उष.काल होता होता काळरात्र झाली चला पेटवू या पुन्हा आयुष्याच्या मशाली ।
सांगणाऱ्यांचे ठिक आहे हो पण ज्यांच्या आयुष्याच्या मशाली पेटतात आणि जीवन खाक होते त्यांच काय ?नेते तर सत्ता मिळवून आपले व आपल्या सात पिढ्यांचे भले करतात पण ज्यांनी या सत्ता पिपासु नेत्यांसाठी आयुष्य पणाला लावले त्यांना काय मिळते नेत्याचीत्राई मासाहेब ,बहिण ताईसाहेब नेत्याचा बाप दादासाहेब आणि कार्यकर्त्याचा बाप म्हातारा ।
आज प्रत्येक राजकीय पक्ष हा तरुण पीढीला टारगेट करत आहे कुणी धर्मद्वेषाचे विष पसरवत आहे तर कुणी मशिदीवरील भोंगे काढायला सांगत आहे तर कुणी हनुमानचालिसा म्हणायला सांगत आहे तर संत आणि साध्वी हिंदूंना चार मुले जन्मास घालण्यास सांगत आहे.पण हेच नेते भोंगे उतरवण्यासाठी आपल्या मुलांना सांगत नाही पद मात्र नेतेपुत्राला ठरलेलेच असते पोलीसांच्या लाठ्या कार्यकर्ते खातात केसेस कार्यकर्त्यांवर होतात आणि मलीदा मात्र नेते घेतात यात सर्वसामान्य कुटुंबातील मुलेच असतात ते आपोआपच सरकारी नौकरीतुन बाद होतात आज हिंदूना चार मुले जन्माला घाला सांगणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की देशातील कायदा सांगतोय की दोन मुलांच्यावर अपत्य असल्यास त्याला सा सरकारी नौकरीही मिळत नाही राजकारणात जायचे म्हटले तर कायद्यान त्याला कुठलीच निवडणूक लढवता येत नाही संत आणि साध्वींनी आधी हाकायदा रद्द करण्यास सरकारला सांगावे किंवा नेत्यांना चार मुले पेदा करण्याचा सल्ला द्यावा पण ते हे करणार नाही कारण त्यांना हेच नेते वा नेत्यांची मुले सत्तेवरच नव्हे तर प्रशासकीय सेवेतही हवी आहेत सामान्य पालकांची मुले नौकरी व राजकारणातून आपोआपच पोलिस केस वा दोनच्यावर मुले असल्याने बाद होणार आहेत म्हणून प्रत्येक मातापीत्याने आपल्या मुलांना आधी असल्या स्वार्थी राजकारण्यांपासुनदूर ठेवायला हवे नाहीतर मुलांचे भविष्य च नाही तर आपलेही निव्रुत्त जीवन अंधकारमय होयील नेते मात्र सत्ता उपभोगतील ।
पालकांनो सावधान रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे।
Submitted by ashokkabade67@g... on 13 May, 2022 - 12:50
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
हो, पोरांना जातपात धर्मभेद
हो, पोरांना जातपात धर्मभेद यासोबत राजकीय विचारधारांपासूनही दूर ठेवणे गरजेचे!
अमुकतमुक जाती धर्माचे लोकं अमुकतमुक असतात असे चुकूनही त्यांच्यासमोर बोलू नये. भले तुम्ही त्यांचा सांगत असलेला स्वभावगुण सामान्य का असेना. पण त्यांच्या डोक्यात यामुळेच समूहभेद बसतो, आणि याचा फायदा पुढे ब्रेनवॉश करणारी टाळकी उचलतात. मुलांना समता आणि बंधुभाव शिकवणे काळाची गरज आहे.
कशाहीपासून दूर ठेवू नका.
कशाहीपासून दूर ठेवू नका.
स्वतःचा विचार करायला शिकवा फक्त. ते बघतील त्यांना करायचं आहे ते.
स्वतःचा विचार करायला शिकवा हे
स्वतःचा विचार करायला शिकवा हे ऐकायला जरी योग्य वाटत असले तरी लहान मुलांना तो त्यांच्या वयात तरी नाही करता येत. त्यामुळे त्यांना योग्य दिशेने विचार करायला लावणे हे गरजेचे.
मुळात आपण मोठेही विचार करतो म्हणजे काय करतो. जी जगदुनिया आपण बघतो, जे आपल्या डोक्यात फिड होते त्या आधारावरच तर विचार करतो. ईथेच मायबोलीवर दिसते की एका शहरातल्या लोकांना दुसर्या शहरातील लोकांचे वागणे कल्चरल शॉक वाटते. कारण जगात असे काही आहे हा डेटा त्यांच्या डोक्यातच जमा नसतो. प्रश्न खरा पुढे येतो की मग तुम्ही तो शॉक अॅबसॉर्ब करता की ई बाई हे काय म्हणून त्याला नावे ठेवता..
