Submitted by _आदित्य_ on 23 October, 2021 - 13:23
अपुल्याच कोशात जावे किती?
एकांत होऊन गावे किती?
स्मरणे तुझी.. पेलते काव्य माझे !
बिचाऱ्या वह्यांनी भरावे किती?
स्मरता मला तू.. मी डोळ्यांत येतो !
हवे आणखी ते पुरावे किती !?
चर्चेत कोणी तुझे नाव घेता..
लपवीत पाणी.. हसावे किती?
आतुर मीही नी आतुर तूही !
मने दोन हळवी ! दुरावे किती !?
अंत गोड होतोच ! ऐकून आहे..
म्हटले.. खरे ते बघावे किती !!
..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान. सुंदर लिहिता तुम्ही.
छान. सुंदर लिहिता तुम्ही.
छान. सुंदर लिहिता तुम्ही.>>>
छान. सुंदर लिहिता तुम्ही.>>>+1
Thank you.. वीरू आणि अस्मिता
Thank you.. वीरू आणि अस्मिता !
व्वाह!
व्वाह!
Thanks @indrajoshi !!
Thanks @indrajoshi !!