किती?

Submitted by _आदित्य_ on 23 October, 2021 - 13:23

अपुल्याच कोशात जावे किती?
एकांत होऊन गावे किती?

स्मरणे तुझी.. पेलते काव्य माझे !
बिचाऱ्या वह्यांनी भरावे किती?

स्मरता मला तू.. मी डोळ्यांत येतो !
हवे आणखी ते पुरावे किती !?

चर्चेत कोणी तुझे नाव घेता..
लपवीत पाणी.. हसावे किती?

आतुर मीही नी आतुर तूही !
मने दोन हळवी ! दुरावे किती !?

अंत गोड होतोच ! ऐकून आहे..
म्हटले.. खरे ते बघावे किती !!

..........

Group content visibility: 
Use group defaults