राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहे, याने आयुष्यात फरक पडतो का?

Submitted by उपाशी बोका on 8 January, 2022 - 18:27

दुसऱ्या एका धाग्यावर बघितलेली वादावादी चर्चा बघून मी मत मांडले होते की राजकारणावरून लोकं तावातावाने आपले रक्त का आटवतात, हे मला कधीच कळलं नाही. राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहे, त्यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात फार काही फरक पडतो का कधी? माझ्या मते तरी विशेष असा नाही. (मग तो मोदी असो किंवा बायडेन असो किंवा राहुल गांधी असो किंवा ट्रम्प असो).

म्हणजे होत काय की तुम्ही मतदान केलं की तुमचं काम झालं. मग पुढे लोकशाही मार्गाने राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान निवडला जातो. मग जो/जी कुणी आहे त्याला/तिला अधिकार मिळतो. जर ती व्यक्ती नाही आवडली तर पुढील मतदान करताना दुसऱ्या कुणाला मत द्यावे. सरकारपर्यंत मत पोचवणे वेगळे, पण आपापसात वाद घातल्याने, वेळ वाया जाण्याव्यतिरिक्त काय निष्पन्न होते? जर तुमच्या कंपनीचा सी.इ.ओ. बदलला तर तुमच्या आयुष्यात फार प्रचंड बदल होतो का? कंपनीने अजून कर्ज घेतले काय, वेगळा धंदा सुरू केला काय, H1B जास्त बोलावले काय, काम ऑफशोर पाठवले काय, ट्रान्सजेंडरना भरती केले काय? तुम्हाला काही पर्याय आहे का? तुम्हाला जर पगार वेळेवर मिळत असेल, सुट्ट्या कमी केल्या नाहीत आणि ड्रेसकोड पण बदलला नाही तर व्यक्तिशः तुम्हाला फार काही फरक पडेल काय? जुना सी.इ.ओ. किती फालतू होता, नवीन कसा चांगला आहे, अथवा नवा कसा मूर्ख आहे आणि तो अमूक तमूक का करत नाही, अशी चर्चा तुम्ही ऑफिसमध्ये दिवसेंदिवस करता का? तुम्हाला काय वाटते?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नेहरूंना बायको, मूल आणि इतर नादही होते, पण त्यांनी काढलेल्या संस्था अन कंपन्यांची संख्या अमाप आहे>>> या संस्था अन कंपन्या नेहरूनी स्वतःच्या पैशानी काढल्या असतील असे वाटत नाही. असतील तर नावे द्यावीत.

जनतेच्या पैशांनी जनतेसाठी कंपन्या काढणे निराळे अन जनतेच्या पैशांनी जनतेसाठी काढलेल्या कंपन्या कवडीमोल भावात सग्या-सोयर्‍यांच्या घशात घालणे निराळे... असो, ज्याची जशी जडणघडण तशी या दोन गोष्टींकडे बघण्याची नजर वेगळी.

मानव पृथ्वीकर म्हणत आहेत, ते पटले.
१) राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहे, याने आयुष्यात फरक पडतो का? आणि २) राजकारणावर निरर्थक वादविवाद करणे (चर्चा करणे, त्यात मतभेद वाद असणे नव्हे, तर स्पेसिफिकली निरर्थक प्रकारचा वादविवाद करणे) याने काही फरक पडतो का? हे दोन वेगळे विषय आहेत.
तूर्तास फक्त पहिल्या मुद्द्याबद्दल बोलू.
लोक उदासीन आहेत आणि मतदान करत नाहीत, असे मला म्हणायचे नाही. मी मतदान करतो. कधी आपल्या निवडीचा उमेदवार निवडून येतो, कधी कुणी दुसरा. That is part of our life. मतदानच केले नाही तर मग कुरकुर कशाला करायची?

बहुतेक जणांचा रोख सध्याचे राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान कोण आहेत, याच्याशीच निगडीत आहे. आपापली मते सध्याच्या परिस्थितीबद्दल जरा रिजीड/कणखर दिसत आहेत, म्हणून असे सुचवतो की पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान (जे परत राजकारणात यायची शक्यता नाही) विचारात घेतले तर? म्हणजे साधारण १९८० नंतर जे राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान होते आणि त्यांचा कार्यकाल बघू.

राजीव गांधी (५ वर्षे ३२ दिवस), व्ही.पी.सिंग (३४३ दिवस), चंद्र शेखर (२२३ दिवस), पी. व्ही. नरसिंहराव (४ वर्षे ३३० दिवस), देवे गौडा (३२४ दिवस), आय.के.गुजराल (३३२ दिवस), अटल बिहारी वाजपेयी (६ वर्षे ६४ दिवस), मनमोहन सिंग (१० वर्षे ४ दिवस) इत्यादी.
तसेच अमेरिकेत रोनाल्ड रेगन (८ वर्षे), थोरले बुश (४ वर्षे), बिल क्लिंटन (८ वर्षे), धाकटे बुश (८ वर्षे) ओबामा (८ वर्षे) इ.

