मायबोलीकरांचे आभार - कथाकारीला पुरस्कार

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2021 - 09:50
kathakari

नमस्कार मायबोलीकर,

माझ्या कथाकारी या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.

या सर्व कथा प्रथम मायबोलीवरच लिहिल्या गेल्या. त्यातील निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला.

या सर्व कथांवर आलेले अभिप्राय हे मला आधीहून अधिक बरे लिहिण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहीत करत होते. एका अर्थाने, येथील वाचकवर्गाने केलेला लोभ आणि येथील प्रशासनाने दाखवलेले औदार्य हेच या पुरस्कारास कारणीभूत आहेत.

गझल लेखनाने मला अनेक पुरस्कार दिले, पण गद्य लेखनाला मिळालेला हा पुरस्कार मला एक वेगळाच आनंद देऊन गेला.

येथील प्रशासक, वाचक, प्रोत्साहक, सकारात्मक टीकाकार यांचे मी मनापासून आभार मानत आहे.

येथे मिळालेला स्नेह मला या वळणावर घेऊन आला आहे याची नम्र जाणीव मनात ठेवून थांबतो.

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कथाकारी या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. >>> वा! मस्त बातमी. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

खूप छान बातमी बेफि! मनापासून अभिनंदन!
मायबोलीवर लिहीलेल्या कथांचं पुस्तक प्रकाशित झालं. हा क्रम असाच चालू ठेवायचा तर इथे नव्या कथा लवकरच येऊ देत. :आदरमोदः:

ह्या निमीत्ताने अजून एक : तुमच्या दोन दीर्घ कथा वा कादंबर्‍या - १. हाफ राईस दाल मारके २. गुड मॉर्निंग मॅडम
माझ्या मते या दोन्ही कथांमधे सिनेमाच्या पटकथांचे पोटेन्शियल आहे. जाणकारांना विचारुन मनावर घ्या.
पुन्हा एकदा खूप अभिनंदन!

तुमच्या कथा प्रचंड वाचनीय आणि खिळवून ठेवणार्‍या आहेत. अजूनही लिहीत राहा. आवडेलच वाचायला++११११

हार्दिक अभिनंदन!!

अभिनंदन बेफिकीर! तुमच्या कथेवर प्रतिसाद देता यावा म्हणून मायबोली सदस्य झाले होते!
शुगोल, +१

अभिनंदन बेफि! अनेक शुभेच्छा! असेच पुरस्कार मिळत राहो.
तुमची कथा वाचुनच माबो सदस्यत्व घेतलं होतं.
माबोवरही लिहित रहा.

मध्ंतरी तुमची विचारपुस करायचं फार मनात येत होतं. रियाला पण विचारणार होते. पण राहून गेलं. कसे आहात?

अभिनंदन बेफिकीर!!!

हल्ली तुमच्या कथा येत नाहीत मायबोलीवर, बघा जमल्यास एखादी कथा नववर्षानिम्मित लिहून प्रकाशित करा.

मनःपूर्वक अभिनंदन ! पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा !

प्लीज , अपूर्ण कथानके पुर्णत्वाला न्या. किंवा वेळ असेल तर नवीन लिहा.

Pages