तुमच्या येण्याची नोंद करा

Submitted by -शर्वरी- on 27 June, 2022 - 03:06

तुमच्या येण्याची नोंद करा
तुमच्या जाण्याची नोंद करा
दरम्यान मधली पोकळी भरण्याची सोय करा.
भरल्या आभाळाखाली न भिजण्याचा सायास करा
भिजलातच जर चुकुन तर न भिजल्याचे ढोंग करा.

नदीला पूर आला तर काठावरून पहात रहा
झाडं-रस्ते पाण्यात गेले, तर गच्चीत जाऊन ऊभे रहा
होडी लोटा पाण्यामध्ये आलाच पूर गळ्याशी तर
होडी नसली हाताशी तर प्रवाहात हात मारा.

पोहता येते का तुम्हाला? येत असेल तर बरचं आहे!
होडी नसलेल्या सर्वांना पोहता येणे ही गरज आहे.
आतापर्यंत भिजला असाल, आता पोहण्याचे ढोंग करा.
नसेल येत पोहता तरी हात पाय हलवत रहा.
बुडता बुडता पाण्यामध्ये तरंगल्याचे सोंग करा.
रोज सारखे आजही जगण्याचे ढोंग करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कविता.

धागा केव्हाही काढला का असे ना नियतीच्या मनात असेल तेव्हाच येण्याची नोंद होते. Wink

धागा केव्हाही काढला का असे ना नियतीच्या मनात असेल तेव्हाच येण्याची नोंद होते. Happy
दोन वर्षं तरंगत होती आज काठाला लागली. Lol

खुप आभार सर्वांचे.