सावली

Submitted by 'अवलिया' on 14 November, 2021 - 09:38

एकटी निघाली नार....
लावून घराचे दार....
अंधराहूनही
गूढ तिच्या डोळ्यांमधला अंधार....

ओसाड नदीच्या काठी....
अनवाणी तुडवीत माती....
अबला बेसावध
कुठे चालली अमावस्येच्या राती....

गावाच्या वेशीपाशी....
थांबून जुन्या विहिरीशी....
तोंडात बडबडे
काहीतरी ती भांबावून कोणाशी....

सावली मलाही दिसली....
झाडाडून धूसर काळी....
हा तिचा पती जो
आगीत मेला होता एकेकाळी....

- अवलिया

Group content visibility: 
Use group defaults

नमस्कार....
माझी मायबोलीवरची ही पहिलीच कविता....
आवडली तर नक्की प्रतिसाद द्या....