विमानवेडे, अर्थात Avgeeks

Submitted by अँकी नं.१ on 31 March, 2022 - 08:11
Let's Take Off...!!!

उडण्याचं आकर्षण माणसाला पहिल्यापासूनच होतं, त्यातूनच वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर विमानाचा शोध लागला.
सुरुवातीला सामान पोहोचवणारी ही यंत्रं प्रवासी वाहनं म्हणूनही वापरात यायला लागली.
प्रोपेलर वाल्या इंजिनापासून फरकात घेत जेट एज आलं अन त्यात आलं बोईंगचं ७४७ : क्वीन ऑफ द स्काय. आपला वेगळा शेप, अपर डेक अन शेकडो माणसं आणि कार्गो हे दोन्ही वाहून न्यायची क्षमता यामुळे बघता बघाता लोकप्रिय झालं.

अशाच वेगवेगळ्या विमानांबाबत अन त्यासंदर्भात अन्य गोष्टींबाबत चर्चा करायला उत्सुक असलेल्या विमानवेड्यांसाठी हे लाऊंज...

Check yourself in...

Group content visibility: 
Use group defaults

जोश, डॅन, डीजे, कोबी, सिंप्लीफ्लाय... सगळ्यांना ओपन इन्विटेशन...

अगदी सॅम चुई ला पण...

I am in

आजच ऐकलेली नवी बातमी...

एअरबसनी भारतात येऊन ए३५० चा रोड शो केला
एअर इंडियासाठी नवी विमानं घ्यायचं टाटांनी जाहीर केलं आहे त्यात जुन्या बोईंग ७७७ (२०० एलआर अन ३०० ईआर) च्या रीप्लेसमेंटसाठी ३५०-९०० अन ३५०-१००० पिच केलंय.
भारतीय विमान बाजार हा लाँग हाऊल ट्विन आईल जेट्समधे कायम बोईंगचा लॉयल ठरलाय. एअर इंडियाकडे आधी ७४७ होती, मग ७७७ आणि ७८७. नाही म्हणायला आधी बर्‍यापैकी ए३१० होती अन मग २ लीज्ड ए३३० होती काही वर्ष. जेटकडेही मुख्यत्वे ७७७ आणि ४-५ ए३३० होती. किंगफिशरनी ऑल एअरबस फ्लीट ठेवताना काही ए३३० अन ए३४० उडवली (त्यांना ए३८० अन ए३५० पण आणायची होती) पण त्यांना फारच लवकर गाशा गुंडाळायला लागल्यानी ती काऊंट नाही करता येणार. सध्या (टाटांच्याच) विस्ताराची ७८७ आहेत, अन आता स्पाईसजेटकडेही दोन ७७७ येणार आहेत. लाँग हाऊल वाईडबॉडीमधे सध्या एअरबसचा शेअर ० आहे.
शॉर्ट हाऊल, नॅरो बॉडीमधे भारतीय बाजारात ते निर्विवाद लीडर्स आहेत त्याच बरोबर आता एअरबसला भारतात वाईड बॉडी मार्केटमधे ग्रँड एंट्री करायला जोरदार चान्स आहे.
कारण बोईंगकडे याला टक्कर द्यायला सध्यातरी कुठलं विमान नाही.
७७७ एक्स यायला अन डिलिव्हरी व्हायला किमान ५ वर्ष लागतील.
७८७ प्रॉडक्शन परत सुरू होऊन, बॅकलॉग क्लिअर होऊन पुढची डिलिव्हरी द्यायलाही ४ एक वर्ष लागतील.
एअर इंडियाकडे सध्या असलेले पायलट्स हे ७७७ अन ७८७ टाईप सर्टिफिकेशन वाले आहेत, पण जर डिलिव्हरीला वेळ लागणार असेल तर त्यांना तेवढ्यासाठी रीटेन करणं आणि इमेज मेक ओव्हरसाठी वाट बघणं हे नक्कीच टाटांच्या अजेंड्यावर नसणार.

