Submitted by पशुपत on 23 March, 2022 - 06:35
जीव रंगला असा एकांत-चिंबलेल्या वनात |
सूर्य आहे उभा तिन्हीसांज रंगलेल्या नभात ||
सावल्या या अशा जमल्या तळ्यावरी निवांत |
गंध उधळत्या दिशा स्वर छेडती गंध पारिजात ||
चंद्र येता नभी उजळला पुन्हा नील आसमंत |
खेळ मांडुनी असा रानी वनी रमतो वसंत ||
संजीव
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कधी असे लयबद्ध शब्द मनात घोळत
कधी असे लयबद्ध शब्द मनात घोळत रहातात. टेकडीवर वनात एकट्यानेच भटकताना बरोबर सूरही घेऊन येतात.
रेकॉर्ड करून ऐकवा की!
रेकॉर्ड करून ऐकवा की!
इथे audio clip टाकता येते का
इथे audio clip टाकता येते का , ते माहित नाही.
इतर ठिकाणी (युट्यूब वगैरे)
इतर ठिकाणी (युट्यूब वगैरे) टाकून त्याची लिंक देता येईल.
मला actually ह्याची लय कळली
मला actually ह्याची लय कळली नाही. चालीत ऐकली तर नीट कळेल.