सरत्या वर्षाने काय दिलं?

Submitted by अजिंक्यराव पाटील on 13 December, 2021 - 22:10

सरणाऱ्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये तुमच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींची नोंद करा, आनंद असो व दुःख वाटून घ्या..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्यापासून सुरुवात करतो!
सर्वात आधी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माझी सई- माझी बायको माझ्या आयुष्यात आली. खरं तर २०२० च्या शेवटी शेवटीच.. पण खरं प्रेमात पडलो ते २०२१ मध्येच.
मला खूप गरज असताना आणि छान पगारवाढीसह नवा जॉब लागला.
माझं अनेक वर्षांचं चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
मग लग्न झालं. कोणतेही विशेष प्लॅन न करता कोकणात भरपूर भटकलो! आणि भर लॉकडाऊन असल्याने प्रत्येक ठिकाणी अगदी मनाप्रमाणे राहता वागता आलं! नेमका पावसाळा असल्याने मासे खाता आले नाहीत एवढंच दुःख!
माझ्या घरात, आप्तांमध्ये कुणी फार आजारी पडलं नाही.
एकंदर हे वर्ष छान गेलं..

अरे व्वा खूपच छान गोष्टी घडल्या तुमच्या आयुष्यात. अभिनंदन.
येते वर्षही तसेच चांगले जावो.>>>> +111111

अभिनंदन. इतक्या चांगल्या गोष्टी घडल्या.. येते वर्षही तसेच चांगले जावो........ +१.
कोणतेही विशेष प्लॅन न करता कोकणात भरपूर भटकलो!....... हे भारीय.

अभिनंदन!!

येते वर्षही तसेच चांगले जावो.
+११११

अभिनंदन !

मला हे मिळाले :

१. दोन छान कौटुंबिक मेळावे
२. इयत्ता दहावीतल्या वर्गमित्रांचं कित्येक वर्षांनी झालेले संमेलन
३. या संस्थळावरील अनेक जणांशी विविध धाग्यांवर झालेल्या सुंदर चर्चा.

अजिंक्य, किती मस्त वाटलं हे अपडेट वाचून.
गेल्या वर्षात इतके वाईट अपडेट ऐकले की असे अजून 4-5 चांगले वाचले की 2022 आनंदात घालवेन.

अजिंक्य, अभिनंदन !
मला मी बऱ्याच काळापासून शोधत होतो ते डीसकन्टीन्युड परफ्युम्स मिळाले दुबईच्या एका रिसेलरकडून. करोनाने बऱ्याच महिन्यांपासून कस्टमला गुंतला होता बॉक्स पण मी आणला सोडवून बरोबर. आणखी बरेच वाटेवर आहेत.

अभिनंदन. इतक्या चांगल्या गोष्टी घडल्या.. येते वर्षही तसेच चांगले जावो........ +१.
२०२१ ने व्हॅक्सिनेशन्स दिली >> क्या बात!! मोठे पाऊल आहे हे ...

कुमार१.. छानच की! तुमचे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद खूप वाचनीय असतात.
जिद्दु: सुगंधी वेड आहे म्हणायचं तुम्हाला! काही काळापूर्वी मी मिट्टी अत्तर घेतलं होतं, शिवाय रुह गुलाब आणि अजून एक जन्नत उल फिरदोस की काहीतरी.. घेताना छान वाटतं पण नंतर ते फार डार्क वाटतात. असं काही असतं का की बंद राहिल्याने डार्क होतात वगैरे? मिट्टी अत्तरला तर आता पूर्वीचा ओल्या मातीचा गंध येतच नाही.

पाटील हार्दिक अभिनंदन व सुखाची कमान अशीच चढती राहु दे येत्या वर्शांमध्ये.

जिद्दु: सुगंधी वेड आहे म्हणायचं तुम्हाला! काही काळापूर्वी मी मिट्टी अत्तर घेतलं होतं, शिवाय रुह गुलाब आणि अजून एक जन्नत उल फिरदोस की काहीतरी.. घेताना छान वाटतं पण नंतर ते फार डार्क वाटतात. असं काही असतं का की बंद राहिल्याने डार्क होतात वगैरे? मिट्टी अत्तरला तर आता पूर्वीचा ओल्या मातीचा गंध येतच नाही.>> रुह गुलाब जन्नत उल फिरदोस आमच्याकडे आहेत. क्रॉफर्ड मार्केट मधील दुकानात मिळतील की. इंपोर्ट करू नका.

