भूत फक्त रात्री का दिसते ?

Submitted by गारंबीचा शारूक on 13 February, 2022 - 00:57

जुन्या चाळीत असताना कधी कधी रात्रीचे भूताखेताचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही.
पण काही काही लोक खोटं बोलत नाहीत हे माहिती होतं. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहीती होतं. असे लोक पण जेव्हां भूताचे अनुभव सांगायचे तेव्हां त्यांना खोटं ठरवणं बरोबर वाटायचं नाही.

ज्याची त्याची श्रद्धा कपूर म्हणून मी ते ऐकायचो !
पिकनिक ला गेल्यावर मित्रांचे पण किस्से ऐकायला मजा यायची. त्यात किस्सा सांगणार्‍याची टांग खेचण्याचा कार्यक्रम व्हायचा. सगळेच इरफानमौला नसल्याने काही जण नाराज व्हायचे. मग एखादा नाराजी दूर करायसाठी दारूचा खंबा खोलू का विचारायचा. तेव्हां माझा एकट्याचा त्याला विरोध असायचा. मग सगळेच नाराज व्हायचे.

एकदा माझ्या एका मैत्रिणीने किस्सा सांगितला होता.

"ती लहान असताना गावी रहायची. गाव लहानच होतं. गावी लहान असताना रहायची पण मोठी झाल्यावर गाव सोडायला लागलं. आय मीन तिचे वडलांच्या बदल्या व्हायच्या. ते मोठेच होते. मोठे असताना नोकरीला लागले होते. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांना माझी मैत्रीण झाली. म्हणजे त्यांना मुलगी झाली ती मोठी झाल्यावर माझी मैत्रीण झाली. हुश्श ! ती मुलगी लहान असताना (आणि तिचे वडील आणि आई पण मोठे असताना) त्यांची बदली एका लहानशा गावी झाली. तिथे एक वाडा त्यांना रहायसाठी मिळाला. तो दोन मजली होता. पुढच्या बाजूला गावातला रस्ता होता. मागच्या बाजूला कोकणात असते तशी वाडी होती. त्यात झाडं होती. विहीर होती.

एकदा तिची आई वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीत रात्रीची तारेवर वाळत असलेले कपडे काढून घ्यायला आली. तर तिने पाहीलं कि एक बाई भिंतीला टेकून उभी आहे. तिने पांढरं पातळ नेसलं होतं. आणि ती खूप उंच होती. इतकी कि तिचे पाय खाली जमिनीला होते आणि वरच्या बाल्कनीच्या इथे तिची छाती आली होती. खांदा आणि डोकं बाल्कनीतून वर मान करून बघावं लागत होतं. आईला आधी काही समजलंच नाही. माझी मैत्रीण तर लहानच होते. ती आईला म्हणाली " आई, बघ केव्हढी मोठी बाई "

तेव्हां आईच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे. तिचं लक्ष कपडे उतरवून घेण्यात असल्याने लक्ष दिलंच नव्हतं. माझी मैत्रीण (जी लहान होती) त्या बाईकडे बघत होती , आणि ती बाई पण हिच्याकडे बघत होती. आईने ते पाहिलं आणि तिला घाम सुटला. तिने कपडे दिले टाकून आणि मुलीला (मैत्रिणीला) हाताला धरून फराफरा ओढतच खाली आणलं. तेव्हां ती ( मैत्रीण जी लहान होती) महिनाभर तापाने आजारी होती.

तिने हा किस्सा सांगितल्यावर मी मस्त पैकी तिची खेचली. ती नाराज झाली. बरेच दिवस बोलली नाही.
मग एक दिवस तिच्या घरी गेलो तेव्हां तिच्या आईने ती माझ्यावर नाराज असल्याचे सांगितले. तिने मग माझी खात्रीच पटवली कि तिथे एक बाई तिनेही पाहिली आणि तिच्या आईनेही पाहिली. नंतर आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही घाबराल म्हणून आधी सांगितलं नव्हतं. तिथे एका बाईचं भूत सर्वांना दिसतं. ते काही करत नाही. पण आपल्याकडे बघत असतं.

मग त्यांनी ते घर आणि ते गावच सोडलं.

असे खूप किस्से ऐकले.
त्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे सर्वांना भूत रात्रीच दिसतं.
असे का ?

एकदा मुंबईतल्या एका डोंगरावर आम्ही सगळे रात्रीचे गेले होतो. त्यात भूत पकडणारे दोघे जण होते. ते मित्राच्या ओळखीचे होते.
तेव्हां तिथं हा विषय निघाला. मग रात्रीच भूत का दिसतं यावर चर्चा झाली.
ते दोघे पॅराझंपर होते. भूत या विषयात त्यांची पीएचडी केली होती. पॅराझंपिंग अ‍ॅक्टिव्हिटीज आणि एनर्जीज या विषयावर ते लेक्चर्स पण देतात.

