कृपया निषेध इथे नोंदवावा

Submitted by जिद्दु on 15 December, 2021 - 07:57

अलीकडे काही धागे वाचताना जाणवले की निषेध व्यक्त करण्यासाठी कोणताही चांगला प्ल्याटफॉर्म (पक्षी धागा) इथे उपलब्ध नाही. इथे जो जातीय-धार्मिक परिसंवाद चालतो त्यात तुम्ही अमुकतमूक घटनेचा निषेध केलेला नाही दिसले तर तुम्हाला अमुकतमूक गोष्टींवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही हे वाचण्यात येते. तरी ही कुचम्बणा टाळण्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल अशी आशा आहे. एकदा इथे निषेध नोंदवला म्हणजे कुठेही जोमाने उखाळ्या-पाखळ्या काढायला सोपे जाईल सर्वांना.
धागा निषेधाचा, आपल्या सर्वांचा Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy पण निषेध वाहून गेला तर काय करायचे?

दुसरे म्हणजे प्रत्येक आयडीबद्दल एक ग्राफ हवा व निषेधांचे डीटेल्स
- आत्तापर्यंत १० निषेध केले आहेत
- जातीनिहाय वर्गवारी. पक्षनिहाय वर्गवारी ई.
- सरकारविरूद्धचे इतके निषेध हे या पार्टीच्या सरकारविरूद्ध आहेत. इतर सरकारांविरूद्ध एकही दिसत नाही
- एकूण पैकी इतके निषेध हे नि:संदिग्ध आहेत.
- इतके निषेध हे काहीतरी व्हॉटअबाउटरी लावून केले आहेत
- इतके निषेध हे पुढे "पण त्याचबरोबर..." लावून कर्जत लाइन ची गाडी कसारा लाइन वर टाकली आहे
- इतके निषेध हे पुढे ती घटना जनरलाइज करून सगळा निषेध आपल्याला पाहिजे तिकडे बरोब्बर वळवला आहे, मग ते निषेधजन्य कृत्य त्यांनी केले नसले तरी.
- इतके निषेध हे "हा निषेध आहे?" असा प्रश्न पडण्यासारखे सौम्य आहेत. आजोबा नातवाच्या चुकीला डाउनप्ले करतात तसे.

माझा निषेध हा सर्वात ' कडक ' असावा असे मला वाटतेय. तर मी कोणाचा आणि कशाचा निषेध करावा?
मदत हवीय आणि सल्लाही.

केवळ तेव्हा निषेध नोंदवला होता एवढे पुरेसे नाहीय.
तेव्हा निषेध नोंदवणारे आता कुठे गेले, आता का गप्प याचा जमा खर्च पण ठेवायला पाहिजे.

तुम्ही अमुकतमूक घटनेचा निषेध केलेला नाही दिसले तर तुम्हाला अमुकतमूक गोष्टींवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही

या अपेक्षेचा निषेध.

धुसफूस साठी पण एक धागा हवा. ती वेगळ्या धाग्यावर असावी. एकाच धाग्यात सगळे याचा निषेध.
मूळ आयडीने गोड बोलून ड्युआयडीने गरळ ओकण्याचा राजमार्ग असताना मायबोलीवर दुसरी बाजू निर्भीडपणे मांडणार्‍यांचा निषेध.
प्लस वन चे राजकारण खेळू न देणार्‍यांचा निषेध.
इतके बास. Lol

तुम्ही त्या वेळी का गप्पबसला, त्यावेळी का नाही निषेध नोंदवला असा आरोप टाळण्यासाठी मला टाइम मशीन मधून मागे जाऊन निषेध नोंदवायचे आहेत
त्याची काही सोय होईल का? Happy

वाईल्ड कार्ड निषेध उपलब्ध आहे का ?
( महाराष्ट्र + कर्नाटक + गोवा ) इथे (़आने + फेब्रु + मार्च) ( २०२१) मध्ये झालेल्य हत्यांचा निषेध.

मिरज ते डिमार्ट हा रस्ता एकदम खराब आहे. रस्त्यावर पाच फूट खोल खड्डे पडले आहेत. कालच एक बाईकवाला माझ्यासमोर खड्यातून चेंडूसारखा उडाला त्यावर मी निषेध नोंदवत आहे.

तुम्ही राहता तिथून स्टँड पर्यंतचा रस्ता पण खराबच आहे की. पुर्वेकडे जा नाहीतर पश्चिमेकडे जा, सगळेच रस्ते खराब आहेत.

फा Lol

>>> तेव्हा निषेध नोंदवणारे आता कुठे गेले, आता का गप्प याचा जमा खर्च पण ठेवायला पाहिजे
किंबहुना नेटफ्लिक्ससारख्या संभाव्य निषेधांच्या सुचवण्यादेखील यायला हव्यात लॉगिन केल्यावर - 'Because you condemned अमुक तमुक' Proud

'Because you condemned अमुक तमुक' >>> हो Lol माबोनेच इतर निषेध करण्याजोगे बाफ व चर्चा दाखवाव्यात Happy

फा Lol
Because you condemned अमुक तमुक>> Lol

शाईफेकीच्या धाग्यावर तोंड फुटलं म्हणून हा धागा काढलाय का ?
तिकडे शाईफेकीचा निषेध करणारेच बोंबलत होते की. कुबेर या विकृत माणसाची विकृती लपवण्यासाठी त्यांनी शाईफेकवर गळे काढायला सुरूवात केली. कुणी कुबेरच्या विकृतीवर बोलले की शाईफेकीचा निषेध का नाही केला असे विचारत होते.
गेंड्याची कातडी पाहीजे राव. आपणच तेव्हां निषेध का नाही केला विचारायचं आणि ते पुन्हा लपवण्यासाठी टर उडवायला सुरूवात करायची.
याला बामणी कावा असे नाव आहे.

