यूं ही कोई..

Submitted by पाचपाटील on 14 February, 2022 - 11:00

वही थमके रह गयी है
मेरी रात ढलते ढलते

जो कही गयी ना मुझसे
वो ज़माना कह रहा है

शब-ए-इन्तज़ार आखिर
कभी होगी मुक्तसर भी

यूँ ही कोई मिल गया था
सरे राह चलते चलते

-- कैफी आज़मी

तिथंच मूक निश्चल थबकून राहिलेली रात्र
तिथंच कुंठलेलं साकळलेलं माझं सगळं असतेपण
जिथं तू मला माझ्यावर सोडून गेला होतास

आणि आता तू येत नाहीस

माझ्याच्यानं यातला एक शब्दही बोलवत नाही, ऐकवत नाही
पण हे लोक म्हणतात
की तू मुळातच कधी अस्तित्वात नव्हतास
तू म्हणजे माझ्या कल्पनेतली एक कथा आहेस फक्त

आणि तरीही तू येत नाहीस

प्रतीक्षेची ही रात्र सरता सरत नाही
ही उमेदही काही कायमची विझून जात नाही

मग ही पहाट येते
खूप वेळा येते
मोठ्या उमेदीनं येते
आणि प्रत्येक वेळी तुला शोधत राहते
आणि तू काही येत नाहीस
मग गढूळ होऊन ती निघून जाते

आता हे असं फार काळ चालेलसं वाटत नाही
चंद्रामधली धुगधुग आता विझत चाललीय
माझ्यासोबत अहोरात्र तेवणाऱ्या ह्या चिरागांमधून
आता क्षीण उदास उजेड ठिबकतोय..
कारण माझाच वजूद आता हळूहळू मिटत चाललाय..

आणि तरीही तू येत नाहीस..

(स्वैर अनुवाद)
किंवा
(अनुवादाचा स्वैर प्रयत्न..)

मूळ हिंदी गीताचा/कवितेचा स्त्रोत:
https://www.lyricsindia.net/songs/915

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमलंय अगदी.
तसंही हे माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. चित्रीकरणही जबरदस्त.
काळजात पुन्हा ती अनंतकाळची वेदना ठसठसू लागली. पुन:प्रत्ययाचा क्लेशदायी आनंद मिळाला ह्या कवितेमुळे..
आभार.

चांगला प्रयत्न

अंमळ हिंदीकडे झुकलाय.

'जिथं तू मला माझ्यावर सोडून गेला होतास ' वाचल्यानंतर 'चिराग' 'वजूद' तर खूप ठीक वाटले.