डोक्यात अडकलेलं पण न आठवणारं गाणं

Submitted by अजिंक्यराव पाटील on 18 March, 2022 - 01:41

लता मंगेशकर, एकच शब्द आठवतोय, रात.. गझल आहे..

टीप: मन क्यू बहका नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

'रात' शब्द गझलमध्ये किती कॉमन आहे. असं नुसतं लता मंगेशकरांची रात शब्द असलेली गझल म्हटली तर 5-6 गझल्स तरी पटकन आठवल्या.
त्यातही मला पटकन आठवली 'फ़िर छिडी बात, रात फुलोंकी' तलत अझीझ आणि लता मंगेशकर

मला पण आज की रात न जा आठवलं!
गझला नाहीयेत पण रातोंके साये घने, सुरमई रात है/सुबह का इंतजार कौन करें ही दोन गाणी आठवली पटकन. सोलो गाणं आहे का?

सापडलं सापडलं! पण बघू कुणाला सुचतय का!

आता clue: नायिका हे गाणं tv वर म्हणतेय आणि नायक बहुतेक हॉटेलच्या रिसेप्शनवरच्या tv वर गाणं बघतोय. तो विचारतो पण, "who is she?"
चित्रपट रंगीत आहे.

जाने क्या बात है?
नींद नही आती बडी लंबी रात है..
सनी
(अमृता सिंग आणि सनी देओल)

बरोबर श्रद्धा!

इतरांनाही प्रश्न असेल तर टाका

एक गाणं आहे, मराठी. हे गाणं आठवतंय. चाल सुद्धा नीट आठवतेय. लहानपणी रेडिओवर हे गाणं लागायचं, त्याने जाग यायची आणि उठावं लागायचं.
पण याचा ऑडीओ अनेक वर्षे शोधून सापडला नाही.
गीत, त्याची सगळी माहिती सापडते पण ऑडिओ नाही.
गाण्यातील शब्द: रंग
स्फूर्ती गीत. गायक /गायिका कोणी नावाजलेले नाहीत बहुदा, आकाशवाणी गायक वृंद असे नमूद केले आहे.

या गाण्याचा ऑडिओ मिळाला तर हवा आहे.

पूर्वी एकदा माझे एक गाणे हरवले होते - हेमलता + येसुदास
मग सापडले व इतका आनंद झाला.
तिस्ता नदी सी तू चंचला
मै भी तो हूं कबसे मनचला

वाह मानव! काय आठवण काढलीत. हो, अशी काही गाणी होती "आकाशवाणी गायकवृंद" ने गायलेली. ती फक्त रेडिओवरच ऐकायला मिळत. असेच एक गाणे मला आठवत होते. पण त्याचा ऑडीओ मात्र कुठेच ऐकायला मिळत नव्हता. "माझाच हिंद देश, नाही दुजा कुणाचा" हे ते गाणे. पण आज तुमच्या पोष्टीमुळे पुन्हा एकदा धुंडाळून पाहिले आणि त्याचा ऑडीओ मिळाला Happy "आठवणीतील गाणी" वर इथे "आकाशवाणी गायकवृंद"ची बरीच गाणी आहेत. "माझाच हिंद देश..." किती वर्षांनी का दशकांनी ऐकले. अगदी जसेच्या तसे रेडिओवर ऐकायला मिळायचे तसेच Happy

https://www.aathavanitli-gani.com/Swar/Akashvani_Gayakvrund

तुम्ही शोधत आहात त्या गाण्याचासुद्धा ऑडीओ कदाचित मिळेल इथे.

