राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहे, याने आयुष्यात फरक पडतो का?

Submitted by उपाशी बोका on 8 January, 2022 - 18:27

दुसऱ्या एका धाग्यावर बघितलेली वादावादी चर्चा बघून मी मत मांडले होते की राजकारणावरून लोकं तावातावाने आपले रक्त का आटवतात, हे मला कधीच कळलं नाही. राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहे, त्यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात फार काही फरक पडतो का कधी? माझ्या मते तरी विशेष असा नाही. (मग तो मोदी असो किंवा बायडेन असो किंवा राहुल गांधी असो किंवा ट्रम्प असो).

म्हणजे होत काय की तुम्ही मतदान केलं की तुमचं काम झालं. मग पुढे लोकशाही मार्गाने राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान निवडला जातो. मग जो/जी कुणी आहे त्याला/तिला अधिकार मिळतो. जर ती व्यक्ती नाही आवडली तर पुढील मतदान करताना दुसऱ्या कुणाला मत द्यावे. सरकारपर्यंत मत पोचवणे वेगळे, पण आपापसात वाद घातल्याने, वेळ वाया जाण्याव्यतिरिक्त काय निष्पन्न होते? जर तुमच्या कंपनीचा सी.इ.ओ. बदलला तर तुमच्या आयुष्यात फार प्रचंड बदल होतो का? कंपनीने अजून कर्ज घेतले काय, वेगळा धंदा सुरू केला काय, H1B जास्त बोलावले काय, काम ऑफशोर पाठवले काय, ट्रान्सजेंडरना भरती केले काय? तुम्हाला काही पर्याय आहे का? तुम्हाला जर पगार वेळेवर मिळत असेल, सुट्ट्या कमी केल्या नाहीत आणि ड्रेसकोड पण बदलला नाही तर व्यक्तिशः तुम्हाला फार काही फरक पडेल काय? जुना सी.इ.ओ. किती फालतू होता, नवीन कसा चांगला आहे, अथवा नवा कसा मूर्ख आहे आणि तो अमूक तमूक का करत नाही, अशी चर्चा तुम्ही ऑफिसमध्ये दिवसेंदिवस करता का? तुम्हाला काय वाटते?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चर्चा होताना, 'कदाचित माझी मते चुकीचीही असतील ती मला या चर्चेतून बदलता येतील. ती बदलण्यासाठी मी माझ्या मनाची तयारी ठेवली पाहिजे.' हा भावही चर्चा कर्त्यांच्या मनी हवा. समोरच्याचे एखादे मत आपल्याला पटत नसेल, तर रागावून, त्याची खिल्ली उडवून ते खोडून काढण्यापेक्षा, शांतपणे आपली असहमती दर्शवून, अधिकृत माहितीचे स्त्रोत दाखवून, आणि शक्य असेल तर पुराव्यांनिशी त्याला समजावता आले पाहिजे. किंवा जर आपण चुकीचे असू तर ते स्वीकारून, आपली मते बदलली पाहिजेत. नको तिथे माझेच म्हणणे बरोबर म्हणून, आपलेच घोडे दामटणे अशा चर्चेसाठी अयोग्य असते. >>>>सहमत . इन जनरल पण लागू पडते .

मा अ‍ॅडमिन, आपण प्रतिसाद उडवलेत हे योग्यच केले. मात्र या आयडीने पहिल्या पानावर शेवटचा प्रतिसाद दिलेला आहे त्याची शहानिशा व्हावी म्हणून जिथे हे उल्लेख आहेत त्या धाग्याची लिंक दिली होती. ती असू द्यावीत.
https://www.maayboli.com/node/85297

माझी देखील यासाठी काहीही हरकत नाहीये. मा. रगू काका आता तरी काहीतरी शिकतील आणि आपल्या वयाला साजेशा टिप्पण्या करतील अशी भाबडी आशा मी व्यक्त करतो.

