Submitted by शांत माणूस on 22 December, 2021 - 20:57
मराठीत अलिकडे उत्तम भयपट बनत आहेत. विषयाची मांडणी, वेगळेपणा यामुळे दखल घेण्याजोगे आहेत. हाक, ऐक, बळी, लपाछपी असे बरेच चांगले सिनेमे बनले आहेत. त्यावर स्पॉयलर्स सहीत गप्पांसाठी धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बळी आणि लपाछपी हे दोन्ही
बळी आणि लपाछपी हे दोन्ही पाहताना अनेक वर्षांनी भीती वाटली.
हल्ली हिंदी, इंग्रजीत आलेले स्पेशल इफेक्ट्स आपल्या पिढीला घाबरवत नाहीत. आपल्या कल्पनेतल्या भयापासून ते फारकत घेतात. डार्क एनर्जी या कल्पनेतून भूत आले की वीजेचे दिवे थरथरतात हे हास्यास्पद वाटते. त्यातून भीती वाटत नाही.
मराठीतल्या या भयपटात आपण लहानपणापासून ऐकलेल्या कल्पनांना दृश्यरूप दिल्याने जास्त भीती वाटते असे मला तरी वाटले.
विशेषतः लपाछपी मधे जी कथा आहे तशा कथा ऐकलेल्या असतात. गरोदर बाई आणि हडळ हे गावाकडे ऐकले आहे. पण यातली कथा गूढ आहे. त्याला भयकथेची जोड आहे. एका समस्येकडे ती निर्देश करते. निव्वळ भयकथा इथून पुढे कंटाळवाणे होत जाणार. कारण घाऊक घाबराघाबरीसाठी निघालेल्या टीव्ही शोजमुळे चरकातून काढावा तसा भयरस काढून झालेला आहे. इथून पुढे पडद्यावर काय दाखवायचे हा प्रश्नच आहे.
लपाछपी:
लपाछपी:
अजून बघायची हिंमत झाली नाही.
बळी: भयपट म्हणून आवडला.पण थोडा विचार केला तर भयपट टिकमार्क म्हणून काही घटना घातल्या आणि नंतर त्यांचा संदर्भ परत आणणे विसरले असे वाटले.
भास्कर मरतो. तो मेल्यावर या आजारी मुलाला दिसतो वगैरे.पण नंतर त्याच्या भुताचा संदर्भ काहीच नाही.
एलिझाबेथ चा छळ झाला म्हणून आत्मा त्या खोलीत.ठिके.पण नंतर त्या आजारी मुलाच्या खोलीत लपवलेल्या फोन चा काहीच संदर्भ नाही.फोन खरा होता का खोटा?
फोन खरा होता का खोटा? >> हे
फोन खरा होता का खोटा? >> हे खरे कि वातावरण निर्मिती म्हणून अशा गोष्टी पेरल्या जातात. नंतर त्याचे स्पष्टीकरण दिले जात नाही. पण भयपटात नंतर ते उलगडून सांगण्यात जो वेळ जातो त्याने इफेक्ट निघून जाणार नाही का ? धनंजय छोटू कथेत सर्व पात्रांना एकत्र बोलवून धनंजय सगळे स्पष्ट करायचा , त्याऐवजी आताच्या प्रेक्षकांवर सोडून देत असतील. (माझे मत ).
मी पहिलेला पहिला मराठी भयपट
मी पहिलेला पहिला मराठी भयपट म्हणजे झपाटलेला. तो देखील थिएटरात. सविस्तर लवकरच लिहितो... आधी थोडे कामाला सुरुवात करतो.
आधी थोडे कामाला सुरुवात करतो.
आधी थोडे कामाला सुरुवात करतो. >> कशाला कशाला ?
सत्य सावित्री आणि सत्यवान हा
सत्य सावित्री आणि सत्यवान हा मराठी चित्रपट जबरी सस्पेन्स आहे...
झपाटलेल्या बेटावर हा PICTURE
झपाटलेल्या बेटावर हा PICTURE सुद्धा खुपचं भारी आहे.
वरचे दोन्ही पाहिलेले नाहीत.