चाल अंधुकशी आठवणारी पण काही केल्या शब्द न आठवणारी गाणी फार त्रासदायक असतात. बरं, गुगल करावे तर त्यासाठी किमान एक दोन शब्द तरी माहित हवेत ना? गाण्यातल्या एखाद्या ओळीची चाल, ती सुद्धा अंधुकशी आठवत असेल तर गुगल काय करणार Lol

एकदा असेच झाले. बरीच वर्षे झाली. रणरणत्या उन्हाळ्याचे दिवस. पुण्यातल्या एका सिग्नलपाशी उभा असताना वाहनांच्या गलक्यात शेजारून जाणाऱ्रया एका गाडीमधून एक धून पूसटशी ऐकू आली. एकदोन सेकंदा पुरतीच. तितक्यात ते वाहन भर्रकन निघून सुद्धा गेले. झाले! माझी इतकी बेचैन अवस्था झाली. अर्रे कुठले गाणे हे? परिचित आहे. पण खूप खूप वर्षांपूर्वी ऐकले होते हे मात्र खरे. ते एक कुठलेतरी खूप छान गाणे आहे हे सुद्धा कळत होते. पण केवळ दोन सेकंदाच्या धून वरून अजिबात आठवायला तयार नव्हते. त्यानंतर एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस नव्हे. तर पुढची कित्येक वर्षे ती धून डोक्यात राहिली होती Lol पण गाणे काही म्हणजे काही केल्या आठवायला तयार नव्हते. वेळ मिळेल तेंव्हा मी आठवायचा प्रयत्न करत असे. त्यातल्या त्यात दोन क्लू मिळाले होते. एक म्हणजे ते नक्कीच लता मंगेशकरांनी गायलेले गाणे होते, आणि दुसरे म्हणजे ते त्या गाडीतल्या रेडिओवर नक्कीच विविध भारतीवर लागलेले असणार ही सुद्धा खात्री होती. कारण तशी गाणी फक्त विविध भारतीवरच ऐकायला मिळतात. हे सगळे जरी खरे असले तरी गाणे शोधण्याच्या दृष्टीने त्या माहितीचा शून्य उपयोग होता. त्यामुळे चरफडण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हतो. नाही म्हणायला मित्रांना व नातलगांना ती दोन सेकंदाची चाल गुणगुणून दाखवायचो आणि हे गाणे कोणते आठवते का विचारायचो (केविलवाणी धडपड Lol ) पण काSSSSही उपयोग झाला नाही.

आणि मग हरवलेली वस्तू भलतेच काही काम करत असताना अचानक मिळते तसे झाले. त्यानंतर जवळ जवळ आठ नऊ वर्षांनी टीव्हीवर एक कॉमेडी शो सुरु होता. त्यात एका महिला कॉमेडीयन ने तिच्या कॉमेडीचा भाग म्हणून या गाण्यावर विडंबन काव्य करून ते ती त्याच मूळ चालीत गाऊ लागली. आणि मी वेड्यासारखा ओरडलो "हांSSSSSS हेच ते गाणे..." घरचे सगळे माझ्याकडे बघायला लागले Rofl त्यांना कसे कळणार मला काय सापडले ते. तर ते गाणे म्हणजे "तेरा साथ है तो, मुझे क्या कमी है...."

आणि ती डोक्यात राहिलेली, केवळ दोन सेकंदाकरता ऐकू आलेली धून म्हणजे अंधेरोंसे भी..... बस्स इतकीच होती Lol पण त्या इवल्याश्या तुकड्याने किती वर्षे तंगवले.

कम्माल आहे हे Happy . असंच मला एकदा कॉलेजमध्ये असताना एक गाणं आठवत नव्हतं, आवडलेलं होतं मात्र. मैत्रिणी guess करताय, लिरीक्स सांग थोडं, कोण आहे गाण्यात ते सांग, पण काहीच आठवेना. बराच वेळ झाला, मग अचानक माझ्याच क्लासमेट च्या वहीवर मागे सोहा अली खानचा फोटो दिसला आणि मग आठवलं एकीला, ' तूही हकीकत, ख्वाब तू,' हे ते गाणं आहे. मला फक्त आपली लास्टची तू सुकून ची ट्यून आठवत होती.

>>पूर्वी एकदा माझे एक गाणे हरवले होते << तिस्ता नदी सी तू चंचला या गाण्याबाबतीत माझेही अगदी असेच झाले होते.
आता तर smule वर karaoke track पण मिळाला.

