खादाडी: तुळशीबाग, शनिपार

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:08

तुळशीबाग, शनिपार, मंडई, लक्ष्मीरोड भागात कुठं काय चांगलं मिळतं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पानावर पहिला मान मिसळीला!
पुण्यात मिसळ खावी ती खालील ठिकाणी :
१. श्रीकृष्ण मिसळ (तुळशीबाग)
२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)
३. श्री मिसळ (शनिपाराजवळ)
४. रामनाथ (टिळक रोड)

भेळ खायची असेल तर पुष्करणी ला पर्याय नाही. पुष्करणी विश्रामबाग वाड्यासमोर आहे. चितळे दही चक्का दुकान आहे त्याच्या जवळ.

ग्रीन बेकरी - चितळ्यांचे पलिकडे, शनिपार ला लागून, पॅटीस आणि कसली कसली नावे आहेत, वाचायला नी खायला झक्कास...

मंडई त एक "हॉटेल मंडई" आहे, रात्रभर चालू असते [FYI]

शनिवार वाड्याच्या समोर, पोलीस चौकीजवळ एक अण्णाची टपरी आहे - पोहे, इडली, वडा चांगला असतो - इथे चहा पिऊ नये, बकवास असतो

शनिपारा कडुन तुळ्शी बागे कडे जाणार्‍या रस्त्याला -अनोखा केंद्रा चा डोसा

कांता बेन चे खाकरा, तिथेच बाहेर भजी वडे मस्त गरम गरम असतात तिथेच आत अमृततुल्य चा चहा छान असतो

श्री मिसळ च्या समोर अणि सुजाता मस्तानी ची स्तुती वर झालेलीच आहे त्या समोर ची पाणिपुरी ही मस्त असते

विश्राम बाग वाड्याच्या समोर वडापाव छान मिळतो

मन्डईच्या आजू बाजूला - देसाइ बन्धुच्या बाजूला एक उसाच्या रसाचे गु-र्हाळ आहे. साधरण १९७५ च्या पासुन आईने घेउन दिलेला अर्धा ग्लास रस आठवतो.

श्रीक्रिष्ण ची मिसळ फरच उत्तम. तसेच कावरे कोल्ड्रिन्क्स आणि स्वीट होम - हया दोन आठवणी कायम लक्षात रहतिल - जवळ फरसे पैसे नसताना आइ वडिला.बरोबर केलेलि मजा आणि बालपण..
नॉस्टाल्गिया

Happy

वामन

विस वर्शा पुरवी पुन्यात्त खुप पैसा कोनाहि काडे नवता. अमेरिकेतुन येनारा तर अजिबात नवता . पन ते दीवस परत कधि येनार नाहित. फास्त फूद च्या जमान्यात आप्ले बालपान आथवते . आपले मन मारुन मुलान ची हाउस पुरवनारए पालक हि गेले. त्या मुले पुन्यात कधि कधि पोरके वाताते.

लक्ष्मीरोडला कॅनरा बँकेसमोर पूना गेस्टहाऊस मध्ये (पहिला मजला) ग्रामीण थाळी मिळते. भरली वांगी, भाकरी, मिर्चीचा खर्डा, चटण्यांची रेलचेल असते. स्पेअर रुमाल घेऊनच जावे ग्रामीण थाळी जेवायला. आणि शनिवारी गेलात तर बरे! मिर्चीचा खर्डा चेपला तर दुस-या दिवशीचा रविवार घरी आराम करण्यास सोयीचा होतो. Happy

विश्रामबाग वाड्यासमोरचा वडापाव छान. पण वडेवाले जोश्यांचा वडा; म्हणजे त्याच्या समोर खरवस चमचमित असा गुळचट म्हणावा लागेल. असो!

या पानावर पहिला मान मिसळीला!
पुण्यात मिसळ खावी ती खालील ठिकाणी :
१. श्रीकृष्ण मिसळ (तुळशीबाग) --- मस्तच!!!
२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)----आरारा...हि काय मिसळ आहे.फ्रिज मध्ये ठेवुन खाल्ली तर स्विट डिश होइल
३. श्री मिसळ (शनिपाराजवळ) --- ठिक
४. रामनाथ (टिळक रोड)--- सगळि कडुन पाणि पाणि होते.. लैच भारी...

जोगेश्वरीच्या गल्लीतले sandwich ची गाडी - मसाला टोस्ट , बॉम्बे sandwich
@सुयाशतात्या : नशिबाने आपण लिहिलेल्या चारही मिसळी खाण्याचे योग आले . उत्तम !

महबँकेकडु तुळशीबागेत शिरताना पूर्वी दवे स्वीट लागायचे. इथे मिळणारी पापडी (जेठालालचा फाफडा) व चटणी म्हणजे स्वर्गसुख होते. काळाच्या ओघात दवे स्वीटच गायब झाले. Sad

२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)----आरारा...हि काय मिसळ आहे.फ्रिज मध्ये ठेवुन खाल्ली तर स्विट डिश होइल
३. श्री मिसळ (शनिपाराजवळ) --- ठिक
>>>>> अनुमोदन..

आज सकाळी 10-30 च्या सुमारास बाजीराव रोड वरच्या वाडेश्वरभुवन समोर पार्सल साठी 7-8 लोकांची रांग पाहिली ...
चला पुणं पुन्हा एकदा नेहमीसारखं सुरू झालं..