खादाडी: पार्ल्यातली.

Submitted by ट्युलिप on 28 May, 2009 - 14:03

पार्ल्याची खाद्यसंस्कृती म्हणा, परंपरा म्हणा नाहीतर खादाडी म्हणा. ती चविष्ट, चारीठाव आहे ह्यात काहीच वाद नाही. अगदी बाबू वडेवाल्यापासून, शर्मा पाणीपुरीवाल्यापर्यंत आणि आरके पासून कॅफे मैलू पर्यंत ती पार्ल्याच्या गल्लोगल्ली पसरली आहे. चला तर. सगळे रेसिडेन्ट आणि नॉन रेसिडेन्ट पार्लेकर्स मिळून लिहूयात इथे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजाली: मासे प्रेमींचे आवडते ठिकाण. (माझे सुद्धा).
गजाली पासूनच जवळ एक मराठमोळं दुकान होते (नावच आठवत नाही दुकानाचे नी गल्लीचे सुद्धा,जवळ एक शाळा आहे) त्यांच्याकडे सर्व मराठी रुचकर पदार्थ मिळत्.(वड्या, पूपो वगैरे).

पार्ल्याच्या खादाडीत आद्य स्थान बाबू च्या वड्यांचे. मी पाचवीत असताना दहा पैशांना एक वडा, दहा पैशांना एक समोसा अन पाच पैशांना पोष्टाच्या तिकिटाएवढा क्रिकेटियर लोकांचा कृष्ण्धवल फोटो मिळत असे. समोसा म्हणजे बटाटा/ वाटाणा वाला पंजाबी समोसा नव्हे, खोबरं कांदा पोहे हिरवी मिरची वाला त्रिकोणी समोसा. पातळ कुरकुरीत फारसं तेलकट नसलेलं आवरण. वर्तमानपत्राच्या तुकड्यात थोडी सुकी लसणाची चटणी अन वडा किंवा समोसा बांधून मिळायचा. गोळ्या वगैरे कधी पाहिल्याचं आठवत नाही. महिना अखेरीस अर्धा दिवस सुट्टी असायची त्या दिवशी आम्हाला प्रत्येकाला घरनं २५ पैसे मिळायचे कँटीन मधे खाण्यासाठी.

पार्ले टिळकमधे जाण्याअगोदर मी एक वर्ष भर सांताकृझच्या पोदार शाळेत काढलंय Sad पाचवीत पार्ले टिळक मधे प्रवेश घ्यायला म्हणून आई मला घेऊन गेली होती. पडळकर सरांनी मला विचारलेले ' पोदार मधे वर्गात पंखे आहेत. त्यांच्या कॅन्टीन मधे रगडा पॅटीस, भेळपुरी सँडविच , पुरी भाजी वगैरे प्रकार मिळतात. त्यांची स्कूलबस आहे. आमच्या इथे कँटीन म्हणजे एक छोटं खोपट आहे. वर्गात पंखे नाहीत. तुला बेस्ट्च्या बसने यावं लागेल. तुला आवडेल का असली शाळा'. त्यावर मी जमेल तितक्या बाणेदारपणे सांगितलं होतं ' सर मी कधी पोदार च्या कँटीन मधे खाल्लं नाही. माझी आई रोज डब्यात भाजी पोळी देते. अन चौथी मधे त्या शाळेत मुलींना स्कॉलरशिपच्या परिक्षेला बसू देत नाहीत ( खरंच डिस्करेज केलं जात असे तेंव्हा ). म्हणून मला ही शाळा हवी.'

मी दहावीला येईपर्यंत सरांच्या ते व्यवस्थित लक्षात होतं.

आता संध्याकाळी किंवा सुटीच्या दिवशी वीरकराच्या दुकानाच्या समोरच्या कोपर्‍यावर वडे, समोसे, कधी कधी कोथिंबीर वडी वगैरे मिळतात. तिथे उभं राहून खाल्ल्याशिवाय माझं परतीचं तिकिट व्हॅलिडेट होत नाही Sad

पार्ल्यात पुर्वी शिवसागरची पावभाजी खुप फेमस होती. पण कधी चाखायची संधी मिळाली नाही. त्याच्याच बाजूला एक आईसक्रिम पार्लर होतं, तिथे बरेचदा आईसक्रिम खाल्लं आहे. तिथे बरीच डेकोरेटीव्ह आईसक्रिम मिळायची. अननसाचे दोन तुकडे करून त्यातला गर काढून त्याच्या पाठीत पायनॅपल पॅशन आईसक्रिम भरून मिळायचं वगैरे.... आणि क्वांटीटी पण भरपूर असायची. आता ते पार्लर आहे की नाही कोण सांगू शकेल काय?

