खादाडी: ठाणे

Submitted by admin on 27 May, 2009 - 01:04

ठाण्यातल्या खादाडीबद्दलंचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाम्भळी नाका - प्रीती sandwitch . चटणी अप्रतिम.

अगं चिंतामणीज् चं दुकान आहे ना, त्याच्या बरोब्बर पाठी, तिकडे बरीचशी ९९ - ४९ डॉलर शॉप्स आहेत. तिथलं व्हेज चिलीमिली सँडविच मला भारी आवडतं..

ह्या रविवारी जाऊया का? Happy

जाऊ की ! Happy तुमच्या जवळचं प्रशांत कॉर्नर खूप फेमस झालंय गं. ते रेस्टॉरंट नाहीये ना पण !

जागमाता मंदिराजवळच्या क्रॉस कडे (कोलबाड) वडापाव अप्रतिम. लुईस सलूनच्या समोर.

अमीत, वडापाव बहुतेक सगळीकडलाच छान लागतो कारण मुळात वडा अफलातून असतो व वडापाव काँबिनेशन तर ग्रेट Happy कोलबाडात एक चायनिजचा ढाबा पण आहे ना रे फेमस?

वा खादाडी जोरात चालू आहे.

एवढा काही ग्रेट नाहीये. चायनीज मीनाताई ठाकरे चौकात नेहरूंच्या पुतळ्याकडे चांगल आहे. (आमच्या नाक्याजवळ, म्हणून तिथेच पडीक असतो

ashwini_k - manjud ने लिहिलच आहे. थोडी भर घालते.
' प्रीती ' चे मसाला टोस्ट सँडविच छान आहे. खास करुन सँडविच मधली हिरवी चटणी - ही चटणी ते लोक पाट्या वरवन्ट्या वर वाटतात. (असे म.टा. आले होते.) त्यामुळे तिची चव मस्त लागते. + जी चटणी प्लेट मध्ये देतात ती लाल मिरची चा ठेचा/रन्जका सारखी झणझणीत असते.

१. मामलेदारच्या झणझणीत मिसळीविष्यी लिहायची गरज नाहीच.
२. हिरानंदानीमधलं रिव्हीएरा ट्राय करा. महाग आहे पण समर डिलाईट सॅलॅड मस्ट आहे.
३. LBS रोडवर मुलूंड चेकनाक्यावरच्या पप्पू पल्टीच्या गाडीवरचे अंड्याचे पदार्थ.
४. पूर्वी दैनिक चिकनच्या मखमली तलावाजवळच्या शाखेत चिकन लिव्हरची (लॉलीपॉप स्टाईलची) भजी मिळायची. आता कुठे मिळत असतील तर कळवा.

कुठून सुरुवात करावी बरं.. श्रद्धा मधली मूगभजी, प्रशांत मध्ये रगडा पॅटीस आणि छोले समोसा, पूजा किंवा सन्मान मधला उत्तम असा सांबार्..पाणीपूरीचा जरा प्रश्नच आहे..खरं तर अजून मनासारखी (म्हणजे नागपूर सारखी)मिळाली नाहीए..पण पाणिपूरी तर हवीच..म्हणून नविन टिपटॉप (लोकपूरम)मधली. झालंच तर टेम्प्टेशन मधलं हनी अंजीर.. आता बस्..एवढंच..

खरंय मामलेदारच्या मिसळीबद्दल लिहायची काहीच गरज नाही. त्यांची साधी मिसळ खाऊन पण कानातून धूर आणि नाकातून पाणी वाहायला लागले होते.

राम मारूती रोड ला समर्थवरून थोडंसं पुढे गेलं की सेलिब्रेशनच्या किंचित अलीकडे (जिनी अ‍ॅन्ड जॉनी दुकानाबाहेर) असलेलं सँडविचही माझं आवडतं आहे.

झालंच तर वामन ह. पेठे दुकानावरून राममारूतीला जाताना छोट्या गल्लीतून (दुकानांच्या) गेलात तर तिथे असलेला पाणीपूरी वाला ही छान आहे.

हे सगळं खाऊन झाल्यावर राजमाता च्या कोकम सोड्याबद्दल ठाणेकरांना वेगळं सांगायची गरज नाहीच.

सी फूड /मालवणीसाठी विजयदुर्ग. नवनीत मोटर्सच्या जवळ. स्वस्त आणि मस्त.

राजमाताचा वडापाव, कोकम सोडा.. दुर्गा स्नॅक्सचा वडापाव, भजी, लिंबू सरबत..
झालेच तर गोखल्यांकडचे फराळाचे पदार्थ..
आणि पाणीपुरी.. पूर्वी पुष्पकची बरी असायची आता नाही.

सुमारे ४-५ वर्षांपूर्वी, स्टेशनजवळ, पुष्पकच्या गल्लीत एक 'अन्डे का फन्डा' नावाचं एक छोटंसं रेस्तरां होतं (आता जिथे ग्रीन गुरु आहे तिथे).ते बंद झालं..परत कुठे सुरु झालंय का?

