टॕटू -- ३

Submitted by रंगिला on 31 May, 2022 - 14:24

टॕटू -- https://www.maayboli.com/node/81646
टॕटू -- २ - https://www.maayboli.com/node/81647

या दोन कथा न वाचता लिंक लागणे शक्य नाही

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आठ दिवसांच्या ब्रेक नंतर शेवटी मीच पुढाकार घेऊन येतो असे शिल्पा ला सांगीतले. आढेवेढे घेऊन ती तयार झाली. मला वाटल आता स्त्री स्वभावानुसार ती काही अटी आणि शर्ती घालेल पण तस काही न होता माझा सगळा धसमुसळे पण आपल्यात समाऊन घेऊन ती मला प्रोत्साहन देत राहीली. थोड्या वेळाने आम्ही शांत होऊन एकमेकांच्या बाहूपाशात पडून राहीलो.

गडबडीत टॕटू चे रसग्रहण करायचे राहून गेले मग मी हळूच तिचे टॕटू पाहू लागलो. एक दंडावर होता. एक मनगटावर, एक मानेवर होता. एक उजव्या उरोजाच्या वर होता. तसाच एक पोटावर होता. मी एकेका टॕटू निरखुन पहात होतो आणि एकेका टॕटू वर माझ्या पसंतीची मोहोर ओठ टेकवून देत होतो. खर तर मला ती चित्रे व त्यांचे सौंदर्य यातले काही कळत नव्हते पण मी उगाचच त्या टॕटू ची तारीफ करुन तिला खुलवत होतो. जस जसा मी तिच्या संवेदनशील भागाला ओठांनी स्पर्श करत होतो तीला पुन्हा जागवणार्या संवेदना होत होत्या.

एखादी संवेदना तिला सहन झाली नाही की ती मला घट्ट पकडून तसे करण्यापासून थोडा वेळ दुर करत होती. तिच्या हुंकाराने, प्रतिसादाने आणि प्रतिसादाने मी पेटत होतो. मला या पध्दतीने एखाद्या स्त्रीला पुन्हा पेटवण्याची नवीन कला समजली होती आणि मी तिच्या शरीरावरील संवेदनशील जागा शोधून शोधुन त्याला स्पर्श करुन किंवा ओठाने स्पर्श करुन तिला तयार करत होतो.

अश्या वेळी मला बॅचलर असतानाचे जोक आठवत होते. मला सिगारेट ची दिक्षा देणारा एक मित्र कारण नसताना एक जोक मारायचा त्याचा जोक आठवला.

सिगारेट आधी पेटवावी लागते मग ओढावी लागते . बाईचे पण तसेच आधी पेटवावी लागते मग जवळ ओढावी लागते.

अस तो म्हणायचा आणि मला जाम गुदगुल्या व्हायच्या. माझ्या मॅरीड लाईफमधे असे फार घडत नव्हते. लहान जागा, त्यात एकत्र कुटूंबात जशी अंघोळ उरकावी लागते तसे आम्ही ती गोष्ट उरकत होतो. त्यात वेगळेपणा नसायचा.

पण इथे आता नव्याने काही क्रिएटीव्ह करता येईल असे दिसू लागले होते आणि मी ती संधी सोडत नव्हतो. शिल्पाला ही तेच हवे होते. माझ्या पेटवण्याला तिने प्रतिसाद दिला आणि पुन्हा खेळ रंगला. एका प्रसंगी ती जोरात रोहन रोहन म्हणाली. मी चपापलो पण जणु काही घडलेच नाही असे दाखवुन मी खेळातली रंगत घालवली नाही.

आता मात्र आम्ही भलतेच दमलो होतो. मी तर घामाने निथळलो होतो. ती मात्र मला तशा अवस्थेत ओढत शॉवर खाली घेऊन गेली आणि पाण्याच्या त्या स्पर्शाने मला पुन्हा उत्साह आला. शॉवरचा पुरता आनंद घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर तिने माझे शरीर माझे डोके टॉवेलने कोरडे केले.

मला बाहेर काढून ती स्वतः पुन्हा कपडे घाऊन माझ्या मांडिवर डोके ठेऊन पुन्हा आडवी झाली.

मी सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढून शिलगावली आणि मधेच तिने ही माझी सिगारेट घेऊन चुळ भरल्यासारखे दोन झुरके मारले.

रोहनचा विषय काढायची मनात इच्छा होती पण शिल्पा भडकली आणि परत येऊ दिले नाही तर या भितीने मी गप्प बसलो. मग पुन्हा तिच्या स्लिव्हलेस टॉप मधून जो भाग दिसेल तिथला टॕटू पहात मी त्यावर बोटे फिरवत त्याची तारीफ सुरु केली.

"हा टॕटू या खेळात छान रंग भरतो. " असे मी म्हणताच ती म्हणाली

"रंगा , खरच तुला असे वाटते की ......... उगाच चापलुसी करत आहेस?"

"खोट कशाला बोलू अश्या नाजुक वेळी जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्याचे कौतूक कोण करेल ?" ती माझ्या डोळ्यात डोळे खालून मला जज करत होती की मी किती खरा बोलतो किती खोटा. मग जरा वेळ शांतता पसरली. मी तिचे केस कुरवाळात राहीलो.

