Submitted by ट्युलिप on 28 May, 2009 - 14:03
पार्ल्याची खाद्यसंस्कृती म्हणा, परंपरा म्हणा नाहीतर खादाडी म्हणा. ती चविष्ट, चारीठाव आहे ह्यात काहीच वाद नाही. अगदी बाबू वडेवाल्यापासून, शर्मा पाणीपुरीवाल्यापर्यंत आणि आरके पासून कॅफे मैलू पर्यंत ती पार्ल्याच्या गल्लोगल्ली पसरली आहे. चला तर. सगळे रेसिडेन्ट आणि नॉन रेसिडेन्ट पार्लेकर्स मिळून लिहूयात इथे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुजा, छान आहे चव मी मराठीची.
सुजा, छान आहे चव मी मराठीची. नक्की भेट दे एकदा.
पितळेंच्या दुकानाच्या जागी
पितळेंच्या दुकानाच्या जागी असलेलं सीसीडी पुन्हा सुरू झालय. <<
बंद कधी होतं?
पणशीकर महागपेक्षा तेल अति वाटतं मला. त्या अर्थीही ते तब्येतीला महाग पडतं.
नमस्कार पार्लेकर्स, तर
नमस्कार पार्लेकर्स,
तर आतापर्यंत शिव सागर, मी मराठी, राम कृष्ण, जीवन, पणशीकर इ. हाटेलं ट्राय करुन झाली. मी मराठी, शिवसागर सर्वात आवडली.
पण चांगला भेळवला अजून सापडला नाहीये. शर्माकडील पापु नाही आवडली. अजून कुठे मिळेल भेळ, पापु चांगली?
वर्षा झालीस का पार्लेकरीण?
वर्षा झालीस का पार्लेकरीण?
वर्षा, मी मराठी आवडलं म्हणजे
वर्षा, मी मराठी आवडलं म्हणजे आलीस माझ्या कंपूत
शर्मा म्हणजे एकदम हाईप्ड आहे, नाव आणि चार्जेस दोन्ही. टेस्ट फारच ऑर्डिनरी. नी म्हणतेय तो गणेश ट्राय करून बघ तेजपाल स्कीमच्या आसपासचा. आमच्या डोंबिवलीतल्या 'प्रजापती' चा मुकाबलाच नाही.
शिवसागरच्या समोरच्या कोपर्यावरच्या सम्राटचा वडापाव खाल्लास कां?
सुभाष रोड चा गणपति जिथे बसतो
सुभाष रोड चा गणपति जिथे बसतो तिथे आतमधे आहे गणेश भेळवाला. मलाप्ण शर्मा आवडत नाही.
Near tejpal scheme road no 1
Near tejpal scheme road no 1 there is shinde's shop. Next to that there ia lane. Ganesh bhelwala is in that lane
ओक्के गणेश भेळवाला ट्राय करीन
ओक्के गणेश भेळवाला ट्राय करीन आता.
प्रॅडी, होतेय हळू हळू..
हो आडो मी मराठी मधले पदार्थ मस्त आहेत. आणि पीयुष तर अहाहा.
सम्राटचा नाही खाल्ला अजून.
सम्राटचा नाही खाल्ला अजून. पार्ले टिळक शाळेजवळच्या बाबू वडेवाल्याचे आवडले आम्हाला. आता नेक्स्ट टाईम सम्राट.
सध्या रॉयल मोटर ड्रा. स्कूलमध्ये ड्रायव्हिंग शिकत्येय. लर्नर्स लायसन्स मिळालंय. सध्या लेसन्स चालू आहेत.
साठे कॉलेज च्या बाजुला भट चा
साठे कॉलेज च्या बाजुला भट चा चहा मिळतो मस्तच , गवति चहा ,आणि आल्याचा ,
मी मराठी कुठलं?
मी मराठी कुठलं?
विजय स्टोर्स पार्ले यांचे
विजय स्टोर्स पार्ले यांचे फराळ आयटम्स कसे असतात? मला इथे बंगलोरला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण चव चांगली असते का? एखाद-दुसराच पदार्थ चविष्ट असला तरी सांगा. धन्यवाद.
Pages