याच गोष्टीचा फायदा घेऊन एअरबस टाटांना जबरदस्त डिस्काऊंट्स ऑफर करू शकते. नुसते विमानाच्या लिस्ट प्राईसवर डिस्काऊंट्स न देता जोडीला पायलट ट्रेंनिंग सर्टिफिकेशन्स सब्सिडाईज्ड किमतीला उपलब्ध करून देऊ शकते. (ज्याचा खर्च एरवी बर्‍यापैकी जास्त असतो).
टाटांनाही ही विमानं लवकर मिळू शकतात अन त्यामधे मॉडर्न फिटमेंट्स देऊन ते लोकांना 'व्हिजुअल चेंज' दाखवून त्यांचा विश्वास जिंकू शकतात.

एअर इंडियाची ७८७ पण आता ऑल्मोस्ट ८-९ वर्ष जुनी आहेत. ही विमानं पहिल्या लॉट मधली असल्यानी नंतरच्या लॉट्समधे झालेल्या डेव्हलपमेंट अपग्रेड्स यात नाहीत. याचा फायदा घेऊन एअरबस बोईंगला टक्कर द्यायला म्हणून ए३३०नीओ विमानं आणखी स्वस्तात ऑफर करू शकतं. ही विमानं तर ऑल्मोस्ट रेडी पर्चेस ठरू शकतात.

पण दुसरीकडे बोईंग दूधखुळं नाहीये. आत्ता बॅकफुटवर असले तरी ते या मार्केटमधले लीडर्स आहेत.
थोड्या दिवसात ते ही ७७७ एक्स घेऊन रोडशो ला येणार आहेत.
आपल्या बालेकिल्याला धक्का लागू नये म्हणून ते ही डिस्काऊंट्स ऑफर करतीलच. लॉयल्टी कार्ड खेळून टाटाला विमान डिलीव्हरी लिस्टवरही प्रेफरन्स मिळू शकतो अन या केस मधे नवीन पायलट ट्रेनिंग अन सर्टिफिकेशनची गरजच नाही.

लेट्स सी, काय होतं...

तुमची मित्रमंडळी आहेत का चुईमुईसामजोश, डॅन, डीजे, कोबी, सिंप्लीफ्लाय??
रोड शो कशाला? एर शो पाहिजेल.

आणि हो या धाग्यात तरी एक चित्र टाका नावासह. लई मागणं न्हाई.

७८७ ड्रीमलाईनर हा बेटर ऑप्शन आहे लॉन्ग हाऊल फ्लाईटसाठी. एअर ईंडिया हीच विमानं वापरते मुख्यत्वे मुंबै / दिल्ली ते नुआर्क किंवा शिकागो साठी.

तुमची मित्रमंडळी आहेत का चुईमुईसामजोश, डॅन, डीजे, कोबी, सिंप्लीफ्लाय?? >>> अहो, हे सगळे जागतिक किर्तीचे अ‍ॅवगीक आहेत. तूनळीवर यांचे सतत व्हिडीओ येत असतात.

७८७ ड्रीमलाईनर हा बेटर ऑप्शन आहे लॉन्ग हाऊल फ्लाईटसाठी. एअर ईंडिया हीच विमानं वापरते मुख्यत्वे मुंबै / दिल्ली ते नुआर्क किंवा शिकागो साठी.
>>
अआ,
७८७ शिकागोपर्यंतच जातं, कॅनडा रूट्स / सॅन फ्रँसिस्को वगैरेला अजून जास्त रेंज वालं हवं

त्यात सध्याची ७८७ ही ७८७-८ आहेत, म्हणजे सीट्स अन रेंज दोन्ही कमी
त्यापेक्षा किमान ७८७-९ घ्यायला हवी होती (निदान २७-२८ च्या ऑर्डरपैकी १५-१६ तरी या टाईपची घ्यायची)

सरप्राईजिंगली, टाटांनी ए३८० चा विचार केला नाहिये. कदाचित एअरबस ने त्याचं उत्पादन बंद केल्यामुळे असेल. गल्फ किंवा लॉन्ग हाऊलला जिथे जास्त डिमांड आहे, तिथे या विमानांचा वापर होऊ शकतो.

