मी कुठे निघालो आहे?

Submitted by _आदित्य_ on 10 January, 2022 - 14:34

मज काही उमगत नाही..
शून्यातच भरते जत्रा !
त्या रंग, सूर, शब्दांच्या
तिमिरात पुसटती मात्रा !

लय अग्रगण्य तत्वाची,
स्तवनात वाहते सरिता..
एकाग्रपणातून उमले
कैवल्यऋतूंची कविता !

हुंदक्यात जन्मा यावी
ऐश्वर्यफुलांची गाणी !
दरवळेल चोहीकडे मग..
प्राणातील अत्तरदाणी !

भरकटून जीवनवारा
कोणत्या दिशेला वाहे?
टाकून मनाला मागे,
मी कुठे निघालो आहे?

..............

Group content visibility: 
Use group defaults