Lol
फारच हसवता हो तुम्ही.
कुणीतरी गेल्या जन्मात दुखावलेला आयडी डूख धरून आलेला आहे हे समजायला मायबोलीचा जास्त अभ्यास लागत नाही. हा आयडी फक्त माझ्याच बाबतीत कुत्र्यासारखा वस्सकन अंगावर येतो आणि अन्य कुणी यांचे दोन दोन रूप आहेत म्हटले तरी शेपूट घालून बसतो हे मनोरंजन फुकटात मिळतंय हेच खूप आहे. Proud

धन्यवाद रगू काका. मला वाटलं तुम्ही फक्त माझ्यावरच भूंकता पण जेव्हा तुमचे मायबोलीवरील प्रताप पाहिले, तेव्हा कळलं की तुम्ही तर प्रत्येकावरच विनाकारण भूंकत असता. (अर्धी गेलीत तरी छंदिष्ट आहात बरं..!). कोणी लक्ष देत नाही काही नाही तरी उगीच गुर्गुरायचं आणि कोणी पेकाटात लाथ घातली की स्वतः ॲडमिन साहेबांपाशी जाऊन तक्रार करायची (तिथे सगळ्यात जास्त तक्रारी करणारे तुम्हीच आहात हे पाहून गहिवरून आलं.) अनेकांनी आजवर तुम्हाला शाल जोडे दिलेत तर, काहींनी नुसतेच जोडे दिलेत. तुमची ही गाथा वाचून डोळ्यांतून आपोआप धबधबे वाहू लागले, मनात विचार आला, का आपण या माणसाशी(?) भांडण्यात वेळ वाया घालवला? इतके रिकामटेकडे झालो का आपण? असो. Lol Lol Lol Lol
तुम्हाला ठिकठिकाणाहून जोडे फुकट मिळतातच आज मनोरंजन पण मिळाले हे वाचून आनंद झाला (कधीतरी लाज, शरम ही मिळू दे ही प्रार्थना). तुम्हाला असेच मिळत राहोत. (जोडे नव्हेत मनोरंजन.) आता एडमिन साहेबांपाशी जाऊन केकटू नका (त्यांच्याकडून ना जोडे मिळतील ना मनोरंजन.) असो हा प्रतिसादही कदाचित काढून टाकण्यात येईल त्या आधी आपण हा प्रतिसाद आणि आपली पात्रता पाहून घ्यावी ही विनंती. तुमच्याशी भांडण्यात आतापर्यंत जेवढा वेळ फुकट गेला तेवढा पुरे. आता माझ्याकडून आणखी जोड्यांची...माफ करा, प्रतिसादांची अपेक्षा करू नये. धन्यवाद.
ता. क.
हल्ली श्वान पथकवालेसुद्धा जोमात आलेत, जपून राहा. लोभ नसावाच, नाहीतर...
Lol Lol Lol Lol

अरेच्चा , कुणी कुणी शालजोडीतले आणि जोडे हाणलेत ते शोधावं म्हणून "केकटू नका" हे सर्च मधे टाकलं आणि काय आश्चर्य Proud

सगळे वस्सकन अंगावर येणारे आक्रस्ताळे, भांडखोर, शिवीगाळी करणारे आयडी समोर हजर. यातला एक कसला कसला आढावा घेतो आणि कुणी काही टोकलं कि पिसाळल्यागत चावे घेत सुटतो. विशेष म्हणजे त्या आयडीचं आणखी एका विदेशी आयडीशी जमतं.. कसं कोण जाणे Proud
चला.शुभरात्री.
फुकट असलं तरी टाकाऊ मनोरंजन बास.

राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान कोण आहे यामुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात काही काळ तरी काही फरक पडत नाही. कदाचित दीर्घकाळानंतर त्याचे परिणाम दिसत असतील, किंवा कदाचित त्याचे काहीच परिणाम होणारही नाहीत.

सामान्य माणसासाठी इंधन, कर, संधींची उपलब्धता, समाजातील एकूण स्वीकारार्हता, महागाई, बेकारी वगैरे बाबी बहुधा तश्याच राहिलेल्या असाव्यात आजवर.

लोकशाहीत ज्याला पवित्र कर्तव्य व हक्क मानले गेले आहे ते मतदान म्हणजे खरे तर विनोद आहे व हे तुम्ही तुमच्या धाग्यात योग्य रीतीने नोंदवलेही आहेत. कधीतरी एकदा मतदान करायचे आणि मग सुकाळ येईल की नाही याकडे डोळे लावून बसायचे यापलीकडे सामान्य माणसाच्या हातात काही नाही.

(एक फार मोठा फायदा मात्र आहे या इथल्या लोकशाहीचा, की येथे लोकशाही फारच वारेमाप आहे. मात्र हे विधान करणे म्हणजे 'याला हुकूमशाही अपेक्षित आहे' असा आरोप करवून घेणे आहे. बहुधा जगात असेही काही देश आहेत की जेथे लोकशाही आहे पण कायद्याची अंमलबजावणी चोख आहे. सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगताना इथल्याइतक्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. )

तर मग इथे तावातावाने चर्चा का होते?

