेही दिसेल.
काँग्रेस, -> रा कॉ -> शिवसेना असा प्रवास करून आलेला उदय सामंतांसारखा माणूस सांगतोय, आम्हाला शिवसेनेला मविआतील इतर दोन पक्षांच्या तावडीतून सोडवायचं आहे.

गेल्या विधानसभेच्या कार्यकाळाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी भाजपकडून छळ होतो असं सांगून भर सभेत मंत्रीपदाचा राजीनामा ठाकरेंकडे दिला होता. आता ते काय करतात ते पाहू

. त्यांच्या गटाच्या पक्षातून निलंबनाचं आणि आमदार म्हणून अपात्रतेचं प्रकरण निवडणूक आयोग आणि मग न्यायालयात जाईल. म्हणजे ठाकरेंना फार आशा ठेवून उपयोग नाही. आता शिवसैनिकांवरच सगळी मदार आहे. अन्यत्र बंडखोर पुन्हा निवडून आले, ते शिवसेनेला परवडणार नाही.

भाजपात / सरकारात सामील होताना बहुतेक बंडकर्‍यांना पुलंच्या 'पौष्टिक जीवना'तल्याप्रमाणे 'ईडी आहे की साधं' हा प्रश्न विचारला जाईल Wink

प्रवक्त्यामुळे सरकार पडल ही दुर्मिळ घटना म्हणून इतिहासात नोन्द होइल.>> पोपटाला चावी दिली तसा बोलतो.
बंडात माझा काही संबंध नाही होsss. सांगायला साहेब मोकळे.
बघा काही दिवसातच सगळे शिलेदार गडावर येतील.

उद्धवजींच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन भगतसिंग हे देखील पदाचा राजीनामा देतील. सर्वोच्च न्यायालयाकडून तातडीने फेरविचार याचिका दाखल करण्याचा आणि स्टे ऑर्डरचा आदेश येईल. बंडखोर आमदारांना पश्चात्ताप होऊन ते पुन्हा पक्षात येतील. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा या नाट्यात सहभाग असल्याचे समजल्याने अमित शहा यांचा राजीनामा आणि नरेंद्र मोदी यांचा राजकारण संन्यास असे होऊ शकते.

शरद पवारांनी खूप दबाव असूनही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नव्हता. (मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला कडवा विरोध असतानाही ते नामांतर घडवून आणले होते. )
भाजपा आधीच्या काँग्रेस अर्थमंत्र्यांनी काही ठराविक वर्षां आधीच्या मोठ्या मूल्याच्या नोटांचा भरणा बँकांत करण्यासाठी मुदत देऊन व त्यां ऐवजी नव्या सीरीजच्या नोटा देऊन एक प्रकारची नोटाबंदीच सुरळीतपणे राबवली होती.
थोडक्यात, शहाणे व समंजस लोक जे करू इच्छित नाहीत ते आगापीछा न बघता काही लोक करून टाकतात.( आणि त्याला धडाका, सर्जिकल स्ट्राईक वगैरे म्हणतात.)

एकनाथ शिंदेना आता ' नवहिंदुहृदयसम्राट' अशी पदवी समस्त हिंदुंकडुन देण्यात यावी

ह्या सर्वात एकनाथ शिंदे ह्यांना काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे. त्यांना सेनेत आज ना ऊद्या मुख्यमंत्रीपद मिळालंच असतं ईतकी ताकद त्यांच्यात होती. २०१९ ला ठाकरेंना राज्यपालांना पत्र देखील पाठवलं होतं पण पवारांच्या आग्रहामुळे ठाकरेंना मामूपद स्विकारलं. आता फडणवीसना पाठींबा देऊन फडणवीस त्यांना मुख्यमंत्रीपद कधीच देनार नाहीत. पैसा मिळाला असेल तर तो त्याना सेनेत राहूनही प्रचंड प्रमाणात मिळालाच असता. मूलाची केंद्रात सोय लावावी म्हणून हे केलं असेल तर ते ही किती टिकेल?? ऊद्या सेना-भाजप झालं गेलं विसरून पुन्हा एकत्र आले तर शिंदेंच्या मुलाला सेना मंत्रीपदावर राहू देनारच नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे. किरीट सोमय्यांनी सेनेला अंगावर घेऊन अशीच खासदारकी गमावून घेतली. बाकीचे लोक चुपचाप केंद्रात मंत्रीपदं घेऊन मजा करताहेत. तेच सेनेत राहूनही श्रिकांत शिंदेना मंत्रीपद मिळाले असते.
बाकी हिंदूत्वासाठी म्हणून बाहेर पडलो असं शिंदे कितीही सांगत असले तरी २०१९ चा भाषणांत फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही हे तो स्वच:च सांगत होते. ऊद्या राजकारनात शिंदे टिकतीलही पण त्यांच्या बरोबर फुटलेले आमदार संपतील.
शिवसेना ऊद्या पुन्हा जोमाने ऊभा राहील पण एकनाथ शिंदेंना स्वत:चं जे राजकीय नूकसान करून घेतलंय ते न भरून येनारं आहे.

