कोरियन आणि इतर वेबसिरीज

Submitted by जाई. on 23 January, 2022 - 11:52

सध्या कोरियन वेबसिरीज इन थिंग आहेत. वाहत्या बाफवर धनुडीने खालील यादी दिलेली ती इथे कॉपी पेस्ट करतेय.

१. What's wrong with secretary Kim
२. She was pretty
३. Fight for my way
४. Witches Love
५. Itaewon class
६. The Divine Fury
७. Beauty inside
८. Midnight runner
९. Hawarang - हे सगळे perk seo Joon चे
१०. Healer
११. Suspicious Partner
१२. The K2
१३. Love struck in the city - हे Ji chang Wook चे
१४. Crash landing on you
१५.Secret Garden
१६.Memories of Alhambra हे Hyun Bin चे
१७. Oh my Venus
१८.The master's Sun
१९. The secret Tarrius
२०. Be with you ( movie) -So Ji Sub चे
ह्या शिवाय बरेच बघितले ज्याची स्टार कास्ट माहिती नव्हती.
जसे
Reply 1988
My Mister
Misty
Hometown cha cha cha
Falling for Innocence
Missing 9
Her Private Life
Marriage contract
--------------------------------------------------------------------------

आरारांनी सायफाय सिनेमांची दिलेली यादी
१. बॅटल स्टार गॅलेक्टिका.
२. एजंट्स ऑफ शिल्ड.
३. स्टारगेट
४. जेसिका जोन्स
५. स्टार ट्रेक नेक्स्ट जेन.
६. स्टार वॉर्स, त्यातले सगळे व्हेरिएशन्स. उदा. मेंडलोरियन
७. वेस्ट वर्ल्ड
८. डॉक्टर हू. (शेवटचा सीझन भीषण बोगस अन बोअर आहे

तुम्ही पाहिलेल्या कोरियन सिरीज पण सांगा. हॅपी बिंजिंग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिक्रेट गार्डन पाहून झाली आणि आवडली.ह्युन बिन ने आत्मे बदलल्यावर केलेला अभिनय खतरनाक आहे.++++1111111
Especially ओस्का बरोबर वावरताना .... आणि त्याची ती एक पाय नाचवत लाजण्याची स्टाईल Lol

माझा नवरा mx player माय गर्लफ्रेंड एलियन बघतो सध्या. कसले कयूट कयूट आहेत यंगस्टर्स. टीनेजर्स वाटतात.

Extraordinary Attorney Woo पाहिली. मी पाहिलेली पहिलीच कोरियन सिरीज. छान वाटली. नंतर इथे वाचून Crash Landing On You पाहिली, किती मोठे मोठे एपिसोड असतात! बिंज करताना दमछाक झाली तरीही जबरदस्त नेटाने पूर्ण केली (इतकं डेडिकेशन कामात येतं तर काय सांगावं महाराजा! Proud ). आधी कोणीतरी म्हणलंय तसा फुल्ल बॉलिवुडी ड्रामा आहे. हिरोसाठी डोळ्यात भरपूर बदाम ☺️

My girlfriend is an alien season 2 येतोय १६ तारखेपासून. माझ्याकडे Wetv नावाचं app आहे त्यावर मी पहिला सिझन बघितला होता. दुसर्याची पण ad आली आहे तिथे. शाओची आणि फांग लेंगची जोडी १ नं. आहे.

Penthouse बघून संपवली. काय Bollywood dramma .

याचा हिन्दी रिमेक आला तर तो एकता कपूरनेच बनवावा.
प्रचंड श्रीमंत लोक, योगायोग, जुळी मुलं , विबासं , revenge , bzness tycoons , single mother , memory loss , मेलेली लोक जिवंत होऊन परत येणं , काय नाही ते विचारा.
ती गायिका म्हणून अभिज्ञा भावे ला घ्या किंवा मौनी राय.

ती हिरोईन आणि लोगन ली दोघेही डोळ्यात बदाम Happy
सीझन3 चा शेवटचा एपि बघून मी total emotional झाले. मस्त शैवट.

मला तरी चेस्टनट जाम आवडली बुवा !

नेट फ्लिक्सवर ची वॉन्टेड सिरीज पण संपवली , तीन सिरीज आहेत .
भ्रष्ट पोलीस अधिकारी , एकमेकींना न ओळखणाऱ्या दोन मध्यमवर्गीय नोकरदार निर्दोष महिला एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या मर्डर मध्ये अडकतात.

मग निर्दोषत्व सिद्ध करण्याची त्यांची धावपळ , त्या धावपळीमुळे आलेल्या निडरपणातून त्या पुढे काय काय करतात ते पाहण्याजोगे आहे .

बरं ही कथा ऑस्ट्रेलिया , इंग्लंड आणि न्यूझीलंड च्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर फुलवलेली , हा एक्सट्रा बोनस ....