वरचे दोन्ही पाहिलेले नाहीत.
च्रप्स सिरीयसली का ? नाहीतर व्हायचा पोपट.
झपाटलेला हा तिसरा मुवि आहे
झपाटलेला हा तिसरा मुवि आहे
पहिला चकी चाईल्ड प्ले
दुसरा पापी गुडीया
मग झपाटलेला
झपाटलेला आधी आलेला
झपाटलेला आधी आलेला
पापी गुडीया नंतर
ट्रेलर पाहून तो बघावासाही वाटला नव्हता.
लक्ष्याला तोड नाही
बरोबर झ 1993 पा गु 1996
बरोबर
झ 1993
पा गु 1996
च्रप्स सिरीयसली का ?
च्रप्स सिरीयसली का ?
>>> yes….
https://youtu.be/FZAOmphw0cE
पापी गुडीया म्हणजे तो करिष्मा
पापी गुडीया म्हणजे तो करिष्मा कपूर चा?
शां मा, त्यांनी सगळं सोलून
शां मा, त्यांनी सगळं सोलून सांगावं असं मी म्हणत नाही.पण ते त्यांना माहीत आहे आणि जाणीवपूर्वक लपलेलं आहे असं तरी दिसावं की नाही?
म्हणजे, एखादी घटना/सूत्र पिक्चर मध्ये दाखवलं तर नंतर त्याचा परत संदर्भ येऊन सगळे धागे जुळतात.
(फोन चं एकवेळ सोडून देऊ.भूत राज्यात मोबाईल चे वेगळे टॉवर, वेगळे नियम असतील.पण भास्कर चा परत लहानसा संदर्भ यायला हरकत नव्हती.)
अनु, सहमत. चांगला प्रयत्न
अनु, सहमत. चांगला प्रयत्न असल्याने मी आवडून घ्यायचा प्रयत्न केला. दोषांकडे दुर्लक्ष केले. पण..
फोनची बॅटरी इतक्या महिन्यांनंतर उतरत कशी नाही हा माझ्या मुलाचा प्रश्न होता.
भूत हा भयपट मला आवडला होता.
.
पापी गुडीया करिष्मा कपूर
पापी गुडीया
करिष्मा कपूर
'तेरी कुरसी मेरे नाम
मेरी आत्मा तेरे नाम
तिन्ही मुवींचे पूर्ण मन्त्र कुणीतरी लिहा
हो शां मा, मलाही चित्रपट
हो शां मा, मलाही चित्रपट आवडला.
सुरुवातीचा क्रिपी पणा चालू ठेवायचा झाला असता तर कथा अजून वेगळ्या अंगाने गेली असतीच
.अर्थात लहान मूल असल्याने ती तशी गेली नाही याचं मनातून बरं पण वाटलं.
छोरी पहावा की लपाछपी ??
छोरी पहावा की लपाछपी ??
लपाछपी आधी बघा कारण छोरी
लपाछपी आधी बघा कारण छोरी त्याची च कॉपी आहे
मी दोन्ही पाहिलेत पण आधी
मी दोन्ही पाहिलेत पण आधी बघायचा असेल तर लप्पाछपी च सजेस्ट करेन.
सत्य सावित्री आणि सत्यवान हा
सत्य सावित्री आणि सत्यवान हा मराठी चित्रपट जबरी सस्पेन्स आहे...>>> +१ छान मुव्ही
च्र्प्स तुमच्याकडे लिन्क असेल तर द्या मुव्हिची
लपाछपी पहिला आणि आवडला. खरतर
लपाछपी पहिला आणि आवडला. खरतर हल्ली चे मराठी चित्रपट बघावेसे वाटत नाहीत. पण हा छान आहे. कथानक, अभिनय सगळंच.. पूजा सावंत दिसते पण खूप गोड.
धन्यवाद
धन्यवाद
प्राजक्ता मी aplimarathi वर
प्राजक्ता मी aplimarathi वर पाहिला होता..
zee5 वर आहे सत्य सावित्री
zee5 वर आहे सत्य सावित्री सत्यवान