प्रभूकृपाची कचोरी मस्त असायची. नॅचरल्सचं आईसक्रिम पहिल्यांदा पार्ल्यातच खाल्लं आहे.

मी पार्ल्यात नवीनच आहे, पण बाबूच्या वड्याची चव चाखली आहे. आणखीन एका ठिकाणचा वडापाव खाल्ला होता, पण नावच आठवत नाहीये. गल्लीच्या टोकाशी होता, शिवसागर हॉटेलच्या समोरच्या कोपर्यावरचा होता बहुतेक.

आउटडोअर्स, तो सम्राटचा वडा. सध्यातरी पार्ल्यात तोच सर्वात चांगला आहे.

शर्माकडची भेळपूरी विसरलात का पार्लेकरांनो?

शिवसागरच्या कॉर्नरवर नामे बंधुंचा वडा पाव मिळतो.... एकदम सही असतो. साठे उद्यानाच्या बाहेर एक दुकान आहे. नाव विसरलो पण तिथला वडा, मिसळ एक्दम मस्त असते.

ते गजालीजवळचं दुकान 'गृहिणी' बहुतेक. त्यांच्या दुधीच्या वड्या छान असायच्या.
हनुमान रोडवरचं 'रुची', मार्केटातलं 'चँपिअन', 'हिरसन' - छान खाऊ मिळण्याची ठिकाणं.

पार्ले टिळकच्या गल्लीजवळ 'रघुवीर स्टोअर्स' पण होतं.

प्रभूकृपाचं कटलेटही मस्त असायचं. आता खाऊन य वर्षं झाली.
शिवसागरच्या शेजारी सॉफ्टी आइसक्रीम मिळायचं. पण मला आवडायचं नॅचरल्स - टेंडर कोकोनट झकास.

पूर्वी हनुमान रोडवरच दत्ताच्या देवळासमोर मुरुगन दुकानवाल्याची डोसा आणि डाळवड्यांची गाडी होती. आता बंद झालेली दिसते.

शबरीमधलं जेवण मस्तच.

कुठे ट्रेकला वगैरे जाऊन आलं की येताना हमखास डॅफोडिल्स मध्ये खाऊन यायचं.

पार nostalgic व्हायला झालय.

शिवलीलाच्या कॉर्नरवरची आणि किन्नरी बाहेरील पाणिपुरी मस्त असते...
अजंठा प्रेससमोरच्या स्टॉलवर सकाळी उपमा छान मिळतो....

राम मंदीराच्या समोरच्या गल्लीत बरेच क्लासेस आहेत तिथेच जवळ एका गाडीवर ग्रील्ड सँडविच मिळायचं ते अजुन मिळतं का?? अप्रतीम असायचं...

पर्ल्यचे शुक्लाचे सँडाविच पण फार फेमस होते. न
>>>मला आवडायचं नॅचरल्स - टेंडर कोकोनट झकास.<<< अनुमोदन... अजुनही तेच फेवरेट आहे.. रात्रिइ १२ ला जाउनसुद्ध खाल्ल आहे ते... Happy शेवटी त्याने गर्दिला कंटालुन बंद केले होते... आम्हि शेवाटचे आईस्क्रिम खाणारे ठरलो होतो... Proud

पणशीकरांकडे फराळी मिसळ, बटाटे वडे, पियुष अप्रतिम मिळतं.

गजाली शेजारी 'पणशीकर'
पितळ्यांच्या हॉटेलचं रूपांतर कॅफे कॉफी डे मधे झालंय.
पणशीकरांच्या समोर एक सॅडविचवाला असतो. त्याच्याकडचं सॅडविच महान.
सुभाषरोडच्या टोकाला गणेश भेळवाला... हल्ली मेल्याने २०-२५ रूपये केलेत सगळ्या डिशेस चे. त्यामुळे सुभाषरोड गणेशोत्सवाच्या ट्रॉफी ठेवल्यात तिथेच एक भेळेची गाडी लागते त्याच्याकडे आम्ही वळलो आहोत. मराठी मुलगा आहे त्यामुळे तेवढाच मराठीचा अभिमान वगैरे..