अ आ
380 झालं की बंद
तसंही खूप अन् इकॉनॉमिकल होतं ते

हाय डिमांड रुटस पुरतं

अलायन्स एअरचं ATR 72 का काहीतरी विमान आहे त्याने बरेचदा प्रवास केलाय. 70 सीटच विमान आहे, एकदम लहान. त्याला बाहेर मोठे पंखे असतात, जेटवे नसतो, साधा फ्लाईटचाच जिना असतो बोर्डिंगला Proud एअर इंडियाच्या हैद्राबाद- पुणे संध्याकाळच्या फ्लाईटला बरेचदा हे विमान असे. प्रत्येकवेळी जाम टरकायची एकदम हेलकावे खात टेक ऑफ Happy पुणे गोवा फ्लाईटला पण असे कित्येकदा. आणि लगेज चा खूप इश्यू होई फ्लाईट फुल्ल अन वजन जास्त झाले की लगेज मागून जे फ्लाईट येईल त्याने पाठवत. एकदा तर हैद्राबाद ला सांगितलं पण नाही की लगेज नाही लोड करणार, पुण्यात उतरल्यावर बेल्ट पाशी पब्लिक जमल्यावर सांगितलं , जाम राडा झाला मग. एअर इंडियाचे भरपूर किस्से आहेत Proud

मस्त धागा. तिकडच्या चर्चेतून क्लिक करून आलो. थँक्स अँकी.

वरती वाइडबॉडी जेट्सच्या चित्रात ३८० वरती पण ७८७ खाली असे का? हे दोन्ही साधारण एकाच वेळी आले ना? आणि हे एकमेकांना कॉम्पिटिटिव्ह आहेत असा माझा समज होता. ७८७ वेगळीच कॅटेगरी आहे का?

हे वरती लंपन यांनी लिहीलेले म्हणजे टर्बो प्रॉप म्हणत ती काय? एकदा पुणे - बंगलोर गेलो होतो. विमान बर्‍याच कमी उंचीवरून जात होते.

फारएण्ड, आपण प्रवास करतो त्यातली बरीचशी इंजिने ही टर्बोफॅन असतात. काही जुन्या पद्धतीची टर्बो प्रॉप प्रकारची असतात. त्या सहज ओळखायला दोन्हीत दिसण्यात फरक हा की टर्बोप्रॉपचा पंखा हा उघडा असतो तर टर्बोफॅनच्या पंख्याभोवती 'नसेल' (नावाचं गोल कव्हर सारखं) असतं. नसेल हा इथे इंग्रजी शब्द आहे, मराठी नाही. टर्बोफॅनची एफिशियन्सी जास्त चांगली असते.

धन्यवाद हपा. हो तो उघडा फॅन असलेले विमान पाहिले आहे. मी गेलो होतो ते तसेच होते का आता लक्षात नाही.

फॅनभोवती नसेल असेल तर टर्बोफॅन आणि फॅनभोवती नसेल नसेल तर टर्बोप्रॉप - हा पांचटपणाचा मोह मी टाळला होता.

मस्त धागा. मला आपले एअर्बस ए ३२० फेवरिट. शिवाय. बी ५२ बाँबर, स्टेल्थ बाँबर काँकार्ड फेवरिट आहेत. एक मनिषा होती काँकार्ड मध्ये फिरायची. शांपेन प्यायची.

वाइडबॉडी जेट्सच्या चित्रात ३८० वरती पण ७८७ खाली असे का
>>
फा

ते चित्र विमानांच्या सीटिंग कपॅसिटी नुसार आहे, सर्व्हिस एन्ट्री नुसार नाही

छान धागा व प्रतिसाद सुध्दा माहितीपूर्ण. तीन प्रकारची इंजिन असतात. पॉवर, एफिशिएनसी आणि म्हणून त्यांच्या यूजकेसेस सुद्धा निरनिराळ्या आहेत. बहुतांश मोठया विमानांना टर्बोफॅन जेट इंजिन असते. इथं या तिन्ही इंजिन्सची थोडक्यात व सचित्र माहिती दिली आहे:
https://www.news18.com/news/auto/understanding-the-3-types-of-airplane-e...

फॅनभोवती नसेल असेल तर टर्बोफॅन आणि फॅनभोवती नसेल नसेल तर टर्बोप्रॉप >> Happy Happy

अँकी - ओके.

अमा - कॉन्कॉर्ड्स परत येत आहेत असे वाचले.

Pages