विमानवेडे, अर्थात Avgeeks

Submitted by अँकी नं.१ on 31 March, 2022 - 08:11
Let's Take Off...!!!

उडण्याचं आकर्षण माणसाला पहिल्यापासूनच होतं, त्यातूनच वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर विमानाचा शोध लागला.
सुरुवातीला सामान पोहोचवणारी ही यंत्रं प्रवासी वाहनं म्हणूनही वापरात यायला लागली.
प्रोपेलर वाल्या इंजिनापासून फरकात घेत जेट एज आलं अन त्यात आलं बोईंगचं ७४७ : क्वीन ऑफ द स्काय. आपला वेगळा शेप, अपर डेक अन शेकडो माणसं आणि कार्गो हे दोन्ही वाहून न्यायची क्षमता यामुळे बघता बघाता लोकप्रिय झालं.

अशाच वेगवेगळ्या विमानांबाबत अन त्यासंदर्भात अन्य गोष्टींबाबत चर्चा करायला उत्सुक असलेल्या विमानवेड्यांसाठी हे लाऊंज...

Check yourself in...

Group content visibility: 
Use group defaults

धनी,
३३० निओ अन् ३५० च्या रेंज पेक्षा जास्त फरक सीटिंग कपॅसिटी मधे आहे. ३३० लहान आहे अन् त्यात २-४-२ अशा ८ अब्रेस्ट सीट मावतात. ३५० च्या १० सीट रो मुळे कपॅसिटी अजून वाढणार.

दोहा रूट वर ३२०-३२१ पैकी विमान असावं. टर्की रूट वर वेट लीज केलेलं ७७७ उडवतात ते. ५००+ सीट वालं...

हो बहुतेक ३२० होते. पण जुने वाटले होते. तसा लांबचा इंटरनॅशनल प्रवास होता. अजिबात आरामशीर नव्हते. इंडिगो देशातल्या देशात स्वस्तात जायला ठीक वाटते पण असा प्रवास नको वाटतो.

३५० बहुतेक वर्जिन अटलांटिक आणि कतार यांच्या मध्ये प्रवास केलेला आहे. कपॅसिटी जास्ती आहे. सीट्स ठीक आहेत. पण ३८० मध्ये जी मजा आहे ती यात नाही. सगळीकडे जास्ती लोकं कोंबून पैसे करण्याकरता जागा वाचवली आहे असे वाटते

Pages