फा Lol

तुम्ही राहता तिथून स्टँड पर्यंतचा रस्ता पण खराबच आहे की. पुर्वेकडे जा नाहीतर पश्चिमेकडे जा, सगळेच रस्ते खराब आहेत>>> या सगळ्या रस्त्यांना अपवाद म्हणजे मिरज सांगली रस्ता Happy

गंभीर धाग्याला विनोदी वळण येईल अश्या पोस्टी टाकणाऱ्या आणि त्यावर दात काढून तो धागा कसा त्याच वळणावर जाईल हे बघणाऱ्या वरील सर्व सभासदांचा निषेध करून मी माझे निषेध ईथे नोंदवायला घेतो.

१) आयपीएलमध्ये चालणाऱ्या फिक्सिंगचा निषेध

२) मद्याच्या/सिगारेटच्या/कोल्ड्रींकच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जाहीराती करणाऱ्या सेलेब्रेटींचा निषेध

३) मायबोलीवर धागाकर्त्यांना ट्रोल करणाऱ्या सभासदांचा निषेध

४) सार्वजनिक जागी धूम्रपान/मद्यपान करणाऱ्यांचा निषेध

५) जंगलतोड करून विकास करणाऱ्यांचा आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांचा निषेध

६) स्त्री किंवा पुरुषांवर स्वयंपाकाची जबरदस्ती करणाऱ्यांचा निषेध

७) स्वत:च्या जातीचा अभिमान/अहंकार बाळगणाऱ्यांचा निषेध

८) मायबोलीवरचे माझे धागे भरकटवणाऱ्यांचा निषेध

९) कबूतरांना बेचकीने दगड मारणाऱ्यांचा निषेध

१०) दुसऱ्यांना त्रास होईल असे पाळीव प्राणी पाळणाऱ्यांचा निषेध

११) खाऊगल्ली धाग्यावर संकष्टीच्या दिवशी मांसाहाराचे फोटो टाकणाऱ्यांचा निषेध

१२) स्वप्निल, सई आणि सचिन या मराठी कलाकारांनाच ट्रोल करणाऱ्यांचा निषेध

१३) प्रेमविवाहात पत्रिका बघणाऱ्यांचा निषेध

१४) लहान मुलांना परीक्षा आहे म्हणून खेळायला न सोडणाऱ्या पालकांचा निषेध

१५) समलिंगी संबंधाना नावे ठेवणाऱ्यांचा निषेध

१६) एखाद्या व्यक्तीला ईंग्लिश येत नाही किंवा ती मातृभाषा अशुद्ध बोलते/लिहिते म्हणून तिला नावे ठेवणाऱ्यांचा निषेध

१७) महापुरुषांना अमुकतमुक जातीचे लेबल लावणाऱ्यांचा निषेध

१८) कपड्यांवरून मुलीचे कॅरेक्टर ठरवणाऱ्यांचा निषेध

१९) सोसायटीत लहान मुलांना खेळायला जागा न देता पार्किंगला प्राधान्य देणाऱ्यांचा निषेध

२०) बड्डेमध्ये रिटर्न गिफ्ट देण्याची प्रथा जोपासणाऱ्यांचा निषेध

तुर्तास क्रमश:

पण...

२१) ज्यांनी हि पोस्ट पुर्ण वाचली नाही त्यांचाही निषेध !

इथे येवुन खास निषेध करणार्‍यांचा घोर निषेध (हा घोर अपमानाच्या कॅटेगिरीतला आहे).
सध्या इतकच ठीक आहे. वाटल्यास अजुन निषेध केला जाईल.

दिवसागणिक भसाभसा धागे कुठल्याही हगल्या मुतल्या कारणावर ( :- हे शब्द अश्लिल वाटल्यास मा प्रशासकांनी ही पोस्ट उडवावी ही विनंती ) काढणार्‍याचा निषेध. Proud

जेम्स बाँड Proud

कुठल्याही हगल्या मुतल्या कारणावर ( :- हे शब्द अश्लिल वाटल्यास
>>>>

या शब्दांना ओंगळवाणे, किळसवाणे, बीभत्स म्हणू शकतो. अश्लील नाही म्हणू शकत असे मला वाटते.
असो,
निषेध मात्र योग्य आहे. असे धागे मायबोलीवर फार दिसतात. कधीतरी माझ्याकडूनही असला धागा निघाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला वाटते कुठल्या विषयांवर धागा असावा आणि कुठल्या विषयावर धागा नसावा यासाठी एक धागा काढणे गरजेचे आहे.

Pages