त्यांनी सांगितलं की दोन कारणं आहेत.
पहिल्या टाईपमधे लोकांची मान्यता आहे की दिवसभर देवांचा वास पृथ्वीवर असतो. देवांच्या शक्ती सूर्याच्या उजेडासोबत सर्वत्र पोहोचतात. त्यामुळे अमंगळ शक्तींना बाहेर पडता येत नाही. दैवी शक्तींचा रात्री संकोच होतो. त्यामुळे भूतं रात्री बाहेर पडतात.
यावर बरंच डिस्कशन झालं. एकाचं असं म्हणणं होतं की भूतांना शरीर नसतं. त्यामुळे दुपारी उन्हानं त्यांचं अंग भाजतं. म्हणून ते रात्रीच्या थंड हवेत बाहेर पडतात. असे प्रत्येकाचे मत होते.

पण दुसरं कारण पण ऐकायचं होतं. ते म्हणाले हे वैज्ञानिक कारण आहे.

दिवसभरात आपले काँप्युटर, टीव्ही, रेडीओज, मोबाईल चालू असतात. याच्या वेव्हज वातावरणात सक्रीय असतात. तसेच गाड्या पळत असतात. त्यांच्या व्हायब्रेशन मुळे एलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्हज / फोर्स तयार होत असतात. दिसवभरातल्या सजीवांच्या हालचालींमुळे वातावरणात उष्णता वाढत असते. त्यातून ऊर्जा बाहेर पडत असते. ही ऊर्जा दिवसा प्रसरण पावते. ती दिवसा खूपच शक्तीमान असते. ती पॉझिटिव एनर्जी असते. तिच्या आवाजात , प्रभावात निगेटिव्ह एनर्जी दबून जातात. निगेटिव्ह एनर्जी मुळात खूप अशक्त असतात. रात्र झाल्यावर हीट वेव्ह वरच्या दिशेने निघून जाते. खालचा स्तर थंड होऊ लागतो. रात्री वीजेचा वापर कमी होऊन जातो. मोबाईलचे संदेश येणं बंद होतं. उर्जेचा वापर रात्री खूपच क्मी होतो. त्या शांततेत नकारात्मक उर्जा आपले अस्तित्व प्रकट करू शकते. त्या उर्जेचा प्रभाव इतर ऊर्जा शांत झाल्यावर आपल्यावर जाणवतो. आणि आपल्याला ते समजत नसल्याने मेंदू आपल्याला इशारे देऊ लागतो. निगेटिव्ह उर्जेशी आपण किंवा मेंदू परिचित नसल्याने मेंदूतल्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक रिअ‍ॅक्शन आपल्या जुन्या आठवणींप्रमाणे आपल्याला काही चित्रं दाखवू लागतात. हे भास असतात. त्यात आपल्याला मग एखादी बाई दिसते , कुणाला आकार दिसतात. कुणाला वेगवेगळे रंग तरंगताना दिसतात.

हे आम्हाला पटलं. तरी एक शंका नंतर आली. कि जर वेगवेगळे भास होत असतील तर एखाद्या जागी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या वर्षी, एकमेकांना न ओळखणार्‍या लोकांना एकाच प्रकारचे भास का होत असतील ? ज्यांना त्या जागेची काहीच माहिती नाही त्यांनाही तेच भास का होतात ? जसे माझ्या मैत्रिणीला ( ती लहान असल्याने) आणि तिच्या आईला आधी कुणीही काहीही सांगितलेले नसताना पण तीच बाई कशी दिसली ? त्यांना वेगळा भास का झाला नाही ?

आता कुणाला यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. मी तर आधीच सांगितले की माझा भूतांवर विश्वास नाही. पण हे असे ऐकलेले कसे नाकारायचे ?

या गप्पा चालू असताना एकाने दारूची बाटली काढली. माझा राग अनावर झाला. मी ती बाटली हिसकावून घेतली आणि खाली आपटली. त्यातली दारू सगळीकडे सांडली.

इतक्यात तिथे कुणीतरी सिगारेट ओढत असल्याचा भास आम्हाला झाला. कुणी तरी असेल पण जे मघाशी दिसले नाही. आम्ही कोण आहे असे विचारून टॉर्च लावणार इतक्यात अंधारातून एक सिगारेट आली आणि जिथे दारू सांडली होती तिथेच पडली. क्षणात आग लागली. पाहता पाहता वणवा पेटला. आग भडकणार हे लक्षात येताच आम्ही तिथून धूम ठोकली.