इतर मिट् टी हे तसे सुद्द्धा एकदम अवघड आहे बनवायला. केळकरचा जुना रोमान्स सोनिया चार्ली असा तीन बाटल्यांचा पॅ क फार फेमस होता एके काळी.

ह्या वर्शात मी मेजर हेल्थ चॅलेंजेस फेस करुन पुढे आले. अगदी निराशेची गर्ता चालुन पुढे आले. आता एका निर्मळ आनंद ज्ञानी परिस्थितीत वावरत आहे.

वयस्कर कुत्र्याची पण सर्जरी झाली तिचे ट्युमर बिनाइन निघाले पण तब्येत सुधारली.

लेक शिक्षण पूर्ण करून नोकरीत रुजू झाली. एक क्षण होता जेव्हा मी २००८ मध्ये इथे डोळे पुसत एकटे पालक बाफ उघडला होता. व हा एक क्षण आहे जेव्हा ती आर्थिक व शैक्षणिक बाबीत समर्थ व स्वतंत्र झाली. मना सारखे शिक्षण घेउन. म्हणजे कार्मिक कर्तव्ये पूर्ण झाली असा ए क क्ष ण असतो तो या वर्शी अनुभवला.

ह्या मुळे जीवनात प्रथमच काळजी करणे व काळजी घेणे अकाउंट आता ऑन होल्ड आहे. अशी परिस्थ्ती पहिल्यांदाच आलेली आसल्याने नवे
बा ळ प ण सुरु आहे. मनाला येइल ती खरेदी व गेम खेळणे खादाडी, करोना अनुसार फिरणे वगैरे.

नव्या वर्शाचा संकल्प धागा येइलच प्ण कमी खा कमी खर्च करा हाच आमचा संकल्प आहे.

2021 उजाडले तेव्हा माझ्या नाकात व घशात नळी होती, बोलता येत नव्हते व नाकावाटे फक्त पातळ पदार्थ घेऊ शकत होतो. आता व्यवस्थित झाली आहे तब्येत. सर्व दैनंदिन कामे व व्यायाम करतो. सध्यातरी कॅन्सरमुक्त आहे. पूर्ण कुटुंबाला करोना होऊन गेला. त्यामुळे 2021 ने मला पुनर्जन्म दिला असे म्हणीन.

काय सुंदर सुंदर प्रतिसाद येत आहेत एकेकाचे.
अमा किती छान वाटलं वाचून.
शरदजी काळजी घ्या. असेच निरामय उदंड आयुष्य आपल्याला लाभो.
धागा छान आहे अजिंक्यराव पाटील.

2021 उजाडले तेव्हा माझ्या नाकात व घशात नळी होती, बोलता येत नव्हते व नाकावाटे फक्त पातळ पदार्थ घेऊ शकत होतो. आता व्यवस्थित झाली आहे तब्येत. सर्व दैनंदिन कामे व व्यायाम करतो. सध्यातरी कॅन्सरमुक्त आहे. पूर्ण कुटुंबाला करोना होऊन गेला. त्यामुळे 2021 ने मला पुनर्जन्म दिला असे म्हणीन.>> शरद आयुरारोग्य चिंतन. पुढील वा टचाल सुखाची होवो. आपले अनुभव कॅन्सर सोबत जीवन ह्या गृप मध्ये जमेल तसे शेअर करा.

फेसबुक वर कॅन्सर सर्वायवर्स इन्डिया गृप चांगला व मदत करणारा आहे. अमित मिश्रा त्यांचा अ‍ॅडमिन फार चांगली माहिती देत असतात.

हो अमा नक्की. पण तो मला अँप वर ग्रुप कसा शोधायचा तेच कळत नाही, पण मी नक्की लिहायचा प्रयत्न करीन. अगदी लगेच नाही, पण लिहिणार हे नक्की. बाकी तुमच्या व इतर मायबोलीकरांच्या शुभेच्छा असू देत पाठीशी.

वा हीरा! मला 'घबाड गवसेल' ह्या दैनिक राशीभविष्याची नेहमी गंमत वाटते. खरं आहे उत्तम आरोग्य असणे घबाड आहे. शरद सर, खूप शुभेच्छा!!

Pages