■ स्कोअर सेटलींग, पांडित्य प्रदर्शन, भडास काढता येण्यास मुभा, घालवून दिल्यावरही इतर आय पी ने येण्याची परवानगी मिळणे सोपे असते याची रास्त जाणीव!

■ 'यांच्याकडे मुबलक वेळ आहे' असे कोणालाही वाटू नये म्हणून! (जो खरे तर असतो, पण तो नसल्यासारखे प्रतिसाद द्यायचे असतात). (मधेच एकदोनदा 'आता मी उद्या हा धागा बघू शकेन' वगैरे म्हंटले की झाले)

वर्षानुवर्षे येथे ज्या भल्या-बुऱ्या बाबींवर सातत्याने टोमणे मारणे, अक्कल काढणे, निषेध करणे, तक्रारी करणे सुरू आहे त्यातील जवळपास कुठल्याच बाबीसाठी लोक स्वतः धावून जाऊन मदत करण्याची उदाहरणे वाचली नाहीत. ते अशक्य असते हे माहीत आहे, पण मग ते सगळ्यांनाच अवघड असते याची जाणीव असल्याचे दिसत नाही. (अर्थात, काही उत्तम सामाजिक उपक्रम होतात व त्या उपक्रमांना वंदन करतो)

जोस्लिन नुनगॅरे, लेकन रायली, रुबी गार्सिया, केला हॅमिल्टन, रेचल मॉरिन
ही नावे काही मुलींची किंवा स्त्रियांची आहेत ज्या अमेरिकेत बेकायदेशीररित्या घुसलेल्या घुसखोर गुन्हेगारांकडून ठार मारल्या गेल्या.
ठार मारणारे आरोपी बलात्कारी होते किंवा त्या स्त्रीकडे काहीतर वस्तू, कार असे होते जे लुटण्यसाठी त्या व्यक्तीला ठार मारले गेले. ह्यातील बहुतेकांचे आयुष्य सुरु होत होते, कित्येक जणी आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत असतील, कित्येक आपल्या मुलाबाळांसाठी गोष्टी ठरवत असतील. सगळे अकाली नष्ट झाले.

जो बायडन २०२१ जानेवारीत सत्तेवर आला तेव्हापासून त्याने अमेरिकेची दक्षिण सीमा पूर्ण उघडी केली आहे. कुणीही अमेरिकेत घुसावे, विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने, सरकारी मदतीने अमेरिकेत हवे त्या शहरात बसने, विमानाने, गाडीने जावे आणि तिथे मस्त खावे प्यावे आणि आनंदी जीवन व्यतित करावे असा अनेकांचा जीवनक्रम ह्या बिनडोक राष्ट्रपतीच्या धोरणामुळे झालेला आहे. जवळपास एक दीड कोटी लोक अशा प्रकारे अमेरिकेत घुसले आहेत. बहुतेक लोक निरक्षर किंवा अर्ध साक्षर आहेत. अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक जण रिकामटेकडे असतात त्यामुळे गुन्ह्याकडे वळतात.
वर उल्लेखलेल्या स्त्रिया, त्यांचे जवळचे नातेवाईक, नवरा, आईबाप, काका, मामा, आत्या, मुलेबाळे, बॉयफ्रेंड ह्या सगळ्यांचे जीवन ह्या बेकायदा घुसखोर लोकांनी केलेल्या हत्येमुळे कमीअधिक प्रमाणात उध्वस्त झाले आहे. आणि ह्याला जबाबदार नराधम जो बायडन. अट्टाहासाने त्याने कोट्यावधी बेकायदा लोकांना बिनबोभाट अमेरिकेत कुठल्याही तपासणी शिवाय घुसता यावे ह्याची तरतूद केली. केवळ ट्रंपने सीमेवर भिंत उभारायचा मनोदय व्यक्त केला म्हणून ह्या नीच माणसाने त्याचे विरुद्ध टोक गाठले.
हा इसम अध्यक्षपदी नसता तर इतकी बेबंद, बेलगाम घुसखोरी कदाचित झाली नसती आणि ह्या दुर्भागी स्त्रियांपैकी अनेक जिवंत राहू शकल्या असत्या. त्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून कायमचे दुरावले नसते.
हे एक उदाहरण आहे जिथे अध्यक्षपदी कोण आहे ह्याचा थेट परिणाम लोकांवर होतो.
ह्या स्त्रियांच्या जागी कुणाचीही मुलगी, बायको, प्रेयसी, बहिण असू शकली असती. ह्या स्त्रियांपैकी कुणी जाणूनबुजून बेकायदा घुसखोर लोकांशी मैत्री वा संगत केलेली नव्हती.
अजूनही अनेक उदाहरणे आहेत जिथे अध्यक्षीय धोरणामुळे असंख्य लोकांच्या भविष्याचे पार वाटोळे होऊन गेले.

