टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज ची खरच गरज असते का?

Submitted by soha on 6 January, 2022 - 04:09

अनेक कंपन्यांमधे HR तर्फे आणि कधी टीम लीडर किंवा मॅनेजर कडून वेगवेगळ्या टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज organize केल्या जातात. करोना पूर्व काळात ह्या अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज साठी अनेक पर्याय उपलब्ध होते. कुठे तरी सहलीला जाणे/ एकत्र जेवायला जाणे इथपासून ते सगळ्यांनी मिळून काहीतरी हॉबी वर्कशॉप करणे इथपर्यंत मोठी रेंज होती पर्यायांची. पण वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून या अ‍ॅक्टीव्हीटीज वर बर्‍यापैकी मर्यादा आल्या आहेत. तरीही त्यातही HR किंवा टीम लीडर किंवा टीम लीडर बनण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे होतकरू लोक सतत नविन नविन टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज organize करत रहातात.
मुळात ह्या अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज गरज आहे का?
कामाव्यतिरिक्त इतर अ‍ॅक्टीव्हीटीज एकत्र केल्याने खरच कामाचा दर्जा आणि प्रत सुधारते का?
कामाची गती वाढते का?
टीम मधल्या लोकांना motivation मिळते का?
ह्या मुद्द्यांचा उहापोह करण्यासाठी हा धागा काढत आहे. Human Resource Management च्या कोर्स मधे शिकवली जाणारी थिअरी मांडू नये. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित चर्चा व्हावी.
माझे वैयक्तिक मतः ह्या अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज फारसा उपयोग होत नाही. अनेकदा त्यामुळे टीम मधे ग्रुपिझम आणि हेवेदावे वाढीस लागतात.
गेले २ वर्ष वर्क फ्रॉम होम करताना लक्षात आले की अनेक टीम मेटस्ना प्रत्यक्ष कधीही भेटले नसले, त्यांच्याशी कामाव्यतिरिक्त काही विशेष संबंध ठेवले नसले तरीही माझे काम व्यवस्थित वेळेत पूर्ण झाले. कामाचा दर्जाही उत्तम होता. असे असताना उगाचच टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज मधे भाग का घ्यावा? केवळ विरंगूळा म्हणून ह्या अ‍ॅक्टीव्हीटीज करायच्या असतील तर मग ऑफिसमधल्या लोकांबरोबर त्या का करायच्या? ऑफिसच्या बाहेर इतरही मित्रपरीवार आहे. त्यांच्याबरोबर अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज करणे मला जास्त सोयीस्कर वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

टीम बिल्ड होतं कि नाही डिफर्र्स फ्रॉम टीम टु टीम पण एखादं समस्या बघण्याचे दृष्टिकोण बदलतं.
यु गेट टु नो पिपल फ्रॉम अदर टीम्स.

कंपनीच्या दृष्टीने चांगली टिम (मेम्बर्सचे एकमेकांना सहकार्य) या बरोबरच इंटर टिम रिलेशनशिपही तेवढीच महत्वाची आहे.
वेगवेगळ्या टिम्स एकत्र येतील अशा ऍक्टिव्हीटिजही असाव्यात. सर्व्हिस आणि फिल्ड सपोर्ट टिम्सच्या सेल्स टिम्स बद्दल तक्रारी आणि व्हाईस अ व्हर्सा, अकौंटस टिम्स आणि सेल्स टिमचे वाकडे, प्रोडक्शन आणि सेल्स टिम मधील तणाव कॉमन आहेत.

मी, सुकडू सुतार, धर्मा मांडवकर वगैरे सगळेजण टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी म्हणून आमच्या 'जगल्या'कडे तंबाखू खायला जातो. तणावरहित जीवन. अशा ऍक्टिव्हिटी गावागावात व्हाव्यात.

वैधानिक इशारा - तंबाखू आरोग्यास अपायकारक आहे.

रोजचे काम दोन किंवा जास्त वेगवेगळ्या जबाबदार्‍या पेलणार्‍या टीम्सना मिळून करायचे असते तेंव्हा त्या टीम्स मध्ये कालांतराने तूतू मैमै सुरू होऊन दरी निर्माण होते (हे एका टिममधल्या लोकांसाठीही लागू आहेच) अश्या अवस्थेत टीम बिल्डींग अ‍ॅक्टिव्हिटीजनी मोलाचे काम केलेलं मी पाहिलं आहे. तेही कसले वेगळे उपदेशाचे डोस न पिता/पाजता.
एरवी आपापल्या क्युबिकल्स मधे मुंडके अडकवून काम एके काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आपले कामाचे विभाग, काम, हुद्दा, वय, लिंग, प्रादेशिक सीमा या सगळ्याचं अवघडलेपण विसरून एकामेकांत मिसळून छानपैकी गप्पा मारत मोकळा श्वास घेतल्याचे मी पाहिले आहे. यानंतर जेंव्हा पुन्हा कामाची सुरुवात झाली तेंव्हा त्यात या इव्हेंटचा चांगला परिणाम दिसलेला आहे.
(मी HR विभागात काम करत नाही बरे का. Happy पण अश्या अ‍ॅक्टिव्हिटीज योग्य प्रकारे राबवल्या तर फार मजा आणतात हे नक्की. )

जेंव्हा टीम अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी मुक्कामाच्या सहलींचा समावेश होतो त्यावेळी बहुतेक वेळा आपापले गट पाडले जाऊन आपल्याच कोंडाळात लोक रमतात असे वाटते.

टीम बिल्डींग मजेची आणि रीलॅक्सींग तेंव्हा होते जेंव्हा टीम मधे निदान १-२ टाळकी उत्साही आणि ओळखीची असतात असं मला वाटतं..
काहिंचा स्वभाव नव्याने रुजू होऊन ही मिक्स होणारा असेल तर त्याना असेही मजा येणारच..

भारतिय कं. मधे सणासुदी चे मस्त तयार होऊन ऑफिसात येणे वगैरे मस्त नोस्टॅल्जिक आठवणी आहेत..

या गोष्टींची गरज बहुधा एच आर ना असते, कं. किती काळजी करते तुमच्या मनःस्वास्थ्याची असं भासवायला Wink
कोण फक्त बोलबच्चन आहे आणि कोण खरोखर कामाचे आहे हे एखादा प्रोजेक्ट एकत्र केल्यावर बरोबर कळते >>>> एकदम पते की बात!!!

मला मुख्यतः अश्या इव्हेंट ना रोजचे मख्ख ठोकळे, मीटिंग मध्ये फडया निवडुंग बनून उगीच रुडपणा करणारे जेव्हा माणूस बनून मजा करतात, हसतात तेव्हा त्यांना हसताना पाहणं आवडतं.ही लोक मिटिंगस मध्ये पण काही काळात माणूस बनतील, स्वतःच्या असुरक्षितता बाजूला ठेवून प्रोजेक्ट चं भलं पाहतील असा विश्वास निर्माण होतो(आणि त्यांनाही माझ्या बद्दल निर्माण होत असेल अशी अपेक्षा करून माझं भाषण मी पूर्ण करते. जय हिंद जय म्हाराष्ट्र. Happy )

अनू Lol

तुझं भाषण वाचून ते तारे जमिन पर मधला शेवटला पेंटींग ला एकत्र जमणारे एरवी कडक असणारे शिक्षक मजा करत, हसत, खेळत आणि मुलांशी संवाद साधत चित्र काढतात ते आठवले Happy

Pages