मैने प्यार किया

Submitted by केशवकूल on 26 April, 2022 - 01:31

प्रसिद्धीसाठी काय केले नाही.

क्रिकेट मध्ये सेन्चुरी मारली.
लोक म्हणाले, “पाटा पिच असणार.”
कथा लिहिल्या.
लोक म्हणाले, “पकाऊ आहेत.”
कविता केल्या.
लोकांनी नाकं मुरडली, “टाकाऊ आहेत.”
लेख लिहिले.
लोक म्हणाले, “विकाऊ आहेत.”
आदळाआपट केली.
लोक म्हणाले, “आडमाप आहे.”
कपडे फाडले.
लोक कुत्सितपणे म्हणाले, “आहेरातले असणार.”
गाढवावर उलटे बसून, तीन पाट काढून, स्वतःची वरात काढली.
लोक म्हणाले, “आता मात्र ह्याला वेड लागले.”
पिऊन धिंगाणा घातला.
लोक खवळले, चप्पल घेऊन धावले, “ह्याच्या आयला------”
मग प्रेम केले.
प्रतिसाद मिळाला.
लोक आश्चर्यचकित झाले , “व्वा, वाटले नव्हते. शेवटी बाबल्याने आयुष्यांत काहीतरी केलं बरं का !”
पण ते ऐकायला उरलोच नव्हतो मी.
आता उरलो फक्त प्रेमा पुरता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलेय.

ज्यांना ईतरांमध्ये काहीही चांगले सापडत नाही त्यांच्या मताला ईतरांनी किती किंमत द्यावी व का द्यावी?

कळली नाही
कोणावर प्रेम केले.. लोकांनी वा वा का केले?