"सिंहगड" (भाग-2)

Submitted by पराग१२२६३ on 19 December, 2021 - 04:51

https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/1.html

ठाण्यापासून निघालेली सिंहगड विशेष ठाण्याची खाडी, पुढचा पार्सिक बोगदा आणि त्याच्या पुढचे दिवा जंक्शन पटापट ओलांडून कल्याण जंक्शनला 18:54 ला पोहोचली. तरीही ती 7 मिनिटं उशिराने धावत होती. तिथेही गाडीत थोडीफार गर्दी चढली. सिंहगड विशेष कल्याणला 5 क्रमांकाच्या फलाटावर शिरत असतानाच पलीकडे सात क्रमांकावर कोल्हापूरहून आलेली कोयना विशेष येत होती, तिच्या नेहमीच्याच WDP-4D लोकोबरोबर. त्याचवेळी कोयनेच्या डब्यांची क्रमवारी आता बदलल्याचेही आढळले. काही दिवसांपूर्वीच मी कोल्हापूरहून येताना ही क्रमवारी वेगळी होती.

18:56 ला सिंहगडने कल्याण जंक्शन सोडले. कर्जतमध्ये सिंहगड विशेष हळुवारपणे पहिल्या फलाटावर जात हाती, तेव्हा शेजारी निळा-पांढरा-लाल रंगातील कल्याणच्या WAG-7 कार्यअश्वांची जोडी आमची वाट पाहत असलेली दिसली. हे दोघेच आता सिंहगडला लोणावळ्यापर्यंतचे घाटामधले मोठे चढ चढण्यासाठी मदत करणार होते.

कर्जतमध्ये गाडी फलाटाला स्पर्श करताच तिथल्या वडापाववाल्यांचा “वडापाव वडापाव” असा सुरू झालेला दणदणात ऐकू येऊ लागला.

20:11 ला सिंहगड लोणावळ्यात एक नंबरवर दाखल झाली. इथे गाडीतील थोडी गर्दी कमी झाली. तोपर्यंत मागचे बँकर सिंहगडपासून वेगळे करून झाले असले तरी आज सिंहगड जरा जास्तच लोणावळ्यात विसावली होती. 20:20 ला सिंहगड विशेष लोणावळ्यातून निघाली. आता हवेत जाणवू लागलेला गारवा आल्हाददायक वाटत होता आणि गाडीतील प्रवाशांच्या गप्पाही बऱ्याच कमी होत होत्या. लोणावळ्यातून बाहेर पडत असताना TXR यार्डात दोन WDG-4 कार्यअश्वांसह उभ्या असलेल्या बीटीपीएन वाघिण्यांच्या टँकर गाडीची तेथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात होती. त्यामुळे तिला कर्जतकडे निघण्यासाठी अजून काही वेळ लागणार होता. आता तर सिंहगड खूपच वेगाने धावू लागली होती.

आता गाडीत फक्त चिक्कीवाल्यांच्याच फेऱ्या सुरू होत्या आणि शिल्लक माल मगाच्यापेक्षा कमी किंमतीत खपवायचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला होता. पिंपरीला अर्धा मिनिटच थांबून गाडी पुढच्या थांब्याच्या दिशेने, खडकीकडे निघाली. खडकला थांबून 21:22 ला सिंहगड विशेषने शिवाजीनगर गाठले, बऱ्याच गर्दीबरोबर मीही तिथे उतरलो आणि अनेक वर्षांनंतर मी केलेला सिंहगडचा प्रवास संपला.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/2.html?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

18:56 ला सिंहगडने कल्याण जंक्शन सोडले. सिंहगड विशेष हळुवारपणे पहिल्या फलाटावर जात हाती >> इथे कर्जतचा उल्लेख राहिला आहे का? पहिल्या फलाटावर म्हणजे कर्जत असावे Happy