सकाळी समजलं की डोंगरच जळाला.
ते काय होतं मग ?

आणि रात्रीच का भास झाला ?
कुणी यावर प्रकाश पाडू शकले तर मला या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कहर आहे हा लेख

पॅराझम्पर थिएरी अफाट आहेत

आणि अखेरीस डोंगर कसा जळला या रहस्यमय कथेवरचा पडदा आज पडला Happy

भूत फक्त रात्री का दिसते ?>>>>>>>> नाही. मला दिवसा दिसले होते.
किस्सा असा झाला होता.
माझ्या लहानपणी आम्ही एका नवीन घरी शिफ्ट झालो होतो.
एके दिवशी दुपारी घरात मी एकटीच टिव्ही पाहत बसले होते रिमोट घेऊन, तेवढ्यात टेलिफोन वाजला म्हणून सोफ्यावर रिमोट ठेवून उठून गेले.परत आल्यावर पाहिले तर रिमोट जागेवर नव्हता. मागे कोपर्यातल्या एका खुर्चीवर रिमोट ठेवलेला सापडला.तो मीच ठेवला कि कुणी ठेवला काही कळेना.
मग टिव्ही बंद केला तर त्याच टिव्ही स्क्रीनमधे मागच्या त्या खुर्चीवर एक म्हातारे आजोबा बसलेले दिसले. मागे वळून बघितले तर कुणीही नव्हते.
नंतर कळले मला दिसलेले आजोबा आधी त्या घरात राहायचे.ते वारले होते आणि ते जीवंत असताना नेहमी त्याच खुर्चीत बसायचे.

आपल्याला पापण्या असतात. आपण मिनिटातून अनेकवेळा पापण्यांची उघडझाप करू शकतो, हवे तेव्हा बंद करू शकतो.
भुतांना पापण्या नसतात, ते डोळे बंद करू शकत नाहीत. त्यामुळे प्रकाशाचा त्यांना त्रास होतो.

दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वी वातावरणातील सर्व पदार्थांसकट स्वतःभोवती फिरते. म्हणजे आपल्या सकट. त्यामुळे आपल्याला दिवस रात्र या सायकल मधून जावेच लागते.
भूत मात्र याला अपवाद आहेत. ते आपल्यासारखे पृथ्वीसकट फिरत नाहीत.
प्रकाश नको म्हणुन ते सतत पृथ्वीच्या ज्या बाजूला सूर्य आहे त्याच्या विरुध्द बाजूला रहातात, तेवढ्या भागात हवे तसे फिरू शकतात.

म्हणजे ते दिवसा गायब होत नाहीत, तर सूर्याच्या विरुद्ध बाजूलाच सतत असतात.

@ आशुचॅंप आणि उपाशी बोका,
दिलगिरीबद्दल क्षमस्व. काही वैयक्तिक कारणांमुळे डोंगर जाळण्याचा किस्सा अजून लिहिता आला नाही. लवकरच लिहितो. पण तोपर्यंत अश्या कॉन्प्सिरसी थिअरीज येत राहतील त्या एंजॉय करूया. अजून थिअरीज प्रतिसादात आलेल्या आवडेल Happy

@ भूत
ते ना दिवसा दिसते ना रात्री. जे असते पण दिसत नाही त्यालाच तर भूत म्हणतात. दिसू लागले तर ते भूत कसले. तो तात्या विंचू झाला.

नको सर तुमची वेळ गेली आता
तुमच्या थापा वाचण्यापेक्षा हे जास्त मनोरंजक आहे

तुम्ही आता जरा विश्रांती च घ्या काही वर्षे Happy

आशूचॅंप ओके Happy
तुमच्याच विनंतीवरून आधी ते प्रायोरीटीवर लिहायला घेणार होतो.
आता नाही लिहीत Happy

किती भामटेगिरी कराल सर Happy
लिहा लिहा म्हणून मागे लागलो होतो तेव्हा माज करत होता
साधं उत्तर ही देत नव्हता, दुर्लक्ष करत राहिलात

आता लगेच आम्ही प्रयोरिटी झालो
आणि तुम्हाला काही बोललं की भक्त आरडाओरडा करतात, अडमीन पोस्ट उडवतात

खरोखरच मायबोली चे 'सर' आहात तुम्ही Happy

लिहितो असे म्हणालेलो सुरुवातीलाच. पण तुम्ही प्रत्येक धाग्यावर विनंती करत होता. प्रत्येक वेळी काय तेच उत्तर देणार. असो, आता काय करू? प्लीज फायनल सांगा.

