मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार - २७ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'यमक'

Submitted by संयोजक-मभादि on 26 February, 2022 - 19:52

आज २७ फेब्रुवारी २०२२. सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाच्या आपल्या ५ दिवसांच्या भाषोत्सवातला आजचा तिसरा दिवस. आपला अलंकारांचा खेळ असाच चालू ठेऊया.

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.

तर मायबोलीकरांनो आजचा अलंकार आहे 'यमक'
-------------------------------------------------
थोडक्यात माहिती
कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.

उदाहरणार्थ :

१. जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ

२. पहिला पाऊस पडला
सुगंध सर्वत्र दरवळला
-------------------------------------------------
चला तर मग, आजचा खेळ सुरू करू

यमक घेऊन कविता लिहिणे हा अनेक माबोकर्‍यांच्या डाव्या हातचा मळ. अनेकविध विषयांवर येथे काव्यनिर्मिती होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण आज मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण काव्यात एखादा मराठी महिना (चैत्र, वैषाख, ज्येष्ठ, ... वगैरे), सणवार, ऋतू (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, ... इत्यादींपैकी) गुंफुयात.

नियम-
१. एका वेळी कोणताही एक मराठी महिना घेऊन त्यातील सण-वार, ऋतू, अजून एखादे वैशिष्ट्य चारोळी स्वरूपात मांडायचे आहे आणि त्याबरोबरीने यमक ही साधायचे आहे.

२. पुढील सदस्य झब्बू देताना तो महिना लगेच घेऊ शकत नाही.
उदा - श्रावण महिन्यातील वर्णन करणारी चारोळी असेल तर पुढचा झब्बू श्रावण महिना नसावा.

३. मराठी महिन्याचा उल्लेख केला तरी/ नाही तरी चालेल.
उदा - गणपती बाप्पा/मोदक चा उल्लेख असेल तर महिन्याचे नाव लक्षात येईलच. ऋतूंच्या नावावरून महिना लक्षात येईलच असे नाही. तिथे महिना सांगावा लागेल.

चला चला करा सुरुवात |
अलंकाराचा हा खेळ येऊ द्या रंगात ||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol
मराठी दिन ऋतु आला, आलं उत्साहाला उधाण
अशा मंगलसमयी मला यमकाचं कुठलं भान.

थंडी थोडी गुलाबी आणि थोडी बोचरी ती
त्यासवे मग गाजत येते दत्तात्रेय जयंती
असा हा मास तो मार्गशीर्ष
मनास देतसे अपरिमीत हर्ष

मी दोडका, नकोसा
म्हणे नाराजला पौष
माय मांडिते उत्सवा
तिचा शाकंभरी वेष

मार्गाशीर्षात चंपाषष्ठी ला करतात खंडेरायाचा जागर
सी ताई आणि सामो यांच्यानंतर झब्बू देतेय मी पामर !!!

Lol
ज्येष्ठाच्या उन्हाळ्यात पायाला लागतात चटके
गोविंदाची गाणी ऐकून मन माझे भटके
(संदर्भ:जेठ की दोपहरीमें पांव जले है सैंया, कुली नं वन)

सामो, अंजुताई , सी, अश्विनी११ मस्तच !

Lol
नाटू नाटू म्हणू नका, म्हणा सामी सामी सामी
मार्गशीर्षात झाला पुष्पा रिलीज, तोच बघणार आम्ही Proud

रामचरण गेला उडत आणि अल्लू आला धावून
पाऊस पडला पंगतीत आणि चटणी गेली वाहून Wink

सी नाटू सोडत नायं
उन्हाळा लवकर संपत नाय
आम्हाला यमक जमत नायं

Pages