३३ कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेत गंभिर गुन्ह्यांचे ( बलात्कार, खून) एकंदर प्रमाण किती आहे आणि त्यापैकी किती गुन्हे स्थलांतरितांनी केले आहेत आणि किती बिगर स्थलांतरितांनी केले आहे हा संशोधनाचा विषय आहे.

अमेरिकेत स्थलांतरित लोकांचा, बेकायदा घुसखोरांचा आणि गुन्हेगारीचा संबंध आहे याला कुठलाही सबळ पुरावा नाही. वरकरणी चार - दोन उदाहरणांवरुन असे वाटत असले तरी तसा संबंध नाही आहे असेच आकडेवारी सांगते.

१९८० - २०१६ या काळांत, अमेरिकेत स्थलांतरितांची लोकसंख्या ११८ % वाढली आहे आणि हिंसक गुन्हेगारीचे प्रमाण ३६ % नी कमी झाले आहे.
https://www.nytimes.com/interactive/2018/03/30/upshot/crime-immigration-...

FBI च्या संकेत स्थळावर गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याची आकडेवारी आहे ( १९९९ - २०१८ या काळासाठी). बलात्कारांचे प्रमाण वाढले आहे असे या आकडेवारीत दिसत आहे पण याला सरसकट स्थलांतरित लोकच जबाबदार आहेत असे म्हणता येण्यासारखा पुरावा नाही. ट्रम्प हा स्थलांतरित नाही आहे तरी त्याला हश मनी द्यावा लागला होता. किती लोकांचे तोंडे बंद केली होती हे त्या मायकेल कोवेनलाच माहिती.
https://ucr.fbi.gov/crime-in-the-u.s/2018/crime-in-the-u.s.-2018/tables/...

लॉन्ग आयलंडमध्ये हे निर्वासित वाटणारे लोक कधी नव्हे ते दिसू लागलेले आहेत. स्पॅनिश, कफल्लक आणि तरीही आनंदी अशी ही जमात दिसते.

>>राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहे, याने आयुष्यात फरक पडतो का?<<
उबो यांना हा प्रश्न पडला, हे वाचुन मी आश्चर्यचकित झालो आहे; कदाचित र्हिटॉरिकल प्रश्न असेल..

या प्रश्नाचं उत्तर वेन्झुएला, ग्रीस किंवा इझ्रेल, सिंगापोर, अमेरिका या देशाचे नागरिक संदर्भासहित देउ शकतील. कुठल्यहि देशाच्या जडण-घडणीत, उज्ज्वल भवितव्यात त्या देशाच्या नेत्रुत्वाचा सिंहाचा वाटा असतो. एब लिंकन सारखा नेता देशाची फाळणी टाळताना बळी पडतो, तर दुसरीकडे साधारण १०० वर्षांनी देशाची फाळणी केली म्हणुन गांधीजींची हत्या केली जाते. या दोन्हि घटनांचा इंपॅक्ट देशाच्या नागरिकांवर कसा झाला, याचा इतिहास साक्षिदार आहे...

इमिग्रेशनच्या बाबतीत डेम्स ने नॅरेटिव्ह त्यांच्यातील वोक लोकांनी काबीज केले आहे हे खरे आहे. इल्लिगली अमेरिकेत शिरणार्‍या लोकांना नक्की काय म्हणायचे याबद्दलच्या शाब्दिक कसरती हे लोक करत असतात. पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे यातील एका खुन्याला सुद्धा "इल्लिगल" म्हणायला यांची जीभ कचरते. खुद्द बायडेनला आधी त्या खुन्याला इल्लिगल म्हंटल्याचा खुलासा द्यावा लागला होता म्हणजे वोक कल्चर किती प्रभावी आहे हे कळते. बायडेन जनरली त्या लोकांबद्दल बोलत नव्हता. तो स्पेसिफिकली त्या खुन्याबद्दल बोलत होता. इथे विक्टिम राहिली बाजूला आणि खुन्याला इल्लिगल म्हणायला नको होते वगैरे शाब्दिक कसरतींवर यांचा फोकस होता. प्रेसिडेण्टच्या जाहीर बोलण्यातले फुटेज खाण्याइतके त्याला महत्त्व दिले या लोकांनी.

