उष.काल होता होता काळरात्र झाली चला पेटवू या पुन्हा आयुष्याच्या मशाली ।
सांगणाऱ्यांचे ठिक आहे हो पण ज्यांच्या आयुष्याच्या मशाली पेटतात आणि जीवन खाक होते त्यांच काय ?नेते तर सत्ता मिळवून आपले व आपल्या सात पिढ्यांचे भले करतात पण ज्यांनी या सत्ता पिपासु नेत्यांसाठी आयुष्य पणाला लावले त्यांना काय मिळते नेत्याचीत्राई मासाहेब ,बहिण ताईसाहेब नेत्याचा बाप दादासाहेब आणि कार्यकर्त्याचा बाप म्हातारा ।
आज प्रत्येक राजकीय पक्ष हा तरुण पीढीला टारगेट करत आहे कुणी धर्मद्वेषाचे विष पसरवत आहे तर कुणी मशिदीवरील भोंगे काढायला सांगत आहे तर कुणी हनुमानचालिसा म्हणायला सांगत आहे तर संत आणि साध्वी हिंदूंना चार मुले जन्मास घालण्यास सांगत आहे.पण हेच नेते भोंगे उतरवण्यासाठी आपल्या मुलांना सांगत नाही पद मात्र नेतेपुत्राला ठरलेलेच असते पोलीसांच्या लाठ्या कार्यकर्ते खातात केसेस कार्यकर्त्यांवर होतात आणि मलीदा मात्र नेते घेतात यात सर्वसामान्य कुटुंबातील मुलेच असतात ते आपोआपच सरकारी नौकरीतुन बाद होतात आज हिंदूना चार मुले जन्माला घाला सांगणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की देशातील कायदा सांगतोय की दोन मुलांच्यावर अपत्य असल्यास त्याला सा सरकारी नौकरीही मिळत नाही राजकारणात जायचे म्हटले तर कायद्यान त्याला कुठलीच निवडणूक लढवता येत नाही संत आणि साध्वींनी आधी हाकायदा रद्द करण्यास सरकारला सांगावे किंवा नेत्यांना चार मुले पेदा करण्याचा सल्ला द्यावा पण ते हे करणार नाही कारण त्यांना हेच नेते वा नेत्यांची मुले सत्तेवरच नव्हे तर प्रशासकीय सेवेतही हवी आहेत सामान्य पालकांची मुले नौकरी व राजकारणातून आपोआपच पोलिस केस वा दोनच्यावर मुले असल्याने बाद होणार आहेत म्हणून प्रत्येक मातापीत्याने आपल्या मुलांना आधी असल्या स्वार्थी राजकारण्यांपासुनदूर ठेवायला हवे नाहीतर मुलांचे भविष्य च नाही तर आपलेही निव्रुत्त जीवन अंधकारमय होयील नेते मात्र सत्ता उपभोगतील ।
पालकांनो सावधान रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे।
Submitted by ashokkabade67@g... on 13 May, 2022 - 12:50
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मटणकरी हा शब्द तुच्छता
मटणकरी हा शब्द तुच्छता दर्शवण्यासाठी वापरतात का? ट्विटर- फेसबुकवर अनेकदा पाहिलाय
वेलकम बॅक रश्मीजी!! अहो ,
वेलकम बॅक रश्मीजी!! अहो , फडण२० गृहमंत्री होते. त्यांना कायदेशीर कारवाई करण्यापासून कोणी रोखले होते. त्यांच्यासाठी धर्मामधे तेढ निर्माण करणारे वंदनीय असतात तर.>>>>> धन्यवाद भ्रमर. किती जणांचे तोंड दाबाल? इथे मायबोलीवरच डायरेक्ट ब्राह्मणांचे नाव न घेता त्यांना पीठमागे, पोटावळे म्हणून हिणवणारे आहेत की. तुम्ही कधी निषेध केला का या जातियवादाचा? की मनातलेच त्यांनी ओठावर आणले म्हणून शांत राहीलात?
काकांनी पण मिटकरींना दाबले नाहीच कारण मनातले बोलले ना त्यांच्या. जाम आग लागलीय या काका नी ठाकरे लोकांच्या बुडाला. लोकसत्ताचा सर्व्हेच सांगतोय कोण जातियवादी आहे ते. मज्जा मज्जा चाललीय.
सर्व्हेवरून सर्टिफिकेट ?
सर्व्हेवरून सर्टिफिकेट ?
मग पोलीस , कोर्ट , युनिव्हर्सिटी कशाची गरज नाही
मटणकरी हा शब्द तुच्छता
मटणकरी हा शब्द तुच्छता दर्शवण्यासाठी वापरतात का? ट्विटर- फेसबुकवर अनेकदा पाहिलाय>>>>> मिटकरीने केले ते आपले नी बाकीच्यांनी मग प्रतीकार केला की ती तुच्छता.
