कौन प्रवीण तांबे? - एका वेड्या स्वप्नाची कहाणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 April, 2022 - 19:31

आज रात्री जेवून झाल्यावर जेव्हा मी बायकोला म्हटले मला प्रवीण तांबेचा पिक्चर बघायचा आहे तेव्हा बायकोने हेच विचारले ... कोण प्रवीण तांबे?

एक्झॅक्टली हेच पिक्चरचे नाव आहे - कौन प्रवीण तांबे?

बायकोने काय स्टोरी आहे विचारले.
मी थंडपणे म्हणालो, आयपीएल खेळणारा एक क्रिकेटर आहे. त्याची कथा आहे.

अरे देवा.. आधीच दिवसरात्र तुझे आयपीएल सुरू झालेय, ते कमी आहे की आता पिक्चरही आयपीएलचाच बघणार आहेस... बायकोची वैतागलेली प्रतिक्रिया!

आमचे संभाषण ऐकून आतल्या खोलीतून आई बाहेर आली. कोण रे, तुझ्या ऑफिसमध्ये ज्याचा भाऊ होता तो का?
मी होकारार्थी मान डोलावली.

काय बोलतोस? त्याच्यावर पिक्चर आला?? - आईची आश्चर्याने ओथंबलेली प्रतिक्रिया.

अर्थात मी देखील त्याचा भाऊ आमच्या ऑफिसमध्ये आहे हे आईला कौतुकाने तेव्हाच सांगितले होते जेव्हा तो चमकला होता.
पण तरीही त्याच्यावर पिक्चर? जे मलाच पचवणे अवघड होते ते त्यांना कसे पटवून देणार होतो?

मग मी शांतपणे त्यांना ट्रेलर दाखवला.
https://www.youtube.com/watch?v=5XZia9c4fVU

मला हा ट्रेलर आवडलेला. त्यांनाही आवडला. म्हणून सर्वांनी एकमताने चला बघूया म्हटले,

आणि सुरू झाला आमचा "कौन प्रवीण तांबे?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रवास Happy

चित्रपटाच्या सुरुवातीलाच जेव्हा खुद्द `द वॉल राहुल द्रविड' म्हणतो की आज मी तुम्हाला सचिन, गांगुली, लक्ष्मण, कुंबळे यांची नाही तर प्रवीण तांबेची स्टोरी सांगणार आहे, तेव्हाच आपल्याला विश्वास बसतो की आता आपण काहीही उथळ बघणार नाही आहोत.

एका टिपिकल चाळीतील, टिपिकल मध्यमवर्गीय मराठी घर. आई बाप दोन पोरे. त्यापैकी एक पोरगा चित्रपटाचा नायक म्हणजेच प्रवीण तांबे. त्याचीही एक बायको. थोडक्यात चाळीशीत पोहोचलेला एक मध्यमवर्गीय संसारी माणूस. ज्याला क्रिकेटचे वेड. पण हे वेड चारचौघांसारखे क्रिकेट बघण्याचे नसून क्रिकेट खेळण्याचे वेड आहे. आणि एकदा तरी नॅशनल लेव्हलला म्हणजे रणजी सामन्यात खेळायचे हे त्याचे वेडे स्वप्न.

असे स्वप्न या देशात कित्येक युवा बघत असतील. मोजक्यांचीच पुर्ण होतात, ज्यांना आपण ओळखतो. बाकी सारे जण ती केव्हा सोडून देतात किंवा आयुष्यभर कवटाळून बसतात, याची आपल्याला कल्पनाही नसते.

अश्याच एका वेड्या स्वप्नाची ही कहाणी - कौन प्रवीण तांबे

क्रिकेट खेळायला मिळावे म्हणून जिथे क्रिकेट खेळले जाते अश्याच कंपनीत नोकरी करणे. भले त्यासाठी पडेल ते काम करावे लागले तरी हरकत नाही. मग ते वेटरचे का असेना, आपल्या शैक्षणिक पात्रतेचे का नसेना. पण ते काम सुद्धा जिद्दीने शिकून आत्मसात करणे आणि आवडीने करणे, कारण त्याचमुळे आपल्याला क्रिकेट खेळायला मिळतेय याचे भान असणे. स्वप्नांच्या मागे धावताना कुटुंबाची जबाबदारीही न विसरणे. संकटांना झुगारून देणे, अपयशातही न डगमगणे, अपमानांना पचवणे, अपघातातून सावरणे हे एखाद्या खेळाडूच्या स्ट्रगल स्टोरीत असणारे सारे टप्पे ईथेही आपल्याला दिसतात.