बायडेन स्वतः मध्यममार्गी आहे. त्याने कोठे काय बोलावे हे ठरवणारे वेगळे असतात. तरीही त्याने हे नाकारायला हवे होते.

इथे आहे. अगदी त्याला हा खुलासा करू द्यायला प्लाण्ट केल्यासारखा प्रश्न आहे. त्या एकूण घटनेत याचे किती महत्त्व असायला पाहिजे? तो येणार्‍या सर्व लोकांना म्हंटला असता तर हा खुलासा ठीक होता. इथे तो खुन्याबद्दल बोलतोय.
https://www.youtube.com/watch?v=VqB3QEwGl0I

ट्रम्पला वेगळा प्रचार करायची गरज नाही. ही क्लिप पुरेशी आहे.

हे झाले नॅरेटिव्ह बद्दल. पण फॉक्सची कोल्हेकुई कितपत खरी आहे याचा शोध घ्यायचा बराच प्रयत्न केला. फॉक्स काही सांगत आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवावा असे अजिबात नाही. डॉमिनियनला द्यावे लागलेले सातशे मिलियन त्यांची फेकाफेक थांबवायला पुरेसे दिसत नाहीत.

प्रत्यक्षात ट्रम्प व बायडेन ने नक्की काय वेगळे केले आहे? याचे चपखल उत्तर डेम्सच्या बाजूने कोठे दिसले नाही. पण कोव्हिडच्या काळात ट्रम्पने टायटल-४२ आणले होते. त्यातून अशा घुसणार्‍या लोकांना लगेच परतवून लावता येत होते. पण जाने २०१७ ते मार्च २०२० या काळात नक्की काय केले होते माहीत नाही.

ते टायटल-४२ बायडेन आल्यानंतरही बराच काळ लागू होते. आधी बायडेनने ते तसेच ठेवले होते. नंतर बायडेनने काढायचा प्रयत्न केल्यावरही कोर्टाने काढू दिले नव्हते. ते २०२३ मधे कधीतरी काढले गेले. इव्हन जाने २०२१ नंतर सुमारे वीस लाख लोक यातून परत पाठवले गेले होते.

तेव्हा टायटल-४२ लागू असताना ट्रम्प असो वा बायडेन, फार फरक पडलेला दिसत नाही. त्याआधी आणि नंतर - म्हणजे जानेवारी २०१७ ते मार्च २०२० या ट्रम्पच्या काळात, व मे २०२३ ते आत्तापर्यंत बायडेनच्या काळात - या दोन्हीमधे नक्की काय फरक आहे? नक्की माहीत नाही. ट्रम्पने ज्यांची मुले इथे आहेत त्या पालकांनाही हाकलले होते - त्यावर बरीच टीका झाली होती हे लक्षात आहे. बायडेनने ते बदलले. ज्यांची क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत त्यांना परत पाठवण्याबद्दलही काही नियम आणले आहेत. तेव्हा सीमा खुल्या केल्या म्हणजे नक्की काय केले हे समजले नाही. हे आकडे विविध ठिकाणी वाचून सापडले आहेत.

बाकी आत्ता २-३ महिन्यांपूर्वी बायडेनने आणलेले बिल ट्रम्पच्या इशार्‍यावरून रिपब्लिकन्सनी रोखले. तेव्हा त्यांना किती काळजी आहे ते ही उघड आहे. बिल मधे इतर काहीतरी मान्य न होणासारखे होते वगैरे सगळे नंतर निघाले. यांनी जेव्हा रोखले होते तेव्हा त्यांना काहीही माहिती नव्हती. ट्रम्प म्हंटला होता, तेवढे त्यांना पुरेसे होते.

यात मला ट्रम्पची बाजू घेण्यात इंटरेस्ट नाही, आणि बायडेनचीही. गुन्हेगार इथे येऊ शकणार नाहीत पण गुन्हेगारांपासून वाचू पाहणारी, नवीन संधीच्या शोधात इथे येऊ पाहणारी व इथल्याच शेती वगैरेच्या कामाकरता इथे आणली गेलेली कुटुंबे - या लोकांना काही मार्ग खुला असावा. इतके करणारा जो कोण असेल त्याला आपले मत.
(तो जो कोण मधला जो मराठी अर्थाने आहे Happy )