चेस्टनट सारख्या डिटेक्टिव सिरीज असतील तर सजेस्ट करा ना ! डब असेल तर अजून बर पडते Happy

कोणाला सिक्रेट गार्डन बघायची तर नेटफ्लिक्सवर लवकर बघून घ्या १४ ऑक्टोबर पर्यंत च नेफ्ली वर आहे असं आलं होतं.. माझी लाडकी सिरीयल आहे, मी ३ ऱ्यां दा कि ४थ्यां दा बघत असेन. मला ह्यूनबिन खुप आवडतो.

हो गं धनुडी
खूप क्युट आहे ती सिरीयल
मी पण 2 दा पाहिली.फुल्ल टाईमपास आहे.
सध्या मेमरीज ऑफ आलहांब्रा पळवत पळवत दुसऱ्या वेळा चालू आहे.अतिशय सुपिरियर म्युझिक.

अ‍ॅ टर्नी वू मी पण पाहिली मी पण फॅन् क्लबात. ती पोरगी गोडच आहे. एक सीरीअल ज्यात मुलगी बॉसच्या प्रेमात पडते. शोधून नाव लिहिते. सध्या पूरक म्हणून स्ट्रे किड्स नावाचा मुलांचा बँड आहे त्यांचे व्हिडीओ सुद्धा बघते क्युट पोरे आहेत. चांगबिन, बांग चान ह ह्युन जिन ली नो फेलिक्स लक्षात आहेत. टोटल ८ मुले.

तसाच एक ट्वाइस नावाचा मुलींचा गृप आहे.

ह्या सर्वांचे कपडे मेकप स्टायलिन्ग दागिने एकदम चोक्कस बुटीफुल. के पॉपचा वेगळा धागा काढता तर काढा. तिथे लिहिते. लव्ह युअर किमची.

My girlfriend is an alien season 2 >>>>>>>यूट्यूबवर आले आहेत त्याचे भाग इंग्लिश सबटायटल आहेत

Penthouse बघून संपवली. काय Bollywood dramma . >>>>>>> अगदी अगदी.

याचा हिन्दी रिमेक आला तर तो एकता कपूरनेच बनवावा. >>>>> माझ्याही मनात हेच आल होत. नायिकेच्या भुमिकेत साक्षी तन्वर किव्वा भाग्यश्री

दुसर्या नायिकेच्या भुमिकेत मोना सिन्ग

ती हिरोईन आणि लोगन ली दोघेही डोळ्यात बदाम >>>>>> ++++++१११११११११

लोगन ली पहिल्यान्दा पेण्टहाऊस मध्ये फायटिन्ग करुन एण्ट्री घेतो तो सीन तर अहाहा!

स्पॉईलर अ‍ॅलर्ट:

गायिकेला शेवटी मिळालेली शिक्षा आवडली. करावे तसे भरावे असा होता. तिला स्वरयन्त्राचा आजार होता. त्यात तिचा आवाज जातो

१०० days my prince फार पूर्वी पाहायला सुरवात केलेली. पण मध्येच सोडून दिली होती. मग काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स परत परत रेकमेंड करत होते. मग पाहायला सुरवात केली आणि संपवली. ठीकठाक आहे पण हिरो काही फारसा आवडला नाही. मख्ख वाटला. ह्यात मिडटाउन चा चा चा चा हिरो साईड हिरोच्या भूमिकेत आहे. कोरियन लोकांचा पुर्वीच्या राजांचा काळातले जीवन, त्यांचे पोशाख बघायला फार मजा येते. त्यातील पुरुष जे हेअरबँडसारखे काहीतरी बांधतात ते झोपताना पण काढत नाहीत.

अमेझॉन प्राईम सर्च अति महान आहे.मी सॉंग ह्ये क्यो सर्च दिल्यावर यंग शेल्डन चे 5 सिझन आले फक्त रिझल्ट मध्ये.यंग शेल्डन सर्च मध्ये दिल्यास सॉंग ह्ये क्यो ची नवी सूडमालिका येईल का? Happy

नेटफ्लिक्स वर crash course इन romance नावाची सिरीज सुरु झाली आहे. दर आठवड्यात दोन दोन एपिसोड येत आहेत. आतापर्यंत ४ आलेत. हिरो-हिरोईन मिडल एजचे आहेत. हिरो गणिताचे क्लासेस घेणारा स्टार टीचर आहे आणि हिरोइनचे रेस्टॉरंट आहे. कोरियन लोकांच्यातपण आपल्यासारखेच उच्च शिक्षणासाठी मुलांवर जे प्रेशर टाकले जाते त्याचे पण चित्रण आहे.
मला तर आतापर्यंत आवडली. नक्की पाहण्यासारखी आहे.

Pages