
नमस्कार मंडळी,
जगभरात पसरलेल्या मराठी मायबोलीने मराठी माणसांना मायबोलीच्या प्रेमळ धाग्यात गुंफलं आहे. हे अंतर कमी करण्यासाठी आपल्या मायबोली वर साजरे होणारे उत्सव, उपक्रम ह्यांचा महत्वाचा वाटा आहेच.
नवीन आव्हाने स्वीकारत मायबोली वरचे उपक्रम केवळ लिखित स्वरुपात न ठेवता, मायबोलीवरचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी एक माध्यम वापरायचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून आपण करत आहोत.
त्यासाठी ह्या वर्षीही म भा दिनाच्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत "साहित्यवाचन "/ "अभिवाचन" हा उपक्रम. जालीय जगातील आयडींच्या आजवर केवळ लिखाणावरून असणाऱ्या ओळखीला आता आवाज, कदाचित चेहरा सुद्धा मिळेल.
उपक्रमाचे स्वरूप-
उपक्रमात भाग घेणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या कोणत्याही साहित्याचे अभिवाचन करून ते रेकॉर्डिंग आमच्याकडे पाठवायचे आहे.
हे रेकॉर्डिंग मायबोलीच्या युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात येईल.
हे रेकॉर्डिंग दृकश्राव्य (व्हिडीओ) असेल तर फारच छान, पण जर काही कारणाने व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य नसेल तर केवळ ध्वनिमुद्रण (ऑडिओ) दिलेत तरी चालेल.
उपक्रमाचे इतर नियम
१) कथा, ललित, प्रवासवर्णन, कविता, वैचारिक लेख असे कोणत्याही प्रकारचे साहित्य चालेल. ते
शक्यतो तुमचे स्वत:चे असावे. पण सगळ्याच लेखकांना सादरीकरण जमते असे नाही. आणि ज्यांना
सादरीकरण जमते त्यांना लिहिता येतेच असे नाही. त्यामुळे ध्वनिमुद्रित करण्याअगोदर मायबोलीकर लेखकांची पूर्वपरवानगी घेऊन इतर मायबोलीकरही यात भाग घेऊ शकतील.
अशी परवानगी मूळ लेखकाने , मायबोलीत प्रवेश करून (लॉगीन करून) मायबोलीची संपर्क सुविधा वापरूनच वेबमास्तरांना कळवावी आणि कुठल्या आयडीला ती परवानगी दिली आहे तेही कळवावे. थेट ईमेल किंवा फॉरवर्डेड ईमेल चालणार नाही. फक्त लेखकांनाच ही परवानगी देता यावी म्हणून ही काळजी घेत आहोत.
२) एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकेल.
३) रेकॉर्डिंग ची कमाल लांबी ८ ते १० मिनिटे असावी.
४) साहित्य मायबोलीवर / इतरत्र पूर्वप्रकाशित असले तरी चालेल.
५) इतरत्र पूर्वप्रकाशित साहित्य पुन:प्रकाशित करण्यासाठी पूर्वीच्या प्रकाशकाची परवानगी घेणे आवश्यक असेल तर ती घेण्याची जबाबदारी त्या त्या सदस्याची राहील.
६) सर्व सहभागी सदस्यांचे अभिवाचन प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, मात्र वादग्रस्त ठरू शकेल किंवा कायदेशीर समस्या उभ्या करेल असे वाटणारे अभिवाचन संपादित करण्याचे किंवा नाकारण्याचे हक्क मायबोली प्रशासन राखून ठेवत आहे.
७) सर्वात महत्वाचे :- आलेली फाईल कोणत्याही तांत्रिक संस्करणाशिवाय प्रसारित होईल. दृकश्राव्य माध्यमात चुका खूप लवकर आणि मोठ्या दिसतात. त्यामुळे सादरीकरणाचा नीट विचार करून ध्वनि/चित्र मुद्रण करावे.
८) रेकॉर्डिंग ची फाइल MP4 format स्वरूपात दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत mabhadi2022@maayboli.com या email वर पाठवावी
संयोजक नमस्कार.
संयोजक नमस्कार.
माझ्या बाधा या कथेच्या अभिवाचनासाठी पार्श्वसंगीत वापरताना प्रताधिकार मुद्दा लक्षात आला नव्हता. त्यामुळे आपण आपल्या धोरणात बसत नसल्यास कृपया ते अभिवाचन रद्द केले तरी हरकत नाही.
किंवा जमल्यास पार्श्वसंगीताशिवाय ध्वनिमुद्रण पाठवण्याचा प्रयत्न करते.
प्राचीन, वेबमास्टर योग्य तो
प्राचीन, वेबमास्टर योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद.
अरे वा बिपिन, इथेच लिहिलेत
अरे वा बिपिन, इथेच लिहिलेत खूप आभार.
संयोजक माफ करा तुमचे काम मी वाढवले आहे.
