Halloween Party साठी कल्पना सुचवा

Submitted by रीया on 5 October, 2021 - 10:39

मला halloween का साजरा केला जातो त्याबद्दल माझ्या एका क्लाइन्ट ने माहिती दिली होती की त्यांच्यामध्ये असं समजलं जातं की 31 oct या दिवशी सगळी भुतं पृथ्वीवर येतात, त्यांना आपण माणूस म्हणून ओळखू येऊ नये म्हणून किंवा त्यांच्या स्वागतासाठी म्हणून इथेही सगळे भुतासारखे ड्रेस अप होतात. माझ्या या कलीगच्या म्हणण्यानुसार कार्टून character किंवा फेअरी वगैरे बनण्याचं फॅड नंतर आलं. खरी कन्सेप्ट भूत बनणे हीच आहे. मी त्याच्या म्हणण्यावर ब्लाईंड विश्वास ठेवत पुन्हा जास्त माहिती काढायचा प्रयत्न केला नाही. मला बऱ्याच गोष्टी लॉजीकली पटल्या नाहीत but hey, who needs logic to have fun??

मी अमेरिकेत असते तेंव्हा आवर्जून भारतीय सण साजरे करते तशी आता भारतात आहे तर आवर्जून तिथले गमतीशीर सण इथेही साजरे करावेत आणि अनायासे यावर्षी halloween रविवारी आलाच आहे तर छोटी पार्टी ठेवावी असा विचार केला.

जरी मी पार्टी म्हणतेय तरी त्याचं स्वरूप म्हणजे नेहमी घरी येणारी 4 टाळकी ड्रेस अप होऊन जमणे , खाणे - पिणे आणि नाचणे एवढं च आहे.

माझ्या मुलाने ने आमच्यासाठी कॉस्युम ऑलरेडी ठरवला आहे पुढील प्रमाणे -
तो स्वतः डायनोसॉर बनणार आहे, मी विच बनायचं आहे, त्याची मावशी नर्स बनणार आहे, त्याची आजी टूथ फेअरी बनणार आहे आणि त्याचे आजोबा ब्लिपी बनणार आहेत.

तर spooky पण नॉन स्केरी आयडिया द्या. डेकोरेशन, स्नॅक्स काय ठेवता येतील, गाणी कोणती लावता येतील वगैरे वगैरे...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खरे भोपळे लावण्या एवजी कट आउट तयार करा पेपर चे आणी त्यामागे लाईट लावा..
खाण्या साठी बिस्किट वर क्रीम च्या मदतीने स्पूकी डिज़ाइन बनवू शकता..
क्रीम रोल आणुन त्याला jam थोडा पातळ करुन लावून कट झालेले बोट तयार करु शकता.

मागे एक धागा काढलेला. ईथले प्रतिसाद कामाला येतात का वाचून घ्या. कदाचित काही क्लिक होईल.

हॅपी हेलोवीन डे - कसा साजरा करतात?
https://www.maayboli.com/node/77154

आणि हो, माझीही या धाग्यावर नजर आहे, काही कल्पना आल्या तर मलाही त्या हवेच आहेत. गेल्यावेळी मी हॅलोवीन झाल्यावर धागा काढलेला. यावेळी आधीच काहीतरी छान आयड्या मिळाली तर आम्हालाही करता येईल. त्यासाठी गरजेची भुतं आमच्याकडे ऑलरेडी आहेत Happy

ते फॅन्सी चित्रविचित्र चेहर्‍याचे सेल्फी निघणारे मोबाईल अ‍ॅप असते. त्यातून आपले भयानक फोटो काढून त्याच्या कलर प्रिंट घेऊन ते घरभर चिकटवून, लटकवून डेकोरेशनला वापरता येईल.
अर्थात मी अमेरीकेची पायरी न चढल्याने मला या हॅलोवीनच्या नियमांबद्दल कल्पना नाही. फक्त डरावणे काहीतरी असते ईतकेच माहीत आहे.

आमच्याकडे सध्या बायकोचे केक फॉर्मला असल्याने तिला हॅलोवीन थीम वाला केक बनवायला सांगू शकतो. तसेही केकसाठी लागणारे सामान कपाट भरभरून घरात पडून आहेच. त्यामुळे त्यात जास्त खर्चा नाही.

सध्या अचानक सोसायटीत कोविडने धुमाकूल घातलाय, त्या नादात नवरात्र झोपली आहे. हॅलोवीनपर्यंत परीस्थिती न सुधारल्यास पोरं गोळा करून पार्टी तर यंदा शक्य होणार नाही. अन्यथा पोरांची चार टाळकी जमली तर मजा येते पार्टीला.

Usual घीसापीटा - https://youtu.be/sOnqjkJTMaA?t=287
देशी - https://youtu.be/urv1wNwiinc
https://youtu.be/PkgStlsVaqw
ओरिजिनीलः https://youtu.be/QnbNtCl170k
रिमिक्सः https://youtu.be/c1pusVyxqc8
कशाला!!: https://youtu.be/5GRbUnw64W0
अजून आठवतील तशी अपडेट करते...

ड्रेस अप आयडिया: स्क्विड गेम मधला लाल आणि काळा मुखवटावाला ड्रेस.
कुकी: स्क्विडगेम फेम कॅरॅमलाईज्ड शुगर करुन गोल, त्रिकोण,चौकोन, छत्री शेपच्या कुक्या.
यावर्षी हे दोन्ही नक्की सुपर हिट होणार बघा!

स्क्विड गेम मधला लाल आणि काळा मुखवटावाला ड्रेस.>> यप्प मुखवटॅ फ्रंट मॅनचा व गोल चौकोन त्रिकोण उपलब्ध आहेत अमेझॉन वर. मी पण
का ळा टीशर्ट ऑर्डर नेला आहे. शनिवारी येइल. सोमवारी ऑफिसात घालेन . टीशर्ट वर फक्त ते गोल चौकोन त्रिकोण आहे. एक्साइटेड.

तुमचा नंबर कुठला? मी २ १८

अमितव स्पेस एक्ष चे फॅन असाल तर स्पेस एक्स वेब साइट वर त्यांचे शॉप आहे व तिथे पार बेबी वन्सी पासून बॅजेस त टीशर्ट उपलब्ध आहेत.
इन्स्पिरेशन फोर क्रु मेंबर म्हणून कॉसप्ले कर ता येइल.

https://www.amazon.in/s?k=squid+game+merc&ref=nb_sb_noss_2

त्या काळ्या मुखवट्यांचीच किंमत हजाराच्या वर आहे. टीशर्ट वगैरे पुन्हा वापरता येतात. मुखवटे एकदा हौस केली की झाले. हजार बाराशे महाग वाटत आहेत.

हो. पण घरी बनवता येईल की सहज.
काळा भोकाभोकांचा बनियन ( किंवा काय आणखी बरं मिळेल ते कापड घ्यायचं) आणि चौकोन काढायचा. झालं.