त्यामुळे तुम्ही मुलांच्या डोक्यात काय भरत आहात हे महत्वाचे. मागे मी मांसाहाराचे संस्कार या धाग्यावरही हेच सांगायचा प्रयत्न केलेला. जर तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाहार म्हणजे ईईई असे आपल्या मुलांना सांगू नका. काही लोकं तो करतात, आपण करत नाही. अॅण्ड व्हायसे वर्सा. यात कोणी चूक वा बरोबर नाही असे त्यांना सांगा. अन्यथा याच आधारावर ते मोठे होऊन माणसामाणसात भेद करू लागतील.
तुम्ही टीव्हीवर , नेटवर
तुम्ही टीव्हीवर , नेटवर कोणती न्यु ज चॅनेल्स बघता त्यावरही बरंच काही आहे. काही न्युज चॅनेल्स दिवसरात्र द्वेष ओकत असतात.
मग कॉलेजात जाणारी मुलं मुली सुल्लीडील सारखी अॅप्स बनवतात.
म्हणून तर आम्ही न्यूजच लावत
म्हणून तर आम्ही न्यूजच लावत नाही. न्यूज खरी वा खोटी वा अजेंडा असलेली, द्वेष पसरवणारी ते एक झाले. पण ती आपल्या डोक्यावर आदळायची पद्धतही फार गचाळ. मुलांनी हे बाजारीकरण न बघितलेलेच चांगले. किंवा योग्य वयात आल्यावरच त्यांना हे दाखवणे उत्तम.
जे चित्रपटात आणि युट्यूब विडिओवर जे दिसते ते सारेच खरे नसते असे मुलांना आपण सांगतो. पण बातम्यांनाही ते लागू होते हे त्यांना सांगणे अयोग्य आणि समजावणे अवघड.
घरात मुल अशी किती वेळ असतात
घरात मुल अशी किती वेळ असतात.बराच वेळ ती बाहेर च असतात . समाजात काय चालल आहे,बाजू चे वातावरण कसे आहे त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो च.आणि येणाऱ्या अनुभवातून त्यांची मानसिकता बनत जाते.
चोरी,खून करा असे आई वडील शिकवत नाहीत अगदी अट्टल गुन्हेगार आई वडील असेल तरी.
तरी मुल गुन्हे करतात च ना?
सामाजिक वातावरण चांगले असणे खूप गरजेचे आहे त्या साठी राजकीय मार्गाने मार्ग निघू शकतो.त्या साठी चांगली लोक राजकारणात हवीत.
राजकारण पासून लांब राहून सामाजिक वातावरण सुधारता येणार नाही.
इच्छा असू किंवा नसू तुम्हाला प्रवाह बरोबर वाहत जाण्याशिवाय पर्याय राहत नाही.
दंगलीत मी बघितले आहे आयुष्यात कधी झुरळ न मारणारी लोक पण माणसांना मारण्यात तयार झाली होती.
त्यालाच प्रवाह म्हणतात...
पुराच्या पाण्यात उभे राहून तुम्ही ते पाणी थोपवू शकतं नाही.वाहून जावे च लागेल.
त्या साठी धरण बांधणे हा उपाय आहे.
आज अनेक राजकीय पक्षांच
आज अनेक राजकीय पक्षांच राजकारण हे धर्म याच एकमेव विषयावर चालू आहे महाराष्ट्रात तर तीन बंधू एक चुलत तर एकाला कधीकाळी मा.बाळासाहेबांच्या बांच बोट धरून आधी छोटा नंतर स्वताला मोठा बंधु म्हणून घोषित करणारा असे तीघे हिंदूत्वाचा खरि मक्तेदार कोण यासाठी भांडत आहेत आणि यासाऱ्यांच टार्गेट फक्त आणि फक्त अठरा ते पंचवीस वयितील तरुण आहेत हा तरूण वर्ग सारासार विचार करणारा असतो का तर त्याचे उत्तर नाही असेच असते या वर्गात असते फक्त भावनाशिलता आणि काहीतरी करायची उर्मी अशी मंडळीच या राजकीय पक्षिंना हवी असतात काही खरे काही खोटे सांगत याच मंडळींची माथी भडकवून ही मंडळी सत्तेचा सोपान चढण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यिंना तर सत्ता मिळतेच पण या युवकांचच नाही तर त्यांच्या साऱ्या कुटुंबाचच भविष्य उध्वस्त होत असत हे सत्य कुणीही नाकारु शकत नाही म्हणून प्रत्येक पालकान सावध रहाण्याची गरज आहे ।
पॉइण्ट बरोबर आहे. त्यात काही
पॉइण्ट बरोबर आहे. त्यात काही वाद नाही.
