हे वर्ष

Submitted by मुग्धमानसी on 29 December, 2021 - 10:26

हे वर्ष माझ्या जाणिवेला टाळूनी जावे
जे जसे होते तसे ते पुन: तसे व्हावे
एवढी नव्हते कधीही भंगलेली मी...
की अभंगाचे निळे मज ठायी उमटावे!

मी अशी नव्हते कधी का... अशीच मी होते?
गल्लतींच्या जंगलातील झाड मी होते?
हे कधी कोणासही मग ना कळेना का...
वर्ष जावो एक क्षणही ना सरेना का...

मी मला ओलांडूनी या पार पोचावे...
हे वर्ष माझ्या जाणिवेला टाळूनी जावे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.

"मी मला ओलांडूनी या पार पोचावे"... चपखल!