>>
३३ कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेत गंभिर गुन्ह्यांचे ( बलात्कार, खून) एकंदर प्रमाण किती आहे आणि त्यापैकी किती गुन्हे स्थलांतरितांनी केले आहेत आणि किती बिगर स्थलांतरितांनी केले आहे हा संशोधनाचा विषय आहे.
<<
ज्या बेकायदा घुसखोरांचे अमेरिकेतील अस्तिवच एका गुन्ह्याने सुरु होते त्यांची आणखी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून नागरिकांशी तुलना का करावीशी हाही एक संशोधनाचा विषय आहे!
जर जगातील अब्जावधी लोकांनी हव्या त्या मार्गाने अमेरिकेत घुसावे, स्थायिक व्हावे आणि अमेरिकेची भरभराटच भरभराट होऊ द्यावी असा उदात्त विचार असेल तर सगळे इमिग्रेशन कायदे संवैधानिक मार्गाने रद्द करावे. कायदे शाबूत ठेवून ते न पाळणे हा निर्लज्जपणा आहे. आणि त्याचे समर्थन करणारे आणखीच बेशरम आहेत.

हे लोक मुख्यतः अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतात. ब्रेन सर्जन, नॅनो टेक्नोलॉजी तज्ञ, हार्ट सर्जन, ए आय तज्ञ असे लोक कायोटी मंडळीना पैसे चारून अनेक मैलाची पायपीट करून अमेरिकेत घुसत नाहीत.

बेकायदा घुसखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात नाही. त्यांचे ठसे आणि अन्य बायोमेट्रिक माहिती अमेरिकन पोलिस आणि एफ बी आयकडे नसते. त्यामुळे अनेकदा त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा तपासच होत नाही.
अनेक शहरात किरकोळ गुन्ह्यांना शिक्षाच द्यायची नाही असे ठरवले असल्यामुळे असले घुसखोर बारिकसारिक गुन्हे करत करत बलात्कार आणि खून यापर्यंत पोचतात.

अमेरिकेत पुरेशी गुन्हेगारी असताना बाहेरून बेकायदा घुसखोर आणून गुन्हेगारी का वाढवायची?

ज्या व्यक्तीने देशात शिरताना देशाच्या एका मूलभूत कायद्याचा भंग केला आहे आणि त्याबदल्यात त्यांना भरपूर सवलती आणि सोयी देण्यात आल्या आहेत असे लोक त्या देशाच्या बाकी कायद्यांची पर्वा करतील का? वाटत नाही.

<< अमेरिकेत पुरेशी गुन्हेगारी असताना बाहेरून बेकायदा घुसखोर आणून गुन्हेगारी का वाढवायची? >>

------- बाहेरुन आलेल्या घुसखोरांमुळेच हिंसक गुन्हेगारीची टक्केवारी कमी होताना दिसत आहे आणि आकडेवारी बोलकी आहे.
१९८० - २०१६ या काळांत, अमेरिकेत स्थलांतरितांची लोकसंख्या ११८ % वाढली आहे आणि हिंसक गुन्हेगारीचे प्रमाण ३६ % नी कमी झाले आहे.

राष्ट्राध्यक्ष/ पंतप्रधान अतिशय चांगला व कर्तबगार असेल किंवा अतिशय जहाल व आततायी असेल तर आपल्या आयुष्यात खूप बरा/ वाईट फरक पडू शकतो; अन्यथा, फारसा नाहीं.

>>>>>बाहेरुन आलेल्या घुसखोरांमुळेच हिंसक गुन्हेगारीची टक्केवारी कमी होताना दिसत आहे
???
कोरिलेशन इज नॉट कॉझेशन.
घुसखोरांमुळे हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण कसे काय कमी होइल?

<< >>>>>बाहेरुन आलेल्या घुसखोरांमुळेच हिंसक गुन्हेगारीची टक्केवारी कमी होताना दिसत आहे
???
कोरिलेशन इज नॉट कॉझेशन.
घुसखोरांमुळे हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण कसे काय कमी होइल? >>

----- सामो - अमेरिकन लोकांत असलेल्या गुन्हेगारीची टक्केवारी "घटक#अ" हा अगोदर पासूनच अस्तित्वात आहे. आता त्यामधे घुसखोर लोकांत असलेल्या गुन्हेगारीची टक्केवारी " घटक#ब " ची भर पडत आहे. बाहेरुन आलेल्या स्थलांतरीत लोकांची टक्केवारी वाढत आहे, पण एकूण गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत आहे.

हिंसक गुन्ह्यांची टक्केवारी कमी झालेली आहे हे १९८० ते २०१६ या काळांतल्या आकडेवारीवरुन दिसते.
https://www.nytimes.com/interactive/2018/03/30/upshot/crime-immigration-...

