Submitted by _आदित्य_ on 10 January, 2022 - 14:34
मज काही उमगत नाही..
शून्यातच भरते जत्रा !
त्या रंग, सूर, शब्दांच्या
तिमिरात पुसटती मात्रा !
लय अग्रगण्य तत्वाची,
स्तवनात वाहते सरिता..
एकाग्रपणातून उमले
कैवल्यऋतूंची कविता !
हुंदक्यात जन्मा यावी
ऐश्वर्यफुलांची गाणी !
दरवळेल चोहीकडे मग..
प्राणातील अत्तरदाणी !
भरकटून जीवनवारा
कोणत्या दिशेला वाहे?
टाकून मनाला मागे,
मी कुठे निघालो आहे?
..............
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नेहमीप्रमाणे छान कविता...!
नेहमीप्रमाणे छान कविता...!
धन्यवाद... @रुपाली विशे -
धन्यवाद... @रुपाली विशे - पाटील !!
छान!
छान!
धन्यवाद.. @भरत. !
धन्यवाद.. @भरत. !
तुमच्या सगळ्या कविता
तुमच्या सगळ्या कविता आध्यात्मिक असतात, आवडतात.
धन्यवाद @अस्मिता. !
धन्यवाद @अस्मिता. !
छान कविता!
छान कविता!
धन्यवाद.. @हरचंद पालव !
धन्यवाद.. @हरचंद पालव !