स्वतः आधी आपल्या बायकांनी दुसर्या बाईवर शाई नी अंडी फेकायची. मग प्रतीकार झाला की हात कापु नी पाय कापु असे ठणाणा करत सुटायचे. राष्ट्रवादीची परंपराच आहे ती.
https://www.esakal.com
https://www.esakal.com/saptarang/sarojini-chavan-writes-about-ncp-chief-...
शरद पवार : मातोश्री , सुंदर लेख
जातीभेदनिर्मूलन व आर्थिक स्वातंत्र्य यासाठी कष्ट केले
याच आठवड्यातला राजकीय
याच आठवड्यातला राजकीय नेत्याचा मुलगा परदेशी विद्यापीठातून डिग्री घेतानाचा दुसरा व्हिडियो
दोघांच्याही बापांना कृतकृत्य वाटतंय.
सामान्य लोकांच्या मुलग्यांना मात्र त्रिशूल, भगवे गमछे, फेटे, तलवारी आणि काय काय घेऊन मिरवणुकांत बीभत्सरीत्या नाचायला पाठवणार.
मायबोलीवरच डायरेक्ट
मायबोलीवरच डायरेक्ट ब्राह्मणांचे नाव न घेता त्यांना पीठमागे, पोटावळे म्हणून हिणवणारे आहेत की.
हे ब्राम्हणांसाठी होतं हा निष्कर्ष कसा काढला?
एक लई आवांतर प्रश्न - चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे ब्राह्मणांचा सबसेट आहेत का?
<< एक लई आवांतर प्रश्न -
<< एक लई आवांतर प्रश्न - चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे ब्राह्मणांचा सबसेट आहेत का? >>
-------- CKP, ब्राह्मण तसेच वर उल्लेखलेले पिठमागे, पोटावळे हे सर्वच मानवजातीचे सबसेट आहेत.
छोट्या छोट्या शब्दांनी उगाचच कशाला चिडायचे? पुढे चलायला पाहिजे. गेली हजारो वर्षे बहुजनांवर आपण घोर अन्याय केला आहे हे मान्य करुन आज आपल्या पिढीकडून असे घडणार नाही याची काळजी घ्या. बहुजनांना शिकायला मदत करणे जमले नाही तरी चालेल, पण किमान त्यांच्या मार्गातले अडथळे बनू नका.
केतकीला करियर आहे , तिला माफ
केतकीला करियर आहे , तिला माफ करा. नथुराम उर्फ शरद पोंक्षे
सामान्य पोरे अडकली तर त्यांना पोंक्षे वाचवणार की अक्षयकुमार ?
मुस्लिम वस्तीतून दगड आला म्हणून बुलडोझर चालवण्याचे समर्थन करणारे स्वतःच्या जातीतील , कंपूतील मुलांना मात्र माफ करा म्हणतात.

पवार साहेब ब्राम्हणद्वेष ,
पवार साहेब ब्राम्हणद्वेष , मत्सरासाठी जबाबदार आहेत हे एक गृहीतक वस्तुस्थितीशी पडताळून बघण्याची गरज आहे.
ब्राम्हणविरोधी posturing हा त्यांच्या राजकारणाचा एक अपरिहार्य भाग असल्याचं दिसतं पण इतक्या वर्षांच्या सत्तेत त्यांनी actually ब्राम्हणविरोधी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा पॉलिसी बनवलेली नाही. उलट अनेक ब्राम्हण त्यांच्या निकटच्या वर्तुळात आहेत. मग फक्त posturing साठी त्यांना किती दोष द्यायचा?
कसले posturing
कसले posturing
ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी
ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी हे बघा:
https://youtu.be/jqloE1iubLo
ब्राम्हण वि. ब्राम्हणेतर.... अशी पडली ठिणगी!
छोट्या छोट्या शब्दांनी उगाचच
छोट्या छोट्या शब्दांनी उगाचच कशाला चिडायचे? पुढे चलायला पाहिजे. गेली हजारो वर्षे बहुजनांवर आपण घोर अन्याय केला आहे हे मान्य करुन आज आपल्या पिढीकडून असे घडणार नाही याची काळजी घ्या. बहुजनांना शिकायला मदत करणे जमले नाही तरी चालेल, पण किमान त्यांच्या मार्गातले अडथळे बनू नका.>>>>>>> अजीबात नाही. इथे प्रश्न हिणवले गेल्याचा आहे, छोट्या गोष्टींनी चिडायचा नाही. आणी हो, बहुजन समाजाच्या हिताच्या आड नक्कीच येत नाही आणी येणार पण नाही. अजूनही कित्येक ब्राह्मण मुले आपले व्यवसाय् अभ्यास, नोकर्या सांभाळुन इतरांना मदत करतांना पाहीले आहे. दुसर्याला मदत करतांना जात धर्म कधीच आडवा येऊ नये हे माझे ठाम मत आहे.