नका लिहू, आणखी दोन चार वर्षे एक अक्षरही लिहू नका

गॅरंबी चा शरूख मस्त लिहीत आहेत, धमाल एकदम
ते जर तुमचेच आयडी नसतील तर त्यांना लिहू द्या, त्यांच्या लिखाणाचा आनंद घेऊ दे, मध्ये मध्ये येऊन विचका करू नका

ते काय जमणार नाहीच तुम्हाला
Happy

ओके आशूचॅंप
मी दोन चार म्हणजे सहा वर्षांनी तुम्हाला पुन्हा एकदा विचारेन की डोंगर जाळल्याचा किस्सा लिहायचा आहे की नाही.
तो पर्यंत माझे ईतर लिखाण चालू देतो Happy

या विषयावर
हे मा शे पो Happy

पॅ हे अक्षर प्या असे लिहीले तर जास्त भन्नाट होईल.

ऋन्मेष, लहानपणी कुंभ के मेले मे गेलेला का घरच्या सगळ्यांसोबत ? जुळा भाऊ असल्याचे घरच्यांनी कधी सांगितले असेलच.
नसेल तर विचारा.

@ धागा
भूत भास्कर मावळल्यावर रात्रीच का दिसते ? शिफ्ट्स वाटून घेतल्या असतील. घुबड रात्रीच का निघते ? वटवाघुळ दिवसभर टांगून का घेते ? तसा प्रोग्राम फिट केलाय.
हे सगळं विश्व दोघांनी बनवलेलं आहे. एक सॉफ्टवेअर इंजिनीयर आणि दुसरा हार्डवेअर इंजिनीयर. मेंदूतील विचार, वेळ, मन, भावना, झोप, फ्रेशनेस, जाणिवा, नेणिवा, हे सॉफ्टवेअर तर मेंदू, त्याचं खोकं, शरीर, जमीन, झाड, दगड, विटा, दिवस, रात्र हे हार्डवेअर आहे.

मला आलेले अनुभव इथे सांगितले तर चालेल का ?

पण आपल्यात जशी निशाचर माणसे असतात तशी दिवसचर भुतेही असतील की?
त्यांनाही डेडलाईन वगैरे काहीतरी असतं असेलच की
आणि मग कामाचे प्रेशर, पोरांच्या शाळेची फी, कामवाल्या मावशींचा पगार असलं काहीतरी असेलच की

भूत झाल्यानंतर रक्त गट जमा करावे लागतात. मग कुठलेही रक्तगट चालतात.
फक्त त्यांना ज्योतिषाकडे एक क्रॅश कोर्स करावा लागतो.
देव गण असलेल्या माणसाच्या वाटेला जायचे नाही. त्याला दिसायचे सुद्धा नाही.
राक्षस गण असलेल्या माणसाला दिसायचे, पण त्याला चावायचे नाही.
मनुष्य गण असलेल्यांना धरायचे, घुसळायचे, चावायचे, रक्त प्यायचे, झपाटायचे जे पाहीजे ते करायचे.

हे गण कोण ठरवतात
मला भुते जाणवतात पण दिसत नाहीत
सगळीच भुते त्रासदायक नसतात हे मी अनुभवावरून सांगू शकतो
आमच्याकडे होती काही पिल्लू भुते, खोड्या काढायची
मी झोपलो की पंखा बंद करायची, मी उठून परत लावला की परत बंद करायची
मग मी दम दिला म्हणलं आता परत बंद केलात तर बघा
मग पळून गेली, तशी ती गोंडस असावीत

आपण भुभु पाळतो तसे भूत पण येईल का पाळता?

आपण भुभु पाळतो तसे भूत पण येईल का पाळता? >>>> मनपात चौकशी करायला पाहीजे. कुत्र्याचा बिल्ला मिळतो त्या विभागात.

भूत रात्रीच का दिसते याहीपेक्षा मला सतावणारा प्रश्न म्हणजे ज्यांना भूत दिसते ते कमीतकमी आठवडा ते महिना तापानेच का फणफणलेले असतात? बाकी कोणतेच आजार का होत नाहीत त्यांना?

फार महत्वाच्या प्रश्नाला हात घातलाय तुम्ही. एक फार उपेक्षित विषय ऐरणीवरती आणलाय. माबोवरील अनुभवी , मान्यवर आयडीज उत्तर देतील अशी आशा आहे.
मला वाटते भूते रात्रीच दिसतात कारण भूते माणसांपेक्षा परवडली अशी मवाळ असतात. त्यांनाच माणसांची भीती असते. माणूस दिसला की त्यांचीच भंबेरी उडत असेल.