" मी मास मिडीया शिकत असताना एक माझा बॉय फ्रेंड होता . रोहन त्याच नाव. त्यानेच मला हे टॕटू काढायला लावले. त्याचे म्हणणे मला ही पटत होते की यातून सेक्स करताना काही उत्तेजना मिळते. " तिने सांगुन टाकले. आता फारसे सिक्रेट शिल्लक नव्हते.

मग हा रोहन कुठे गेला ? मी न राहवून तिच्या केसांना कुरवाळत विचारले

त्याच्या आई वडीलांचा डिव्होर्स झालेला. पैशाला कमी नव्हती. तो ही माझ्या सोबत मास मिडीया करत होता. एकटा एका रुमवर रहायचा. घर मालकाला घरी कोण येते यावर चर्चा न करण्यासाठी जास्त भाडे द्यायचा. क्लास मधे असे काही बोलायचा की त्याच्या वर फिदा झाले. मग पुढे आम्ही रुमवर एकांतात भेटु लागलो. थोडेच दिवस झाले आणि त्याला एक नविन मुलगी पटली. आमच्या दोघांच्यात यावरु कडाक्याचे भांडण झाले. मी म्हणाले असे काय आहे तिच्यात ?

रोहन मला म्हणाला तिच्या शरीरावर १७ टॕटू आहेत. झाल मी पिसाळले. मी पण टॕटू कोरुन घ्यायला सुरवात केली. काही काळ त्याचे माझ्यातले आकर्षण वाढले आणि तो एक दिवस गायब झाला.

विवाह त्यातुन मिळणारी सिक्युरीटी मला तो पर्यंत काही समजत नव्हते. तो गेल्यावर अजून दोन बॉय फ्रेंड माझ्या जीवनात आले पण त्यांना या टॕटू चा उपयोग कसा करायचा समजले नाही. तुला मात्र रंगा न सांगता समजले.

"तुझ्या घरच्यांनी तुला लग्न कर म्हणुन पिडले नाही ?" मी मधेच विचारले.

"खुप मागे लागले. मला न सांगता मॅट्रीमोनीवर माझे नाव आई बाबांनी नोंदवले. मला न सांगताच घरात अचानक पहाण्याचे कार्येक्रम होऊ लागले. पण त्या अरेंज मॅरेज साठी इच्छुक मुलांना मी माझे पुर्वायुष्य सांगीतल्यावर त्यांनी परत इंटरेस्ट दाखवला नाही. पुढे आई बाबा कंटाळले आणि त्यांनी मला आहे तसे अ‍ॅक्सेप्ट केले. "

"पुढच तुला सांगीतलेच आहे. मी याच कारणाने एकटी रहाते. आता सध्या तुझ्या शिवाय माझ्या आयुष्यात कोणी नाही. " तिने तिची स्टोरी पुर्ण केली.

"हम्म्म्म्म अस आहे तर : असे म्हणुन मी तिचे कडकडीत चुंबन घेतले आणि म्हणले की

"आता मला सोडू नकोस. मी तुझ्यावर जाम खुष आहे. फक्त दोनच कारणाने आपले रिलेशन संपतील. जर तु लग्न केलेस आणि सिक्युअर्ड लाईफ जगायच ठरवल तर आणि मीच आणखी म्हातारा होउन तुला सुख देऊ शकलो नाही तर" असे म्हणुन मी तिला निरोप देण्यासाठी उभे केले.

निरोपाची ती मिठी मला सोडवत नव्हती. पण भरलेल्या कुटूंबातून रात्रभर गायब व्हायच डेरींग माझ्यात नव्हत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुभानअल्लाह! माझ्यासारख्या रात्र रात्रभर जागणाऱ्या आं शौ लोकांची फुल्ल सोय Happy

जोक्स द अपार्ट,
तीन भाग वाचलेच आहेत तर कथानक पुढील भागात कुठेतरी गेलेले आवडेल.

मायबोली धोरणात हे लिखाण बसते का नाही याचीही एका वेगळ्या धाग्यावर चर्चा झालेली आवडेल Happy

ऋन्मेऽऽष , धन्यवाद -
मी काकोडकर किंवा अन्य कोणा लेखकाची श्रुंगारिक भाषा न वापरता आवश्यक तेव्हडेच शब्द वापरुन लेखन केले आहे. मायबोलीकरांना ते कलात्मक वाटेल.

छान!

आता कथा पुढे सरकायला हवी !

बरेचं जण वाचतात पण प्रतिसाद देत नाहीत... का ते त्यांनाच माहीत.

आता तुमचा कॉल आहे... जे प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी तरी लिहायचं की नाही ते Happy

आबा.

100 टक्के मान्य आहे की जे प्रतिसाद देतात त्यांच्या साठी लिहायला हवे. प्रयत्न करतो.

मायबोली मधे एक कमतरता आहे असे वाटते की भले प्रतिसाद नको मिळू देत. अनेकांना माझ्या कथांवर प्रतिसाद देणे योग्य वाटत नसेलही. पण व्हुज किती हे समजले तर फार बरे झाले असते. खर तर मायबोली नंतर किती तरी उशीरा अनेक सोशल मिडीया आले आहेत ज्यांच्या कडे व्ह्युज पहायची सोय आहे.

पण व्हुज किती हे समजले तर फार बरे झाले असते.
>>> बरोबर. बऱ्याच लेखकांना आपलं लेखन किती जणांनी वाचलं आहे याची उत्सुकता असेल. Happy