यांचा विचार करा आणि कंपनीच्या सी.इ.ओ.शी तुलना करा. (तुमच्या कंपनीचा सी.इ.ओ. बदलला तर तुमच्या आयुष्यात फार प्रचंड बदल होतो का?) तुम्हाला खरंच वाटतं का की यापैकी कुणामुळेही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात फार फरक पडला, यांच्यामुळे तुमचे कल्याण/नुकसान झाले किंवा दुसरा कुणी न आल्याने तुमचे नुकसान झाले? यांच्या जागी दुसरा कुणीही चालला असता की नाही? याचा पुढील भाग म्हणजे एकदा का सर्वानुमते, लोकशाही मार्गाने ती व्यक्ती निवडून आली की तुमच्या हातात काही रहाते का, पुढच्या निवडणुकीची वाट बघण्याशिवाय? fait accompli न्यायाने जे पदरात पडले ते घ्यावे लागणार नाही का?

कंपनी आणि देश खूप फरक आहे.
त्याची तुलना करू नका.
फक्त चार तास मला पंतप्रधान बनवा
प्रत्येकाच्या आयुष्यात कसा फरक पडेल ह्याचा ट्रेलर दाखवला जाईल
चर्चा ह्या झाल्याचं पाहिजेत समाज हा जिवंत असला पाहिजे मृत समाज काही कामाचा नाही
ज्यांना वाटते फरक पडत नाही त्यांचा मतदान अधिकार काढून घ्यावा

तेव्हा च त्यांचे डोळे उघडतील.

हेमंत सर, मी मान्य करतो की तुमच्या इतका ज्ञानी नाही की जिवंत आणि मृत समाजाबद्दल काही बोलू शकेन. मी खरंच मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.

Hemant 33 >> ++++१११११

समाजाशी नाळ तुटलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार नसलेलाच बरा... अशा लोकांमुळे समाज अजुनच अडचणीत येऊ शकतो.

आली की तुमच्या हातात काही रहाते का?, पुढच्या निवडणुकीची वाट बघण्याशिवाय?

ह्या साठी च जिंवत समाज हवा.लोकांच्या अती मजबूत संघटना हव्या त्या सरकार आणि सरकारी यंत्रणा ह्यांच्या छातीत नेहमीच धड धड वाढवतील

समाज मृत असेल तर पुढची निवडणूक बघा.

सरकारला प्रश्न विचारण्यासाठी लोकशाहीत विरोधी पक्ष, पत्रकार असतात. एकदा सरकार आले की सामान्य नागरीकाचे काम म्हणजे जवळच्या मंत्र्याकडे जाणे.

जर तुमच्या कंपनीचा सी.इ.ओ. बदलला तर तुमच्या आयुष्यात फार प्रचंड बदल होतो का?
>>>>> समजा नवीन सीईओ बोलला कि तुम्हाला तुमचा पगार पूर्वीसारखा बँकेत ट्रान्स्फर होणार नाही. आजपासून रोख मिळत जाईल. त्यासाठी दर आठवड्याला/महिन्याला भली मोठी लाईन लावायची दोन तीन तास लायनीत उभं राहायचं आणि रोख रक्कम हातात घ्यायची. तुमचा पगारही तोच आहे, तुमच्या सुट्याही तितक्याच आहेत आणि ड्रेसकोड पण सेम आहे तर तुमच्या आयुष्यात फरक पडेल काय आणि तुमच्या कंपनीत
जुना सी.इ.ओ. किती फालतू होता, नवीन कसा चांगला आहे, अथवा नवा कसा मूर्ख आहे आणि तो अमूक तमूक का करत नाही?
या चर्चा सुरू नाही का होणार?

नेहरू जनतेवर जनतेचाच पैसा खर्च करत होते
मोदीही तेच करतात

त्यामुळे पैसा सोर्स हा सेमच आहे , त्यामुळे आता फक्त संस्थाचा नंबर द्यावा, काँग्रेसने 600 वर्षात 600 काढल्या तर भाजपने 15 वर्षात किती ? 150 दाखवा

सरकारला प्रश्न विचारण्यासाठी लोकशाहीत विरोधी पक्ष, पत्रकार असतात. एकदा सरकार आले की सामान्य नागरीकाचे काम म्हणजे जवळच्या मंत्र्याकडे जाणे.

सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी .
हे जनतेच्या हिताचाच विचार करत नाहीत.
पत्रकार काय लायकीचे आहेत हे अर्णव पासून .....?? ह्यांनी दाखवून दिले आहे.
जनतेचे हित कोणी च करणार नाही.
ते स्वतः स्वतःचे हित जनतेने च बघायचे असतें

त्यासाठी चर्चा हव्यात,आंदोलन हवीत,मोर्चे हवेत

आता भक्त मोदींची 7 च वर्षे झालीत म्हणून रडतील.
व्हीपिसिंग 2 , वाजपेयी 5 , ही धरणार नाहीत

काँग्रेसची मात्र 60 एकत्र मोजून राहुल गांधीला जाब विचारतील

Bjp ची वृत्ती ही लालची,एकाधिकार शाही वादी आहे ह्या बद्धल कोणताच संशय नाही
लोकशाही मध्ये जितके महत्व सत्ताधारी पक्षाचे असते त्या पेक्षा जास्त महत्व विरोधी पक्षाचे असतें
कोणताही महत्वाचा निर्णय घेताना ह्या विशालकाय देशातील प्रत्येक घटकाचे मत विचारून त्याची दखल सरकार नी घेणे गरजेचे आहे.
पण जेव्हा पासून bjp सत्तेवर आहे
ह्या वैविध्य नी नटलेला देशाला एकाच नियम असावा असला फालतू विचार प्रबळ झाला आहे
Bjp विरोधी मत असणाऱ्या तज्ञ ,विचारवंत,राजकीय पक्ष,समाज संघटना, सामान्य जनता ह्यांना फट्या वर करून स्वतःचे घोडे च पुढे दामटत आहे .हीच तर हुकूम शाही वृत्ती आहे

@बोकलत
चांगले उदाहरण दिले. एकदम मान्य आहे. जिथे त्रास होतो, जिथे पैसे कमी होतात, टॅक्स वाढतो, महागाई वाढते ते कुणालाच आवडत नाही. अजून एक उदाहरण सुचले की कंपनीत रिझर्व्हेशन आणून फक्त त्यांनाच प्रमोशन देणे. (उदा: मंडल कमिशन, व्ही.पी.सिंग)
कंपनीच्या आवारात राममंदिर बांधले काय किंवा आवाराभोवती भिंत बांधली/नाही बांधली काय, याने सामान्य नागरिकांना फरक पडणार नाही बहुदा. पण मोदी आणि बायडेनचे उदाहरण नको कारण भावना फार तीव्र आहेत बर्‍याच.

आरक्षण हा विषय पहिला समजून घ्या
समाज पहिला समजून घ्या .
देश पहिला समजून घ्या
काही बिन कामाचे दोन टक्के हे देश नाहीत
पाकिस्तान,चीन भारतावर तुटून पडेल तेव्हा हे दोन टक्के देशप्रेमी गांडी ला पाय लावून अमेरिका ,आणि ब्रिटन मध्ये. लपून राहतील

त्याग ० आणि आव माझ्या मुळेच भारत आहे
हा bjp पक्ष आहे

हेमंत सर, वैयक्तिक गैरसोय हा मुद्दा मला मान्य आहे. पण मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या. मी बी.जे.पी/काँग्रेस किंवा डेमोक्रॅट्/रिपब्लिकन यापैकी कुणाच्याही बाजूने बोलत नाहीये, एक सामान्य नागरिक म्हणून माझे मत वाचा जरा. माझ्या मते ह्या धाग्यावर प्रामाणिकपणे चर्चा करणे कठीण आहे. हा माझा शेवटचा प्रतिसाद.

मंडल आयोगाचा राग ठेवून भाजपने व्हीपिसिंग सरकार पाडले

आणि आज हे स्वतःला बहुजन उद्धारक म्हणवत आहेत,

ह्यांच्याच लोकांनी आज पोस्ट पाठवली आहे, सावित्रीबाई फुले मुलगी शाळा वगैरे झूठ आहे म्हणे, गार्गी मैत्रेयी इ , विजय नगर साम्राज्यात शाळा होत्या म्हणे इ.( ह्यांची पणजी तिथे हेड मास्टर असणार )

मग सावित्रीबाईंना शेण का मारले हे विचारल्यावर शेणामध्ये गडप झाले

ह्या मध्ये .
झाशी ची महा पराक्रमी राणी.
महान समाज सुधारक राजश्री शाहू महाराज.
महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज.
ज्ञाना च भंडार असलेले आणि महान महा महामानव भारत रत्न बाबासाहेब.
ह्यांचा वापर स्वतःच्या संकुचित राजकारण साठी करू नका.
हीच अपेक्षा