या आर्टिकल मधे थोडे पुढे गेल्यावर, वाढणारी स्थलांतरित लोकसंख्या आणि घटणारी हिंसक गुन्हेगारीचे दर यांचे शहरानुसार आलेख दिसतात. आलेखांवरुन, हिंसक गुन्हेगारीची टक्केवारी कमी होतांना दिसत आहे.

FBI च्या संकेत स्थळावर पण हिंसक गुन्ह्यांची आकडेवारी रोडावलेली दिसत आहे. लिंक वर दिलेली आहे.

घुसखोर, स्थलांतरित बाहेरुन अमेरिकेत आलेल्या लोकांमुळे (च) गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे या प्रचारांत फोलपणा आहे. अमेरिकनांच्या तुलनेत कमी पैशांत, जास्त कष्टाची कामे करुन अमेरिकन अर्थव्यावस्थेला हातभार लावतात - अमेरिकेचे भविष्य आहे. Happy

मी हा धागा वर काढला कारण राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहे, त्यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात फार काही फरक पडतो का कधी? माझ्या मते तरी विशेष असा नाही. (मग तो मोदी असो किंवा बायडेन असो किंवा राहुल गांधी असो किंवा ट्रम्प असो). असे लिहिणार्‍या उपाशी बोका यांनी अमेरिकन राष्ट्रा ध्यक्षांच्या आताच्या निवडणुकीबद्दल धागा काढला आहे.
तो त्यांचे मतपरिवर्तन झाले म्हणून की मनोरंजनाची सोय म्हणून?

फरक तर पडतोच.
हुकुमशाही असेल तर फरक चटकन जाणवतो..
लोकशाहीत फरक जाणवायला कित्येक वर्षे जावी लागतात..

जर मी ३% ऑर्गेनाइज्ड सेक्टर मधे असेन तर राजकीय घडामोडींचा माझ्यावर फारसा परिणाम होणार नाही. ३% ही आकडेवारी जुनी आहे, त्यानंतर ती कमी झाली आहे कि वाढली आहे याचे अपडेट्स माझ्याकडे नाहीत. पण जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम होऊन या संघटीत क्षेत्रातल्या विशिष्ट सेक्टर वर परिणाम होऊन माझी नोकरी गेली आणि मी सरकारवर अवलंबून राहू लागलो कि सरकार कुणाचे आहे याने मला फरक पडू लागतो.

जागतिकीकरणाने मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर परिणाम झाला आहे. पूर्वी जी कामे भारतात दिली जायची ती आता जागतिक निविदेमुळे फिलिपिन्स, इंडोनेशिया या देशात जातात. मॅन्युफॅक्चरिंग मधे लेबर कॉस्ट ने खूप फरक पडतो. फिलिपिन्स मधे स्वस्त लेबर आहे. गुजरातच्या अनेक उद्योगांनी या पूर्व आशियायी आणि आफ्रिकन देशातून काम करण्याला प्राधान्य दिलेले आहे. या खेरीज चीन मधेही त्यांचे युनिट्स आहेत.

जागतिकीकरणाची सुरूवात काँग्रेसने केली. त्याचे हे परिणाम आहेत. या धोरणांचा सर्वात जास्त फायदा नरेंद्र मोदींनी उचलला. याचा फायदा गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना झाला. गुजरातच्या व्यापार्‍यांना लेबर लॉज क्लिष्ट वाटत होते. मोदींनी केंद्रीय कायदे पायदळी तुडवत कंत्राटी कामगारांचे धोरण आणले. त्याला केंद्राने कधीच आव्हान दिले नाही. त्यामुळे व्यापार्‍यांच्या नफ्यात वाढ झाली.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर गुजरातच्या धर्तीवर कायदे बदलण्याचे काम सुरू झाले. बरंच काही आहे.

थोडक्यात सत्तेमुळे फरक पडतो.
पण एकाला घालवून कुणाला आणावे म्हणजे हे बदल अनडू होतील ? तर याचे उत्तर नाही असे आहे.
त्यामुळे फरक पडत नाही हे पण बरोबर.

लाडकी बहीण योजना असो कि राहुल गांधींची महिना आठ हजार रूपये योजना असो. या योजना आणण्यापेक्षा बाहेर जो रोजगार जातोय तो रोखण्यासाठी १९९१ च्या सुधारणांमधे बदल करणे हे जास्त गरजेचे आहे. चीनने तसे धोरण आखले आहे. त्यांचे धोरण दुटप्पी आहे. जागतिकीकरणाच्चे फायदे उपटायचे पण आपल्या देशाला तोटा होऊ द्यायचा नाही. असेच धोरण भारताला आखता येणे अशक्य आहे का ?

जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे याची समिक्षा घडवून त्यातून बाहेर पडायचे कि नाही याचा निर्णय घेणारे सरकार असेल तर अनेकांना फरक पडेल. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. त्याचे आमिष दाखवून थोडे लोक आपली थैली भरत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल असे धोरण चीन आखतो. कारण त्यांच्या नेत्यांना थैल्यांमधे इंटरेस्ट नाही.

भारताची बाजारपेठ हवी तर कामगारांना उध्वस्त करणार्‍या अटी चालणार नाहीत हे ठणकावून सांगणारे सरकार येणार असेल तर फरक पडेल. नाहीतर कुणीही येवो, काहीच फरक पडत नाही.

१९९१ च्या आर्थिक बदलांचे उल्लेख केले की इथले काही तथाकथित पुरोगामी लोक मला छुपा संघी म्हणतात. यांच्या बाजूने भाजपविरोधी बाजू मांडली तर मग त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. पण ती बाजू मांडताना एका ठराविक प़क्षाच्या सोयीनेच मांडली पाहीजे याबाबतीत ते फार आग्रही असतात. नाहीतर चिडून जाऊन सात्विक संताप करत थयथयाट करतात. त्याला सात्विक हा शब्द योग्य आहे का ? कारण तीन ड्युआयडी शिवीगाळ करतात, उकसवतात आणि दोन ड्युआयडी तोल गेल्यावर आयडी घालवण्यासाठी प्रयत्न करतात.

भाजपच्या धोरणांना विरोध केल्यावर देशद्रोही असा उल्लेख करून उकसवणार्‍यांना ब्लॉकसदनी पाठवल्याने आयुष्य सुखाचे होते. तसेच काँग्रेसला विरोध केल्याने छुपा संघी, गद्दार असा उल्लेख करणारे ट्रोल्स सुद्धा ब्लॉक केले की आयुष्य सुखी होते हे नवे तथ्य आहेत. मायबोलीवर कडवे उजवे (ट्रोल्स) दिसत नाहीत. सौम्य भाषेत उजवी विचारसरणी मांडणारे असतील तर प्रतिवाद करता येतो. पण हल्ली तिखट भाषा पुरोगाम्यांची आहे. त्यातही ड्युआयड्यांची. (यातल्या एकाला ह्म म्हणता येत नाही).

भाजपला विरोध करता करता दहा वर्षे झाल्यावर आणि त्याच लायनीवर विरोध करत राहिल्यावर भाजपला फरक पडत नाही हे लक्षात यायला हवे. हिंदू - मुसलमान केल्याने सर्वाधिक फायदा भाजपला होतो. गेल्या काही वर्षात राहुल गांधी यांना आर्थिक फटका बसलेला वर्ग जो हिंदुत्वासाठी मत देत त्याच्यावर लक्ष दिले पाहीजे हे समजले आहे. त्याला आकर्षक ठिगळ योजनांचे गाजर दाखवले आहे. भाजपला घालवायचे तर सशक्त विरोधी पक्ष हवा यात शंका नाही. पण तो सत्तेत आला तर बदल काय होणार याचे मोजमाप आर्थिक धोरणात नको का ?

ठिगळ योजना आणण्यापेक्षा महिना आठ हजाराची योजना आणावी लागणार नाही असे धोरण हवे. त्यासाठी १९९१ च्या आर्थिक धोरणांचा आढावा घ्यायला हवा. त्यासाठी राहुल गांधी तयार नाहीत. त्यांनी एका मुलाखतीत तसे सांगितलेही. उद्योगपतींची कर्जमाफी रद्द करून त्याची वसुली करणार का यावरही त्यांचे धोरण स्पष्ट नाही. अंबानी अदानी जाऊन काँग्रेसला सपोर्ट करणारी अठरा उद्योग घराणी परतणार असतील आणि मोदींनी मेहरबानी केली तशी काँग्रेस पुन्हा या घराण्यांवर मेहरबानी करणार असेल तर काहीच बदलले नाही.

अशी मेहरबानी राष्ट्रीय हितातून केली जात असेल आणि त्यामुळे रोजगार मिळत असेल तर विरोधाचे कारण नाही. पण तसे होत नाही.
यामुळेच मायबोलीवर राजकीय मतं मांडण्याबाबत उदासीनता येत आहे.

Pages