>>पण त्या इवल्याश्या तुकड्याने किती वर्षे तंगवले.<< मी समजु शकतो ती व्यथा Happy

असंच गेल्या किमान दहा वर्षापासुन मी एक गाणं शोधतोय. त्यावेळी सकाळी नाशिक एफ एम वर लागायचं, एक दोनदा ऐकलं होतं. सगळे सगळे प्रयत्न केले पण व्यर्थ.
गाण्याच्या ४-५ ओळी अगदी स्पष्ट आठवतायेत.
"आषाढ घन सुंदरा
आषाढ घन सुंदरा
अंबरा , मी प्रणयिनी अधीरा धरा
आषाढ घन सुंदरा"
खुप शांत आणि धिरगंभिर सुरावट आहे.. बघा कुणाला काही आठवतंय का?

इथे वर ही पोष्ट टाकली अन सहजच गुगल बाबाला परत विचारावं असं वाटल्याने ओळ तिकडे डकवली.. आणि ... गाणं आता श्रूती बर्वे यांच्या आवाजात परत ध्वनिमुद्रित झाल्याचं दिसलं. (मी मेल आवाजात ऐकलं आहे) यावेळी एक अंतरा एकतर बदलला आहे किंवा गाळला आहे.

एक फार जुनं हिंदी चित्रपटगीत. कोरस वालं. अजिबात धड आठवत नाहीय आणि नेमके शब्द न सापडल्यामुळे शोधताही येत नाहीय.
रंग बिरंगी चुनरी मोरी मस्त हवा में उडाना, उडाना. असं काहीसं.
आणि महिलांच्या कोरसमध्ये सियाराम हो सियाराम असे काहीसे शब्द.
कोणी कोणी 'मेरी लाडली हो मेरी लाडली जो बनी है, तारों की तू रानी ' हे गीत सुचवलं. पण ते हे नव्हे. हे अंदाज मधलं दागिरदारा गाणं. मला आठवत नाहीय ते वेगळं आहे.

<<एक गाणं आहे, मराठी. हे गाणं आठवतंय. चाल सुद्धा नीट आठवतेय. लहानपणी रेडिओवर हे गाणं लागायचं, त्याने जाग यायची आणि उठावं लागायचं.
पण याचा ऑडीओ अनेक वर्षे शोधून सापडला नाही.
गीत, त्याची सगळी माहिती सापडते पण ऑडिओ नाही.
गाण्यातील शब्द: रंग
>>
ते गाणं म्हणजे: "उल्हासाचे रंग भरले"
कवी: यशवंत देव
गायक: आकाशवाणी गायकवृंद
संगीतकार: कानू घोष

आठवणीतील गाणीवर हे गाणं ऐकण्याचा अनेकवेळा (१००+) प्रयत्न केला. (स्पीकर्स ऑन आहेत, दोन्ही ठिकाणी याची खात्री करून). एकदा गाणे खरंच सुरू झाले, पण पुढे अडकले. त्यानंतर कधीच ऐकू आले नाही.

Screenshot_20220321-231226_Chrome.jpg

लहानपणी मी याला "हुल्ला तापे रंग भरले" म्हणायचो.

एकदा गाणे खरंच सुरू झाले, पण पुढे अडकले. त्यानंतर कधीच ऐकू आले नाही.>>> मी आत्ता तिथेच संपूर्ण ऐकले. तुम्ही दुसऱ्या ब्राऊजर मधे ते संकेतस्थळ उघडून बघा.

काय आश्चर्य!!!
आता खरेच ऐकू येत आहे!
इथेच मी किमान पाच वर्षांपूर्वीपासून ऐकण्याचा प्रयत्न केला होता कित्येकवेळा!

गावातलं घर, तो जुना रेडिओ, त्या गाण्याच्या तेव्हा गायक /गायिका म्हणुन मनात येणारे मुले मुली, शाळेचा ड्रेस, सगळे डोळ्यासमोर आले!

