मुलांच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट सुचवा.

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2021 - 12:54

सर्वप्रथम प्रामाणिकपणे सांगू ईच्छितो की रिटर्न गिफ्ट काय द्यायचे याआधी त्याचे पर पीस बजेट काय असावे याचा अंदाज घेणे आणि मगच त्या बजेटमध्ये काय घेता येईल हे शोधणे असे मध्यमवर्गीय कुटुंब आहोत आम्ही.

तर आम्ही याआधी भाड्याने राहायचो त्या सोसायटीमध्ये मुलांच्या वाढदिवसाला केवळ दहा बारा मुलेच यायची. ती अधिक एक-दोन नात्यातील आणि कामवाल्या मावशींची पकडून आकडा पंधराच्या फार पुढे जायचा नाही. त्यामुळे व्यवस्थित योग्य बजेट राखत रिटर्न गिप्ट देता यायचे जे मुलांना आवडेल आणि उपयुक्तही ठरेल.

मुलीच्या आधीच्या प्लेग्रूप नर्सरीलाही मोजकीच मुले होती. त्यामुळे तिथेही रिटर्न गिफ्टचे बजेट काय ठेवावे या प्रश्नाने फार सतावले नाही. नंतर शाळा बदलली तशी मुले वाढली पण त्या शाळेत बड्डे सेलिब्रेट करताना रिटर्न गिफ्ट नावाचा प्रकार अलौडच नव्हता.

त्यानंतर मग नव्या सोसायटीत मुलीचा वाढदिवस झाला तेव्हा ईथले सारे रहिवाशी नवीनच होते. तरीही मुलीने वीसपंचवीस मुलांना गोळा करून आणले होते. तेव्हा या सोसायटीत रिटर्न गिफ्ट नावाचे फॅड सुरू करायचा पहिला मान पटकवायचे आम्ही टाळले. पण नंतरच्या ईतर बड्डेजना ती प्रथा सुरू झालीच.

आता मुलाचा बड्डे येतोय तर आम्हालाही रिटर्न गिफ्टचा खर्चा करावाच लागणार. पोरगी जगतमित्र असल्याने तिच्याच मित्रमैत्रीणींनी घर भरणार. तिला नेमकी किती तो आकडा मोजायला लावला तर तिने चटचट पन्नासेक नावे घेतली. मग आम्ही त्यातील काही मोठ्या वयाच्या मुलांवर काटछाट मारली आणि तिलाही बजावले की सगळीकडे उगाच दवंडी पिटू नकोस. तेवढेच रिटर्न गिफ्टचे बजेट कमी होईल. वा पर पीस बजेट वाढेल असेही म्हणू शकता.

पण तरीही तीस ते पस्तीस मुले येतीलच. ईतर वरचे घरचे दोनचार आणि थोडीशी मार्जिन पकडून साधारण चाळीसेक रिटर्न गिफ्ट मागवावे लागतील. त्याचसोबत मुलाची ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष शाळाही सुरू झालीय. तिथेही दहा बारा गिफ्ट आणखी पकडा. अर्थात ती सगळी छोटूशी चार वर्षांचीच मुले असल्याने त्यांच्यासाठी वयाला साजेसे वेगळे गिप्टस आणायचा विचार करतोय. सोसायटीतील मुले मात्र तीनचार ते दहाबारा वयापर्यंतची मिक्स येतील.

आमच्या ओवरऑल बड्डे बजेटनुसार आणि मुलांचा आकडा पाहता पर पीस बजेट आम्ही ७० रुपये ठरवले आहे. तरी आधी मी पन्नासच म्हणत होतो. पण बायकोने झुरळासारखे झटकले. एवढ्यात काही येत नाही म्हणाली. उगाच काहीतरी द्यायचे म्हणून द्यायचे हे मलाही पटत नाही. आणि न देण्याचाही जणू पर्यायच नाही. पण चारचौघांकडे चौकशी केली तर स्वस्तातही मस्त मिळू शकतेच. मग नेहमीसारखी मायबोली आठवली. प्लीज मदत करा स्वस्त आणि मस्त रिटर्न गिफ्ट सुचवा. सोबत एक नग कितीला पडेल हे सुद्धा लिहा. ऑनलाईन लिंका दिल्यास उत्तमच. अन्यथा बड्डेच्या ईतर खरेदीसाठी वाशीच्या एपीएमसी मार्केटलाही राऊंड मारायचा विचार आहेच. तिथेही बघता येईल.

धाग्याचा फायदा सर्वांना _/\_

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिल्मी मासिकं, फिल्मी स्टीकर्स असे चालेल ना ? गाजलेले फिल्मी संवाद, फिल्मी व्हिलन्स, फिल्मी डबल रोल्सचे असे सगळ्या फिल्म्सचे एक्सेल शीट बनवून फनी इतिहास द्यायचा. जमल्यास रीळं मिळवूना द्यायची. वाढदिवस पण एकदम फिल्मी स्टाईलने होऊन जाऊ दे. इथे व्हिडीओ बघता येईल. एखाद्या फिल्मी स्टुडीओतच करावा.

सामी धन्यवाद, करतो चेक.
ऑनलाईननंतर आमची बरीच भिस्त एपीएमसी मार्केटवर असते. आज बायको ईतर खरेदी करायला तिथे भटकून आली. पण तिला स्टोरी बूक्स हवे तसे मिळाले नाहीत. पुस्तकात शब्द कमी आणि चित्र जास्त त्यामुळे बजेट जास्त असाच प्रकार होता म्हणाली. तरी आवडलेल्या ईतर दोन तीन आयटमचे फोटो काढून आणले. आता शनिवारी मी सुद्धा तिच्यासोबत उरलीसुरली खरेदी करायला जाईन तेव्हाच काय ते फायनल करू. पण वर्षातून दोनदा हा सण येतो. एका बड्डेला तरी स्टोरीबूक्स वाटणारच.

National Book Trust (NBT) ची मुलांसाठी भरपूर पुस्तकं कमी किंमतीत मिळतात. ऑनलाईनही घेता येतात. साईट बेक्कार आहे, पण पुस्तकं येतात घरी ऑर्डर केल्याप्रमाणे.

Pages