अभिवाचन हा प्रकार गुलमोहर मधे
अभिवाचन हा प्रकार गुलमोहर मधे कायमचा वाढवला तर ज्यांना लिखाणाचा कंटाळा आहे किंवा काही कारणाने ज्यांचे लिखाण पूर्णत्वास जात नाही त्यांच्यासाठी मस्त सोय उपलब्ध होईल. काहींना वाचण्यापेक्षा ऐकायला आवडते. त्यांचीही सोय होईल. मायबोलीपण आधुनिक होईल.
शांत माणूस + 1
शांत माणूस + 1
आणि युट्युब हिट्स मिळून मायबोलीला फायदाच होईल...
शांमा +१०१
शांमा +१०१
फक्त मला वाटते, ते अपलोड करणे फार किचकट व वेळखाऊ काम आहे. संयोजक समितीने यावेळेस परिश्रमाने केले असावे. माझा असा अंदाज आहे जो की चूकीचा असू शकतो.
नमस्कार, संयोजक मंडळ, मेघना.
नमस्कार, संयोजक मंडळ, मेघना. यांनी "पंधराशे हॅरिसन- शोध" अभिवाचन करण्यास माझी काही हरकत नाही. (नियमानुसार वे.मांना औपचारिकरित्या कळवले आहे. पण इमेल जर कदाचित मिळाली नसेल तर इथे ही नमूद करते.)
पटापट टाका सगळे..
पटापट टाका सगळे..
आवाजावरून व्यक्ती कशी दिसत असेल अंदाज असा धागा काढा लवकर कोणी..
मी सांगते पण दिसणे नाही तर
मी सांगते पण दिसणे नाही तर स्वभाव -
'हॉरर' कथा निवडणारे व वाचणारे - डॅशिंग व मिश्किल
'आनंदाचे डोही' .......... - अरे ला कारे ची धमक असणारी व्यक्ती. अजिबात मुळूमुळू नाही.
'अरण्यकेश्वर' .......... - अध्यात्माकडे कल, काम पूर्ण व चोख करण्याकडे कल व कष्ट घ्यायची तयारी
'३०९' ................. -चोखंदळ व प्लॅन करुन मग काम हातात घेणार, घिसाडघाई नाही. ठंडा दिमाग
'मायबोलीची कहाणी' ............. - तरतरीत, तल्लख.
'उर्मिला' ........... - शांत आणि विचारी व्यक्ती
कोणालाही भेटलेले नाही (एक व्यक्ती सोडता) पण बरोबर आहेत की नाही आडाखे!!
शांत माणूस + ७८६
शांत माणूस + ७८६
ऋ सर अभिशेकवाचन करतील. मी लिहीत जाईन.
चर्प्स सर , भारी आयडिया. हा धागा तुम्हीच काढा.
माझ्या डोळ्यासमोर आले सगळे.
नमस्कार संयोजक,
नमस्कार संयोजक,
मायबोली आयडी सुनिधी यांनी माझी ‘उत्तर’ कथा उपक्रमात वाचायला माझी हरकत नाही.
वेबमास्तरांना तशी मेल संपर्कातून पाठवत आहे.
'३०९' .................
'३०९' ................. -चोखंदळ व प्लॅन करुन मग काम हातात घेणार, घिसाडघाई नाही. ठंडा दिमाग…. हे हे सामो ,आवडलं पण नाहीयं तसं. ही कथा मी स्वान्तसुखाय खूप पुर्वी रेकॅार्ड करून ठेवली होती गंमत म्हणून. म्हणून असं वाटलं असेल तुला.पण धन्स.
मी आता उत्तम उत्तम कथा
मी आता उत्तम उत्तम कथा-कवितांवर डल्ला मारुन ठेवणार आहे, परवानगी घेउन ठेवणार आहे . पुढे भविष्यात अभिवाचन करण्याकरता
हाहाहा

नाही नाही!!! मजा करते आहे.
हेहे …मस्त कल्पना. एकाच कथेचे
हेहे …मस्त कल्पना. एकाच कथेचे वेगवेगळ्या लोकांनी केलेले अभिवाचन… ते पण छान वाटेल कदाचित.
माबो
माबो
म भा दि - यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवलेत
यासाठी खूप कौतुक न आभार
समिती
आपण दिलेला वेळ , आलेल्या - सोडवलेल्या अडचणी , आपली मेहनत या साऱ्याला सलाम आहे .
खूप आभार
एकूण उपक्रम छान पार पडला !
उपक्रम संपल्यावर पण अभिवाचन
उपक्रम संपल्यावर पण अभिवाचन हा प्रकार सुरू असणार का ?
अभिवादन संपले की.. आता कचा
अभिवादन संपले की.. आता कचा बादाम चे रिल्स अपलोड करण्याचा उपक्रम सुरु करावा असे प्रोपोज करतो...
बादाम बादाम ए दादा कचा बादाम...
उपक्रम संपला आहे. आता इतर
उपक्रम संपला आहे. आता इतर वेळी ही सोय असेल का ते वेमांना स्वतंत्रपणे विचारा.
Pages