रूचिसागर बंद होऊन जमाना झाला.
त्याच्या शेजारी आधी दर्या होतं तिथे मासे उत्तम मिळायचे. आता तिथे पुरेपूर कोल्हापूर आहे. आणि सध्या त्यांच्या भाकरी नी पालेभाजी मुळे ते माझ्या फेव लिस्टवर आहे.

त्याच गल्लीत थोडं पुढे गेल्यावर एक गुज्जु हॉल आहे लग्नाचा तिथे एक हाटेल चालू झालंय. आरके टायप्स आणि चव सुद्धा आरके शी स्पर्धा करते.
अजून पुढे या गल्लीतून मग लागतं तोसा... अहाहा.. गुज्जु, मारवाडी मिनी मील्स मिळतात. पानग्या, सुरळीची वडी असलंही काय काय मिळतं.. तिथली बाजरा खिचडी आणि मारवाडी कढी माझी फेव..

स्टेशनच्या बरोब्बर समोर एक न्हाव्याचे दुकान आहे त्याच्या पुढ्यात जी भेळेची गाडी लागते तिथली पाणीपुरी महान.

उत्कर्ष मंडळाकडून प्रार्थनासमाज रोडकडे येताना डावीकडे 'द शॅक' नावाचं व्हेज हाटेल आहे. तिथले पराठे उत्तम असतात.

गजाली पेक्षाही अस्सल मासे 'मालवणी आस्वाद' मधे मिळतात इति माझा मत्स्यप्रेमी नवरा. हे मालवणी आस्वाद शानच्या ब्रिजकडून सरळ आल्यावर रस्ता डावीकडे वळतो त्या रस्त्याने थोडे पुढे गेले की डावीकडे आहे. बहुधा प्राची सोसायटी च्या आसपास.

बादवे हे सगळं इस्टातलं आहे.

वेष्टात खाउ गल्ली सोडून २ महत्वाच्या गोष्टी.. बजाज रोडवरची मारूतीची चटईवरची पावभाजी, आणि एस व्ही रोडवरच्या इर्ल्याच्या बसस्टॉपच्या इथला भेळवाला. त्याच्याकडे जी पाणीपुरी मिळते तशी महान पाणीपुरी मी अजून तरी मुंबईत कुठे खाल्ली नाही.
जुहू कडे जाताना सहकार भांडार/ अपना बाजार च्या बाहेरचा भेळवाला पण उत्तम आहे.
रात्री बेरात्री क्षुधा शांती साठी कूपरच्या इथला अमर आहे.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

थँक्स योगेश, मला नामे बंधूंचा वडाच म्हणायचं होतं.

"दर्या" नॉनवेजसाठी ठिक आहे, तिकडे गेलो होतो तेव्हा सगळ्यात मिठ जास्त होत Sad

बहका है मन कहि... कहा जानती नहि...
कोई रोक ले यहि....

"दर्या" नॉनवेजसाठी ठिक आहे,<<
होतं. तिथे आता पुरेपूर कोल्हापूर आहे. मी दर्यामधे कधीच गेले नव्हते.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

सगळे मेले(सदाशिवपेठी आज्जीबाई, हसू, शंभर शकले, लोळणे इत्यादी) कृतघ्न... एवढा निबंध लिहिला पण एकाने प्रतिक्रिया नाही दिली. गेले लगेच हादडायला! Wink

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

शान चा पूल ओलांडून पलीकडे पश्चिमेला उतरले की लगेच पहिल्या गल्लीत आतमध्ये एक पाव भाजी वाला आहे.वेगळीच पद्धत आहे आणि चवही छान आहे.जरा ति़खट आहे त्यामुळे गुजराती गोंधळ जरा कमी आणि आवाजही कमी असतो.

संजय,
त्याच्याबद्दल लिहिलंय मी वरती..
बजाज रोडवरचा मारूती पावभाजीवाला तो.
चटईवर बसून खायची पावभाजी.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

पार्ले international च्या "निमंत्रण" मधली गुजराथी थाळी सुदधा छान असते. पुर्वी १०० रुपयाना मिळायची आता बहुतेक १५० झाली आहे.
स्टेशनच्या समोर STM Tea Depot च्या बाजुला एक सँडविच वाला आहे, त्याच्याकडे सँडविच उत्तम मिळता.

अरे कोणि पार्लेश्वराच्या वडापाव बद्द्ल लिहिले नाहि.
फारच झण्झणित असतो.
गजाली नक्कि कुठे आहे ते सांगाल का?
मि रहाते गोरेगावला पण खरेदि आणि नाटक यामुळे पार्ले आठवड्यातुन एकदा तरि फेरि असतेच.
या पुढे येताना हि लिस्ट घेउन येणार आहे मि.