धाग्याचे शीर्षक विरोधीपक्ष नेता कोण आहे याने आपल्या आयुष्यात फरक पडतो का ? असे ही असते तर बरं झाले असते .
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सरकार वर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असण्याची खूपच गरज आहे
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असो किंवा नसो ,
पण विरोधीपक्ष नेतेपदी राहुल गांधी असायलाच हवेत !
असे माझे प्रांजळ मत .
लैच टॅलेंटेड माणूस !
ट्विटर वरून सतत गनिमी हल्ले करून मोदी सरकारला पळो कि सळो केले आणि भाजप सरकार ला भानावर आणले .
देशातील सध्या होत असलेली विकास कामे असोत कि गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना असतो , किंवा देशाची सरंक्षण सिद्धता असो हे फक्त राहुल गांधींच्या सूचना मुळेच झालेले आहे .
त्यात भर म्हणजे कॅमेऱ्या समोर अवर्णनीय विनोदी वक्तृत्वाकौशल्य दाखवून राहुल बाबा ने भाजप सरकार विरोधकांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या .
थोडक्यात सरकार विरोधकांना गारद करण्याचे अजब कौशल्य फक्त राहुल बाबा कडे आहे
म्हणून राहुल गांधी कायमस्वरूपी विरोधीपक्ष नेतेपदी असावेत असे मला तरी सिरियसली वाटत .

२ MS झालेला, कँसर वर बराच अनुभव असलेला, विवाहित, काही मुले, शिवाय एक नपत्नी, ई. असलेला, शौकीन, बर्‍यापैकी महाग.

आपण कोणाला निवडू ? मग हाच न्याय नेत्यांना का नाही///

असा शौकीन नेता निवडावा असं वाटणं हे तुमचं पुरुषी privilege आहे.
शौकीन नवऱ्याकडून एचआयव्ही लागण झालेली स्त्री असा तुमच्यासारखा विचार करणार नाही.
नेत्याचं पर्सनल लाईफ हा एकमेव किंवा क्रमांक एकचा निकष दरवेळी असू नये हे मान्य आहे. पण तो विचार कधी करूच नये हे मान्य नाही.

https://www.bbc.com/marathi/india-45538289

या बाफच्या मूळ प्रश्नाचा अर्थ "सामान्य नोकरदार वर्गाला फरक पडतो का" अशा अर्थाने किंवा "कोणत्याही सामान्य नागरिकाला पडतो का" या अर्थाने घेतला तर उत्तरे वेगळी येतील. काही उदाहरणे:
- स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू पंतप्रधान न होता काँग्रेसमधली दुसरी एखादी व्यक्ती झाली असती, तर सार्वजनिक उद्योग, संशोधन संस्था, आयआयटी ई. च्या बाबतीत जे निर्णय त्यांनी घेतले - सपोर्ट केला तितका त्या व्यक्तीने केला असता का शंका आहे. कारण त्यांची जी व्हिजन होती तशी ती काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे तेव्हा नसावी
- इंदिरा गांधीनी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले तेव्हा बँक कर्मचार्‍यांना काहीतरी नक्कीच फरक पडला असेल. आता अनेक सरकारी कंपन्या खाजगी होत आहेत, त्यांनाही पडेल.
- १९९१-९२ साली जेव्हा अर्थव्यवस्था खुली झाली त्यानंतर ८-१० वर्षांत त्यातून मिळणार्‍या संधी ओळखणारे व "योग्य वेळी योग्य ठिकाणी" असलेले श्रीमंत, मध्यमवर्गीय व गरीब या तिन्ही वर्गातील लोकांची कौटुंबिक्/आर्थिक लेव्हल प्रचंड वर उचलली गेली. नरसिंहराव व मनमोहन सिंग नसते तर इतर कोणी हेच निर्णय घेतले असते का? माहीत नाही
- आज मथुरा वगैरे ठिकाणी एखादा मुस्लिम माणूस आहे. बीफ वगैरे खाणारा. पण एरव्ही बाजूचा हिंदू माणूस व हा यात काही फरक नसलेला. त्याच्या जीवनात काहीच फरक पडला नसेल का? जे वाचायला मिळते त्यावरून तरी तसे वाटत नाही.
- मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून ते पुढे ६-८ महिने अमेरिकन रिपब्लिकन वोटर बेस मधले असंख्य लोक ही निवडणूक चोरलेली आहे, ट्रम्प, ज्युलियानी व इतर अनेक लोक काहीतरी भारी करून हे सगळे चक्र उलटे फिरवून ट्रम्पला परत अध्यक्षपदी बसवणार आहेत. असल्या भ्रमात राहिले. ट्रम्पच्या ऐवजी एखादा रिझनेबल रिपब्लिकन अध्यक्ष जर सत्तेवर असला असता तर हेच झाले असते का? बहुधा नाही.

हे केवळ समजात नेहमी होत असणारे बदल नव्हेत. ही उदाहरणे त्या स्पेसिफिक सरकारच्या नेत्याशी थेट संबंधित आहेत. त्या जागी वेगळा नेता असता तर या प्रत्येक वेळेस कदाचित चित्र वेगळे असले असते.

Pages