मायबोलीवरच डायरेक्ट ब्राह्मणांचे नाव न घेता त्यांना पीठमागे, पोटावळे म्हणून हिणवणारे आहेत की.
हे ब्राम्हणांसाठी होतं हा निष्कर्ष कसा काढला?>>>>> मग पंक्चरवाला म्हणून बोलले की इथले पुरोगामी , मुस्लिमांना हिणवु नका असे का बोलतात? मी तरी बोलले नाही अजून असे. उलट मुस्लिम लोकांचे कौतुक वाटते की नोकरी नाही मिळाली की रडत न बसता धाडसाने धंद्याला सुरुवात करुन कष्ट करतात.
केतकीला करियर आहे , तिला माफ करा. नथुराम उर्फ शरद पोंक्षे>>>>> अजीबात माफ करु नका. उलट तिनेच माफी मागीतली पाहीजे. कोणाच्या आजारावर, शरीरावर बोलायला नाही पाहीजे. खरे तर मूळ पोस्ट करणारा आहे त्यालाच पण धरायला हवा होता. कारण तिने कविता केलीच नाहीये.
फक्त मुलांनाच नाही, घरातल्या
फक्त मुलांनाच नाही, घरातल्या वृ द्धांनाही सांभाळायची गरज आहे. ते बाहेर गेले, दिसण्यावरून धर्म ओळखता येत नसेल, तुम्ही कोण आहात, धर्म काय याची उत्तरं पटकन देता आली नाही, आधार कार्ड नसेल तर डोक्यावर , थोबाडीत थपडा बसण्याची शक्यता आहे. मग घरच्यांना डायरेक्ट मृतदेहच मिळेल.
बातमीत मारहाणीचा व्हिडियोही आहे. नक्की बघा.
जयति हिंदु राष्ट्रम्!
हो, बातमी वाचली. व्हिडीओ
हो, बातमी वाचली. व्हिडीओ पहाण्याचे खरच धाडस नाही झाले. अशांना तर फासावर लटकवायला पाहीजे, नो जन्मठेप. मध्यंतरी पुण्यात की चिंचवड मध्ये एक डॉक्टर चक्कर येऊन पडले तर बेवडा समजून लोकांनी त्रास दिला. लोकांना लाज वाटायला हवी. उद्या आपल्याच घरातले लहान थोर असे अडकु शकतात. किमान पोलीसांना तरी कळवा की, ते बघतील खरे काय आहे ते. पण नुसते मोबाईल वर शुटिंग करत रहातात.
सुल्ली डील, बुल्ली बाई अॅप
सुल्ली डील, बुल्ली बाई अॅप बनवणार्या मुलांनाही त्यांचं वय लक्षात घेऊन जामीन मिळाला.
पायल तडवीला जातीवरून हिणवणार्या डॉक्टर मुलींना तर शिक्षण पूर्ण करायची परवानगी मिळाली. तेव्हा पालकांनो, फार घाबरू नका. तुमची मुलं चुकली तरी फार नुकसान हो णार नाही. बग्गा, रामभक्त गोपाल, कपिल गुर्जर यांचं तर मस्त चाललंय
एका वयस्कर व्यक्तीला, भवरलाल
एका वयस्कर व्यक्तीला, भवरलाल जैन, यांना मुस्लीम असल्याच्या "संशयावरुन" मारले जाते? मारल्या गेलेली व्यक्ती मुस्लीम नव्हती म्हणून थोडी जास्तच हळहळ व्यक्त होत असेल तर तेही चुकीचे आहे.
अजून किती निच्चांक गाठणार आहोत? माणुसकीला लाज वाटणारी घटना आहे. मारल्या गेलेली व्यक्ती कुठल्याही धर्माची असती, आणि हो अगदी मुस्लीम असती, तरी मारण्याचे / हत्येचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. अशा प्रत्येक घटनांचा सर्व थरातून तिव्र निषेध होणे अपेक्षित आहे.
तेच, मारली गेलेली व्यक्ती
तेच, मारली गेलेली व्यक्ती कुठल्याही जात पंथाची धर्माची असो, शेवटी एक जीव आहे. पण मारायचेच कशाला? कोणी अधिकार दिला? केवळ विकृती की अजून काही?
काल की परवा कुत्र्याच्या एका छोट्या पिल्लाला, ते केवळ रिक्षात बसले म्हणून रिक्षावाल्याने संतापुन बेदम मारहाण करुन त्या पिल्लाचा जीव घेतला.
मानवी संवेदना जास्त विकृत होत चालल्यात.
Pages