पेट्रोल/डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. खाजगी गाडीने प्रवास करणे हळूहळू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. पेट्रोलवाढ अशीच सुरु राहिली तर लवकरच पेट्रोल मटणापेक्षा महाग होईल आणि येत्या काही वर्षात सोन्यापेक्षा महाग होऊ शकते. अशी वेळ आली तर लोकांना बाहेर फिरणे कठीण होईल कारण पेट्रोल चोरीसाठी अनेक गाड्यांवर दरोडे पडतील. त्यामुळे सायकल व पायी जाण्याशिवाय लोकांकडे पर्याय उरणार नाही. इलेक्ट्रिक कारने बाहेर फिरणे पण अवघड होईल कारण गाडयांना चार्जिंगसाठी जनरेटरची गरज असते आणि जनरेटर डिझेलवर चालतात. त्यामुळे त्या जनरेटरवर पण कोणीतरी डाका टाकून त्यातलं डिझेल लंपास केलं असेल. तर या समस्येवर तुम्ही काही विचार केला असेल तर सांगा. मी स्वतः पेट्रोल २०० रुपये, जास्तीत जास्त २५० रुपये गेल्यावर गाडी वापरणे बंद करणार आहे. याला दोन कारणे आहेत पहिलं म्हणजे एकदा का २५० चा आकडा ओलांडला कि पेट्रोल एक्सपोनंशिअली वाढणार. आणि दुसरं म्हणजे अचानक सायकल वापरणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आधीपासूनच थोडी थोडी सवय केलेली बरी. तुमच्या डोक्यात या संकटापासून वाचण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगा.
पेट्रोल किती रुपये गेल्यावर तुम्ही गाड्या वापरणे बंद कराल?
Submitted by अनिळजी on 27 October, 2021 - 05:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जिज्ञासा ओके.. thnx
जिज्ञासा ओके.. thnx
संघराज्य सरकार पेट्रोलवर १८
संघराज्य सरकार पेट्रोलवर १८ रु. पर लिटर इतका रस्ते आणि पायाभूत सुविधा अधिभार लावतं. त्या पैशांतून बांधलेल्या रस्त्याने जाताना आपण टोलही देतो.
मी स्वतः पेट्रोल ११५ रुपये
मी स्वतः पेट्रोल ११५ रुपये झाल्यावर गाडी वापरणे बंद करेन.
.
.
.
.
आणि ११६ रुपये झाल्यावर पुन्हा चालू करेन. मजबूरी का नाम गाडीस्वारी.
करोडपतीची सुंदर बायको ५० लाख
करोडपतीची सुंदर बायको ५० लाख कॅश आणि करोडोंचे दागिने घेऊन रिक्षावाल्याबरोबर पळाली ही बातमी वाचून वडे विकण्याचा धंदा बंद करून रिक्षा चालवावी असे वाटू लागले आहे. पेट्रोल कितीही महाग झाले तरी वांदा नाय.
(No subject)
कार वाल्या बरोबर पळणे
कार वाल्या बरोबर पळणे लांबच्या प्रवासाला सोयीचे झाले असते का?
करोडपती सुंदर बायका म्हणतील
करोडपती सुंदर बायका म्हणतील ते वाहन चालवणे इतकेच आपल्या हातात असते. इस्तरीवाद.
कामाला जायला उशीर झायलाय...
कामाला जायला उशीर झायलाय... बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला.
यात 'कारवाला' मात्रेत बसत नाही त्याचं काय???
लॅंबोर्गिनी चलाईं जाए दो, सानु वे सुटा दे दो, की गली गली जाए जाने दो... हे गाणं लागलं तर मग जाईल लँबोर्गिनी वाल्याबरोबर. सुट्टे पैसे घेऊन.
तेवढं 'बघतोय स्कोडावाला'
तेवढं 'बघतोय स्कोडावाला' बसतंय का बघा की वो.
हो! सोडावाला पण बसेल. बाबुज
हो! सोडावाला पण बसेल. बाबुज मॅरेज फिक्स्ड विथ लिमयेज डॉटर, चं बाबुज गॅरेज मिक्स विथ सोडा वॉटर! हा एक जोक पण रिसायकल करायला जमेल बहुतेक!