पण टार्गेट फक्त सेना-मनसे-भाजप आहे का? गेली १५-१६ वर्षे जुन्या इतिहासावरून जे वारंवार उकरून काढले जाते त्याबद्दल काहीच नाही? अनेक मराठी पोरे त्याच्या नादी लागली आहेत. उठसूठ "महाराष्ट्राचा अपमान" वगैरे सुरू आहे. रोजच्या पेपरात कोणाच्या तरी अपमानाचा क्लेम असतो.
ह्याला एक मार्ग आहे मुलांना
ह्याला एक मार्ग आहे मुलांना चांगल्या कामात गुंतवणे.
त्या साठी सर्वात चांगले क्षेत्र म्हणजे खेळ.
पहिल्या गावागावात तालमी होत्या .माझ्या गावात पाच तालमी होत्या .
तरुण मुलं तालीम आणि कुस्ती मध्ये गुंतत.
तसे विविध मैदानी खेळ त्यांच्या स्पर्था भरवणे .आणि असेच चांगले छंद मुलांना लागतील आणि ते अभ्यास व्यतिरिक्त त्या मध्ये गुंततील
असे काही शाळे च्या स्तरापासून केले पाहिजे.
लोकांनी सर्व नेत्यांना
लोकांनी सर्व नेत्यांना फाट्यावर हाणावे
आपला कुणीही उद्धार कर्ता नाही , कुणीही सम्राट , सुलतान , हर हायनेस नाही.
नेते आपल्या जीवावर जगतात
पब्लिकला खर्याखोट्या
पब्लिकला खर्याखोट्या माहितीवरून व्हेण्टिंग करायचे असते ते सोशल नेटवर्क्स वरून व्हर्च्युअली करू दे काय करायते. प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काही करू नका, आपले शिक्षण, नोकरी वगैरे सोडून हे धंदे करू नका हे सांगणे महत्त्वाचे. ज्या नेत्यांच्या काड्यांमुळे तुम्ही एकदम भारून जाउन हे उद्योग करत आहात, ते नेते तो विषय कधी सोडून दुसरीकडे जातील कळणार नाही.
सध्याच्या सरकारी धोरणांबद्दल, चालू असलेल्या अन्यायांबद्दल आंदोलने करणार्यांबद्दल हे नाही. त्यांचा तो हक्क आहे आणि बदल घडवायला असे लोक लागतातच. पण तेथेही दंगे बिंगे न करता घटनात्मक मार्गाने करा.
घटनेने प्रत्येक नागरिकाला
घटनेने प्रत्येक नागरिकाला विचार व्यक्त करण्याचा , टिका करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या हक्कांचे संरक्षण करणे सरकारचे कर्त्यव्य आहे. प्रत्येक वेळी विरोधकांवर / आंदोलक कार्यकर्त्यांवर देशद्रोह सेडिशन, विरोधकांना ED लावणे असले प्रकार करु नये. नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा या बाबत निर्णय महत्वाचा वाटतो.
विचार व्यक्ती करण्याचा अधिकार
विचार व्यक्ती करण्याचा अधिकार आहे पण भान ठेवूनच च विचार व्यक्त केले पाहिजेत.
कोणाच्या शारीरिक व्यंग वर टीका करता येणार नाही.स्त्री असेल तर तिच्या स्त्रीत्व वर टीका करणे योग्य नाही.कोणाच्याच खासगी सेक्स लाईफ वर टीका करता येणार नाही.
शिव्या देणे,किंवा अर्वाच्य भाषा वापरता येणार नाही
कोणाच्याच श्रद्धा स्थानावर बिन बुडाची टीका करता येणार नाही.
हे सर्व पण लक्षात ठेवूनच विचार व्यक्त करावेत आणि घटनेला पण तेच अपेक्षित आहे.
