आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
मी नितीनच्या जागी असते तर आता आशुतोषशी जरा जेव्हढ्यास तेव्हढेच संबंध ठेवले असते !!
ज्या वीणा वरच्या अतीव प्रेमामुळे आशू ने थोबाडीत मारली...ती तर चालली सोडून याला..कथानकाची गरज संपल्याने !!

थोबाडीत मारायची वेळ आणि कारण वेगळंच होतं. नितीन आशूला गंभीरपणे घेत नसावा. या येड्याचं काय मनावर घ्यायचं असं वाटत असेल त्याला. वीणा झीवरील मालिकेत येत आहे. अशोक शिंदे पण आहे त्यात.

आता हे लोक अनीशच्या आईवडिलांना अनिरुद्धबद्दल सांगणार नाहीत. मग त्यांना लग्नात मस्त राडा बघायला मिळेल.

देशमुखांकडचे तीनही पुरुष बेकार बसले आहेत आणि दोन्ही सुना पैसे कमवताहेत.

आणि ही अनीश चा रियाझ काय घेत होती मधेच..? इतक्या घडामोडी होत असताना?
आणि नितीन यांच्याकडे खिडकीत निवांत सकाळ च्या पारी..? काही ऑफीस , घरच्या जबाबदार्‍या ?
इशा छान अभिनय करतेय पण...चिडल्याचा, आक्रस्ताळे पणाचा........

आपण घर सोडून जातोय हे याहीवेळी वीणा आपल्या नातलगांना धड सांगत नाही.>> सुलेखा खूप बोर करेल आणि अशू धड्यावर धडे वाचेल या भितीने सांगत नसेल.
इशा जेव्हा संधी मेळेल तेव्हा अरूला दोष देते, वाट्टेल तसे बोलते. आता तिचा कोणावर विश्वास नाही. घरचे सगळे लग्नाच्या तयारीला लागले आहेत तर ती पळून जाऊन लग्न करेल.

ईशाला आयुष्यात शिक्षण, करिअर, स्टेबिलीटी हे प्रकार कशाशी खातात हे माहितीच नाही. लग्नानंतर पण जॉब करणार नाही हे आधीच सांगून झालंय. आणि अनीशला ते फार क्यूट वगैरे वाटलंय. फक्त लग्न लग्न आणि लग्न.
अनिरुद्ध सारख्या माणसासोबत आयुष्य काढणं महाभयंकर आहे. इतकी ill mentality.

लग्नानंतर पण जॉब करणार नाही >>+ फ्लॅटमधे राहणार नाही. आई किंवा बाबांकडे राहूया असे ती बोलली होती. कारण तिला लहान घरात रहायची सवय नाही. ती खूप त्रासदायक असणार आहे पण अनिषने आधीच सांगितले आहे कि त्याला तिची पंचिंगबॅग व्हायला आवडेल. त्याला तसेच पाहिजे!
आता आई सेटल झाली आहे त्यामुळे बिथरलेला बाबा आणि ह्या तीन मुलांचा थयथयाट यावरच मालिका रेटत आहेत

आजपण नितीन केळकरांकडेच.

ईशाच्या लग्नासाठी त्या अनिरुद्धला राजी करायची काय गरज आहे? त्याच्या शिवाय लग्न लावता येत नाही का?

आता केळकर दांपत्य एक दिवसासाठी बाहेर जाईल तेवढ्यात ईशा अनिशला पळवून नेईल का?

नितीन म्हणातो तुम्ही लाँग ड्राइव्हला जा. पण आशुबाळाला ड्राइव्ह करता येत नाही. ड्रायव्हरला घेऊन रोमँटिक लाँग ड्राइव्ह की अरुंधती चालक होणार?

ज्या वीणा वरच्या अतीव प्रेमामुळे आशू ने थोबाडीत मारली...ती तर चालली सोडून याला..कथानकाची गरज संपल्याने !! >>>>>>>झी मराठीवर ७ च्या स्लॉट ला तिला केंद्रस्थानी भूमिका मिळाली , माका तुका करूक लागली आहे।

Happy
कंटाळले का लोक या सिरिअल ला?
काल ईशाचा आक्रस्ताळेपणा पराकोटीला पोहोचला होता...नुसता थयथयाट करते! वर मला नोकरी करायचीच नाही, आम्ही वर्ल्ड टूर ला जाऊ,
यो अन त्यो...!!