पण स्तिमित करून जाते ते त्याचे वय. कितीही म्हटले, "एज ईजे जस्ट अ नंबर" तरी आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला आपल्या वयाची जाणीव करून देतोच. "वाटत नाही हं तुझे वय ईतके", असे कोणी कितीही म्हटले तरी आपल्याला वागणूक मात्र आपल्या खर्‍या वयाला अनुसरूनच मिळते. आणि जे क्रिकेट खेळतात , बघतात त्यांना नक्कीच समजू शकते की ४१ हे वय काय असते एखाद्या खेळाडूसाठी... एण्ड ऑफ करीअर.. पण नाही!

४० वर्षांचा सचिन तेंडुलकर आयपीएलसह क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतो.
आणि ४१ वर्षांचा प्रवीण तांबे आपला पहिला आयपीएल सामना खेळतो.

४२ व्या वर्षी तो आपले स्वप्न पुर्ण करणारा पहिला रणजी सामना खेळतो.
तर ४५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर मुंबईतर्फे आपला पहिला "लिस्ट ए" एकदिवसीय सामना खेळतो.

४१ वर्षांपर्यंत खेळणे आणि ४१ वर्षानंतर खेळायला सुरुवात करणे यात फार मोठा फरक आहे. तोपर्यंत तग धरून ठेवणे, आशा मावळू न देणे, प्रयत्न करायचे न सोडणे...,म्हणजे तो खरेच वेडाच होता असेच चित्रपट संपता संपता वाटतेच.

तसेही आयुष्यभर जो मध्यमगती गोलंदाज म्हणून मुंबईच्या रणजी संघात जागा मिळवू ईच्छित होता तो वयाची चाळीशी जवळ आल्यावर स्पिन गोलंदाजी करायला सुरुवात करतो हा देखील एक वेडेपणाच झाला.

चित्रपटात एक चांगला डायलॉग आहे - आयुष्य असो वा क्रिकेटची मॅच, तुम्हाला फक्त एका चांगल्या ओवरची गरज असते.

चित्रपटात जेव्हा त्याचे स्ट्रगल संपून त्याला यश मिळताना दाखवलेय त्या सामन्यात निर्णायक क्षणी तो गोलंदाजीला येतो आणि त्या ओवरला चक्क हॅट्रीक घेत सामना जिंकवून देतो. ते पाहून मन एकदम खट्टू झाले. अरे एवढा चांगला चित्रपट बनवला, उगाच कश्याला हॅट्रीक वगैरे दाखवून सिनेमेटीक लिबर्ट्री घेतली असे झाले.

पण तरी खरे खोटे बघूया म्हटले. पिक्चर तिथेच पॉज करून गूगल केले. नक्की घेतली होती का याने कधी हॅट्रीक हे चेक करायला... तर खरेच... एक नाही तर चक्क दोन हॅट्रीक सापडल्या, ईतकेच नाही तर त्याचे बरेच पराक्रम आढळले. जे चित्रपटात दाखवले नाहीत, म्हणून विकीवरून कॉपीपेस्ट करून ईथेच डकवतो.

Pravin took a hat-trick against Kolkata Knight Riders on 5 May 2014 in Ahmedabad by dismissing Manish Pandey, Yusuf Pathan and Ryan ten Doeschate which also helped him to earn the man of the match award.
He also got the purple cap for the first time in his career by becoming the highest wicket taker in IPL 2014 (till the 25th match).
He ended 2014 IPL season on a high by taking 15 wickets. he was also the leading wicket taker for Rajasthan Royals in 2014 season.

in 2013 Champions League Twenty20 He received the Golden Wicket award (for taking most wickets in the tournament)
He ended up taking 12 wickets in five matches with an impressive average of 6.50
He was also the most economical bowler for the Royals in the 2013 CLT20 final against the Mumbai Indians where he delivered a crucial spell of 2/19 in 4 overs.

T10 format - he set a record by becoming the first player to take a 5 wicket haul in the history of T10 format when he dismissed Chris Gayle, Eoin Morgan, Kieron Pollard, Fabian Allen and Upul Tharanga.
In the same match, he coincidentally completed a hat-trick by dismissing Morgan, Pollard and Allen on consecutive balls.
He also became the second player after Shahid Afridi to take a hat-trick in T10 league.