बुवा "कैलासाचा कळस, ध्वजा कौपिनाची, अढळ त्या पदावरती दृष्टी आज माझी" असे गुणगुणत हिमालयाच्या दिशेने जात आहेत असे चित्र डोळ्यासमोर आले !

>> गावातलं घर, तो जुना रेडिओ, त्या गाण्याच्या तेव्हा गायक /गायिका म्हणुन मनात येणारे मुले मुली, शाळेचा ड्रेस
+१११११ अगदी हेच माझाच हिंद देश ऐकताना झाले. लहानपणी "नाही तुझा कुणाचा" असे ऐकायला यायचे. सकाळी रेडिओवर लागत असे हे गाणे. सगळे आठवले. डोळे नकळत पाणावले.

'गोप गड्यांसह कृष्ण कन्हैया आज खेळतो होळी ग
आज नको यमुनेचे पाणी चल जाऊ माघारी ग '
हे समूहगान इथे कोणी शोधत होतं का?

मी कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग मधे एक English गाणं ऐकलं होतं.पूर्ण आठवत नाही. Happy mery love tango, when you come to from my home when go to from my home. खूप शोध ल पण सापडलं नाही.

अजींक्यराव , जाने क्या बात है !! जाणे क्या राज है , निंद नाही आती बडी लंबी रात है

picture -सनी
लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर ( दोघांच्या आवाजात आहे हे )
R D बर्मन
सनी देओल आणि अमृता सिंग , शर्मिला टागोर धर्मेंद्र , वहिदा रहमान
माझे आणि नवऱ्याचे पण आवडते , लॉन्ग ड्राईव्ह , सी लिंक आणि RD ची गाणी

गौरी प्रियकर शंभो
गौरी प्रियकर करुणाकर हे विश्वेशा

असे साधारण शब्द असलेलं एक मराठी नाट्यगीत लहान असताना दूरदर्शन वर ऐकलेलं आठवतंय
बऱ्याच मुली नऊवारी साड्या नेसून पूजा साहित्य घेऊन निघाल्यात आणि हे गाणं म्हणतायत असं काहीतरी अंधुकसं आठवतंय
आणि त्या विडिओ मध्ये पुढे अजित कडकडे सुद्धा होते बहुतेक

मी शोधले हे शब्द बरेच वेळा गूगल वर पण काही सापडत नाही, आठवतंय का कोणाला असं काही गाणं ?

हा धागा वाचून गेला महिनाभर मनाला कुरतडत असलेलं गाणे आता अचानक आठवले. लहानपणी ऐकले होते... दोन शब्द तरी त्यातील आठवतील अस वाटायचं... अस्वस्थपणा आला होता.
शाळेत बहिणीचा डान्स बसवला होता त्यावर.अन् आता आठवल्यावर आभाळाएवढा आनंद झाला.
https://youtu.be/t6sHj7Vyy9Y
हे ते गाणे.

तंग आ चुके हैं कष्मकश ए जिंदगी (प्यासा) ची चाल असलेली इतर गाणी कोणती? एक प्रार्थना टाइप पण आहे..

तुम तो प्यार हो , मारू बिहाग राग , तो हा नव्हे

हा छायानट राग आहे

हे बसेल त्या चालीत

मुझसे नाराज

https://youtu.be/f-7yVDSyGT4

हम बेखुदी मे

https://youtu.be/JB9RfKNAf2k

चंदा रे जा रे जा रे

https://youtu.be/p-7NJ1lWZAE

ह्याच ओळीच्या चालीवर एक चतुर नारमधील काला रे जा रे जा रे ही ओळ घेतली आहे

Proud

एक असंच मनात अडकलेलं गाणं आहे, " जिवलगा, कधी रे येशील तू" , सुहासिनी फिल्म चे नव्हे.
हेच शब्द पण वेगळी चाल, कुठल्याश्या सिरियल मध्ये होतं बहुतेक.
कुणाला आठवतंय का?

Pages