ब्लँककँट अगदी बरोबर आहे ,पण
ब्लँककँट अगदी बरोबर आहे ,पण फाट्यावर मारता येत नाही ना लोकशाहीचा पाचवा स्तंभही मीडिया ही एकतर विकत घेतला जातो वा संपवला जातो आणि भीतीने वा लोभाने हे मीडियावर आपणच कसे तारणहार आहोत हे सदैव खोटे बोल पण रेटुन बोल या उक्तीला सार्थ करत सांगत असतात ,खरतर कुठलाही राजकीय पक्ष ना हिंदूचा तारणहार वा मुस्लिमांचा मसिहा नाही पण युवा वर्गाची माथी भडकावून आपले सत्तेचे स्वप्न हे पुर्ण करतात आणि यांचीच मुले वारसाहक्काने पुन्हा नेते बनतातयाला कुठलाच पक्ष अपवाद नाही भाजपतही हेच चाललय दानवे असो वा राणे वा मुंडे वा महाजन सर्वत्र घराणेशाही आहेच कार्यकर्ते केसेस अंगावर घेतात आधीच नौकऱ्यांची वाणवा त्यात गुन्हा दाखल असल्याने नौकरी गेलीच याला कारण आहे एकदा निवडून आल की हे नेते पाच वर्षांत करोडपती बनतात[कसे तो संशोधनाचा विषय आहे]आणि याच पैशावर पुन्हा निवडूण येतात हेच चक्र अविरत सुरु आहे म्हणून सामान्य माणूस बाजुला फेकला जातोय ।
खून के सब साथी जेल मे ना कोई
खून के सब साथी
जेल मे ना कोई
याच विषयावरचा माझा धागाच अ
याच विषयावरचा माझा धागाच अॅडमिन नी उडवून दिला
लोकांनी सर्व नेत्यांना
लोकांनी सर्व नेत्यांना फाट्यावर हाणावे
आपला कुणीही उद्धार कर्ता नाही , कुणीही सम्राट , सुलतान , हर हायनेस नाही.
नेते आपल्या जीवावर जगतात
ब्लॅक cat ह्यांच्या ह्या विचाराशी पूर्ण सहमत.
आण्णा,तात्या,दादा ह्यांना विचाराची काही गरज नाही
<< लोकशाहीचा पाचवा स्तंभही
<< लोकशाहीचा पाचवा स्तंभही मीडिया ही एकतर विकत घेतला जातो वा संपवला जातो >>
------ लोकशाहीचे चार स्तंभ विधायिका Legislature, कार्यपालिका Executive, न्यायपालिका Judiciary आणि पत्रकारिता/Media हे आहेत. पाचवा स्तंभ कुठला आहे?
कबाडे नी जाणत्या राजाच्या
कबाडे नी जाणत्या राजाच्या पक्षाची ओळख खुबीने टाळली आहे , जणूकाही सात्विक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे .
पण भाजप वर मात्र हेतुपुरस्सर टीका !
पुण्यातील मारणे ,लोंढे या गुंडांना कोणी मोठे केले माहीत आहे का ? ज्या वेळेस हे गुंड त्यांच्याच लोकांना त्रास देवू लागले तेंव्हाच ते संपवले गेले वा जेल मध्ये गेले ,
त्यांचे हजारो समर्थक झोपडपट्ट्यांमध्ये वाढतील आणि त्यांना राजकारणात वापरता येईल असे पोषक वातावरण ठेवणे ,कार्यकर्त्यांच्या मनात ब्राह्मण द्वेष पसरवणे , अशी अती विधायक कामे त्यांच्या पक्षाच्या वतीने राजरोस चालू असतात .
गेल्या दोन चार वर्षांत भाजप समर्थकांना मीडियावरील लिखाण बद्दल मारहाण करण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वात पुढे असतात , याचा ही काबडेनी अनुल्लेख केला .
लेख पूर्णपणे एका बाजूला कलंडलेला आहे , असू द्या ज्याची त्याची मर्जी !
पवार ब्राह्मणद्वेष पसरवतात
पवार ब्राह्मणद्वेष पसरवतात म्हणजे नेमकं काय करतात ?
आणि मग ब्राह्मण त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाहीत ?
भीमा कोरेगाव लढाई , 1948 ची ब्राह्मणजाळपोळ पण त्यांनीच केली होती की काय ?
काँग्रेस राष्ट्रवादी यांनी खेड्यापाड्यात सामान्य कुटुंबापर्यंत विचार पोचवले हे काही संकुचित लोकांना सहन होत नाही
भीमा कोरेगाव लढाई , 1948 ची
भीमा कोरेगाव लढाई , 1948 ची ब्राह्मणजाळपोळ पण त्यांनीच केली होती की काय ? >>> दोन्ही एकत्र करू नका हो
एक नॉर्मल लढाई होती. दुसरा दंगा.
पवार स्वतः काही करत नाहीत. तेवढे हुशार आहेत ते. त्यांचे चेले करतात. मिटकरी वगैरे. कोणतेही भाषण बघा यूट्यूबवर. बाकी ब्रिगेड तर आहेच.