सुट्टे पार्किंग वाल्याला
सुट्टे पार्किंग वाल्याला द्यायला ना?टोल वाले फास्ट टॅग घेतात हल्ली.
मर्द फेरारीवाला मैं मर्द
मर्द फेरारीवाला मैं मर्द फेरारीवाला...
नाही ना जुळत? काय उपयोग रे तुझ्या ते फेरारीचा? विकून मंक हो जा.
We already have a monk who
We already have a monk who sold everyone's Ferrari
सरकारने कंपनी करात कपात
सरकारने कंपनी करात कपात केल्याने एका वर्षात १.४५ लाख करोड रुपये इतका कर कमी आला.
तो पेट्रोल डिझेलमधून वसूल करण्याला पर्याय नाही.
९९ वर्षांची लीज संपल्यावर
९९ वर्षांची लीज संपल्यावर पेट्रोलचे भाव काय असतील?
आपल्याला पौंडात पैसे मोजावे लागतील का?
करोडपतीची सुंदर बायको ५० लाख
करोडपतीची सुंदर बायको ५० लाख कॅश आणि करोडोंचे दागिने घेऊन रिक्षावाल्याबरोबर पळाली>>>> तुम्हाला कसं माहित कि ती सुंदर होती?
ईथे वडेवाला आहे तुम्ही
ईथे वडेवाला आहे तुम्ही स्कोडावाला आणि सोडावाला म्हणतायं!
वडेवाला चालतोय की!
सुंदर बायका करोडपतींशीच लग्न
सुंदर बायका करोडपतींशीच लग्न करतात.
मागे एकाने कार्यालयाच्या
मागे एकाने कार्यालयाच्या आवारात घोडा बांधायला परवानगी मागितली होती. पेट्रोल असंच वाढत राहिले तर सगळ्यांनाच अशी परवानगी घ्यावी लागेल.
ऑफिस ला जाताना बैलगाडी पूलिंग
ऑफिस ला जाताना बैलगाडी पूलिंग करवं लागेल. हिंजवडीत बैलगाड्या उभ्या करायला छावण्या उभाराव्या लागतील.
भारतीय कित्ती नशीबवान!
भारतीय कित्ती नशीबवान!
नाही पेट्रोल तर इतर अनेक सुविधा आहेत इकडून तिकडे जायला.
इथे मी ऐकले की कॅलिफोर्नियात जेंव्हा पेट्रोल (गॅस) function at() { [native code] } function at() { [native code] }इ महाग झाला तेंव्हा लोकांना रक्त विकून पैसे गोळा करावे लागले - स्वतःची चार चाकी गाडी नसेल तर इकडून तिकडे जायला पर्यायच नाही. नि कामावर तर जायलाच हवे!!
हिंजवडीत बैलगाड्या उभ्या
हिंजवडीत बैलगाड्या उभ्या करायला छावण्या उभाराव्या लागतील.>>>>
दिवसभर संगणकासमोर बसून काम करणारे संध्याकाळी ऊसाचे वाढे विकत घेताना दिसतील असं दृश्य डोळ्यासमोर आलं.
(No subject)
२०० रुपये ltr जरी पेट्रोल
२०० रुपये ltr जरी पेट्रोल झाले तरी लोक गाड्या वापरणार.
स्कूटर हे वाहन घेवूया एका ltr ल ४० km अंतर कापते.
म्हणजे एक km साठी. ५ रुपये पडतील.
Double सीट प्रवास केला तर २.५, रुपये च एक किलोमीटर साठी पेट्रोल चा खर्च येईल.
आणि तो सहज परवडणारा आहे
एकाच्या भाच्याचे आणि
एकाच्या भाच्याचे आणि दोघांच्या भाच्यांचे वजन एकच असेल का ?
घोडा,बैल ह्यांना सांभाळण्याचा
घोडा,बैल ह्यांना सांभाळण्याचा खर्च खूप जास्त आहे तो बिलकुल परवडणार नाही.
मायबोली सांभाळते की.
मायबोली सांभाळते की.
मायबोली सांभाळते की. >>>
मायबोली सांभाळते की.

>>>
Pages