खरेच अनीश ला महागात पडणारे ती!
पण संवाद आवडले मला ...... म्हणजे फ्लो चांगला ठेवला आहे... विशेषतः अरु आणि इशा मधील डायलॉग्ज!
ईशा ला आता वाटत्येय की आईला पण आपले लग्न व्हायला नको आहे!
आशु चांगुलपणा दाखवून दाखवून कंटाळल्या सारखे वागत बोलत होता....!! किती सारखे समजूत दार पणा दाखविणार! देशमुखांचे प्रॉब्लेम्स संपतच नाहीत!
काल फॉर अ चेंज नित्या नव्हता!!
आशु ने एकट्यानेच काही संवाद म्हटले आणि निर्णय घेतले..... उदा.. ईशा तू हवे तितके दिवस इथे राहा, अरु, तुझ्या तीनही मुलांचे एकदम सगळे चांगले होणारे...ई ई...!!

हो. मीपण म्हणत होत, आज नितीन नाही. सुलेखा कधीही गायब होते. पण केळकरांकडे नितीन नाही, असं होत नाही.
आचरट पणा चाललाय. शहरी मध्यमवर्गीय सुशिक्षित घरात मुलीला हाताला धरून ओढून नेऊन खोलीत डांबणे , तिचं जबरदस्तीने लग्न लावणं हे फारच अ आणि अ चाललंय. आधी अनिरुद्ध फक्त बाहेरख्याली होता. स्त्रीलंपट होता का? आता त्यासोबत फ्रॉड आणि क्रिमिनलही झाला.

अरुंधतीची तिन्ही मुलं डिफेक्टिव्ह निघाली.

ईशाला श्रीमंत तरुणांची भुरळ पडते. पहिले दोन रिझॉर्ट वाले. आताचा मध्यमवर्गीय दिसणार्‍या बिझिनेस फॅमिलीतला. अनिरुद्धने याच्यापेक्षा श्रीमंत मुलगा आणला तर याला टांग देईल.

मागे एकाने आशुतोषला म्युझिक स्कूलसाठी जागा दिली. आता दुसर्‍याने वृद्धाश्रमासाठी. म्युझिक स्कूल विकून टाकलं का? नाव सुद्धा घेत नाहीत.

म्युझिक स्कूल विकून टाकलं का? नाव सुद्धा घेत नाहीत.
Lol भरत... !

ईशाला श्रीमंत तरुणांची भुरळ पडते. .. आताचा मध्यमवर्गीय दिसणार्‍या ( Lol ) बिझिनेस फॅमिलीतला!!
अनिरुद्धचे कॅरेक्टर एकमेव सापडले आहे वाईट पणा घ्यायला आणि (त्यायोगे) कथा लांबवायला...म्हणून त्याला वाट्टेल ते करायला लावताहेत !
इतक्यांचे घर चालते कसे मुळात? कामं तर कुणीच करताना दिसत नाही! येऊन जाऊन सारखा आपला चहा ढोसताना दिसतात..बस!

बापरे हे दळण अजून चालूच आहे.. आज खूप दिवसांनी कालचा भाग पाहीला.
त्या अनीशला आताच अक्कल आली आणि त्याने माघार घेतली तर ठिकेय नाहीतर आयुष्यभर मनस्ताप आहेच. इशा सारख्या मुली इतर सगळ्यांच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेमच निर्माण करतात बाकी काही नाही.
भयानक डोक्यात जाते.

एकदाचं ईशाचं लग्न झालं, बालिशपणाची हद्द केली इशाने.

बिचारा आशु, एकामागे एक अरुच्या मुलांच्या कटकटी चालूच.

अरुंधतीचे एक्स्प्रेशन्स नक्की काय होते? खूप सर्दी झालीय, शिंक बाहेर पडत नाहीए.

ईशा कशी बिघडली आणि हट्टी झाली ते अनिरुद्धच्या बोलण्यातून व्यवस्थित कळलं. तिचं जग तिच्याभोवती फिरतं. आशुतोषचं आणि यशचं अरुंधतीभोवती. अरुंधती मुलांच्या भल्यासाठी म्हणून जे करायला जाते त्यातून भलतंच काहीतरी होतं. अन्घाच्या डोहाळजेवणात अभिषेकच्या लफड्यावर बोलली आणि आता इतक्या उशिरा ईशा इमॅच्युअर आहे म्हणून लग्न पुढे ढकलायला निघाली.