आईस्क्रीम वडा नमस्कार हॉटेलमध्ये मिळायचा , आता मिळतो की नाही माहित नाही .
पुष्पक च्या शेजारचा कुलकर्ण्यांचा वडा क्लास . तसाच आपटे वडेवाल्यांचा ( ए. के जोशी शाळेच्या गल्लीत ) सुद्धा मस्त असतो .
शिवसागर आणि शिवाप्रसाद ( राम मारुती रोडवर असलेली ) सहसा सगळेच पदार्थ ए वन असतात . पण सिझलर्स अप्रतिम .
प्रताप टॉकिजच्या पुढे पै हॉस्पिटलसमोरच्या स्वरा मध्ये फिश खायलाच हवे . चिकन टिक्का न चुकवावा असा.
गावदेवी मार्केट मधून बाहेर पडल्यावरच्या रोडवरील हनुमान मधले चाट खाऊन बघाच. उभे राहायला खूप जागा नाहीये , म्हणून कमी गर्दीच्या वेळी जाणे इष्ट .
प्रशांत कॉर्नरला भेट देणे अत्यावश्यक . Proud
घरगुती पदार्थांसाठी जसे चिवडा , विविध लाडू , मिक्स पीठे , मसाले , इ.साठी श्रद्धा ( घंटाळी देवळासमोर ) .
मराठमोळ्या थाळीसाठी ब्राह्मण सोसायटीमधले स्वाद .
वागळे इस्टेटला जातानाच्या रस्त्यावर टिप टॉप ची थाळी खायची असेल तर एक दिवस उपास करुनच जावे . तिथल्या जेवणाला उत्तम न्याय देता येतो हा स्वानुभव . Proud
ही सर्व माहिती दोन वर्षापूर्वी पर्यंतची .
लेटेस्ट माहिती म्हणजे घोडबंदर रोडवर सिने वंडर समोरचे विहंग पाल्म्स ( हे म्हणजे इंग्लिश नको लिहायला म्हणून )
आणि बार्बेक्यू नेशन .

आइसक्रिम वडा ( फ्राईड आइसक्रिम ना ? )मुलूंड च्या लाईफस्टाईल मधे एक थाय हॉटेल आहे, नाव आठवत नाही, तिथे मिळतो.
सरस्वती मराठी शाळेसमोर 'ग्रील' नावाच एक फक्त सिझलर्स मिळणार हॉटेल होत, ( जिथे आता केसरी आहे ) ते अचानक बंद झाल, ते ही मस्त होत.
आलोक च्या वर टॉप फ्लोअर वरचे 'एक्सपिरीअन्स' , नितीन कंपनी समोरच 'ओरीएन्टल स्पाईस'.

काल टेम्प्टेशन्स कडे 'मँगो मेल्बा' खाल्लं.... अहाहा!!! पैसा वसूल डेझर्ट आहे. फ्रेश क्रिम फेटवून त्यात मँगो फ्लेवर घालून त्यावर मँगो आईसक्रिमचा एक स्कूप, आणि त्यावर हापूस आंब्याचे तुकडे..... वॉव!!

लोकहो, सीझन संपायच्या खाऊन घ्या....

अरे पाणीपुरीचा उल्लेख केला कुणीतरी...

विष्णूनगरातून रा.मा. रोड कडे जाताना चौकात डाव्या हाताला एक गाडी असते. शिवाय इव्हिनिंग स्पॉट तर प्रसिद्ध आहेच रा.मा. रोड वरचं....

सुंदर च्या कट्लेट बद्द्ल काय मत आहे? आता कॉलिटी जरा कमी झालीय नई?

मामलेदार ची मिसळ मी चविष्ट पदार्थात गणत नाही. मुळात 'तिखट' ही चव नव्हे. असं असूनही दुनिया.... ती मिसळ जाऊन का खाते हे एक कोडं आहे माझ्यासाठी.

विष्णू नगरात 'गारवा' फाउंटन
विविध प्रकारचे सोडे (पिण्याचे) मिळतात...

वसूल आहे...

जाऊन बघाच.

वाहवा..........! एव्हढी खादाडी करून पोट भरलं. खवय्या चं नाव कसं काय यादीतून निसट्लं?बाकी ढोकळा, स्पेशल वाटी ढोकळा , उन्धिया खायला मुलुंड आहेच जवळ!

युगन्धर,

अंडे का फंडा जबरी होतं ! जबरी !
पण का बंद झालं तोच माणूस जाणे.

त्याच्याच बाजुला एक पलछिन डाईन नावाचं एक्स्क्लुसिव्हली नॉनव्हेज रेस्त्रां होतं ! तेही बंद पड्लं. श्या !

अमित, अरे ते कोलबाडचं वडापावचं दुकान माझ्या मामाचंच आहे. दिलिप झुंजारराव त्याचं नाव. दुकानाचे नाव रुची स्नॅक्स. आत्ता गेल्या वर्षापासुन ते चालवायला दिलय.

त्याने खुप कठीण परिस्थितीत सुरु केलेलं दुकान आहे. त्याची कंपनी बंद पडली. इंदिरा गांधी मारली गेली. ठाणे दोन का तीन दिवस बंद होते. त्याच सुमारास घरी आलेल्या पाहुण्यांनी त्याच्या मुलांच्या हातावर ( म्हणजे माझ्या मामेभावंडांच्या) खाउसाठी ७ रुपये ठेवले. त्या भांडवलावर त्याने पहिल्यांदा बटाटेवडे बनवुन विकायला ठेवले. ते विकले गेले म्हणुन आलेल्या पैश्यातुन पुन्हा सामान आणले आणि अशा रितीने या दुकानाची सुरुवात झाली.

थाने मधे हस्त् कला च्य बजुल एक vadapav ani bhaji bhav milte ti pan chan aste kon tari gujrati hai. mi donda tari khale chan aste.

Just Parathas सुद्धा विसरलात का?

कुंजविहारचा जम्बो वडापाव आता बंद झाला का ? शालेत अस्ताना कुंजविहारचा वडापाव आणि अशोक टॉकीजच्या बाजुच्या गल्लीत भजी पाव खायचो. आणि स्वीट साठी खण्डेलवाल .. Happy

Pages