अरे वा पार्ल्यातली खादाडी Happy

सुरूवात करायची तर हनूमान रोड वरन करू. सत्कार मधला कोळीवाडा आणि टीक्का. जनता फरसाण मधला सामोसा कचोरी. मग मंगेश स्टोर्स च्या कॉर्नरवरचा डोसा. गोकुळ मधला रजवाडी चहा, बाजूला पणशीकरचा बटाटा वडा, मिसळ आणिक मसाला दूध बाजूला गझाली मधला मत्स्याहार, समोरच पंकज मधले बटाटा वेफर्स , आणखी पुढे आलात की माँजीनीस मधली पेस्ट्री आणि पॅटीस, शिव-लीला च्या कोपर्‍यातली (ठोसर वाडीच्या नाक्यावर) चटकदार दही पुरी , रगडा, मग जरा पुढे आलात की बाबूची कांदा समोसा, बटाट वडा आणि पॅटीस कटलेटाची गाडी.

थोड पुढे आल्यावर स्टेशनाच्या रस्त्यावर पूरेपूर कोल्हापूर, आणि त्यापुढे फडके उद्योग मंदिरातल्या आननस, संत्र, दूधी आणि गुलकंद बर्फ्या वर पिस्ता शिंपडून, त्यापुढे आल्यावर तोसा.

स्टेशन रोड वर आल्यावर मार्शलची पावभाजी , बाजूला अंडा भूर्जी, आणखी पुढे आल्यावर ती २५-३० वर्ष जुनी ताकाची गाडी, समोरच सोडा पब. जीवन मधली ऊकडे बटाटे घालून केलेली मिसळ, हिरवे वाटाण घालून केलेल मटार पॅटीस, अळू वडी, डाळींबी उसळ , पुढे आर के मधला तो भारदस्त पंजाबी सामोसा, मसाला भाजी घातलेला म्हैसूर मसाला , ओनीयन उतप्पा आणि त्यावर भुरभूरणार खोबर आणि कोथींबीर , पुढे नेहेरू रोडला रामकृष्ण फरसाण , जोशी गॅसच्या मागच मोहन फरसाण मधली कचोरी. पार्ले बूकच्या समोरच के के पंजाब (कांबळी वाडीतल) , बाजूला प्रभूंच दूकान तिथले चटपटे पदार्थ , विजय स्टोर्स चे उकडीचे मोदक आणि फक्त सणाच्या दिवसाला मिळणारी बासुंदी , नेहेरू रोडला च पुढे शिवसागरची पावभाजी आणि फालुदा , बाजूला स्प्लॅश आईस्क्रीम. आणखी पुढे नॅचरल्स आईस्क्रीम .....

आईग भुक लागली (लगेच जेऊन येतो ) Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

हल्ली-हल्लीच अंधेरी (पू) ला चिनॉय कॉलेजच्या जवळच एक बालाजी नावाची टपरी (हो हो टपरीच म्हणायला हवं) आहे, तिथे म्हणे डोसा, पावभाजी लई भारी मिळतं. हे सगळं ऐकीव आहे. या वेळेच्या भारतवारीत खादाडीच्या लिस्टमध्ये सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे हे. माहितगारांनी प्रकाश टाकावा.

खाऊन आल्यावर फीडबॅक टाकेनच. Happy

इर्ल्याच्या हरिश (बार आणि) रेस्टॉरंट बद्दल कुणी लिहल नाही. मत्स्यप्रेमींसाठी मस्ट विजीट. माझे आवड्ते - सुरमय तवा फ्राय, काणे तवा फ्राय, बोंबील चिलि (हो इंडियन चायनीज स्टाईल पण मस्त कुरकुरित) बरोबर निर डोसा

या शनिवारी हनुमान रोड वरुन ड्राईव्ह करताना ' बाघ बकरी टी लाऊंज ' मधे बरीच गर्दी दिसली . कुणी गेलय का तीथे?

पार्ल्यातील खादाडी साठी आमच फेमस ठिकाण म्हणजे "पुरेपूर कोल्हापूर"...तिथल धनगरी चिकन-मटण,तांबडा आणि पांढरा रस्सा,बाजरीची भाकरी सगळच नाका-तोंडातून अक्षरक्ष पाणी काढणारं.त्याच्या बाजूलाच मराठमोळया जेवणासाठी "मी मराठी" पण उत्तम आहे.

Pages