बाप

Submitted by काड्यासारू आगलावे on 9 June, 2022 - 10:23

शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?

रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक! वेळीच दवाखान्यात पोहोचवले म्हणून डाॅक्टरांनी भरभरून शाबासकी दिली.
कामधंदा बूडवून गेले आठ दिवस दवाखानाच्या फरशीवर झोपतोय, खायला काय तर गाडीवरचा वडापाव, रात्रीअपरात्री केव्हीही नर्स यादी देतेय औषध आणायला, आपला बापच तो, ईतकं करायला नको?
नातेवाईक येताहेत पहायला, त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.
बाप ठणठणीत झालाय आता, ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना, परवा आत्या आली होती, तिच्याशी बोलताना ऐकलं
“शहरातल्या पोराने वेळीच पन्नास हजार पाठवले म्हणून वाचलो, नाहीतर….”

माझी मिसळपाव शशक स्पर्धेत ही कथा प्रथम क्रमांकावर आली. पण तिथे भाजपविरोधी लेखन केल्यामुळे माझा आयडी काहीही न कळवता ब्लाॅक करण्यात आलाय.

Group content visibility: 
Use group defaults

छान जमलीय! > +१
माझी मिसळपाव शशक स्पर्धेत ही कथा प्रथम क्रमांकावर आली. >> अभिनंदन !

कडक जमलीय !

ईतर संकेतस्थळावर काय झाले हे कथेशेवटी नमूद करायची गरज नव्हती असे वाटले. कथेची परीणामकारकता त्या एक्स्ट्रा पॅरामुळे कमी व्हायला नको.

मायबोलीवर स्वागत Happy

गोष्ट आवडली.

<< ईतर संस्थळावर मत मांडण्याचंही स्वातंत्र्य नाही हे सांगायचा ऊद्देश होता. >> मनातले काय वाट्टेल ते लिहायचे असेल आणि तरीही ते मांडायचे स्वातंत्र्य हवे असेल, तर 'ऐसीअक्षरे'वर लिहीत जा. तिथे अकाऊंट आणि नावडते प्रतिसाद उडवले जात नाहीत. मराठी आंतरजालावर बाकी कुठेही ते संपूर्ण स्वातंत्र्य नाही, मायबोलीवर पण नाही. (पटत नसेल तर वेबसाईटवर जाहिराती दिसू नयेत याच्या टिप्स एकदा लिहून बघा.)

वैयक्तिक मत: मुळात अकाऊंट उडेल असे लिखाणच करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या (दुसऱ्याच्या) खाजगी संस्थळावर स्वातंत्र्य मिळेल ही अपेक्षाच भाबडी आहे. त्यासाठी स्वतःचे संस्थळच सुरु करावे लागेल, तरच ध्रुवासारखे अढळ स्थान प्राप्त होऊ शकेल.