In July 2020, He became the first Indian cricketer to get a contract in the CPL. On 26 August 2020, he played in the match between Trinbago Knight Riders and the St Lucia Zouks, to become the first ever Indian cricketer to play in the CPL......... आणि तेव्हा तो ४८ वर्षांचा होता Happy

.. तरीही प्रवीण तांबे कौन है हा प्रश्न पडत असेल वा नसेल, क्रिकेटप्रेमी असाल वा नसाल, तरी नक्की बघा हा चित्रपट. चित्रपटात गाणी नावाचा फारसा प्रकार नाही. श्रेयस तळपदेने या आधीही ईक्बालमधे एका क्रिकेटरची भुमिका केलेली. यातही तशीच जान ओतली आहे. तो आणि त्याच्या मराठमोळ्या मध्यमवर्गीय घरातले वातावरण छान दाखवले आहे. चित्रपट कुठेही रेंगाळत नाही, की बोअर करत नाही. ईतक्या वर्षांचे स्ट्रगल आहे, कसे करणार म्हणा Happy

कुठे बघू शकता? - मी हॉटस्टारवर बघितला

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्या पत्रकारावर ते व्यक्तिचित्रण आहे, बोरिया मजुमदार?
>>>>>

बहुधा, आणखी एकीकडे त्याचेच नाव वाचनात आलेले.
त्या वृद्धीमान सहा धमकी प्रकरणातही तोच होता का? असेही वाचनात आलेले..

मुंबई, क्रिकेट आणि मराठी मुलं. एकदम नॉस्टॅल्जिक.
खरंय, असे कितीतरी प्रवीण मुंबई मध्ये होते, असतील, येतील.
एकदम फिलगुड स्टोरी. छान लेख.

यावरून आठवण आली अजून एक कोणीतरी मराठी होता, एकदम चांगला बॅट्समन होता.
त्याचा भाऊ गॅंग किंवा अंडरवर्ल्ड शी संबंधित असल्याने पोलीस याला उचलून न्यायचे आणि दिवस दिवस लॉकअप मध्ये छळायचे सांग कुठे आहे भाऊ म्हणून
आणि या सगळ्यात त्याचं क्रिकेट सुटलं, कुठे तरी वसई की नालासोपाऱ्याला झोपडपट्टी मध्ये राहतो आता.
एकदा न्यूज मध्ये पहिली होती स्टोरी.

असुफ,
सचिन कांबळीच्या काळातीलच का.. मी सुद्धा पाहिलेला विडिओ त्याचा

>>यावरून आठवण आली अजून एक कोणीतरी मराठी होता, एकदम चांगला बॅट्समन होता.<<
अनिल गुरव. आचरेकर सरांचा शिष्य, तेंडल्याला सिनियर होता...

Yes, Anil Gurav.

And it pains me to this day, imagining what Vinod Kambli could have achieved had he kept in line in life, he could have easily matched if not surpassed Sachin.
Such promising start, only to have ruined it all.

कांबळीने आपल्या कर्माने वाट लावली आपल्या करीअरची. त्याला सहानुभुती देऊ शकतो पण त्याच्या अपयशाचे खापर कोणा दुसऱ्यावर फोडू शकत नाही.
एक आहे, जर कांबळी आयपीएल काळात असता तर राष्ट्रीय संघात असो वा नसो, पण पैसा जरूर कमावला असता.

आयपीएल काळात किंवा एकूणच प्लेयिंग करियर संपल्यावर क्रिकेटशी निगडीत राहून पैसा न कमावण्यातही कांबळीच्या दुर्दैवापेक्षा त्याच्या कर्माचा भाग जास्त आहे. प्रविण आम्रे, पारस म्हांब्रे, साईराज बहुतुले, विजय दहिया, दिशांत याज्ञिक ह्यांची प्लेयिंग करिअर्स कांबळीपेक्षा illustrious नव्हती. पण नंतरच्या काळात कोचिंग च्या मार्गानं ही लोकं क्रिकेटशी निगडीत राहिली आणि आज आयपीएलच्या काळातही सपोर्ट स्टाफ म्हणून relevant राहून पैसा कमावतायत. Kambli just wasn’t serious enough about his career in cricket असं म्हणावं लागेल.

"Kambli just wasn’t serious enough about his लाईफ" - हेच लिहीलं होतं, पण बदललं (विषयाला फाटे नको म्हणून Happy )

एक आहे, जर कांबळी आयपीएल काळात असता तर राष्ट्रीय संघात असो वा नसो, पण पैसा जरूर कमावला असता. >>> हो.

कांबळी "ऑन अ‍ॅण्ड ऑफ" २००० पर्यंत संघात होता. अगदी गांगुलीनेही त्याला सलग संधी दिली होती इतके लक्षात आहे.

Pages