मन

Submitted by कविन on 26 February, 2022 - 00:06

मन 'पोलादी', हे ठावूक मजला आहे
चिंतेचे कारण? वाट 'चुंबकी' आहे

मन अजाण? हट्टी? काय म्हणावे सांग!
ते,अशाश्वताला शाश्वत समजत आहे

मन डोकावतही नाही गर्दीमध्ये
ते 'आयसोलेशन' मधेच रमले आहे

मन म्हणाल ते ते, सर्व बाळगून आहे
ते किंमत जोखून, वापर ठरवत आहे

मन चंचल नाही परी स्थिरही नाही
हे 'भलेबुरे'च्या मधले काही आहे

मन उलट-सुलटचा खेळ खेळते आहे
हा विणकामाचा छंद, अघोरी आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, चुंबकी वाट Happy
तुझ्या कवितेच्या पुढे हे म्हणावसं वाटलं:

अन् म्हणून मनाचा थांगच लागत नाही,
मनकवडा कोठे लपला, शोधत आहे... Happy