कार्यकर्त्यांच्या मनात
कार्यकर्त्यांच्या मनात ब्राह्मण द्वेष पसरवणे>>> ५ वर्ष फडण२० मामु होता , हातावर हात ठेवुन बसला होता ?
राष्ट्रवादी पण अपवाद नाही तो
राष्ट्रवादी पण अपवाद नाही तो पक्ष पण अनेक उचापती करत असतो.
जतिजाती मध्ये प्रेमाचे संबंध निर्माण च होवू नयेत म्हणून लोकांचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग केले जाते.
पक्ष स्वतः असली काम करत नाही ते तिसऱ्या कडूनच करून घेतात.
सरकारी कर्मचारी कसे लाचेची रक्कम पान वाल्याकडे जमा करायला सांगतात किंवा त्यांचे स्वतःचे हस्तक असतात.त्यांना दलाल म्हणतात.
स्वतः मात्र लाच म्हणून मिळालेल्या पैशाला स्वतः सरळ हात लावत नाहीत.
त्या मुळे लाच पण मिळते आणि हात पण स्वच्छ.
तसाच प्रकार राजकीय पक्ष करत अस्तात.
गल्ली बोळात निर्माण झालेले दादा ,गुंड ही ह्या राजकीय पक्षाचीच लेकर असतात.
नाहीतर हिम्मत होईल का गुंडगिरी करायची.
पोलिस सोलून काढतील.
नवी दिल्ली : वाराणसीच्या
नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) सर्वेक्षणावरून सध्या वाद सुरू आहे. य़ा वादावर संघपरिवाराच्या (RSS) बाजूने सूचक व महत्वाचे विधान आले आहे. ‘ज्ञानवापी तसेच यापुढील कोणत्याही मंदिर-मशीद वादात किंवा आंदोलनात संघ अथवा संघपरिवार थेटपणे उतरणार नाही, असे वरिष्ठ संघ सूत्रांनी आज अनौपचारीकरीत्या बोलताना सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘काशी मथुरा बाकी है‘ हा पुढील अध्याय सुरू झाल्याचे वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर थेट संघाच्या बाजूने आलेले हे विधान महत्वाचे मानले जाते.
https://www.sarkarnama.in/desh/after-gyanvapi-row-rss-says-it-will-not-i...
कर्नाटकातल्या एका शाळेत
कर्नाटकातल्या एका शाळेत बजरंग दलाने युवकांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं. कुठे कुठे सांभाळाल?
कार्यकर्त्यांच्या मनात
कार्यकर्त्यांच्या मनात ब्राह्मण द्वेष पसरवणे>>> ५ वर्ष फडण२० मामु होता , हातावर हात ठेवुन बसला होता ?>>>>> बोलणार्याचे तोंड दाबता येत असेल तर मी मटणकरी, झिपर्या आणी बाकी भडभुंज्यांचे दाबले असते. आता झिपर्या फिरायला गेल्याने शांतता आहे. सध्या आम्ही, आमचे , महाराष्ट्राचा अपमान , कोमट पाणी, कोथळा थंडावलेत. मोर्चे सुद्धा शांत आहेत, कोणी यात्रेत साप सोडत नाहीत.
अरेरे 35 वर्षे पाठिंबा देऊनही
अरेरे 35 वर्षे पाठिंबा देऊनही मित्र ठाकरेबद्दल ही भाषा!
ममता, पवार , ठाकरे सगळ्यांनी भाजपच्या मागे येणे थांबवले की त्यांच्याबद्दल अनादर करणे सुरू होते
म्हणूनच बहुजन , मुसलमान , ख्रिश्चन, बौद्ध , निधर्मी यांच्याबद्दल भगवे कडवे निंदनीय बोलतात , कारण ते त्यांच्या मागे आता येत नाहीत
बोलणार्याचे तोंड दाबता येत
बोलणार्याचे तोंड दाबता येत असेल >>>>>
वेलकम बॅक रश्मीजी!! अहो , फडण२० गृहमंत्री होते. त्यांना कायदेशीर कारवाई करण्यापासून कोणी रोखले होते. त्यांच्यासाठी धर्मामधे तेढ निर्माण करणारे वंदनीय असतात तर.
इतिहातील राजेमहाराजानी
इतिहातील राजेमहाराजानी प्रजेला खुनशी बनवून ठेवले आहे , कुणी ना कुणी शत्रू , दुष्मन , देशद्रोही , असे सतत चवताळून गेल्याशिवाय देशसेवा होत नाही की काय
1947 नंतर लोकशाही आली , युद्ध नाही , आता निष्पक्ष निवडणूक होते , पण 2014 नंतर चित्र बदलले
Pages