Submitted by मीसाक्षी on 10 October, 2021 - 04:21

दिवाळी साठी खास रंगीत आणि सोनेरी, चंदेरी क्रोशे टीलाईट होल्डर.. मेटल वाटी आणि व्हाईट वॅक्स कँडल/गुलाब कँडल सहित उपलब्ध.. यात रेडिमेड लाईट्सही ठेवता येतात. मेटल वाटी काढता येते त्यामुळे सुशोभित वाटी सारखा उपयोग ही करता येतो. दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळी देवासमोर सुका नैवेद्य किंवा फुलं ठेवायला उपयोग होतो. शिवाय हळदीकुंकू वाण म्हणून ही देता येतं. पूर्णपणे एकसंध आणि हाताने वीणलेले आहेत.
https://www.facebook.com/saarascrafts







विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह किती सुरेख.
वाह किती सुरेख.
वा, सुंदर.
वा, सुंदर.
मी 6 पणत्या आणि 6 टी लाईट
मी 6 पणत्या आणि 6 टी लाईट असा एक असे दोन सेट ऑर्डर केले होते. साक्षीने wa वर माझ्या सगळ्या शंका क्लिअर केल्या.
l वेळेत कुरिअर केल्या. पॅकिंग ही छान होत. कुरिअर वेळात आणि नीट आलं. पणत्या फारच सुंदर दिसत आहेत. काम अतिशय सुबक आणि नीट नेटकं आहे. पणतीत led टी लाईट लावला की अतिशय सुंदर दिसतंय.
ह्या वर्षीची आमची दिवाळी है अनोख्या सुंदर पणत्यांमुळे फार शोभिवंत असणार आहे. त्याच सगळं श्रेय साक्षी ला.
थॅंक्यु साक्षी .
थॅंक्यु अमुपरी, सामो, कुंद.
थॅंक्यु अमुपरी, सामो, कुंद.
ममोताई खुप खुप छान वाटतय तुमचा फिडबॅक वाचून... स्वतःहून कॉन्टॅक्ट करून तुम्ही पणत्या घेतलात.. अस मनापासून कौतुक झालं कलेच की अजून प्रोत्साहन मिळतं. थॅंक्यु सो मच
आज मी मागवलेल्या पणत्या आल्या
आज मी मागवलेल्या पणत्या आल्या! अतिशय सुबक काम, वजनाला हलकी आणि सर्व रंग खूप आकर्षक आहेत. प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट! मला जांभळा रंग फारच आवडला! पिवळा सुद्धा खूप उठून दिसतो! ह्याआधी नेहमी तेलाच्या पणत्या असायच्या घरी, पण रात्री गल्लीतली मांजरे उच्छाद मांडून जिनाभर तेल तेल करायच्या. ह्या वर्षी एकदम neat & tidy दिवाळी!
सहज मायबोलीवर काय चाललंय म्हणून आले, हि पोस्ट पाहिली आणि तेव्हाच पणत्या मागवल्या. दिवाळीला जेमतेम एक आठवडा उरला असताना मीसाक्षी ह्यांनी तत्परतेने सगळ्या पणत्या बनवून पाठवल्या सुद्धा! त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार! पुढच्या वेळी उरलेले रंगही मागवणार!
प्रचि इथे.
खूप खूप धन्यवाद जरबेरा, इथेही
खूप खूप धन्यवाद जरबेरा, इथेही रिव्यु लिहिल्या बद्दल. तुम्हा सगळ्यांचा रिस्पॉन्सच इतका छान होता की मी उत्साहाने भारावून गेले.. अगदी कालपर्यंत मेकींग, dispatches सुरू होते.. खुप छान वाटतंय. सगळ्यांचेच आभार.
जरबेरा प्रचि फारच सूंदर आहे.
Pages