Submitted by मेधावि on 26 February, 2022 - 10:27
माझ्याकडे चार वर्षांपूर्वी घेतलेली अॅमेझाॅनची फायरस्टीक आहे.
त्याच्या रिमोटच्या बॅटरीच अगदी चारपाच दिवसांत संपायच्या म्हणून रिमोटचं मोबाईल अॅप घेतलं.
मात्र हल्ली डिव्हाईस नाॅट फाऊंड अशी एरर वरचेवर येते. थोड्या वेळानं ती आपोआप जातेही आणी फा. स्टी. चालू होते.
तर..वरचेवर असं होत असेल तर फा. स्टी बदलायला हवी का?
नवी घ्यायची तर कुठली घ्यावी? अॅमेझाॅनमधेही खूप ऑपशन्स दिसतायत्. नक्की कुठली घ्यावी समजेना.
कुणी माहिती देऊ शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अॅप अन इन्स्टॉल करून पुन्हा
अॅप अन इन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून पाहीले का ?
रिमोटच्या बॅटर्या इतक्या लवकर संपत नाहीत. दुसरा रिमोट मिळतोय का ?
नवा रिमोट रू. 1300 म्हणजे फार
नवा रिमोट रू. 1300 म्हणजे फार महाग वाटतो.
ही समस्या अनेक जणांना आहे.
ही समस्या अनेक जणांना आहे.
वापर करत नसताना, रिमोटचे सेल बाहेर काढुन ठेवा. ते आतच ठेवल्याने रिमोट सतत फायरस्टिकशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत राहतो व त्याने ते लवकर संपतात - ईति कस्टमर सपोर्ट
रिमोटची बॅटरी लवकर संपते आहे
रिमोटची बॅटरी लवकर संपते आहे म्हणजे त्यात बग आहे. रिमोट ओव्हर द एअर अपग्रेड करायचा काही पर्याय दिसतो आहे का? मला वाटतं रिमोट वायफाय आहे. फक्त इन्फ्रारेड असेल तर बॅटरी लवकर ड्रेन होणे शक्य नाही. रिमोट री-पेअर करुन बघा.
रिमोटला हेडफोन वगैरे लावलेली नाहीयेत ना?
डिव्हाईस नॉट फाऊंड येत असेल आणि रिमोट आणि अॅप दोन्हीला तसं होत असेल तर प्रॉब्लेम स्टिक मध्ये आहे, रिमोट बदलून काही फरक पडू नये.
रिमोट फिजिकली स्टिकच्या जवळ ठेवून हा एरर येतो का?
स्टिक टीव्हीच्या मागे लावली असेल तर एचडीएमआय एक्स्टेंशन घेऊन लाईन ऑफ साईट रिमोटच्या समोर ठेवून ट्राय करुन बघा एकदा.
मला फायर स्टिक पेक्षा रोकू आवडतो.
ते आतच ठेवल्याने रिमोट सतत
ते आतच ठेवल्याने रिमोट सतत फायरस्टिकशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत राहतो व त्याने ते लवकर संपतात - ईति कस्टमर सपोर्ट >> धन्य! हे असेल तर स्टिकच्या रिव्ह्यू मध्ये हे लिहा आणि स्टार रेटिंग कमी द्या. अत्यंत सहज फिक्स करता येण्यासारखा बग आहे हा.
स्टिक बरेच वर्षे मार्केट वर असलेले प्रॉडक्ट आहे, त्यात इतका बेसिक बग असू नये. अर्थात तुमच्या घरी असलेले जुने असेल आणि अपग्रेड केलेले नसेल असं ही असू शकते.
अॅपला डिव्हाईस नॉट फाऊंड हा नक्कीच डिव्हाईसचा प्रॉब्लेम आहे. रिमोट मधल्या बॅटरी लवकर संपणे हे सिंम्प्टम असेल, मूळ समस्या डिव्हाईसची दिसते आहे.
अपग्रेड केले आहे. त्यांच्याच
अपग्रेड व दोनदा री-पेअरींग केले आहे. त्यांच्याच मदतीने त्यांच्या सांगण्यानुसारच केले आहे. तरी सेल संपत राहतात.
रिमोटचे व फायरस्टीकचे काहीतरी कनेक्शन आहे ते सतत चालू राहते.
अॅमेझॉनची कमीतकमी उपकरणे
अॅमेझॉनची कमीतकमी उपकरणे वापरणे, आणि अॅमेझॉन पासून चार हात लांब रहायचा प्रयत्न करणे हा चॉईस आहे.