बा बहु बेबी मधली बेबीही अशीच लाडावलेली होती. पण ती गोड तरी होती. बाने बेबीच्या सासू ला हाताशी धरून तिला जबाबदारीची जाणीव करून् दिली. अरुंधतीला काही ते जमणार नाही . ती सुद्धा सध्या का ही ही करत नाहीए.

आशुतोषने फॉर्मल शर्ट, कोटच्या खाली जीन्स घातली होती का?

गेले चार पाच एपिसोड आपण सगळे शांत बसून बोलूया हे वाक्य किती वेळा आलं असेल?

गेले चार पाच एपिसोड आपण सगळे शांत बसून बोलूया हे वाक्य किती वेळा आलं असेल?>>> तसंच करायला हवंय सगळ्यांनी. अगदी लेखक, दिग्दर्शक, निर्माते सगळेच.

ईशाला घरात कोंडून ठेवण्यापेक्षा तिला टकली केली असती तर घराबाहेर काय , रूम बाहेर पण आली नसती.
काम वही सोच नयी..Social मीडिया साभार.
हलके घ्या.

ईशाला घरात कोंडून ठेवण्यापेक्षा तिला टकली केली असती तर घराबाहेर काय , रूम बाहेर पण आली नसती.
काम वही सोच नयी>>>>रियली?? मालिका बन्डल आहेच पण हे अत्यत विक्रुत आहे.

आता ईशा आणि अरुची रोज जुगलबंदी कामावरून. जबाबदारी या विषयावर अरु रोज लांब लेक्चर देणार. ईशाला कोणीच घरात घेतलं नसतं तर बरं झालं असतं. अरुला ती इतकं बोलली तरी अरु तिला घेऊन चालली आणि अन्याने तिला कोंडून ठेवली आणि जबरदस्ती तिचे लग्न लावून देत होता तरी ईशा म्हणते अन्या चांगला. अन्याने दुखावले गेल्याचा अभिनय चांगला केला.

या दोघांनी तडकाफडकी लग्न केल्याने समृद्धीमधले (जाऊन जाऊन जाणार कुठे, लग्न आणखी करणार कुठे? ) तयारीचे , सजावटीचे तीनचार एपिसोड वाचले. लग्नात या लोकांनी केलेले बालवाडी लेव्हलचे नाच बघायला लागणार नाहीत, असं वाटलं होतं. पण कांचन म्हणतेय आपण यांच थाटामाटाने लग्न लावून देऊ.

अरुंधतीला केळकरांकडे सासुरवास नव्हता. तो करायला ईशाला आणलंय.

Happy हो ना
किती विचित्र गुंतागुंत नात्यांची.
अरुंधती सुद्धा पेचात सापडली आहे.
पुन्हा अनिश - ईशा दोघं.. यांच्या नाकावर टिच्चून तिथेच राहणार म्हणतात....
वेगळीकडे तरी राहायचं ना

वेगळं राहायला कमवावं लागतं. ही दोन बांडगुळे लाडात वाढलेली कधी वेगळं राहण्याइतकी कमवतील असे वाटत नाही. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते असे करत सहानुभूती गोळा करत दुसऱ्यांच्या जीवावरच जगतील. ईशाच्या कपाटात एवढे कमी सामान. सगळे भर्जरी कपडे गेले कुठे.

इशा- अनीश ला भूक लागत नाही का? जेवताना वगैरे काहीच दाखवत नाहीत. डायरेक्ट झोपायच्या उशा- पांघरुणे घेऊनच आला अनीश.
आता अरुंधती रागावली म्हटल्यावर यांना जेवायला दिले की नाही?
आशुतोष फारच एकसुरी आणि रटाळ , अती फॉर्मल, वाक्येच्या वाक्ये पाठ करुन म्हटल्यागत बोलतो... !!
त्याने आपल्यालाच इतके बोअर होते; तर अरुंधतीला किती होत असेल!! Lol

आज काय घडले? माझे घरी लाइट नाही. म्हणून नेट स्वयंपाक काहीच नाही फोन चार्जिन्ग करायला लवकर हपिसात आले.

Pages