आताचीच घटना आणि केस माझ्यापुरती सॉल्व्ह!

नेहमी प्रमाणे पोराला सूसू शीशी उरकायला बाथरूममध्ये नेले.
त्याचे न्हाऊन धुवून झाल्यावर मी माझे हात डेटॉल हॅण्डवॉशने धुवत असताना तो नेहमीप्रमाणेच दरवाजा बंद करून बाहेर पळाला आणि लाईट बंद केली.
आता मी पुरुषासारखा पुरुष. मी कश्याला अंधाराला घाबरतो..
कदाचित बायकाही घाबरत नसतील. पण तसा एक वाक्यप्रचार आहे मराठीत म्हणून वापरला.
असो, पण तरी मला घाबरल्याचे नाटक करावे लागते. तेवढेच पोराचे समाधान. आणि न केल्यास हा आमचा खेळच बंद पडेल.
तर आज हे अंधारात घाबरल्याचे नाटक चालू असताना मला सहज हा धागा आठवला. मनात आले चला बघूया तरी अंधारात रोखून कुठे आणि कसे दिसते ते भूत.
असे म्हणून मी हात धुताधुताच अंधारातच बाथरूमच्या खिडकीकडे नजर टाकली तर नजरेसमोर काहीतरी सळसळताना दिसले.
छे, असे काही नसते. आपल्या मनात भूताचा विचार आहे म्हणून भास झाला म्हणत मी पुन्हा हात धुवू लागलो आणि मनावर ताबा ठेवत दोन क्षणांनी पुन्हा खिडकीवर नजर टाकली तर पुन्हा नजरेसमोर काहीतरी सळसळले. यावेळी निरखून बघितल्याने असेल पण ते जे काही होते ते अगदीच माझ्या जवळ असल्यासारखे वाटले. घाबरून मी हाडहूड करू लागलो तसे ते माझ्या चेहऱ्यावरच झेपावल्यासारखे वाटले. पाल झटकावी तसे मी ते झटकायचा प्रयत्न करत मोठमोठ्याने ओरडू लागलो.
हि ॲक्टींग नव्हती. हे घाबरणे खरेखुरे होते. त्यामुळे काहीतरी वेगळे वाटून मुलगा दरवाजा उघडून आत आला. त्यासोबत बाहेरच्या लाईटचा ऊजेडही आला. आणि मला जाणवले की ते सावलीसारखे काहीतरी सळसळत माझ्या अंगावर आलेले माझेच वाढलेले केस होते.
मॉरल ऑफ द स्टोरी - भूताचे भास होण्यासाठी जी भिती गरजेची असते ती रात्री मनात निर्माण होते. तसेच ओळखीच्या वस्तूही अनोळखी भासण्यासाठी रात्रीचे अंधुक वातावरण वा दिव्यांच्या पडलेल्या सावल्या ही पोषक स्थिती असते. त्यामुळे भूत रात्रीच दिसत असावे.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भिती हे दिवसातून दहा वेळा तरी बोलणारा आणि भूतांवरच काय तर देवावरही विश्वास न ठेवणारा मी जर असा घाबरत असेल तर जगात कोणीही घाबरू शकते.

प्याराझंपिंग करून भूत पकडायच्या व्यवसायात पडण्याचा मानस आहे. यात स्पर्धा किती आहे ? भांडवल किती लागेल ? रिस्क किती आहे ?

तर अजून उत्तर कुणी दिलं नाही. म्हणजे दिवसा भूत पाहिलेले नाहीत. किंवा आहेत पण मायबोलीवर नाहीत. असो.
त्यांना निशाचर बनवले असेल कदाचित.

लेख जमून गेलाय पण दुसरेच वाक्य.'माझा भूतांवर विश्वास नाही.' सांगून रहस्याचा मुडदा पाडलात लगेच.

भूतांवर माझाही विश्वास नाही. कलियुग आहे हे. सख्ख्या भावावर विश्वास ठेवता येत नाही तिथे भूतांवर कसा ठेवणार?

चांगल्या माणसाचे भूत हे चांगलेच असते का?
तसे असेल तर मग सरसकट सगळ्या भुतांना का घाबरावे
भुतणूकसी नावाची काही गोष्ट आहे का नाही

भुतणूकसी नावाची काही गोष्ट आहे का नाही>>>>>> Lol
मला मध्यंतरी रात्री लय म्हणजे लयच भिती वाटायची. पण श्री रामरक्षा संध्याकाळ ऐवजी मी झोपण्या आधी म्हणते. भूत असो वा नसो, माझ्या मनाला बरे वाटते हे महत्वाचे.

Pages