<< दिपक केसरकर सारखा सयमित प्रवक्ता असताना राउत सारखा प्रवक्ता का निवडला असेल सेनेने?परवा एबिपी माझावर त्या अ‍ॅन्करने ५-६ उचलवल तरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर नियत्रण ठेवुन बोलत होते. प्रवक्त्यामुळे सरकार पडल ही दुर्मिळ घटना म्हणून इतिहासात नोन्द होइल.
नवीन Submitted by प्राजक्ता on 29 June, 2022 - 22:27 >>

-------- बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पक्षाच्या प्रवक्त्यामुळे एका महान परंपरा असलेल्या देशाचे नाक कापले जाण्याची घटना घडली आहे, इतिहासाने नोंद घेतली आहे.

राउतांमुळे ठाकरे सरकार पडले असे म्हणणारे लोक हे ED/ CBI/ कोषारी यांच्या टिम वर्कला कमी लेखत आहेत. Happy

<< बाकी हिंदूत्वासाठी म्हणून बाहेर पडलो असं शिंदे कितीही सांगत असले तरी २०१९ चा भाषणांत फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही हे तो स्वच:च सांगत होते. >>

------ राजकारणांत कोणीही कायमचा शत्रू (किंवा मित्र) कुणीही नसतो Happy भाजपा वापरुन फेकून देतील हे त्यांनाही माहित आहे.

<< एवढ्या लवकर क्लीन चीट दिली तर ते दुसरा मुमं यायच्या आधीच परत मविआला जाऊन मिळतील >>
-------- blanket क्लीन चिट नसतेच. त्यात खाचा खळगा ठेवलेल्या असतातच.

कुठलिही फाइल कायमची बंद होत नाही. फाइल पुढे सरकण्याचा वेग मंदावतो, मग त्यावर धूळ बसते, पण मोशाभि autocratic राज्यात बसलेली धूळ हवी तेव्हा झटकताही येते.

<< शांत , संयमी , मिळमिळीत नेता नको , राकट , खुनशी, बडबड्या नेता हवा >> उठांबद्दल बहुतेकांना काही राग नाही. भाजपचे कट्टर लोक सोडले तर. इव्हन बंडखोर अजूनही चांगलेच बोलत आहेत. त्यांनी एकदम आलोकनाथ मोड मधे जायच्या ऐवजी पक्षावर पकड ठेवून राउतांची बडबड आणि सैनिकांची तोडफोड कंट्रोल केली असती तर बंडखोरांचे परतीचे दोर तुटले नसते. २०-२५ तरी तळ्यात मळ्यात असतील गेला आठवडाभर. पण त्यांचेही परतीचे मार्ग बंद झाले.
Submitted by फारएण्ड on 29 June, 2022 - 22:21 >>

------ बंडखोर नाराज होते म्हणून गेले असतील तर ते परतण्याची थोडी शक्यता असते. त्यांच्या किंवा अप्तेष्टांच्या कानावर ED/CBI नामक बंदूक ठेवली असेल तर ?

शिवसेनेत किंवा इतर कुठल्याही पक्षात स्वच्छ लोक आहेत असे म्हणायची परिस्थिती नाही, पण आकसाने केवळ विरोधकांच्याच चौकशा सुरु असतात. येथे चौकशी करण्यापेक्षा त्रास देणे हाच उद्देश असतो. मग भाजपाप्रवेश केल्यावर पुढे काहीच होत नाही, भाजपाला मिळाले अन पवित्र झाले असे होते. नारायण राणे केवळ एक उदाहरण आहे.

राद्यसरकारी यंत्रणा भाजपीग्जच्या मागे लावल्या नाहीत ही ठाकरेंची पहीली चूक. आडी सारख्याच राज्यातील संस्था भाजपीग्ज च्या मागे सेनेने लावायला हव्या होत्या.### मला हेच वाटतं. दरेकर, लाड ह्यासारखे किती जण सापडले असते.

मला तर वाटते की ह्या बागींनाच प्रोटेक्शन मनी म्हणून भाजपाकडे खंडणी पोचती करावी लागली असेल. हॉटेल ची बिलंसुद्धा ह्यांनीच भरायची अशीसुद्धा अट असेल.

Pages