मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या

Submitted by संयोजक-मभादि on 25 February, 2022 - 01:50

आपल्या लतादीदी.

त्यांची गाणी कानावर पडलीच नाहीत असा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या चाहत्यांची तर गोष्टच न्यारी! ते येता जाता गाणी ऐकतात, गुणगुणतात, अगदी संग्रही ठेवतात.

तर मग चला, यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळूया. ह्या गानसम्राज्ञीला आपल्याकडून ही गीत-आदरांजली.
--------------------------------------------------------------
खेळाचे नियम-

१. गाणी/भजन/अभंग मराठी असावीत आणि लता मंगेशकरांनी गायलेली असावीत

२. झब्बू देणाऱ्या/री ने मुखड्याच्या पूर्ण ओळी लिहाव्यात.

३. भेंड्या २ प्रकारे खेळू शकता :
अ- पारंपरिक पद्धतीने, म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचे गाणे

ब- मुखड्यातील कुठल्याही शब्दापासून पुढील गाणे लिहा
उदा-
'असा बेभान हा वारा, कुठे ही नाव नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ,कशी येऊ'

यातील 'कशी' ह्या शब्दाचा उल्लेख करून पुढील झब्बू

' बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई'

अर्थात तो शब्द,मुखड्यातच असावा.

वरीलपैकी कुठल्याही एका पद्धतीने पुढचं गाणं दिलंत तरी चालेल

४. एकाचवेळी एकाहून अधिक जणांकडून गाणी आल्यास पाहिजे ते गाणे पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

५. शब्दाची पुनरावृत्ती झाली तर चालेल, परंतु गाणं वेगळं असावं.

मग रंगू देत गाण्याची मैफल.

सुरुवात करायला, वरचे 'बाळा होऊ कशी उतराई' हे गीत घेऊ शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याचा
आजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु

अन्जू, एकावेळी २ गाणी आली तर पुढचे लिहीणार्‍याने त्याला हवे ते निवडायचे आहे


नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने आड येते रीत

अन्जू, एकावेळी २ गाणी आली तर पुढचे लिहीणार्‍याने त्याला हवे ते निवडायचे आहे >>> ओके पण मी आधी लिहिलेलं गाणे लिहिल्याने ते योग्य नव्हतं त्यामुळे माझं बाद.

कशी
बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई

अर्र.
गाणं बाद

तुज
तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा
जमल्या ललना चतुरा
मोदे स्वागत करण्याला

तुज
तुज मागतो मी आता, मज द्यावे एकदंता

सखे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजूनही उशीवर टिपूर चांदणे पडे

चांदणे
चांदण्यात या धरणी हसते
चंद्र हसे गगनी
चांदणे फुलले माझ्या मनी

हसते
आली हासत पहिली रात
उजळत प्राणांची फुलवात

गगनी
गगन सदन तेजोमय
तिमिर हरून करूणाकर दे प्रकाश देई अभय

या
या चिमण्यांनो परत फिरा रे

अन्जूंचे घ्या मग


राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हाविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही

Pages