घरी एकापेक्षा जास्त वापरणारे
घरी एकापेक्षा जास्त वापरणारे असतील आणि ऍप एकापेक्षा जास्त फोनवर इन्स्टॉल्ड असेल, आणि सगळ्याच फोनवरुन ही समस्या येत असेल असे गृहीत धरले तर समस्या फोन/ऍप मध्ये नाही. पण एकाच मोबाईल वरून ऍप वापरत असाल, तर ऍप रिइन्स्टॉल करून किंवा उत्तम म्हणजे दुसऱ्या मोबाईलवर ऍप इन्स्टॉल करून पहाणे. त्यातही हीच समस्या म्हणजे समस्या फायर स्टिक डिव्हाईसमध्ये किंवा मला वाटते वायफाय राऊटरमध्येही असू शकते. (router मधूनच रँडमली केव्हातरी पॅकेट्स ड्रॉप करतोय, आणि त्यावेळी मोबाईल ऍप डिव्हाईस डिटेक्ट करत नसेल.)
जर असा राऊटरचा प्रॉब्लेम असेल तर जेव्हा फायर स्टिक काम करू लागली तेव्हा फायरस्टिक डेटा बफर करत असल्याने नंतरही मध्येच थोडे पॅकेट्स ड्रॉप झाले तर ते शो पाहताना कळत नसेल.
पण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर सर्फिंग करताना वेबसाईट उघडताना, नेव्हीगेट करताना जरावेळ अडकल्या सारखे दिसते असाही अनुभव यायला हवा. किंवा तुमच्या लॅपटॉपवरून राउटर डिफॉल्ट गेट वे आयपी ऍड्रेसला वीसेक मिनिट ping करून (शेवटी -t स्विच वापरून) बघु शकता मध्येच कुठे host unreachable येतेय का. पॅकेट ड्रॉप्स होत असेल तर राऊटर बदला.
हे नसेल (पॅकेट्स ड्रॉप होत नाहीत) तर जेव्हा फायर स्टिक डिटेक्ट होते तेव्हा रिमोट मध्ये एकदा सेल घालून, तो वापरून फायरस्टिकचे वाय फाय सेटिंग रिसेट करून बघा. (हा रिमोट RF वर काम करतो बहुतेक (म्हणजे IR सारखी लाईन ऑफ साईट नाही लागत पण त्याला वायफाय पण नाही लागत. वायफाय लागत असत तर मग पहिल्यांदा फायर स्टिक टीव्हीला लागली तर तिचे वायफाय नेटवर्क वायफाय पासवर्ड देऊन सेट कसे करणार?)
म्हणजे नेटवर्क डीलिट करून परत तेच सेट अप करून बघा. हे मोबाईल ऍपने नका करायला जाउ. त्यात एकदा नेटवर्क डिलीट केले की मोबाईल ऍपशी संपर्क तुटेल आणि परत सेट अप करताच येणार नाही.
हे करूनही तीच समस्या येत असेल तर फायर स्टिक रिपेरला द्या / बदला.
फा. स्टीची सगळी कनेक्शन्स
फा. स्टीची सगळी कनेक्शन्स सोडवून परत चालू केली. होम पेज दिसायला लागलं.
नंतर सेटींग्जमधे जाऊन बराच वेळ बरेच अपडेटस् केले.
तीनचार वेळेस अपडेट केले. दहाबारा मि. लागली.
सगळं अपटुडेट झाल्यावर आता सगळं टकाटक चालू झालंय.
अॅमेझाॅनचा रिमोट फारच फालतू आहे असं वाटतंय एकंदरीतच.
फा. स्टीची सगळी कनेक्शन्स
फा. स्टीची सगळी कनेक्शन्स सोडवून परत चालू केली. होम पेज दिसायला लागलं.
नंतर सेटींग्जमधे जाऊन बराच वेळ बरेच अपडेटस् केले.
तीनचार वेळेस अपडेट केले. दहाबारा मि. लागली.
सगळं अपटुडेट झाल्यावर आता सगळं टकाटक चालू झालंय.
अॅमेझाॅनचा रिमोट फारच फालतू आहे असं वाटतंय एकंदरीतच. माहीती देऊन मदत करणा-या सर्वांना धन्यवाद.
Amazon fire stick चे cell
Amazon fire stick चे cell सारखेच बदलावे लागत आहेत.
मोबाईल वरती ॲप घेतला आहे त्यातूनच वापर होतो मग.